Wednesday, June 30, 2021

इंजिनियरिंग कॉलेज विद्यार्थी चे शुल्क कमी केल्यामुळे वीस हजार मुलांना लाभ,दिल्याबद्दल सरकार चे अभिनंदनअन्य कॉलेज बाबतीत लवकर निर्णय घ्यावा - प्रशांत बोरकर

इंजिनियरिंग कॉलेज विद्यार्थी चे शुल्क कमी केल्यामुळे वीस हजार मुलांना लाभ,दिल्याबद्दल सरकार चे अभिनंदन
अन्य कॉलेज बाबतीत लवकर निर्णय घ्यावा  - प्रशांत बोरकर
मुंबई=जळगाव=
महाराष्ट्र सरकारने या संदर्भात आज शासकीय  इंजिनिअिंगचे शुल्क सोळा हजार पाचशे रुपये प्रति विद्यार्थी बाबत तसेच जिमखाना शुल्क कमी केले आहे  त्यामुळे विसं हजार विद्यार्थी वरगाला दिलासा मिळणार आहे
श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय यांना गेले वर्ष भरापासून शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा आणि फी माफ करावी अशी मागणी केली आहे तसेच चार जून रोजी उपोषणाचा इशारा दिला होता 
मुख्य मंत्री कार्यालयाने याबाबत दोन मिनिटात उत्तराचा ईमेल श्री प्रशांत बोरकर यांना करून उच्च शिक्षणाच्या मंत्रालयाकडे पाठविले होते  केवळ इंजिनियरनिग अभ्यासक्रम बाबतीत निर्णय घेण्यात आला आहे तो इतर अभ्यासक्रम बाबतीत निर्णय घेण्यात यावेत अशी मागणी श्री बोरकर यांनी केली  आहे,
  तसेच  संस्था आणि खाजगी  संस्था यांना  तसेच अन्य सर्व प्रकारच्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत सर्व प्रकारच्या अनुदान आणि शिश्यवूर्ती चा  आढावा घेवून सर्वांना  मोफत शिक्षण देण्याचा आदेश देवून लोकांना मारामारीत दिलासा द्यावा ही अपेक्षा मानवी हक्क कार्यकर्ता मुक्त पत्रकार श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र आणि उच्च शिक्षण  मंत्री यांना केली आहे

Wednesday, June 2, 2021

*भेंडी :- आरोग्याचे पॉवर हाऊस!* खूप माहितीपूर्ण लेख



*भेंडी :- आरोग्याचे  पॉवर हाऊस!*

माणसाच्या ५० टक्के आजाराला त्याचे पोट कारणीभूत असते.
 *पोट नीट असलं की स्वास्थ्य आलबेल राहू शकते. त्यासाठी एक साधी भाजी महत्त्वपूर्ण कार्य करते ती म्हणजे शेंगेसारखी दिसणारी भेंडी ही भाजी होय. भेंडीच्या आत चविष्ट बिया असतात पण जाडसर, पारदर्शक द्रव असतो. काहींना ती आवडत नाही. पण तुमच्या पोटाचे विकार विशेषतः बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीच्या त्रासांवर भेंडी उत्तम इलाज असल्याचे आढळले आहे. या भाजीचा नियमित खुराक पचनेंद्रियांच्या कार्यासाठी लाभदायक ठरतो.*

*अमेरिकन युनिव्हर्सिटीतील* एक संशोधक  डॉ. सिल्विया  यांच्या नोंदणीनुसार भेंडीची भाजी ही विविध अन्नद्रव्यांचे पॉवर हाऊस आहे. 
त्यातील अर्धा हिस्सा गम आणि पेक्टिनच्या धाग्याच्या रुपात असतो. त्यातील विद्राव्य तंतूमय अन्नामुळे रक्तातला कोलेस्टरॉल कमी होतो, 
तसेच हृदयविकार मंदावतात. जो अतिद्रव्य तंतूमय चोथा असतो तो पचनेंद्रियाचा मार्ग मोकळा ठेवण्यास हातभार लावतो. 
भेंडी सतत खाल्ल्याने आतड्याच्या कर्करोगापासून आपली सुटका होते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठीसुद्धा या भाजीचा हातभार लागतो.

या भाजीत बी-६ हे जीवनसत्त्व तसेच शरीराला उपयुक्त असे फॉलिक आम्लदेखील मुबलक असते. 
शिजविलेल्या अर्धा कप भाजीत खालीलप्रमाणे अन्नसाठा असतो: कॅलरीज – २५ तंतूमय अन्न – २ ग्रॅम प्रथिने – १.५ ग्रॅम कार्बोहायड्रेटस् – ५.८ ग्रॅम जीवनसत्त्व अ – ४६९ युनिट जीवनसत्त्व क – १३ मिलीग्रॅम फॉलिक आम्ल – ३६.५ मिलीग्रॅम लोह – ०.४ मिलीग्रॅम पोटॅशियम – २५६ मिलीग्रॅम मॅग्नेशियम – ४६ मिलीग्रॅम भेंडीतील पातळ, 
*चिकट द्रव्यामुळे आतड्यातील साखरेचे शोषण कमी होते व रक्तात वाढणार्‍या साखरेचे प्रमाण रोखले जाते.*

भेंडीतली जीव रसायने कोलेस्टरॉलच्या नव्हे तर यकृतरसातील विषारी पदार्थाशी परमाणूशी संयोग पावतात व शरीराबाहेर टाकण्यास सहाय्य करतात. भेंडीतील तंतूमय भाग *बद्धकोष्ठता रोखतो.*

हे तंतू मऊ असल्यामुळे अन्य कठीण वनस्पतीज तंतूप्रमाणे ते आतड्याच्या आतल्या मऊ मांसल थरांना ओरखडे पाडीत नाहीत. त्याच्या घसरट गुणधर्मामुळे न पचलेल्या अन्नाचा घन भाग मोठ्या आतड्यातून सहज निसटत गुदद्वारामार्गे शरीराबाहेर पडतो.
शरीराच्या स्वास्थ्याला पोषक ठरणार्‍या जीवाणूच्या वाढीस ही भाजी हातभार लावते. *अशक्तपणा, थकवा व मानसिक तणाव घालविण्यासाठी ही भाजी खुप उपयोगी पडते. फुफ्फुसाला होणारे संसर्ग, गळ्याचे विकार, खाज यासाठी सुद्धा उपाय म्हणून भेंडीची भाजी लागू पडते.*
 या सर्व प्राप्तीसाठी भेंडीची भाजी अर्धवट उकळवून खाल्लेली बरी असा सल्ला दिला जातो.

विशेष चव तसेच चिकट आणि बुळबीळत गुणधर्मामुळे भेंडीची भाजी पाहिली की, अनेकजण नाक मुरडतात. पण, भेंडी या फळभाजीत अनेक पोषण तत्वे असून, नियमित भेंडीचे सेवन केल्यास कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव होतो.
*भेंडी ही फळभाजी आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे.* 

भेंडीमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आणि प्रोटीन्स असतात. शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्यासाठी आवश्यक असलेले वसा, रेशा, कार्बोहाइड्रेट, कैल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम यासारखे जीवनसत्वे भेंडीमध्ये आहेत.
भेंडी कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव करते. 
*आपल्या शरीरातील विषारी सत्वे नष्ट करण्याचे काम भेंडी करते.*

भेंडीत असलेले यूगेनॉलमुळे डायबिटीस या आजारापासून बचाव होतो. तर, यातील फाइबर रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.
ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांनी नियमीत भेंडीचा आहार घ्यावा. 
*भेंडीत असलेल्या फायबरमुळे आपल्या शरीरातील कॅलरी वाढत नाही आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते.*

भेंडी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यात व्हिटामीन सी हे जीवनस्तव असते. हे आपली इम्यूनीटी सिस्टमला ताकद वाढवून खोकला आणि थंडी पासून बचाव करते. तर, 
*यातील व्हिटामीन ए हे जीवनसत्व डोळ्यांना निरोगी ठेवते.*


*भेंडीचे १० फायदे:*

हिरव्या भाज्यांमध्ये आपले एक वेगळे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगरसुध्दा म्हटले जाते. भेंडी ही अनेकांच्या आवडीच्या भाज्यांमधील एक आहे, तर काही लोकांना भेंडी बिलकुल आवडत नाही. परंतु भेंडी खाल्याने कोणते फायदे आणि नुकसान होतात हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत नसतील तर नक्की वाचा हे १० फायदे:

*१. कँसर* -भेंडी आपल्या आहारा नियमित घेतल्याने तुम्ही कँसरला दूर ठेवु शकता. कोलन कँसरला दूर ठेवण्यासाठी भेंडी खास फायदेशीर आहे. ही आतड्यांतील विषारी तत्त्व बाहेर काढण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आतडे स्वस्थ राहतात आणि चांगल्या प्रकारे काम करता.

*२. हृदय*
भेंडी हृदयाला सुध्दा चांगले ठेवते. यामध्ये असलेले पैक्टिन, कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात, यासोबतच यामध्ये असणारा घुलनशील फायबर, रक्त आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतो. ज्यामुळे हृदय रोगाचा धोका कमी होतो.

*३. डायबिटीस*
यामध्ये असणारे यूगेनॉल, डायबिटीससाठी खुप फायदेशीर ठरते. हे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासुन थांबवते, ज्यामुळे डायबिटीसचा धोका कमी होतो.

*४. अनीमिया*
भेंडी अनिमियासाठी खुप फायदेशीर असते. यामध्ये असलेले आयर्न हीमोग्लोबिन निर्माण करण्यात सहायक असतात. हे रक्त स्त्राव थांबवण्याचे काम करते.

*५. पचनतंत्र*
भेंडी ही भरपुर फायबर असलेली भाजी आहे. यामध्ये असलेले फायबर पचनतंत्रासाठी फायदेशीर आहे. यामुळे गॅस, बध्दकोष्ट आणि पोट दुखी यासारख्या समस्या होत नाही.

*६. हाडांना मजबुत बनवते*
भेंडीमध्ये असणारे सर्व पदार्थ हाडांसाठी उपयोगी असतात. यामध्ये मिळणारे व्हिटॅमिन के हाडांना मजबुत बनवण्याचे कार्य करते.

*७. इम्यून सिस्टम*
भेंडीमध्ये व्हिटॅमिन-सी सोबतच अँटीऑक्सीडेंसही मोठ्या प्रमाणात असते. यामुळे हे इम्यून सिस्टमला मजबुत बनवुन शरीरातील आजारांपासुन लढण्यास मदत करते. भेंडीला रोजच्या जेवनात घेतल्याने अनेक आजार जसे की, खोकला, सर्दी यांसारख्या समस्या होत नाही.

*८. डोळ्यांचा प्रकाश*
भेंडीमध्ये व्हिटॅमिन-ए, बीटा केरोटीन आणि अँटी-ऑक्सीडेंट्स असतात. नेत्रहिनतेसाठी जे कण हानीकारक असतात त्यांना नष्ट करण्याचे काम भेंडी करते. भेंडी मोती बिंदुपासून दुर ठेवते.

*९. गर्भावस्था*
गर्भावस्थेमध्ये भेंडीचे सेवन फायदेशीर असते. भेंडीमध्ये फोटेल नावाचे एक पोषक तत्त्व असते, जे भ्रूणाच्या मेंदुचा विकास करण्यात महत्त्व पुर्ण भुमिका बजावते. या व्यतिरीक्त भेंडीत अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
*१०. वजन कमी करण्यासाठी*
भेंडी आपले वजन कमी करण्यासोबत त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते. भेंडीचा उपयोग केसांना सुंदर, दाट आणि चमकदार करण्यासाठी केला जातो. यामधील पदार्थांना लिंबु सोबत मिसळुन शांपु प्रमाणे वापरता येऊ शकते.
ज्यांनी ही माहिती लीहली आहे त्याला आमचा सलाम

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...