Saturday, September 26, 2020

शेतकरी व्यथा, वायरल कविता,,

मुंग गेले उडीद गेले कपाशी न केली बोम 🙏
काय करू देवा आता सोयाबीनला पण आले कोम 🙏
फाटकं धोतर फाटक खेटर तरी कर्ज काढून पेरलं 🙏
दोन घास भाकरीसाठी लेकराले माग सारल 🙏
लय पाणी झाला 
शासन करतो बोम 🙏
काय करू देवा आता 
सोयाबीन आले कोम 🙏
निसर्ग हा लहरी शासनही 
मोठेच खोटे 🙏
गरीब माझा शेतकरी
 त्याला कोण तारी🙏 
पाण्यामुळे जळून गेलं
 भुईमुगाच थोम 🙏
काय करू देवा आता 
सोयाबीनला आले कोम🙏
#महाराष्ट्रतील महापूर
 मीडिया ला काही दिसेना🙏
#सुशांतसिंग व कंगना 
शिवाय त्यांना काही सुचेना🙏 l

🙏🙏👆 कवि 👍  एक  नाव  माहित  नसले ला  कवि 😭😭😭😭😭😭😭😭🤔✍️
✍️

Friday, September 18, 2020

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्ज चक्रव्युहामधून महिलांना बाहेर काढण्यासाठी राज्यस्तरिय अभ्यासगट नियुक्त

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
 
 ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या (मायक्रो फ़ायनान्स कंपन्यांच्या) कर्ज चक्रव्युहामध्ये अडकलेल्या महिलांना त्यामधून बाहेर काढणे तसेच महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता एक राज्यस्तरिय अभ्यासगट नियुक्त करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. हा अभ्यासगट पुढील तीन महिन्यात अभ्यास करुन किमान अंतरिम अहवाल सादर करेल. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यात ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटातील महिलांना बॅकेकडून कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अनेक महिला सुक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था (मायक्रो फ़ायनान्स कंपनी) यांच्याकडून कर्ज घेतात असे निदर्शनास आले आहे. वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या (मायक्रो फ़ायनान्स कंपन्यांच्या) कर्ज चक्रव्युहात या महिला हळहळू अडकत जातात व त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर परिणाम होता. याबाबत अभ्यास करण्यासाठी तसेच महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना सूचविण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुनेश्वरी एस., धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वनमती सी., रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखर या सदस्यपदी आहेत. तर लक्ष्य प्रतिष्ठान (अमरावती)च्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे, राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्ष (राजगुरुनगर, जि. पुणे) विजयाताई शिंदे, लोकप्रतिष्ठान (उस्मानाबाद) च्या सचिव डॉ. स्मिता अभय शहापुरकर, स्वयंसिद्धाच्या (कोल्हापूर) संचालिका श्रीमती कांचन बाळकृष्ण परुळेकर या अशासकीय सदस्य आहेत. तर उमेद अभियानाच्या अतिरिक्त संचालक मानसी बोरकर ह्या या समितीच्या सदस्य सचिव आहेत.

राज्यातील महिलांना सुक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था (मायक्रो फ़ायनान्स कंपन्या) या जादा व्याजाने  कर्ज देऊन त्यांना आपल्या चक्रव्युहात अडकवत आहेत. त्यामधून महिलांना बाहेर काढण्यासाठी तसेच महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना सुचविण्याचा या अभ्यासगटाचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत निर्माण झालेल्या स्वयंसहाय्यता गटातील महिला ह्या सुक्ष्म वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचे (मायक्रो फ़ायनान्स कंपन्यांचे) कर्ज घेऊन त्यांच्या चक्रव्युहात अडकल्या आहेत किंवा कसे याचा सखोल अभ्यास करणे, सुक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था (मायक्रो फ़ायनान्स कंपन्या) यांच्याकडून महिलांनी कर्ज घेण्याची कारणे, व्याजाचा दर, कर्ज वितरणाची पध्दती, कर्जाचा वापर, कर्ज वसुली पध्दत, कर्जवसुली वेळेवर न होण्याची कारणे व या सर्व बाबींचा ग्रामीण महिलांच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची व्याप्ती, राज्यात अभियान कितपत यशस्वी झाले, अभियानांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध होते किंवा कसे, विपणनाची पध्दत याबाबत अभ्यास करणे तसेच अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही सुधारणा आवश्यक असल्यास त्या सुचविणे यावरही समिती काम करणार आहे.

राज्यस्तरीय अभ्यासगट अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार उपगट निर्माण करुन ते उपगट विविध जिल्ह्यांना भेटी देतील. राज्यातील महिलांशी चर्चा करुन त्यांच्या आर्थिक समस्या जाणून घेतील. महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे अध्यक्ष व महासंचालक यांच्यासोबत चर्चा करुन त्याच्याकडील स्वयंसहाय्यता गटाची कार्यपध्दती, त्यांचे उत्पादने आणि त्यांचे विपणन याबाबत महिती घेतील. सदर अभ्यासगट हा फक्त महिलांच्या आर्थिक अडचणी, त्यावर उपाययोजना यासाठी असून मायक्रोफायनान्सच्या कर्जमाफीसाठी नाही, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

Friday, September 11, 2020

इन्शुरन्स पॉलिसी# बिमा पर का GST जीएसटी हठणा* चाहिए प्रशांत बोरकर जी की मांग

*अपने ओर अपने परिवार के भविष्य ओर स्वास्थ  के लिये सरकार की योजना का लाभ ना लेकरं बलकी मेडिकल पॉलिसी खरी द कर किंमत देनेवाले को कैसा टॅक्स ,,लगान एनसनियत के खिलाफ हे

👍इन्शुरन्स पॉलिसी बिमा पर का gst हठणा* चाहिए   करोडो लोगोको राहत देणे समाजसेवी श्री प्रशांत बोरकर जी की अपील       👌👌                   
 

,Gst एक जुलाई १७se बीमा महगा हो  गया ,१८ % टक,,,,,पर कोई भी इसपर ध्यान नहीं दे रहा है,,,बीमा ये नुकसान भरपाई का तत्व है। उसपर क टैक्स नही gcलेना चाहिए,,,टैक्स सेविंग्स से ही जादातर लोग बीमा लेते है,, अपने निजी सांसद विदायक नेता को मिल के निवेदन दे और बीमा पर का पूरा टैक्स हटाने की मांग करे,,,, बीमा ग्राहक भी अपने तरीके से  इसका विरोध करे,,,,कौकि बीमा जो चीज है जो कंपनिया सरकार का काम कर रही है,, एक प्रकार सहारा दे रही है,,,जड़ तर privete बीमा कंपनियां loss मैं है वो तो बोनस भी नही दे सकती,,,और lic तो पुरा पैस्सा govt सरकार को दे देती है,,,इसलिए इसमे सरकार का काम सुलभ कर रहि है,,देश मैं कोई बड़ा संकट आया तो उसकी भरपाई बीमा कंपनी ही करती है,सरकार की जिम्मेदारी बीमा कपनी उठाती ही,,,,उल्टा बीमा कंपनी  ग्राहक को ज्यादा से ज्यादा करसवलत दे कर उन्हें स्वावलंबी कर सकती है सरकार,,कोई भी बीमा पर टैक्स लेना नैतिकता की दृष्टि से बराबर नही है,,,जी जो अपनी मरने के बाद का कफन और बेसहआरा बीबी बचो का बदोबस्त करता है उन्हें टैक्स जे बोझ तले दबाना कैसे जा यस है,,,,में तबीमा परओरो सेवा कर से विरूद्ध लेख लिख रहहु पर को ही  साथ नही द्व रहा,,,देखे,, मानवता के प्रतीक बीमा को कर के च्रक वुह से कोंन बचाता है,,bimaपर कर टैक्स लेना बीमारी संकट को आमंत्रण देना है,,लोगोका जीने का, सुरक्षिततेसाठी का अधिकार पर आक्रमण है,🙏🏼🙏🏼👉🏻🤞🏼 *,प्रशान्त बोरकर* मुक्त पत्रकार,ग्राहक हक्क मानवी हक्क संविधान अभ्यासक,, सेवानिृत्त एजन्सी मॅनेजर बिर्ला sanlife , रावेर🙏🙏 9403652599

21जून 2018 फेसबुक पोस्ट, सर्व्हिस टॅक्स के बारेमे 2013 से पोस्ट ,GST हटाव की सबसे पहले करणे वाले आर्थिक सलाहकार श्री प्रशात बोरकर जी बिमा के क्षेत्र मे कई  समस्या पर आवाज उठाकर बिमा ग्राहक ओर विमा अजेंत को न्याय दिलवा दिया हे,,,

कान,नाक,घसा संबधी काही आजार आहे का..? ....तर मग उशीर करू नका आजच डॉ उल्हास पाटील हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी व शस्त्रक्रिया करून घ्या.अधिक माहितीसाठी संपर्क :-9422583795


महाराष्ट्र बॅड कलाकार उत्कर्ष संघटना यांच्या माध्यमातूनपालकमंत्री तसेच अनेक नेत्यांना निवेदन सादर करून चर्चा

सावदा ,महाराष्ट्र बॅड कलाकार उत्कर्ष संघटना यांच्या माध्यमातून मागील आठवड्यात रावेर तालुक्यातील सावदा येथे घेण्यात आलेल्या मिटींगला जो ठराव झाला होता त्या अनुषंगाने आज रावेर,   यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी श्री बबन बडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 11 रोजी शुक्रवारी सकाळी 10 वाजता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांना आज निवेदन सादर केले त्यांनी निवेदन स्वीकारले व आवर्जुन सांगितले की मी तुमचा हा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती उपाययोजना केल्या शिवाय राहणार नाही. त्यावेळी रावेर मुक्ताईनगर व यावल तालुक्यातील उपविभागीय उपाध्यक्ष श्री राजू बोरसे तसेच जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मास्टर शेख रफी , रावेर तालुका अध्यक्ष श्री नीरज सोनवणे , आतिष केदारे व किशोर लोखंडे यांची सुद्धा उपस्थिती होती. 
नंतर पाळधी येथिल भेट घेतल्यानंतर जळगाव ला आले असताना मा. उपजिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली तसेच मा श्री गिरीश महाजन , श्री उमेशदादा पाटील , श्रीमती रक्षाताई खडसे यांनाही निवेदन देऊन त्यांच्या माध्यमातून सुध्दा आपल्या कामाची दखल घेतली जाणार आहे असे सर्वांनी मिळून आश्वासन दिले आहे. व ते आपल्या कार्याचा पाठपुरावा करून दुर्गादेवी उत्सवाच्या वेळे पर्यंत तुम्हाला परवानगी देण्यात येईल अशी आम्ही योजना करणार आहे असे श्री गिरीश महाजन यांनी सांगितले

Monday, September 7, 2020

महसूल रचनेत लोकाभिमुख बदल करताना सातबाराही नवीन स्वरूपात देण्याचा निर्णय

सातबारात आता युनिक कोड, वॉटर मार्क, लोगो, क्यूआर कोड
सातबा-यातील बदलांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल
                    - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
 
        महसूल रचनेत लोकाभिमुख बदल करताना सातबाराही नवीन स्वरूपात देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे सातबा-यात बारा प्रकारचे बदल होत असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

        महसूल नोंदीमध्ये अधिक पारदर्शकता, स्पष्टता व अचूकता आणण्यासाठी व नागरिकांचे हित जोपासले जावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. शासनाकडून यापूर्वीच ऑनलाईन सातबा-याची प्रक्रियाही जोरदारपणे राबविण्यात आली आहे. जिल्ह्यातही सातबा-याचे जवळजवळ 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. ऑनलाईन सातबारा सुविधा प्रक्रियेतील अभिलेखिकरण, डिजीटल स्वाक्षरी आदी तांत्रिक बाजू आदी काम पूर्ण झाले असून, जलदगतीने व सुलभरीत्या अचूक नोंदीसह डिजीटल स्वाक्षरीसह सातबारा मिळण्यास मदत होत आहे. आता राज्यात जवळजवळ आठ दशकानंतर नवी महसूल रचना अंमलात आणण्याचा शासनाचा निर्णय आहे.

         त्यानुसार आता सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड असणार आहे. अनेक उता-यांमध्ये क्षेत्र न जुळण्यासारख्या अडचणी असतात. त्या यामुळे दूर होणार आहेत. लागवडीसाठी योग्य व पोटखराबा क्षेत्राचा उल्लेखही त्यात असणार आहे. त्यामुळे महसूलविषयक वादांचे प्रमाणही कमी होईल व पारदर्शकता वाढेल, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

          महसूल विभागामार्फत महाराष्ट्रातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पद्धतीत बदल करण्यात आल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांनी दिली. त्या म्हणाल्या की, ब्रिटीश सरकारच्या काळात एम.जी. हार्टनेल अँडरसन यांनी तयार केलेल्या मॅन्युअलमध्ये एम.जे.देसाई यांनी सुधारणा केल्या होत्या. हा बदल 1941 मध्ये झाला होता. त्यानंतर आता जवळपास 8 दशकांनंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येत असून सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. 

        यापुढे आता प्रत्येक गाव आणि खातेदाराला स्वतंत्र कोड क्रमांक देण्यासोबत गाव नमुना नंबर 7 अधिकार अभिलेख पत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गाव नमुना नंबर 7‍ मध्ये गावाच्या नावासोबत एलजीडी (Local Government Directory) स्थानिक शासनाचा कोड दर्शविण्यात येणार आहेत. याशिवाय लागवडयोग्य आणि पोटखराबा क्षेत्राचे एकूण क्षेत्र यापुढे दर्शविले जाणार आहे. सध्या अनेक उताऱ्यांमध्ये त्यांचे क्षेत्र जुळत नाही मात्र आता अशी अडचण येणार नाही. हेक्टर, आरसोबत अकृषक उताऱ्यावर चौरसमीटर नोंदले जाणार आहे. इतर हक्काच्या रकान्यात खातेदारांचे क्रमांक युनिक क्रमांकासह नोंदले जातील.सातबारा उताऱ्यातील नव्या बदलामुळे राज्यातील जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन जमीन महसूलविषयक वाद कमी होण्यास मदत होईल, असेही श्रीमती कनिचे यांनी सांगितले.

00000

सावदा मध्ये स्वस्त ओषधी चे दुकान घनश्याम जी महाराज व अनिलभाऊ चोधरी यांचे हस्ते शुभारंभ

सावदा ता रावेर मध्ये स्वस्त औषधी चे दुकानाचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी फैजपूर येथील घरी जनार्दन महाराज व अनिल भाऊ चौधरी भुसावळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व दिपप्रज्वलन या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे व प्रमुख अतिथी म्हणून या नगरीच्या अनिताताई पंकज येवले नगराध्यक्ष सावदा माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक लोखंडे प्रगतिशील शेतकरी व सन्माननीय कार्यकर्ते डॉक्टर उपस्थित होते 

भाजप चे धडाडीचे कार्यकर्ते श्री नितिन पाटील यांची तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड

रावेर चे भाजप कार्यकते श्री नितिन पाटील यांची निवड भाजप रावेर तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी करण्यात आली असून त्यांना त्या निवडीचे पत्र भाजप चे जेष्ठ नेते सुरेश धनके यांचे हस्ते देण्यात आले
 यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन तालुका अध्यक्ष लासुरकर, सरचिटणीस सी एस पाटील ,प्रविण पाचपोहे, कैलाश पारधी शहाणे  आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नितीन पाटील यांचे सर्वांनी अभिनंदन केले
 तरुण तडफदार तर्फे ही त्यांचे अभिनंदन, 
त्याचे निवडीबद्दल  पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला,,

Wednesday, September 2, 2020

आज पासून राज्यात रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षण करण्यास सुरुवात

रावेर। 2/9/2020=
आज पासून रावेर रेल्वे स्टेशन हुन  राज्य अंतर्गत प्रवासासाठी आरक्षण सुरू झाले आहे, 
त्यात पसेंजर बंद आहेत तसेच पठाणकोट काशी एक्सप्रेसपण बंद आहे
सकाळी आठ ते चार वाजेच्या  दरम्यान आरक्षण करू शकतात == जनरल तिकीट  बंद  आहे  तरी प्रवसि यांनी आरक्षण करून नियोजन करावे 
माहिती  रेल्वे अधिकारी याचे कडून मिळाली
🙏🙏
रावेर रेल्वे प्रवाशी मित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश पाटील यांना मातृशोक

गं.भा. वनरसीबाई आनंदा पाटील  केऱ्हाळे बु,  वय 89 यांचे दि. 31/08/2020 सोमवार रोजी 12वाजता वृद्ध काळाने निधन झाले. केऱ्हाळे बु, ता. रावेर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ पदाधिकारी प्रकाश पाटील यांच्या  त्या मातोश्री होत्या.
🙏🙏🙏
तरुण तडफदार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Tuesday, September 1, 2020

नाथाभाऊ ना वाढदिवसाच्या शुभेच्छा,🙏🙏 सावदा फेजपुर मध्ये विविध कार्यक्रम आयोजित👍नन्दाबाई लोखंडे नगरसेविका

सावदा, माजी महसूलमंत्री माजी विरोधी पक्षनेते श्री एकनाथराव खडसे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा💐💐
सावदा भाजप तर्फे आज बिविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे त्यात फेजपुर येथील कोविड सेंटर मध्ये आज सकाळी नऊ वाजता फळवाटप चा कार्यक्रम नगरसेविका नंदाबाई लोखंडे,सावदा शहराचे अध्यक्ष पराग पाटील भारतीय जनता पार्टी  गजु भाऊ लोखंडे जितेंद्र भारंबे संजू भाऊ चौधरी राहुल पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे  पदाधिकारी पंकज भाऊ येवले सय्यद अजगर विकी भंगाळे आदी असंख्य
 भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे

*🙏💐'सामना'चे हिंगोली प्रतिनिधी योगेश पाटील यांचे हृदयविकाराने निधन*

💥💥एक पत्रकार हरवला,✍️
*🙏💐'सामना'चे हिंगोली प्रतिनिधी योगेश पाटील यांचे हृदयविकाराने निधन*

*'दैनिक सामना'चे हिंगोली येथील जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील यांचे रविवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. ते 41वर्षांचे होते. योगेश पाटील यांच्या आकस्मिक निधनाने पाटील परिवार आणि सामना परिवारावर शोककळा पसरली आहे.*

*योगेश पाटील यांना संभाजीनगर येथील नंदलाल धूत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विलास मगरकर यांच्यासह त्यांची टीम योगेश पाटील यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होती. मात्र पाटील यांची गेली 24 तास सुरू असलेली मृत्यूशी झुंज संपली. योगेश पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी संभाजीनगर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले*

*त्यांच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाचा लहान मुलगा, आई, तीन भाऊ, बहीण असा परिवार आहे. आधी धर्माबाद जिल्हा नांदेड येथील तालुका प्रतिनिधी, नंतर सामना च्या नांदेड कार्यालयात शहर प्रतिनिधी, पुढे उत्तर महाराष्ट्रात जळगाव येथे जिल्हा प्रतिनिधी आणि पुन्हा मराठवाड्यात हिंगोली येथे जिल्हा प्रतिनिधी म्हणून योगेश पाटील यांनी काम केले. अत्यंत सचोटीचे, स्पष्टवक्ते आणि धडाकेबाज पत्रकार असलेल्या योगेश पाटील यांचा नांदेड, जळगाव आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांत दांडगा जनसंपर्क होता.*

 त्यांना तरुण तडफदार पत्रकार ग्रुपमार्फत भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...