Sunday, May 31, 2020

मुख्यमंत्री श्रीउद्धव ठाकरे यांचे दिलासा देणारा संवाद ,, पुनचं हरिओम,,, परीक्षा न घेता पास ,शाळा वातावरण पाहीन निर्णय,, ऑनलाइन अभ्यास साठी तयारी

न्यूज पेपर पण घरी मिळणार पण वाटप करनारे मुलांची काळजी घ्या,,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यापक संवाद
मुंबई,,,🙏, प्रशांत बोरकर यांजकडून तरूण तडफदार टीम🙏
 

उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले की आपण पुनच हरिओम करीत आहोत,,  सकाळी  मॉर्निग वाक ला परवानगी, पण सर्व जबाबदारी पार पडली पाहिजे,,  विविध प्रकारच्या  मुद्दा वर उल्लेख करून सर्वव्यापी माहिती दिली,,, महाराष्ट्र राज्य ला बदनाम करण्याची कृती बद्दल नाराजी व्यक्त केली त्याबरोबर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे मुद्धमून आभार मानले  व राष्ट्रपती राजवट लागू करा पण हे संकट कोण निवारण करणार,,आम्ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गर्क आहात 65 हजार रुग्णांपैकी 28 हजार रुग्ण  बरे होऊन घरी गेले आहेत,,, लोकांना कशी काळजी घ्यावी याबद्दल खुप बारकाईने माहिती दिली कळकळीची भाषा बरोबर  क्रोरोना चे विरोधात कणखरपणा ही भाषणांत दिसून आला,,, 2 लॅब चे 77 प्रयोगशाळा त्यावरून 100 चे वरती नेणार,,,चाचण्यांचे संख्या वाढविणार,,

पाच जून से दुकाने सुरू होगी,, महाराष्ट्र राज्य को बदनाम करणे से दुःख हुवा उध्दव ठाकरे जी ने दुःख जताया, खबरदारी लेने की अपील

Friday, May 29, 2020

दुःखदायक बातमी**प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचं दुःखद निधन



*👉गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली.*
*अहमदाबाद,२९ मे :-प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे आज निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. , बेजान दारुवाला यांचा मुलगा नास्तुर दारुवाला यांनी पत्रकारांना सांगितले की, बेजान दारुवाला यांचा मृत्यू निमोनिया आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला. दारुवाला यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.*
*बेजान दारुवाला हे स्वयंभू गणेश भक्त होते. त्यांनी भारताच्या पंतप्रधान पदावरून भविष्यवाणी केली होती. अटल बिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई आणि नजीकची भविष्यवाणी ही नरेंद्र मोदी यांच्याबाबत होती.याशिवाय त्यांनी राजीव गांधी यांची हत्या, संजय गांधी यांचा अपघात, भोपाळ गॅस दुर्घनेवरही भविष्यवाणी केली होती.*

*ज्योतिष क्षेत्रात त्यांचं कार्य खूप मोठं होतं. त्यांचा जन्म ११ जुलै १९३१ ला झाला होता. पारशी समाजाचे असूनही ते गणपतीचे भक्त होते. पारंपरिक ज्योतिष, पाश्चिमात्य ज्योतिष, टॅरो कार्ड, अंकशास्त्र, हस्तरेखा शास्त्र या विषयांमध्ये त्यांचा गाढा अभ्यास होता. अनेक वृत्तपत्रं, टीव्ही चॅनेल्स यांवर ते भविष्य सांगत. आज अहमदाबादमध्ये एका रुग्णालयात त्यांचं निधन झालं.*

Thursday, May 28, 2020

व्हायरल पोष्ट,, प्रेरणादायी पण ,,ज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी!*

*
जवळच्या पैशातून तिनं एक जुनी, साधी सायकल विकत घेतली. मागं आपल्या आजारी वडलांना बसवलं आणि ती पॅडेल मारू लागली. लॉकडाऊनमुळे घरी जायला काहीच साधन उपलब्ध नसल्याने ज्योती पासवान या १५ वर्षाच्या मुलीनं सायकलवरून सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. आज जग तिचं कौतुक करतंय. पण तिच्या प्रत्येक पॅडेलनं आपल्या समोर एक प्रश्न उभा केलाय. या लाखो प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे आहेत?

कोरोना वायरसचा सामना करण्यासाठी सरकारने संपूर्ण देश लॉकडाऊन केला. पहिल्यांदा १५ दिवसांसाठी जाहीर केलेला लॉकडाऊन आणखी पंधरा, आणखी पंधरा दिवस असं म्हणत चार वेळा वाढला. देशातल्या वेगवेगळ्या शहरात पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्थलांतरित झालेल्या मजुरांच्या राहण्याचा आणि जगण्याचा प्रश्न मात्र या लॉकडाऊनच्या काळात गंभीर बनला.
अचानक लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मजूर सैरभैर झाले. अशावेळी सरकारनं त्यांना आश्वस्त करायला हवं होतं. लॉकडाऊन संपेपर्यंत त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था पहायला हवी. पण सरकारने हात वर केले. धीर सुटलेल्या मजुरांचे तांडे जीवाच्या आकांताने रेल्वे रूळावरून, महामार्गावरून चालतच आपल्या घरी निघाले. हादरवून टाकणारं मजुरांचं हे स्थलांतर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून संपूर्ण देशात चाललंय.

आठ दिवसात बाराशे किमीचा प्रवास

या स्थलांतरितांमधे एक १५ वर्षांची मुलगी होती. हरयाणातल्या सिकंदरपूर भागात ती आणि तिचे वडील अडकले. त्यांना बिहारमधल्या दरभंगा जिल्ह्यातल्या आपल्या गावात जायचं होतं. सिकंदरपूर ते दरभंगा असं गुगलवर टाकलं तर कमीतकमी १३८८ किलोमीटरचं अंतर दाखवलं जातं. एवढा प्रवास तिने साध्या लेडीबर्ड सायकलवरून केला. तोही डबलसीट. आपल्या आजारी वडलांना मागे बसवून आठ दिवसांत तिनं हे अंतर कापलं.
कोरोना वायरस, लॉकडाऊन अशा संकटाच्या परिस्थितीतही हताश न होता तिने धैर्य दाखवलं. त्यामुळे ती सध्या चर्चेचा विषय बनलीय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका यांनीही सोशल मीडियावर तिच्या या कृतीचं ‘असामान्य धैर्याचे सुंदर प्रतिक’ म्हणून गौरव केलाय. २३ मेच्या ‘द इंडियन एक्सप्रेस’ या पेपरच्या पहिल्या पानावर तिचा आणि तिच्या वडलांसोबतचा फोटो छापून आलाय.

लॉकडाऊनमुळे भयानक कोंडी झाली

ज्योतीकुमारी पासवान असं तिचं नाव. वय वर्ष फक्त १५. वडलाचं नाव मोहन. बिहारमधल्या दरभंगा जिल्ह्यातलं सिरहुली हे त्यांचं गाव. आई-वडील भूमिहीन आहेत. पाच भावंडांमधे ज्योती दुसऱ्या नंबरची मुलगी. आता एवढ्या मोठ्या कुटुंबाचं पोट भरायचं म्हणजे पैसे जास्त लागणार. त्यासाठी ज्योतिच्या वडलांनी हरयाणातलं गुरूग्राम हे शहर गाठलं. संपूर्ण देशात हे शहर गुडगाव म्हणून प्रसिद्ध आहे. राजधानी दिल्लीशेजारचं हे शहर आयटी हब म्हणूनही ओळखलं जातं. तिथं ते रिक्षा चालवायचे. ज्योतीची आई अंगणवाडी सेविका आहे आणि उरलेल्या वेळात शेतमजूर म्हणूनही राबत असते.
लॉकडाऊनच्या आधी एका अपघातात ज्योतीच्या वडलांच्या गुडघ्याला दुखापत झाली. ज्योतीची आई १० दिवसांची सुट्टी काढून मुलांना घेऊन गुडगावला पोचली. बीबीसी हिंदीला दिलेल्या एका मुलाखतीत ज्योतीची आई फुलन देवी म्हणते, ‘६० हजार रूपये कर्ज काढून ज्योतिच्या बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन केलं. पण अजूनही ते दुखापतीतून पूर्णपणे बरं होऊ शकले नाहीत. लॉकडाऊनमुळे उपचारही पुरेसे घेता आले नाहीत. मी अंगणवाडीत कामाला असल्यानं मला थांबता येत नव्हतं. म्हणून ज्योतीला वडलांकडे ठेऊन मी बाकी मुलांसोबत गावी परतले.’
वडील आजारी पडल्याने फेब्रुवारीपासून रोजची मिळकत थांबली होती. त्यातच सरकारने साथरोगाला रोखण्यासाठी लॉकडाऊन पुकारला. त्यामुळे ज्योती आणि तिच्या वडलांचं गुडगावला थांबणं आणखी कठीण बनलं.
‘लॉकडाऊनमुळे आमची भयानक कोंडी झाली होती. पैसे संपत आले होते. त्यात घरमालक भाड्याची मागणी करत होते. भाडं देत नसू तर घर मोकळं करायला सांगत होते. एका रात्री तर त्यांनी घराची वीजच तोडली. दोन रात्री आम्ही अंधारात काढल्या. मग मात्र तिथून निघण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याजवळ राहिला नाही,’ असं ज्योती सांगते.
गुडगावमधे मरण्यापेक्षा रस्त्यात मरू

तिच्याकडे जमवलेले काही पैसे होते. त्यातून एक जुनी सायकल घ्यायची आणि गावाला जायचं असं तिनं ठरवलं. सायकलची किंमत होती १२०० रूपये. पण सगळेच्या सगळे पैसे त्यांना दिले तर घरी जाऊन खायचं काय? ज्योतीनं सायकलच्या मालकाला ५०० रूपये दिले आणि बाकी रक्कम पुन्हा गुडगावला आल्यावर देईन, असं वचन दिलं. 
आपण निघायचंय हे ज्योतीनं वडलांना सांगितलं. पण एवढी पायपीट करायला वडील तयार नव्हते. गुडगावमधे मरण्यापेक्षा रस्त्यात मेलो तरी चालेल, असा निश्चयच ज्योतीने केला होता. तिनं जबरदस्तीने वडलांना मागे बसवलं आणि सायकलवर पॅडल मारणं सुरू केलं.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ज्योतीचे वडील मोहन मुलीबद्दल अभिमानाने सांगतात. ‘घरी जाण्याची तळमळ होती. पण कसं जायचं तेच समजत नव्हतं. सुखरूप जाता येईल अशी कोणतीच व्यवस्था दिसत नव्हती. प्रचंड निराश वाटत होतं. पण माझ्या मुलीने हार मानली नाही. मला माहीत नाही तिने हा विचार कसा केला. खरंच ती धीट आहे आणि मला तिचा गर्व वाटतो.’

लोकांच्या हसण्याने मला फरक पडत नाही

८ मेला ज्योतीनं प्रवास चालू केला. एकहाती सायकल चालवत आठ दिवसांनी ती गावात पोचली. तिच्यासाठी हा प्रवास किती खडतर होता याची कल्पना करणं संवेदना गोठवणारं आहे. वाटेत पलवल, आग्रा, मथुरा या आणि इतर ठिकाणी मुक्काम केला. अनेकांनी मदत केली. काही ठिकाणी जेवण मिळालं तर काही ठिकाणी बिस्किटं मिळाली. मिळालेली मदत आनंदाने घेऊन हा पल्ला पार केला.

ज्योती म्हणते, ‘बाप मागे बसलाय आणि मी सायकल चालवतेय हे दृश्य पाहून अनेकजण हसत होते. आपण मागे बसून मुलीला सायकल चालवायला लावतो म्हणून बापाला बोल लावत होते. वडलांना वाईट वाटायचं. ते मला सांगायचे. मला फक्त हसू यायचं. लोकांच्या हसण्याने मला फरक पडत नव्हता. वडलांचं दु:ख मला माहीत होतं.’


लाखो प्रश्न विचारत ती गावी पोचलीय

गावाला पोचल्यावर ज्योती आणि तिच्या वडलांना क्वारंटाईन करण्यात आलं. तिच्या जिगरबाज कर्तृत्वामुळे देशभरातून तिचं कौतुक केलं जातंय. भारतीय सायकल फेडरेशनच्या वतीने सायकल स्पर्धेत सहभाग घेण्याबाबतही तिला विचारणा करण्यात आलीय. तिला मदत करण्याची, तिला पुरस्कार देण्याची, तिचं कौतुक करण्याची आता स्पर्धाच सुरू होईल. पण खरंच तिच्या नजरेला नजर भिडवून तिचं कौतुक करण्याची सरकारची, राजकीय पुढाऱ्यांची नैतिक हिंमत होईल?
ज्योतीच्या साहसाचं आता कौतुक होतंय. पण आपण केलेल्या कृत्याचा तिला खरंच अभिमान वाटत असेल का? ज्योतीने १२०० किमी सायकलने प्रवास करण्याचं धैर्य हौस म्हणून दाखवलं होतं की हा जीवघेणा प्रवास करायला तिला भाग पाडलं गेलं? ज्योतीच्या प्रत्येक पॅडेलमागे या सरकारला विचारलेला एक प्रश्न आहे. असे लाखो प्रश्न विचारत ती तिच्या गावी पोचलीय.
ज्योती आठवीपर्यंतच शिकलीय. तिला पुढे शिकायची इच्छा आहे. पण आर्थिक परिस्थितीमुळे तिला पुढे शिकता येत नाही. अशा हजारो ज्योती, स्थलांतरित मजुरांची हजारो मुलं गावाच्या दिशेने महामार्गावरून, रेल्वे ट्रॅकवरून ऊर फुटेस्तोवर आईवडलांसोबत पळतायत. समृद्ध भारताचं हे बीभत्स रूप ज्योतीनं आठ दिवसांच्या प्रवासात ठिकठिकाणी पाहिलं असणार.
स्वतंत्र भारताला ७५ वर्ष झाली तरी हे जीवघेणे अनुभव लोक घेतायत. अशा लाखो ज्योती पासवान मनाने खचून गेल्या असतील. या देशात आपण असुरक्षित असल्याची भावना प्रबळ झाली तर त्याला जबाबदार कोण? 
*ज्योतीकुमारी पासवानचं तिच्या जिगरबाज साहसाबद्दल कौतुक करण्याऐवजी संपूर्ण देशानं खरंतर तिची माफी मागायला हवी. आपण हे करायला तयार आहोत?*

आज रावेर ला जिल्हाधिकारी यांची भेट,

Tuesday, May 26, 2020

कर्जासाठी अनावश्यक कागदपत्रे मागू नका - अमरावतीपालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

खरीप कर्जवितरणाला गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
पीक कर्जासाठी अनावश्यक कागदपत्रे मागू नकाखरीप कर्जवितरणाला गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

                 -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

       अमरावती--        बँकामधून शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून त्यांची अडवणूक करू नये. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्याव्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्रे मागून शेतकरी बांधवांची अडवणूक केल्यास कठोर कारवाई करू, असा सज्जड इशारा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी बँकांना दिला आहे.
            अमरावती जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2020-21 करिता किसान क्रेडीट कार्डअंतर्गत पीक कर्ज वाटप सुरु आहे. त्याकरिता बँका शेतकऱ्यांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करीत आहेत, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. कोरोना संकटामुळे कृषी क्षेत्र आधीच संकटात सापडले आहे. शेतकरी बांधव अडचणीत आहेत. त्यामुळे शेती क्षेत्रासाठी शासन विविध कल्याणकारी निर्णय घेत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा अद्यापही लाभ न मिळू शकलेल्या पात्र शेतकरी बांधवांना तो मिळवून देण्यासाठी कर्जाची रक्कम शासन व्याजासह भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आगामी खरीपासाठी शेतक-यांना तत्काळ कर्ज मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
           या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीपासाठी कर्ज देण्याची कार्यवाही मुदतीत करावी. आवश्यक तीच कागदपत्रे घेऊन शेतकरी बांधवांना कर्ज मिळवून द्यावे. त्यासाठी त्यांना संपूर्ण सहकार्य करावे.  एकही शेतकरी बांधव पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहता कामा नये. शेतकरी बांधवांची कुठेही अडवणूक होत असल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिला आहे.
          पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाकडून पीक कर्जासाठी लागणा-या कागदपत्रांची यादी जाहीर  करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही यासंबंधी नुकतीच बँकांची बैठक घेऊन विविध निर्देश दिले. त्यानुसार किसान क्रेडीट कार्ड अंतर्गत पिक कर्जाकरिता लागणाऱ्या आवश्यक दस्तऐवजांची विभागणी कर्जाच्या प्रकारावरून निश्चित करण्यात आली आहे. सर्व बँकांच्या सहमतीने हा निर्णय झाला आहे. किसान क्रेडीट कार्डअंतर्गत पीक कर्ज मंजूर करतांना शेतकरी बांधवांकडून अनावश्यक कागदपत्रे मागू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.   
त्यानुसार पीक कर्ज नूतनीकरणासाठी आवश्यक दस्तऐवज आधार कार्ड, सात बारा उतारा व आठ-अ असा आहे. नवीन पीक कर्जाकरिता आधार कार्ड, सात बारा उतारा, आठ-अ, फेरफार, दोन फोटो, जमिनीचा नकाशा (तलाठी यांनी दिलेला हात नकाशा  किंवा तलाठी यांनी जमिनीच्या हद्दी नमूद करून दिलेलाही चालेल), एक लाख साठ हजार रू. च्या वर कर्ज घेतल्यास मॉर्गेज/ ई करार, कायदेशीर तपासणी अहवाल (लीगल सर्च रिपोर्ट- 1लाख60 हजार रूपयांवरील प्रकरणी), तसेच नो ड्युज करीता शंभर रूपये स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.
            स्टॅम्पवर (१०० रु) लेटर ऑफ कंटिन्यूटी आणि प्रति एक लक्ष रूपयांसाठी १०० रूपयांचा बॉण्ड अथवा स्टॅम्प लागेल. सर्व बँकांनी याप्रमाणे नमूद कागदपत्रे पीक कर्ज मंजूर करतेवेळी शेतकऱ्यांकडून घेण्यात यावी. बँकांनी इतर अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये. कोणत्याही बँकांनी असे केल्यास तसेच पीक कर्ज मंजुरीसाठी टाळाटाळ केल्यास शेतकरी बांधवांनी संबंधित तालुक्यातील तहसिलदार, सहाय्यक निबंधक व सहकारी संस्था कार्यालय येथे संपर्क साधावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील  टोल फ्री क्रमांक 1077 वर किंवा 0721-2662025 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000
                 -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

               बँकामधून शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून त्यांची अडवणूक करू नये. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्याव्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्रे मागून शेतकरी बांधवांची अडवणूक केल्यास कठोर कारवाई करू, असा सज्जड इशारा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी बँकांना दिला आहे.
            अमरावती जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2020-21 करिता किसान क्रेडीट कार्डअंतर्गत पीक कर्ज वाटप सुरु आहे. त्याकरिता बँका शेतकऱ्यांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करीत आहेत, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. कोरोना संकटामुळे कृषी क्षेत्र आधीच संकटात सापडले आहे. शेतकरी बांधव अडचणीत आहेत. त्यामुळे शेती क्षेत्रासाठी शासन विविध कल्याणकारी निर्णय घेत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा अद्यापही लाभ न मिळू शकलेल्या पात्र शेतकरी बांधवांना तो मिळवून देण्यासाठी कर्जाची रक्कम शासन व्याजासह भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आगामी खरीपासाठी शेतक-यांना तत्काळ कर्ज मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
           या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीपासाठी कर्ज देण्याची कार्यवाही मुदतीत करावी. आवश्यक तीच कागदपत्रे घेऊन शेतकरी बांधवांना कर्ज मिळवून द्यावे. त्यासाठी त्यांना संपूर्ण सहकार्य करावे.  एकही शेतकरी बांधव पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहता कामा नये. शेतकरी बांधवांची कुठेही अडवणूक होत असल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिला आहे.
          पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाकडून पीक कर्जासाठी लागणा-या कागदपत्रांची यादी जाहीर  करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही यासंबंधी नुकतीच बँकांची बैठक घेऊन विविध निर्देश दिले. त्यानुसार किसान क्रेडीट कार्ड अंतर्गत पिक कर्जाकरिता लागणाऱ्या आवश्यक दस्तऐवजांची विभागणी कर्जाच्या प्रकारावरून निश्चित करण्यात आली आहे. सर्व बँकांच्या सहमतीने हा निर्णय झाला आहे. किसान क्रेडीट कार्डअंतर्गत पीक कर्ज मंजूर करतांना शेतकरी बांधवांकडून अनावश्यक कागदपत्रे मागू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.   
त्यानुसार पीक कर्ज नूतनीकरणासाठी आवश्यक दस्तऐवज आधार कार्ड, सात बारा उतारा व आठ-अ असा आहे. नवीन पीक कर्जाकरिता आधार कार्ड, सात बारा उतारा, आठ-अ, फेरफार, दोन फोटो, जमिनीचा नकाशा (तलाठी यांनी दिलेला हात नकाशा  किंवा तलाठी यांनी जमिनीच्या हद्दी नमूद करून दिलेलाही चालेल), एक लाख साठ हजार रू. च्या वर कर्ज घेतल्यास मॉर्गेज/ ई करार, कायदेशीर तपासणी अहवाल (लीगल सर्च रिपोर्ट- 1लाख60 हजार रूपयांवरील प्रकरणी), तसेच नो ड्युज करीता शंभर रूपये स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.
            स्टॅम्पवर (१०० रु) लेटर ऑफ कंटिन्यूटी आणि प्रति एक लक्ष रूपयांसाठी १०० रूपयांचा बॉण्ड अथवा स्टॅम्प लागेल. सर्व बँकांनी याप्रमाणे नमूद कागदपत्रे पीक कर्ज मंजूर करतेवेळी शेतकऱ्यांकडून घेण्यात यावी. बँकांनी इतर अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये. कोणत्याही बँकांनी असे केल्यास तसेच पीक कर्ज मंजुरीसाठी टाळाटाळ केल्यास शेतकरी बांधवांनी संबंधित तालुक्यातील तहसिलदार, सहाय्यक निबंधक व सहकारी संस्था कार्यालय येथे संपर्क साधावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील  टोल फ्री क्रमांक 1077 वर किंवा 0721-2662025 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

Monday, May 25, 2020

15 दिवसात मुंबईमध्ये उभारण्यात आले 1हजार बेड चे कोविड-19 रुग्णालय..! यालाच म्हणतात ठाकरे सरकार

#कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

◆बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत उभारले देशातील पहिले ओपन हॉस्पिटल ( १००० बेड्सची जम्बो सुविधा ). याचठिकाणी २०० बेड्सची आयसीयू सुविधाही
#MaharashtraFightsCorona 
#WarAgainstVirus

Sunday, May 24, 2020

प्रबोधन कथा,,,##👌👌👍इस लिये अगर जीवन में ऊँचाइयों को छुना हो तो, जोड़ने वाले बने तोड़ने वाले नहीं।*

*एक दिन स्कूल में छुट्टी की घोषणा होने के कारण, एक दर्जी का बेटा, अपने पापा की दुकान पर चला गया ।वहाँ जाकर वह बड़े ध्यान से अपने पापा को काम करते हुए देखने लगा । उसने देखा कि उसके पापा कैंची से कपड़े को काटते हैं और कैंची को पैर के पास टांग से दबा कर रख देते हैं । फिर सुई से उसको सीते हैं और सीने के बाद सुई को अपनी टोपी पर लगा लेते हैं । जब उसने इसी क्रिया को चार-पाँच बार देखा तो उससे रहा नहीं गया, तो उसने अपने पापा से कहा कि वह एक बात उनसे पूछना चाहता है ?*
*पापा ने कहा- बेटा बोलो क्या पूछना चाहते हो ? बेटा बोला- पापा मैं बड़ी देर से आपको देख रहा हूं, आप जब भी कपड़ा काटते हैं, उसके बाद कैंची को पैर के नीचे दबा देते हैं, और सुई से कपड़ा सीने के बाद, उसे टोपी पर लगा लेते हैं, ऐसा क्यों ? इसका जो उत्तर पापा ने दिया- उन दो पंक्तियाँ में मानों उसने ज़िन्दगी का सार समझा दिया।*
*उत्तर था- ” बेटा, कैंची काटने का काम करती है, और सुई जोड़ने का काम करती है, और काटने वाले की जगह हमेशा नीचे होती है परन्तु जोड़ने वाले की जगह हमेशा ऊपर होती है । यही कारण है कि मैं सुई को टोपी पर लगाता हूं और कैंची को पैर के नीचे रखता हूं ।”*
*इस लिये अगर जीवन में ऊँचाइयों को छुना हो तो, जोड़ने वाले बने तोड़ने वाले नहीं।*                                                                *सुप्रभात*                            9403652599

वायरल मॅसेज,,,सध्या कोरोना विरुद्ध रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून Arsenic album 30 हे औषध खूप चर्चेत आहे.

सध्या कोरोना विरुद्ध रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून Arsenic album 30 हे औषध खूप चर्चेत आहे. 

हे औषध खरेच काम करते का, कसे घ्यायचे, पथ्य काय वगैरे प्रश्न सर्वांच्या मनात उद्भवलेले  आहेत. 
ह्यापैकी काही प्रश्नांची उत्तरे पाहुयात 

प्रश्न  1 *अर्सेनिक अल्बम ह्या गोळया खरेच उपयोगी आहेत का?* 

उत्तर   *होय,  आयुष मंत्रालयाने सुचवलेले हे औषध केरळ समवेत आठ हुन अधिक राज्यांमध्ये जनतेला देण्यात आले आणि निष्कर्ष तपासण्यात आले. ज्यांनी ह्या औषधाचे फक्त तीनच डोस घेतले त्यांना कोरोना झाला नाही हे टेस्ट मधून सिद्ध झाले.*

प्रश्न 2 
*ह्या औषधाचे काही साईड इफेक्ट्स आहेत का?*
उत्तर  
*हे होमिओपॅथीचे औषध आहे ज्याला कोणतेही साईड इफेक्ट्स नसतात. आठ राज्यांतील कोट्यवधी जनतेला हे औषध दिल्यावर कोणतेही साईड इफेक्ट्स जाणवलेले नाहीत*

प्रश्न 3 
*फक्त तीन डोस मूळे कोरोना पासून संरक्षण कसे काय मिळते?*

उत्तर  
*हे औषध फक्त तीनच डोस मध्ये रोग प्रतिकारशक्ती किंवा immunity इतकी वाढवते की तुमचे कोरोना तसेच इतरही viral infection पासून बचाव होऊ शकतो*

प्रश्न  4
*मग ही immunity किती दिवस टिकते?*

उत्तर 
 *सर्वसाधारण पणे 1 महिना ही immunity टिकते, म्हणजे 1 महिन्यानंतर पुन्हा हे औषध घ्यावे असे सुचवण्यात आलेले आहे*

प्रश्न  5 
*लहान मुलांना हे औषध दिले तर चालेल का?*

उत्तर 
 *होय, लहान मुलांना immunity वाढवण्याची खरी गरज असते, त्यामुळे त्यांना आवर्जून द्यावे, गरोदर किंवा डिलिव्हरी झालेल्या स्त्रिया  तसेच वयस्कर व्यक्तींना सुद्धा द्यावे*

प्रश्न 6
 *लहान मुलांना किती गोळया द्यायच्या?*

उत्तर  
*लहान मोठे सर्वाना सारखाच डोस म्हणजे 2 ते 3 गोळया असे 3 दिवस द्यावे*

प्रश्न 7
  *काही ठिकाणी गोळया  च्या ऐवजी liquid मिळते ते कसे घ्यायचे?*

उत्तर  
 *liquid चे 1 ते 2 थेंब थेट तोंडात टाकावेत*

प्रश्न 7
 *ह्या औषधाचे काही पथ्य आहे का?*

उत्तर  
*हे औषध सुरु असताना आठवड्याभर कच्चा कांदा खाऊ नये,  भाजीतला शिजलेला कांदा चालेल,  तसेच कॉफी पिऊ नये, चहा पिऊ शकता*

प्रश्न 8
 *मला कोणताही त्रास किंवा लक्षण नाही, मग निरोगी व्यक्तीने घेतले तर चालेल का?*

उत्तर  
*हे औषध आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याकरिता घ्यायचे आहे, कोरोना पासून बचाव होण्याकरिता सर्वांनी घ्यावे*

प्रश्न  9
*ज्यांना BP डायबेटीस आहे त्यांनी घेतले तर चालेल का?*

उत्तर  
*होय, उलट अश्या लोकांना तसेच किडनी रोग कँसर दमा वगैरे व्याधी असलेल्यांनी हे औषध आधी घ्यायला हवे, ते कोरोना ला जास्त susceptible असतात*, *म्हणजे त्यांना कोरोना चा धोका अधिक असतो तसेच कॉम्प्लिकेशन होण्याचे प्रमाण जास्त असते*. 
*ह्या लोकांनी आधीच सुरु  असलेल्या औषधांसोबत Arsenic alb चे 3 डोस नक्की घ्यावेत*

प्रश्न 10
 *सध्या औषध योग्य काळजी न घेता बनवत असल्याचा व्हिडिओ फिरत आहे, मग चांगले खात्रीचे औषध कसे व कुठे मिळेल?*

उत्तर   
*सध्या औषधाच्या प्रचंड मागणी मूळे  तुटवडा निर्माण झालेला आहे. अश्या वेळी पैसे कमावण्याची  उत्तम संधी म्हणून असे प्रकार घडणे शक्य आहे,*  *तसेच वाढीव किमतीत औषध विकण्याचे प्रकार सुद्धा सुरु झालेत.* 
*अश्या वेळी तुम्ही तुमच्या खात्रीच्या होमिओपॅथी मेडिकल दुकानातून औषध आणावे.* 
*किंवा होमिओपॅथी डॉक्टर कडूनच  हे औषध घ्यावे*

प्रश्न 11
 *औषध देणारा मेडिकल वाला वेगळा डोस सांगतो, व्हाट्सअप वर वेगळा डोस सांगितला आहे,  नक्की कोणाचे ऐकावे?*

उत्तर   
*आयुष मंत्रालयाने सुचवलेला डोस आहे  2 ते 3 गोळया रोज सकाळी उपाशीपोटी एकदा असे 3 दिवस*. 
*फक्त हाच डोस घ्यावा*

प्रश्न  12 
*हे औषध आम्हाला कुठे मिळते किंवा होमिओ मेडिकल कुठे आहे हे ठाऊक नाही, मग आम्ही काय करावे?*

उत्तर  
*तुम्ही गुगल वर homeopathic medicine near me  असे लिहून search करावा, जे results येईल त्यांच्या नंबर वर फोन करून विचारावे*

प्रश्न  12
*arsenic alb 30 चा  stock संपलाय किंवा मिळतच नसेल तर पर्यायी दुसरे औषध आहे का? ते कसे घ्यावे?*

उत्तर  
*जर आर्सेनिक अल्बम मिळू शकत नसेल तर त्या ऐवजी  Camphor 1M* 
*किंवा Bryonia 200 ह्या होमिओपॅथी औषधाच्या 4 गोळया सकाळ संध्याकाळ असे दोनच दिवस घ्यावे.* 
*ह्या पर्यायी औषधाने सुद्धा उत्तम पैकी बचाव होऊ शकतो*

प्रश्न  13
*मग अधिक सुरक्षिततेसाठी आम्ही ही दोन किंवा तिन्ही औषधे एकत्र किंवा एकानंतर दुसरे असे घेतले तर चालेल का?*

उत्तर 
 *होमिओपॅथीची काही औषधे एकमेकांविरुद्ध कार्य करतात, तर काही एकमेकांचा प्रभाव नष्ट करतात.* 
*Camphor 1M हे असेच एक औषध आहे जो इतर औषधांचा प्रभाव नष्ट करतो.* 
*त्यामुळे Arsenic, Camphor, Bryonia ह्यांपैकी कोणतेही एकच औषध घ्यावे व तेच 15 दिवस ते महिन्यानंतर परत घ्यावे.* *आधीचे सोडून दुसरे औषध घ्याल तर कोणत्याच औषधाचा प्रभाव होणार नाही व संरक्षण मिळणार नाही*

प्रश्न 14 *आमच्याकडे ही औषधे मिळतच नाहीत किंवा असे होमिओ स्टोर जवळ कुठेच नाहीत किंवा आमचा परिसर seal किंवा Quarantine केला असल्याने औषध बाहेरून आणणे शक्य नाहीत तर आम्ही औषध कसे मागवू शकतो?* 

उत्तर  *तुम्ही ड्युटीवर असलेल्या पोलिसांना औषध आणून देण्याबाबत विनंती करू शकता किंवा* 
*औषधे कुरियर किंवा पोस्टाने पाठवता येतात पण काही ठिकाणी त्यांची सर्व्हिस नसते किंवा उशिराने औषध मिळते.* 
*अश्या ठिकाणहून सर्वांनी एकत्र विचार विनिमय करून सर्वांसाठी एकत्र औषध मागवले तर ते  कुरियर ने पाठवणे अधिक योग्य ठरेल.* 

*सोसायटी मधील फॅमिली साठी एक एकट्या घरासाठी औषध मागवण्यापेक्षा एकत्र औषध मागवणे हे अधिक प्रॅक्टिकल ठरते*

प्रश्न 15 
*आधीच होमिओ औषध सुरु असेल तर काय करावे,?*

उत्तर 
*ज्यांच्या कडून होमिओ औषध सुरु आहे त्यांचा सल्ला घ्यावा*

प्रश्न 16
*कोरोना पॉसिटीव्ह लोकांनी किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी,  Quarantine मधील लोकांनी  हे औषध घेतले तर चालेल का?*
 *काय डोस घ्यावा?*

उत्तर  *अश्या लोकांनी व  ज्यांची टेस्ट positive आली आहे पण जे  asymptomatic आहेत त्यांनी* 
*Arsenic album 30 हे औषध दिवसातून 2 वेळा सकाळ संध्याकाळ असे 4 ते 5 दिवस घ्यावे*. 

*ज्यांना ताप अंगदुखी घसा दुखणे इत्यादी लक्षणें आहेत त्यांनी होमिओपॅथी डॉक्टर च्या सल्ल्याने  Camphor किंवा  Bryonia  घ्यावे, त्याचे डोस डॉक्टर ठरवतील*

*हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असलेल्याना  ऍलोपॅथीच्या डॉक्टर च्या संमतीने हे औषध घेता येईल*

*डॉ प्रसाद हजारे भिवंडी ठाणे*
*9881374994*

ही महत्वाची माहिती कॉपी पेस्ट करून सर्वत्र शेअर करावी ही विनंती 🙏

हा वायरल मॅसेज असून आम्ही  लिहलेल्या नाही, सध्या या क्षेत्रातील तध्द चर्चा केली तरी चालेल,आपल्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा,,तरुण तडफदार टीम

Saturday, May 23, 2020

५५ ते ६० वयोगटातील काम करणारे आढळल्यास कार्यवाही --प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले


फैजपूर ता. यावल 

रावेर यावल तालुक्याचाफैजपूर प्रांतात कोरोना च्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या दुकानांमध्ये ५५ ते ६० वर्षे वा त्या वरील वयोगटातील दुकान मालक अथवा त्या वयोगटातील कामगार आढळल्यास दुकाने सील करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी एका लेखीपत्रा असे आदेश जारी केले आहेत. याचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे,
       प्रांताधिकारी थोरबोले यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्यात दिनांक १४ मार्च पासून साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोना ची बाधा होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण हे साधारणत: ५५ ते ६० वयोगटातील असल्याने हे आतापर्यंतच्या वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
       त्यामुळे या वयोगटातील व्यक्ती कोणत्याही कारणास्तव घराच्या बाहेर पडणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे. असे असतांनाही अनेक ठिकाणी फळ विक्री, किराणा दुकानदार, भाजीपाला व विक्री करणारे व्यापारी तसेच अन्य अत्यावश्यक सेवा देण्यासाठी परवानगी दिलेल्या दुकानांमध्ये बऱ्याच ठिकाणी याच वयोगटातील दुकानमालक, मजूर काम करीत असताना व खरेदीसाठी त्याच वयोगटातील नागरिक येत असल्याचे दिसून येत आहेत. तर त्यांच्यासोबत लहान मुलेसुद्धा येतात त्या ठिकाणी  सोशल डिस्टन्सींगचे पालन होताना दिसत नाही.या वयोगटातील व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी असल्याने व अशा व्यक्तीस मधुमेह, हृदयरोग व अन्य आजाराचे प्रमाण असल्याने अशांना संसर्ग लवकर होण्याची शक्यता असते.
    त्यामुळे दुकानांमध्ये ज्येष्ठ नागरिक वयोगटातील व्यक्तींना पाय बंदी घातलेली आहे. तसे आढळल्यास दुकाने सील करण्याची स्थानिक स्वराज्य व पोलीस प्रशासन यांना आदेश करण्यात आलेले आहे तर या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांनी विरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी थोरबोले यांनी आदेशात म्हटले आहे.

वायरल कथा,,,लाईक नाही केले तरी चालेल पण नक्की वाचा*टीम (TEAM) म्हणजे नक्की काय ???....*



....एकदा एक श्रीमंत उद्योगपती एका खेडेगावात कारखान्यासाठी साईट बघायला गेला होता ... 

रस्ता कच्चा, खडबडीत होता. काही ठिकाणी रस्त्यात पाणी पण साठले होते, खुप चिखल झाला होता. येताना त्या उद्योगपतीची गाडी चिखलात रुतली आणि बंद पडली ... 

कोणाची मदत मिळते का हे बघायला तो गाडितून खाली उतरला. त्याला थोड्या अंतरावरू एक म्हातारे शेतकरीबाबा येताना दिसले. त्याने त्या शेतकरीबाबांना थांबले, गाडी चिखलात रुतल्याचे सांगीतले व मदत करण्याची विनंती केली ...

शेतकरी बाबा गाडीजवळ आले, पहाणी केली आणि म्हणाले, ‘ नामदेवला, म्हणजे नाम्याला बोलवायला लागेल ...!’

‘मग बोलवाना तुमच्या त्या नाम्याला! मी त्याला चांगले बक्षीस देईन! मस्त जेवायला, खायला घालेन ...!’ तो उद्योगपती म्हणाला ...

आहो नाम्या म्हणजे कोणी माणुस नाही. तो येक बैल आहे. मी आत्ता त्याला घेऊन येतो!’ ते शेतकरी म्हातारबाबा म्हणाले व लगेचच ‘नाम्याला’ म्हणजे त्या बैलाला घेऊन आले ...

त्या बैलाला दोरीच्या सहाय्याने गाडीला जुंपले आणि म्हणाले ...
‘हे हरबा खेच! हे ढवळ्या खेच! हे नाम्या खेच! हे पवळ्या खेच!’

त्याबरोबर त्या बैलाने जोर लाऊन ती गाडी चिखलातून खेचून बाहेर काढली. हे बधून तो उद्योगपती खुष झाला पण त्याला समजेना की गाडीला एकच बैल जुंपलेला असताना त्या म्हातारबाबांनी चार बैलांची नावे का घेतली ...?? 
 
उद्योगपतीने त्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हातारबुवा उत्तरले ...
‘ त्याचे काय आहे! आमचा नाम्या आहे म्हातारा आणि आंधळा. त्याला दिसत नाही. त्यामुळे त्याला एकट्यालाच गाडीला जुंपले आहे हे त्याला माहीत नाही. मी अजून तीन बैलांची नावे घेतली कारण नाम्याला वाटावे की त्याच्याबरोबर अजून तीन बैल आहेत. म्हणजे तो टिममध्ये काम करतो आहे. म्हणूनच तो त्याची ताकद पणाला लाऊन सर्वोत्तम काम करून दाखवतो. साहेब तुमच्या भाषेत याला ‘टीम स्पिरीट’ म्हणतात नाही का?’

एका पागोटे, मुंडासेवाल्या म्हातार्‍या शेतकरीबुवांचे हे बोलणे ऐकून तो उद्योगपती चाटच पडला ...

लक्षात ठेवा

👉🏻कोणतेही काम हे टिम/संघटन केल्याशिवाय होणे अशक्य जरी असले तरी त्या टिम मधिल सर्व घटकांनी कोणाचीही वाट न पाहता जर जीव ओतून व जोर लावून काम केल्यास ते कार्य अव्दितीय व चोख झाल्याशिवाय राहत नाही ...

👉🏻 आपल्या बरोबर कोणी असू नाही तर नसू आपल्यावर असणारी जबाबदारी आपण अगदी चोखपणे करु शकतो हा विश्वासच आपल्याला मनोबल देवून कार्य करुन घेण्यास सहाय्य करत असतो ...

👉🏻 आपण स्वत: म्हणजेच एक टिम आहे असे समजून व प्रत्येक सहकार्‍या बरोबर स्वत: पुढे होऊन कार्य केल्यास बरोबर असणारांचाही आत्मविश्वास वाढत असतो ...

👉🏻 टिम किंवा संघटनात्मक काम करत असताना मी बरोबर आहे तुम्ही हे करा, तुम्ही ते करा असे सांगून बघत बसणारे त्या टिमसाठी घातक मेंबर ठरतात ...

👉🏻 मी हे करु शकतो आणि मीच करणार, फक्त मला या कामात थोडी मदत करा असे म्हणून कार्य करणारे ग्रेट असतात ...

         *👉🏻 TEAM या शब्दाचा अर्थ .....✍🏻*
                   *👍🏻 T = Together ....*
                   *👍🏻 E = Everyone ...*
                   *👍🏻 A = Achieves ...*
                   *👍🏻 M = More .*🙏

धक्कादायक कोरोना व्हायरस मुळे रावेर चे एकाचा मृत्यू

रावेर शहरातील एका क्रोरोणा ग्रस्त असलेल्या प्रौढ वयाचे व्यक्ती चां जळगाव येथे मृत्यू झाल्याची माहिती नुकतीच मिळाली आहे प्रांत व जवळच्या नातेवाईकांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे,,त्यामुळे रावेर तालुक्यातील लोकामध्ये एकाच ख लबळ उडाली आहे, 

Friday, May 22, 2020

वायरल मॅसेज,जर का तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असेल तरीही घाबरू नका.

 
त्या रिपोर्ट मध्ये खालील पैकी काय लिहिले आहे ते पहा...

1 ) 229 E अल्फा कोरोना वायरस 
2) NL 63 अल्फा कोरोना वायरस 
3) OC 43 बीटा कोरोना वायरस 
4) HKU 1 बीटा कोरोना वायरस
5) 2019-nCover ( कोविड कोरोना वायरस 2019 )

 
 वर उल्लेख केलेल्या पाच व्हायरस पैकी फक्त *2019-nCover* *हा एकच व्हायरस आपणांस धोकादायक* आहे.
 बाकीचे सर्व कोरोना वायरस हे क्षुल्लक आहेत ...

2019-nCoV म्हणजे कोरोना  कोविड व्हायरस....

हा कोण आहे... काय आहे... ह्याचे प्लस पाॅईन्ट... मायनस पाॅईन्ट काय काय आहेत... हे बघु... 

सर्वात महत्वाचे म्हणजे हा बॅक्टिरीया नाही. बॅक्टिरीया हे सजीव असतात. एका जागेवरून  दुसऱ्या जागेवर स्वतःहून स्थलांतरीत होऊ शकतात !...
 पण ...

1) 2019-nCoV कोविड हा व्हायरस आहे.... त्याचे स्वरूप कसे आहे? 
   असे समजा की हे एक 400  मायक्रॉन्स डेन्सिटी वजन असलेल अंड आहे... अंड्यांच्या टरफलाच्या म्हणजे फॅटी अॅसिडच्या आत हा DNA प्रोटिन कोविड 2019-nCoV कोरोना व्हायरस असतो !

*हा व्हायरस आहे त्या जागेवरून स्वतः हून मुळीच हलू शकत नाही...*.

अंडी छोटी असो अथवा मोठी... डोळ्यांनी दिसु अगर न दिसो... जागेवरून स्वतः हलताना किंवा स्थलांतरीत होताना कधी पाहिलीत का ? 
    नाही ना... त्याचप्रमाणे  हा वायरस ( अंडी ) देखील *स्वतः हलत नाही* !

2) हा व्हायरस  ज्या जागेवर आहेत तेथे फक्त 72 तास टिकतो आणि मग आपोआप नष्ट होतो... तांबे, चांदी ह्या वर तर 72 तासाभरात पेक्षा ही कमी काळ टिकतो !

3) हा व्हायरस तर *साधा लिक्विड सोप* किंवा *अती उष्णतेच्या संपर्कात* आला तरीही नष्ट होतो.

4) मग हा अॅक्टिव्ह कसा होतो... ? 
 तर तो एका संक्रमित व्यक्ती कडून खोकल्या मुळे/ शिंकल्यामुळे / आणि त्यामुळे तो जिथे पडला असेल तेथे दुसऱ्या  निरोगी व्यक्तीचा हात लागल्यावर त्याच्या हाताला चिकटून तोंड / नाक / कान ह्या मार्फतच घशात ( टाॅन्सिल एरीयात ) प्रवेश करतो .

5) घशात ( टाॅन्सिल एरीयात ) हा काही काळ वास्तव्य करतो.
 *किती काळ हे अजुनही संशोधनातुन समजले नाही*.  

6) घशातुन तो फुफ्फुसात जातो... तेथे हा अंडी स्वरूपातील व्हायरस पेशींना धडकतो आणि फुटतो. त्यामुळे आतला DNA त्याला असलेल्या फॅटी अॅसिड (प्रोटिन) कोटींगच्या बाहेर पडून अॅक्टीव्हेट होतो आणि शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर त्याची वाढ होते... आणि मग माणसाच्या शरिरावर त्याचा परिणाम होतो 

7) अतिशय महत्वाचे = दर दोन तासांनी गरम गरम सोसवेल एवढे गरम पाणी / दूध / आयुर्वेदिक काढा प्यावा... म्हणजे तो व्हायरस घशातच (टाॅन्सिल एरीयातच) नष्ट होईल...

*घाबरु नका फक्त योग्य प्रकारे स्वतःची तसेच इतरांची ही काळजी घ्या ...*
 🙏🏻💐 असा मॅसेज फॉरवर्ड केला जात आहे  हुशार लोकांनी यावर कॉमेंट करा आणि जाणून घ्या,,,,खरे,,जुने स्मरण,रावेर रेेेल

यूपी बिहार मध्यप्रदेश जा प्रवासी की श्रमिक रेल रावेर मे सुबह से रुकि थी भुके प्यासे प्रवासी मित्रों की सेवा करने का मोका मिला,,रावेर के लोगोने की प्रेमसे भरपूर मदत,

रावेर रेल्वे प्रवासी मित्र किंत्रफ से आज यात्री किसेवा,,यूपी बिहार मध्यप्रदेश जा प्रवासी की श्रमिक रेल रावेर मे सुबाह से रुकि थी भुके प्यासे प्रवासी  मित्रों की सेवा करने का मोका मिला,,सेवा पर्मो धर्म,, वही पूर्ण. कर्म,,,एस काम मे पुरे रावेर के लोक आये सुरुवात रावेर रेल्वे प्रवासी मित्र ग्रुप ने की श्री प्रशांत बोरकर जी ने सबकी सेवा का आवाहन किया रेल्वे स्टेशन पर युवराज महाजन सुयश बोरकर आदी काई लोगोणे मदत की दीन भर क ई नागरिक को ने रावेर स्टेशन पर आकार यात्री लोगो को खाना खीलाया, रावेर चे पोलिस निलेश लोहार  कार्यकर्ते प्राविण महाजन,  यांची टीम तसेच संतोष लालचंद पाटील, भास्कर पहिलवान मंडळी आदी अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते 

Thursday, May 21, 2020

नोकरी मार्गदर्शन कॉर्नर. 🌷🌷*Tally कम्प्यूटर ऑपरेटर पाहिजे* यशोधन अग्रो , रावेर 7499817540🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*Tally कम्प्यूटर ऑपरेटर पाहिजे*

        ***     यशोधन अग्रो , रावेर 
                  7499817540**फोटो ग्रााफी सुयश बोरकर 
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...