Sunday, December 25, 2022

ओबीसी नेते श्री प्रशांत बोरकर आणि कुमार कुंभार यांचे कडून सरपंच गडदे यांचे अभिनंदन

नवनिर्वाचित सरपंच दशरथ गडदे  यांचा सत्कार करताना  ओबीसी नेते श्री कुमार कुंभार आणि राजद कार्यकर्ते ग्रामस्थ मंडळी। अभिनंदन। प्रशांत बोरकर प्रवक्ते ओबीसी नेते पत्रकार तरुण तडफदार

Saturday, December 24, 2022

हजारो वीज कामगार लढास राष्ट्रीय जनता दलाचे समर्थन👍राजद नेते श्री प्रशांत बोरकर

हजारो वीज कामगार यांच्या खाजगीकरण विरोधी लढास 
राष्ट्रीय जनता दलाचे समर्थन👍
राजद नेते श्री प्रशांत बोरकर

मुंबई।
वीज कंपन्या चे खाजगी करण हे वीज कर्मचारी बरोबर वीज ग्राहक आणि शेतकरी यांच्या हिताचे  नसून राष्ट्रीय जनता दल वीज कर्मचारी यांचे  बाजूने उभा असल्याचे राष्ट्रिय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांनी पत्रकार यांचेशी बोलताना सांगितले

महाराष्ट्र राज्य सरकारवीज कंपनीचे खाजगीकरण धोरण घेत असून त्यास सर्व वीज कर्मचारी व त्यांच्या संघटना विरोध करत असून त्यासाठी वीज कामगार रस्तावर उतरले असून काल विधिमंडळ अधिवेशनावर मोर्चा काढला वीज कामगार संघटना यांच्या धोरणास मागण्यास राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव श्री प्रशांत बोरकर यांनी पाठिंबा दिला आहे

दोंडाईचा ते मुंबई सेंट्रल खान्देश एक्सप्रेस रावेर हुन सुरू करा प्रवासी नेते राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांची मागणी


भुसावल

दोंडाईचा ते मुंबई सेंट्रल खान्देश एक्सप्रेस रावेर हुन सुरू करा
प्रवासी नेते 
राष्ट्रीय जनता दलाचे  नेते श्री  प्रशांत बोरकर यांची मागणी केली आहे
सध्या भुसावल  रेल्वे स्टेशन वर गर्दी असल्याने भुसावल ऐवजी रावेर परिसरातील  स्टेशन सारखा मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक करणारे लोक यांचा  विचार ना करता   चुकीचे पध्दतीने गाड्या जाहीर करण्यात येत आहेत
त्याचा प्रवासी जनतेला काही फायदा होत नसून रावेर खडवा लोकसभा  मतदार संघातील जनतेवर जाणून बुजून अन्याय होत आहे 
रेलवे चे मिटिंग मध्ये रावेर च्या बाबतील एकही मागणी केली जात नाही एकाही रावेर च्या प्रवासी नेताची वर्णी समितीवर नाही आणि जे काही आहेत ते रावेर चे प्रश्नावर  बोलत नाही रावेर चे बाबतीत रेल्वे प्रशासनाने लक्ष्य ध्यावे  बुऱ्हाणपूर रावेर हुन पुणे मुंबई सुरत साठी रेल्वे गाड्या सुरू करा जुन्या गाड्या रावेर हुन सोडण्यात याव्यातअशी मागणी प्रवासी नेते आणि  राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांनी केली आहे

Wednesday, November 23, 2022

तेजस्वी जी को मिल्ने आदित्य ठाकरे पाटणा बिहार पाहुचे।।

बिहार के साथ अब महाराष्ट्र मे सुवर्ण युगतेजस्वी पर्वकी सुरुवात
💥💥🕯️⚡👍👍👍👍👍🌈🌈
बिहार में राजद और जेडीयूमहागठबंधन की सरकार बन गई। अपने सरकार ने  विधान सभा  में *नीतीश कुमार ने मुख्यमंत्री तो तेजस्वी यादव ने उपमुख्यमंत्री*जी.  सहित सरकार ने भारी बहुमत से  विश्वास मत हासिल कर लिया 
160सदश्योंका समर्थन प्राप्त किए
तेजस्वी यादव जी ने
अपने झुझारू रुपका परिचय दिया.
हे
एक 32साल के युवा नेता ने बिहार की राजनीती बदल दि हे, रोज हजारो  नोकरी देने का सपना पुरा कर रहे हे तेजस्वी जी  आज महाराष्ट्र के युवा सेना नेता आदित्य ठाकरे इंहोणें  तेजस्वी यादव जी से पटना बिहार मे जाकर भेट वार्ता की
*महाराष्ट्र प्रदेश कि ओर से बिहार के जनता और नये  उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव जी को शुभकामनाएं।*
 मराठी बिहारी भाई भाई
भाऊ भाऊ
जय महाराष्ट्र जय शिवराय।
💥💥🌈💅🤳💫🤝🚩🌿
हार्दिक बधाई एवं ढेरों शुभकामनाएं माननीय महोदय Tejashwi Yadav जी !    

🙏🙏🕯️🕯️💡🦚🌈🌹🌹🌹🌹🌹🌺🌸☘️☘️🍀🌱🌱💥💥⚡🕯️💡🔥💥
   विजय कंडारे प्रदेश अध्यक्ष.
 प्रशांत बोरकर प्रवक्ते महाराष्ट्र 
  राज्य महासचिव .
8208361187
विजय कांबळे प्रदेश उपाध्यक्ष 
Dr सुनील देवरे उत्तर महाराष्ट्र प्रमुख
नाना ठाकरे विदर्भ प्रमुख
मुध्दसर पटेल कोकण प्रमुख
मिर्झा जुनेद मराठवाडा सचिव
सुनील पवार रावेर तालुका अध्यक्ष 
राष्ट्रीय जनता दल.महाराष्ट्र राज्य सभी सदस्य.

Tuesday, November 15, 2022

आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती दिन साजरा


जळगाव :- इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरुद्ध आदिवासींचे  संघटन उभारून क्रांती लढा उभारणारे जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त त्यांच्या शौर्य शाली  इतिहासाला उजाळा देऊन शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
     महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने काव्य रत्नावली चौकात बिरसा मुंडा जयंती दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन केले होते.
      यावेळी अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी बिरसा मुंडा यांचा पराक्रमी इतिहास सांगताना जिथे जिथे अन्याय अत्याचार आहे,तिथे विद्रोह, बंड पुकारणाऱ्या कार्यकर्त्यांना बिरसा मुंडे हे प्रेरणा देतात.आज देशात,जमातवाद,धर्मवाद वाढीस लागला असून देशाची एकात्मता धोक्यात आली आहे.अशा भयग्रस्त काळात नागरिकांना संकटाची जाणीव होत नसेल तर त्यासाठी लोकचळवळ उभारावी लागेल.
      याप्रसंगी संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे,शिरतुरे यांनी आपले विचार व्यक्त करून बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकला.
       सुरुवातीला आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मुकुंद सपकाळे, सचिन धांडे यांनी पुषपहार अर्पण केले.
     सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी तर आभार वाल्मीक सपकाळे यांनी मानले.यावेळी प्रा.प्रीतीलाल पवार,अमोल कोल्हे,रमेश सोनवणे,दिलीप सपकाळे,मिलिंद सोनवणे,  बापूराव पानपाटील,महेंद्र केदारे,साहेबराव वानखेडे,संजय सपकाळे,सुभाष साळुंखे,सुधाकर पाटील,श्रीकांत बाविस्कर,चंद्रकांत नन्नवरे,अजय मनोरे,कृष्णा सपकाळे,विजय सुरवाडे,सचिन बिऱ्हाडे,दिलीप त्र्यंबक सपकाळे,विवेक जावळे,संजय सपकाळे,भिमराव सोनवणे,भारत सोनवणे,सत्यजित सपकाळे,राहुल सपकाळे यांच्यासह विविध संघटनाचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Monday, November 14, 2022

आई वडील एक प्रेरणा प्राण चिरंतन आशीर्वाद देणारी माणसे

आज आईचा वाढ दिवस  सकाळी लवकरच उठलो सकाळी कधी नव्हे ते नास्ता केला।नंतर मग जो उत्तसाह आला आई प्रमाणे आज 78 वर्षाची आहे पण सर्व कामे स्वतः ची घरची करते।तसाच उत्साह आला।  थोडी   भिंतीला खडे तडे भरून भांधकाम मजूर झालो कलर पेंटर ची वाट  महिना भरापासून पाहतोय आला नाही शेवटी स्वतः रंग रंगतो दोन तीन भिंतीवर रंग लावला। नाहीतरी लहानपणी दगडी चुना गरम पाण्यात टाकून तो ताडताड फुटायचा।हाताला तर चुना लागायचा आणी नेहमी कपडे यांना पण नांतर आईल पेंट डिसेंम्पर प्लॅस्टिक कलर आले मशीन आल्या कॉम्प्युटर वर संग संगती करू लागले।मस्त पैकी जुन्या आठवणी जोश आला। दोन तीन भिंती केल्या रंग सम्पला मग तरी मग मुलाला रंग आणायला सांगितले त्यात संध्याकाळ झाली तो पर्यत मग पुन्हा सस्थ काही बसबेना वरती गच्ची वर गेलो झाड रोप ची देखरेख केली अनेक  रोप आली एका थिलीत दोन तीन रोप दाटीवाटीने मग त्यात पिशव्या बद्दलवल्या माती राख बदलत गेलो आता माती खत म्हिजे आपले रोजचा भाजीपला खरंगते ते ररोज वेगवेगळ्या ठिकाणी रोपटी पाशी टाकत असतो कचरा मधून च माती करतो।काही कचरा जाळून टाकतो टातून राख मिळते ती पुन्हा झाडांना टाकतो रोजचे वोपरलेली चहा पावडर असो कीं भंडायचे स्वयपाक घरातील पाणी हे सुध्या ना फेकता झाडांना टाकतो।नित्यम कर्म सुरू त्यातून आलेले परिश्रम घाम येत नाही।शेतकरी वर्ग यांना झाडे रोप शेतात जाऊन फुकट देत असतो।कोणत्याही नदी पाशी काहींरोप लावून द्यावीत असा नेहमीं काही ना काहि करत राहावं म्हणुन लिहता पण येते की केले म्हणून।आपला परिसर स्वच्छ आणि सुन्दर करावा  आई वडील यांनी हेच दिलेले संस्कार आहेत ते करून मग संध्याकाळी आईचे आशीर्वाद घेतलं आई दादा खूप आठवण करत असतात माझी खूप फिकीर चिंता असते। समाज कार्य साठी घरचया मदत सहजरीत्या मिळते  अश्या प्रकारे अनेक कष्ट केले आहेत अगदी हमाली सुध्या म्हणून आई वडील भाऊ परिवार यांच च त्याग जास्त आहे।आजही आनंदाने मालामाझ्या समाधान साठी वेडे पणासाठी का मदत करतात ।तेव्हा ते म्हणतात की अरे आपल्या रक्तात च आहे
आजोबा हे आदिवासी भागात जाऊन जाऊन लोकांना आदिवासी मुलांना औषधें देत हाजरो मुलांना  पायी बेळगाडीने जाऊन रातभर राहून सेवा देत पैसे पण घेत नसत।मग आपले दिवाण जी चें काम करत।रावेर च अनेक संस्था त्यांनी रजिस्टर करून दिल्या कारण आजोबा खूप हुशार होते इंग्रजी मोदी हिंदी  अनेक भाष्या त्यांना येत असत।इंग्रज काळात फोजदर नोकरी सोडून दिली या वेधकीय सेवे साठी गावोगाव मुलाना शाळेत प्रवेश ताकन्यापासून त्यांच वद्दीलानी विरोध केला की नोटीस बाजवून येत।असो आईला पण खुप काहींकेल आहें
आई मूळ आम्ही शिकलो।रावेर परिसरातील उच्च शिक्षित उधोजीका म्हणता येईल।कापड दुकान शिलाई पासून तर सोनारी केली आहे त्याबरोबर आईच समाज कार्य करत असे अनेक मुलींना शिवण काम  शिकवल महिलांच्या खंबीर पाठीशी।दारुड्या नवऱ्यानं  भाऊ दादा करून त्यांचा संसार सुखाचा केले  लग्न जुळवणी पोलिस St कामगार यांना घर भाडं ने मिळत नाहींबतो पर्यबत त्यांचा डबा करून आग्रहाने घरी बोलावी कारण एक प्रकाश बनतोडे मामा  पोलिस भरती केंद्रात प्रशिस क होते ।आई आमचा प्राण आहे ।टिलाच आमची जाण आहे।
🙏🙏💁‍♂️💅👨‍👩‍👧‍👦🌈🍥
प्रशांत बोरकर।

Thursday, November 10, 2022

दहावी पासून बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप योजना

शिष्यवृत्तीची रक्कम,प्रतिवर्ष रु. 12000/- एवढी आहे. National scholarship portal (NSP), या
विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती
योजनांच्या वन स्टॉप प्लॅटफॉर्मवर(सर्व माहिती एकाच
ठिकाणी उपलब्ध असलेलं पोर्टल-संकेतस्थळ),
NMMSS या योजनेची माहिती उपलब्ध आहे.

NMMSS शिष्यवृत्तीची रक्कम, सार्वजनिक वित्तीय
व्यवस्थापन प्रणाली (PFMS) च्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT), पात्र
विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट वितरित केली जाते. ही योजना 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं सर्व स्रोतांमधून वार्षिक उत्पन्न
3 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नाही, ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात.

शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक गुणवत्तेच्या पात्रतेच्या निकषाचा विचार करता, विद्यार्थ्यांना इयत्ता 7 वी च्या परीक्षेत किमान 55 टक्के गुण किंवा समतुल्य श्रेणी प्राप्त असणं आवश्यक आहे. गुणांची ही अट, अनुसूचित जाती- जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 टक्क्यांनी शिथिल आहे. पडताळणीचे दोन स्तर आहेत. संस्था नोडल अधिकारी (INO) हा पहिला स्तर (L-1) आणि जिल्हा नोडल अधिकारी (DNO), हा दुसरा स्तर (L-2) आहे. पहिल्या स्तरावरील पडताळणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे आणि दुसऱ्या स्तरावरील पडताळणीची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://scholarships.gov.in/ या वेबसाईटवर अर्ज करा

करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे. या योजने अंतर्गत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवान विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीतील त्यांची गळती रोखून, माध्यमिक स्तरावर त्यांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता ही शिष्यवृत्ती दिली जाते.

इयत्ता आठवीत शाळा न सोडता इयत्ता नववीत दाखल झालेल्या निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी नव्यानं एक लाख शिष्यवृत्त्या दिल्या जातात आणि राज्य सरकार, सरकारी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी दहावी पासून बारावी पर्यंत शिष्यवृत्ती सुरु राहते किंवा तिचं नूतनीकरण केलं जातं.


Wednesday, November 9, 2022

*मुलगी दर्शना सुधीर चितारी हिने दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग*https://youtu.be/kkMKAi3NL4A

*मुलगी दर्शना सुधीर चितारी हिने दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग*
https://youtu.be/kkMKAi3NL4A

Tuesday, November 8, 2022

https://youtu.be/kkMKAi3NL4A Watch "मुलगी दर्शनाने दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग। नाशिक । तरुण तडफदार न्यूज@TARUN TADAFDAR NEWS" on YouTube

https://youtu.be/kkMKAi3NL4A 

Watch "मुलगी दर्शनाने दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग। नाशिक । तरुण तडफदार न्यूज@TARUN TADAFDAR NEWS" on YouTube

Sunday, November 6, 2022

बिहार मोकामा✌️ विधानसभा #उपचुनाव में राष्ट्रीय जनता दल के प्रत्याशी श्रीमती नीलम देवी जी को ऐतिहासिक जीत

बिहार मोकामा✌️ विधानसभा #उपचुनाव में राष्ट्रीय जनता दल के  महागठबंधन समर्थित प्रत्याशी श्रीमती नीलम देवी जी  को ऐतिहासिक जीत की ढेर सारी बहुत बहुत बधाई एवं शुभकामनाएं।।

प्रशांत बोरकर।
प्रवक्ते महाराष्ट्र राज्य महासचिव राष्ट्रीय जनता दल

Saturday, November 5, 2022

तरूणांना सुवर्णसंधी..! ‘UPSC’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन; प्रवेश प्रक्रिया सुरु

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडमी, पुणेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज २५ नोव्हेंबरपर्यंत भरता येतील. अर्ज भरण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत दि. २५ नोव्हेंबरपर्यंत आहे. प्रवेश परीक्षा दि. ४ डिसेंबर २०२२ (ऑफलाइन पद्धतीने) घेण्यात येईल परीक्षेची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील. परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक डॉ. के. एस. जैन यांनी केले आहे.


Saturday, October 29, 2022

पहिली पासून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री-मेट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता १ ली ते १० वी), बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी ते १२ वी फक्त मुली), राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी ते १२ वी), दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी व १० वी) या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी

www.scholarships.in या संकेतस्थळावर ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. तसेच नूतनीकरणासाठी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याने अर्ज भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.scholarships.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे, असे आवाहन शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे

Thursday, October 27, 2022

अर्चनाताई सोनार यांना 'सन्मान स्त्री शक्तीचा समाजसेविका'पुरस्कार*

*अर्चनाताई सोनार यांना 'सन्मान स्त्री शक्तीचा समाजसेविका'पुरस्कार*

(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे)
पुणेः- पिंपरी चिंचवड महानगर पालिका बहुउद्देशीय सभागृह स्व.प्रमोद महाजन हाॕल या ठिकाणी माजी नगरसेविका  योगिताताई नागरगोजे यांच्या हस्ते 'सन्मान स्त्री शक्तीचा उत्कृष्ट समाजसेविका 'पुरस्कार  योगगुरु अर्चनाताई सोनार यांना नवरात्रौत्सवाच्या आयोजित भव्य कार्यक्रमात देण्यात आला.
           स्री शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अंतर्गत सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक क्षेत्रात विविध कार्यक्रमात   फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.अर्चना ईश्वर सोनार यांचा सहभाग सातत्याने असतो.तसेच निःशुल्क योगशिक्षण देत असतात .मोफत आरोग्य शिबिर ,बालसंस्कार वर्ग आदी उपक्रमात सहभाग . त्यांच्या विविध कार्याचा आढावा घेऊन  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ.योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे यांनी  सौ.अर्चनाताई सोनार यांना "सन्मान स्त्री शक्तीचा उत्कृष्ट समाजसेविका "पुरस्कार खास महिलासाठीआयोजित नवरात्र उत्सव निमित्त महाभोंडला कार्यक्रमात सन्मानचिन्ह ,शाल,श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.या पुरस्काराबद्दल अनेक महिला,संस्था,संघटना यांनी अभिनंदन करुन कौतुक केले.

Monday, October 24, 2022

ब्रिटन के प्रधान मंत्री ऋषि सुनक ने दिवाली पर निकाला था महात्मा गांधी के नाम का सिक्का

ऋषि सुनक ने दिवाली पर निकाला था महात्मा गांधी के नाम का सिक्का

 अब प्रधान मंत्री  हुये हे  पूर्व ब्रिटेन के वित्त मंत्री के पद पर रहकर ऋषि सुनक ने भारत के राष्ट्रपिता महात्मा गांधी के नाम का सिक्का जारी किया। जिसमें भारत का राष्ट्र चिन्ह और मां सरस्वती का सिंहासन कमल अंकित किया हुआ है। ये पहली बार हुआ है कि एक ब्रिटिश देश में भारतीय सिक्के को जारी किया गया हो।

Thursday, October 20, 2022

अपघात स्थळी संकटकाळात धावून जाणारा***कर्तव्य तत्पर "वासुदेव"*************************

***कर्तव्य तत्पर "वासुदेव"***
**********************
दिनांक 16,10,2022 रोजी सकाळी 11 ते 11:15 दरम्यान गुरुवर्य ना.भि.वानखेडे प्रतिष्ठानच्या ॲम्ब्युलन्स चा मोबाईल खणखणला. ॲम्ब्युलन्स चालक वासुदेव महाजन यांनी कर्तव्यात कसूर न करता अपघात स्थळी धाव घेतली.🚑.🚑🚑
बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर मोटर सायकल स्वार  मामा/भाचे खड्डे चुकवित असताना एका मिनी ट्रकची धडक लागून मोटर सायकल स्वार गंभीर रित्या जखमी झाला. ट्रकचे चाक पायावरून गेल्याने गंभीर दुखापत झाली, सदर अपघात  रावेर पासून एक किलोमीटर अंतरावर झाला.
अपघाताच्या ठिकाणी शेजारीच शेतामध्ये श्री राजू रामदास महाजन हे काम करीत होते. त्यांनी गुरुवर्य ना.भि.वानखेडे प्रतिष्ठानचे ॲम्ब्युलन्स चालक वासुदेव महाजन यांच्याशी संपर्क केला व काही वेळातच ॲम्ब्युलन्स घटनास्थळावर पोहोचली. तोपर्यंत गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्ती तेथेच पडून होती. वासुदेव महाजन यांनी त्वरित उचलून अस्थिरोग तज्ञ डॉक्टर भगवान कुयटे यांच्याशी संपर्क केला. त्याचेवर प्राथमिक उपचार करून व प्रसंगावधान राखून पुढील उपचारासाठी पाठवीले.🚑🚑🚑
************************

Tuesday, October 18, 2022

फसवणुकीची ३ दिवसांच्या आत तक्रार कराऑनलाईन बँक फसवणूक झाल्यास RBI च्या या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वागा


हॅकर्स तुमच्या खात्याचा तपशील मिळवतात आणि त्यातून पैसे काढतात. मात्र, नुकसान सोसूनही लोक गप्प बसतात कारण त्यांना काय करता येईल हे माहीत नसते. परंतु अशा घटना घडल्यास तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे परत मिळू शकतात हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. डिजिटलायझेशन हे भविष्य आहे आणि डिजिटल
व्यवहारांच्या वाढत्या युगात बँक खात्यातील फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत हे आपणा सर्वांना माहीत आहे.

अनधिकृतपणे अवैध व्यवहार होत आहेत. ऑनलाइन फसवणूक, डिजिटल फसवणूक किंवाvसायबर फसवणूक अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने म्हटले आहे की कोणत्याही अनधिकृत व्यवहारानंतरही तुम्हाला पूर्ण परतावा मिळू शकतो. आरबीआयने पुढे सांगितले की,अशा कोणत्याही व्यवहाराची तत्काळ माहिती देऊन तुम्ही नुकसान टाळू शकता.

परतावा कसा मिळवायचा:- लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की जर फसवणूक झाली असेल तर पैसे परत कसे होणार? तसेच बँक खात्यातून पैसे काढल्यानंतर तक्रार केल्यास बँक पैसे कोठून परत करणार. अशा सायबर फसवणुकीमुळे बँका विमा पॉलिसी घेतात हे तुम्हाला माहिती आहे. बँक फसवणुकीची माहिती थेट विमा कंपनीला देईल आणि तिथून विम्याचे पैसे घेऊन
तुमचे नुकसान भरून काढेल. सायबर फसवणूक
टाळण्यासाठी विमा कंपन्याही लोकांना थेट कव्हरेज देत आहेत. तुम्हाला हवे असल्यास, सायबर फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही विमा देखील मिळवू शकता. अनेक कंपन्या असा विमा देतात. रिझर्व्ह बँकेने ग्राहक संरक्षण, अनाधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांमधील ग्राहकांचे मर्यादित दायित्व (अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारातील ग्राहकांचे संरक्षण मर्यादित दायित्व) यावर नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

फसवणुकीची ३ दिवसांच्या आत तक्रार करा:- जर कोणी चुकीच्या पद्धतीने तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले तर तुम्हाला या घटनेची तक्रार तीन दिवसांत बँकेकडे करावी लागेल. असे केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान सहन करावे लागणार नाही. आरबीआयने असेही म्हटले आहे की ग्राहकाच्या खात्यातून फसवणुकीने काढलेली रक्कम निर्धारित वेळेत बँकेला कळवल्यानंतर 10 दिवसांच्या आत त्याच्या बँक खात्यात परत केली जाईल. तथापि, जर व्यक्तीने 4-7 दिवसांनंतर फसवणुकीची माहिती दिली तर अशा प्रकरणांमध्ये ग्राहकाला 25,000 रुपयांपर्यंतचे नुकसान सहन करावे लागेल, असे आरबीआयने म्हटले आहे.

सायबर फ्रॉड्स हेल्पलाइन:- गृह मंत्रालयाने “नागरिक आर्थिक सायबर फ्रॉड रिपोर्टिंग आणि मॅनेजमेंट सिस्टीम” मॉड्यूलवर आर्थिक फसवणुकीच्या तत्काळ अहवाल देण्यासाठी आणि सायबर गुन्हे दाखल करण्यात मदत मिळवण्यासाठी टोल- फ्री हेल्पलाइन क्रमांक ‘1930’ (पूर्वी ‘155260) कार्यान्वित केला आहे.

स्थानिक पोलीस मिळविणार माहिती:- ही हेल्पलाइन भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरद्वारे आरबीआय, पेमेंट बँक आणि इतर प्रमुख बँकांच्या मदतीने चालवली जाते. एवढेच नाही तर याबाबत तक्रार दाखल होताच तत्काळ कारवाईही सुरू केली जाते. सोबतच पोलीस ठाण्यातही माहिती देण्यात येते. तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती तपास यंत्रणेला देणे ही स्थानिक पोलिसांची जबाबदारी आहे. या हेल्पलाइनचे वैशिष्ट्य म्हणजे, ही हेल्पलाइन थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आली. गृहमंत्रालयही यावर लक्ष ठेवते. अनेकांच्या तक्रारीनंतर पैसे परत केले जातात. तक्रार केल्यानंतर काही तासांत फ्रॉडला बळी पडलेल्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर एक्नॉलेजमेंट क्रमांकही पोहोचतो.

नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल:- जर हेल्पलाईन क्रमांकावरील कॉलमध्ये काही अडचण येत असेल तर, तर तुम्ही cybercrime.gov.in या वेबसाइटला भेट देऊन तक्रार नोंदवू शकता.

Monday, October 17, 2022

सीताफळ लागवड अनुदान योजना अर्ज भरण्याची पद्धत.

महाराष्ट्रात औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, जळगाव, सातारा, नाशिक, सोलापूर आणि भंडारा जिल्ह्यात बीड कोथिंबीरचे सर्वाधिक पीक घेतले जाते. रोजगार हमी योजनेच्या संबंधित फलोत्पादन विकास योजनेंतर्गत महाराष्ट्रात २५ हजार ९०६ हेक्टर क्षेत्रात सीताफळाची लागवड करण्यात आली आहे. आणि मराठवाड्यातील धारूर आणि बालाघाट ही गावे सीताफळासाठी प्रसिद्ध आहेत.

योजनेच्या पात्रता

हा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. योजनेचा लाभ संस्थात्मक लाभार्थ्यांना देय नाही.

शेतकऱ्याच्या नावावर 7/12 असावा. संयुक्त मालकीच्या बाबतीत, इतर खातेदारांच्या संमतीने, शेतकरी त्याच्या हिश्श्याच्या मर्यादेपर्यंत लाभ घेऊ शकतो.

इथे करा ऑनलाइन अर्ज



https://mahadbtmahait.gov.in/Farmer/login/login

7/12 वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे.

पारंपारिक वन अधिवास (वन हक्कांची मान्यता) अधिनियम 2006 नुसार, वनपट्टे धारक शेतकरी लाभासाठी पात्र आहेत.

त्या क्षेत्राव्यतिरिक्त शासकीय योजनांद्वारे फळबागांची लागवड केल्यास वरील कलमानुसार शेतकऱ्याला क्षेत्र मर्यादेत लाभ मिळू शकतो.

सीताफळ लागवड अनुदान योजना अर्ज भरण्याची पद्धत.

जर तुम्ही भाऊसाहेब फंडकर सीताफळ अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करू शकता.

Sunday, October 16, 2022

शेकडो एकर पडित जमीन विकासासाठी हा उपक्रम प्रोजेक्ट आदर्श सर्वत्र राबविण्याचि गरज।। प्रशांत बोरकर।

कृषी मधून पर्यावरण रक्षणासाठी पाचशे एकरापेक्ष्या जास्त
जिनसी सांबार पाटअभोडा उपक्रम।
🤳🌱🌿🌲🌳🌴🪴🍃🌍🌈💫
शेकडो एकर  पडित जमीन विकासासाठी हा उपक्रम   प्रोजेक्ट आदर्श  सर्वत्र राबविण्याचि गरज।। प्रशांत बोरकर।

रावेरपाल  मधील आभोडा जिनसी सांभरपाट भागात  पूर्वी खूप प
डीत शेती होती  माजी सैनिक यांना दिलेली  पाचशे एकर पेक्षा जास्त शेतजमीन खडकाळ जमीन आणि उत्पन्न  येत नसल्याने  कुणी लक्ष देत नसे त्याचे वारसदार यांना पण आपली जमीन कुठे आहे हे समजत नव्हते पण  जुन्या पुणे हून  नकाशे रेकॉर्ड  आणून जमीन शोधल्या  खूप कडक दगडाची जमीन म्हणून कोणी करण्यास तयार होईना ,मग त्यातून जय जवान जय किसान कृषी पर्यावरण सहकारी संथाचा जन्म झाला त्यात  माजी सैनिक शेतकरी आदिवासी  भटके विमुक्त जाती जमातीचे लोक यांना बरोबर घेवून  पाचशे  500एकर मद्ये  वूर्क्षारोपण करण्याचे ठरविले रोज जावून खड्डे खोदणे हा उपक्रम पण तरीपण त्यास प्रतिसाद मिळाला नाहीये म्हणून  आदिवासी पावरा समाजाचे मजुरांना बरोबर घेतले रोप लावली पण उन्हाळा मधे पाणी नसल्याने रोप वाळून गेली मद्ये बिबटे वन्य प्राणी यांचा धोका असल्याने जाणे ही जोखमीचे होत गेले, म्हणून प्रत्येक झाडाजवळ माठ  इंजेक्शन सलाईन चां प्रयोग पण केला पण    प्रचंड उन्हाळा कडक दगड म्हणून काही रोप जगली  त्यात बंधारे पाणी जिरवा पाणी अडवा चां प्रयोग केला उस का  केली लावण्याचा  स्वप्न होते म्हणून मग विहिरी तलाव चर्चा झाली पण आता  निधी नाही म्हणून आमदार राजाराम भाऊ यांना त्या स्पॉट वर बोलावले ते सकाळी च हजर आणि तो परिसर पाहून झाडे लावलेली जुनी झाडे  पाहून थक्क झाले त्यांना आम्ही जवाहर विहिरी चे माहिती सांगितले लगेच त्यायर म्हणाले किती तर आम्ही 25प्रस्ताव दिले त्याचा पाठपुरावा करून सर्व जिल्हा चे बजेट रावेर अभौडा जिनसी पाल भागात विहारी खोदल्या  काहीना पाणी लागले काही फेल गेल्या पण त्यामुळे त्यात पाणी जाण्यामुळे जमीन भुसभुशीत झाली रोज  जावून जेथे दिसेल तेथे झाडे लावली, इतकी  डोंगराळ भागात विहारी खोदल्या पण वीज मिळेना त्यासाठी पुन्हा  चकरा काही शेतकऱ्यांनी या जमिनी सुपीक केल्या धरणाचा गाळ काढण्याचे व डोंगराळ जमीन मद्ये आणून टाकण्याचे प्रयत्न झाले  आज ही जमीन सुजलाम सुफलाम दिसत आहे संस्था बंद पडली असली तरी भू मातेने आले दान दिले आहे आज आमचे  मार्गदर्शक  माजी  मुख्याधिकारी एम एम पाटील  शहादाकर प्रल्हाद नारायण पाटील बलवाडीकर हे हयात नाही पण आम्ही  आमचे काका वसंत विठ्ठल महाजन यांच्या बरोबर जमिनी पोट खराब  जमिनी रेकॉर्ड ला दुरुस्त करणे सुरू आहे
कृषी बरोबर पर्यावरण बचाव त्यातून कृषी पर्यटन विकास आणि जोड प्रकल्प जोड धंदे ची साथ मिळाली तर शेतकरी वर्ग बरोबर मजूर गावा गावातली मुलं यांना रोजगार उपलब्ध होईल , तसे वातावरण तयार होत आहे साथ साशनाची मिळावी यासाठी माहिती सहकार्य महत्वाचे आहे 
महात्मा गांधी यांचे खेड्याकडे चला ह्या धोरणच खूप ताकदीचे आणि तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणार आहे हे शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्षात घेतले पाहिजे तेव्हाच मोठ्या शहराकडे जाणारी   लोंढI कमी होतील
पर्यावरण रक्षण कृषी फळबाग लागवड मधून मोठ्या प्रमाणात वन आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होतील त्यासाठी सरकारने काही नवीन योजना पडीत
 जमीन विकास हा जन सहभागाने केला पाहिजे,. 
प्रशांत बोरकर
मुक्त पत्रकार
 जय जवान जय किसान
कृषी पर्यावरण प्रकल्प योजना
कृषी पर्यटन अभ्यासक कार्यकर्ता💚🪴🦚🐥🍀🦜🌈🌈🎯🐥💫💫💫🎯
8208361187
11/07/2021

Friday, October 14, 2022

कोकणकन्या रिटर्न” या कॅफे मराठीच्या नव्या युट्यूब सीरिजमधून.


“कोकणकन्या रिटर्न” मधून घडणार कोकणची सफर !
प्रशांतबोरकर यांजकडून
मुबई – आज आपण मोठ-मोठ्या महानगरात आणि आलिशान ऑफिस आणि घरात राहत असलो तरी आपल्या सगळयांची नाळ ही गावाशी जोडली गेली आहे. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आपण गाव सोडून शहरात आलो खरे पण ती गावची गोडी इथे नाही अशीच कोकणातल्या एका गावाची गोष्ट तुम्हाला पहायला मिळणार आहे ते, “कोकणकन्या रिटर्न” या कॅफे मराठीच्या नव्या युट्यूब सीरिजमधून.
ही गोष्ट आहे राधाची आणि तिच्या भाव-विश्वाची. अनेक वर्ष आपल्या गावापासून दूर राहिलेली राधा अचानक काही कामानिमित्त आपल्या गावी कोकणात परतते. इथे आल्यावर तिला आपले घर, बालपणाच्या गोष्टी आठवू लागतात. गावची माती आणि नाती यांची खरी गोडी तिला आपल्या कोकणातल्या या छोट्याश्या गावात लोकांना भेटून येते. गावातल्या
लोकांचे निरागस वागणे, तेवढ्याच जोरात भांडण करून पुन्हा दुसऱ्या क्षणी गोड होणे.
एकमेकांच्या सुख-दुखात सामील होणे, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधणे. खरतर राधा सोबत आपण प्रेक्षक म्हणून सुध्दा आपल्या गावच्या आठवणीत रमून जातो. ही सीरिज म्हणजे आपल्या गावाची एक सफ़र आहे.
गावची धमाल-मस्ती सोबत यातली सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू म्हणजे निसर्गरम्य
कोकण, तिकडची साधी भोळी माणसं आणि तिकडच्या भाषेचा गोडवा. गावची माती आणि
नाती यांचा एक मेळ इथे आपल्याला नव्याने अनुभवायला मिळतो. कॅफे मराठीच्या निखिल
रायबोले अणि भूपेंद्रकुमार नंदन यांची निर्मिती असून, लेखक रोहन कदम तर कथा,पटकथा आणि दिग्दर्शन सुयोग हांदे यांचे आहे आशय प्रमुख कोमल कुडाळकर आहेत.
सिरीजमध्ये राधा ही मध्यवर्ती भूमिका वैष्णवी खाडे हिने साकारली आहे तर तिच्यासोबत अस्सल कोकणचे स्थानिक कलाकार अमोल रेडीज, अमित कुबड़े, प्रितेश रहाटे, तेजस घाडीगावकर, किशोर साळुंखे , प्रितम जाधव, ओमकार गावडे, जगदीश शेलार, राजेश गोसावी, स्नेहा पांचाळ, दामिनी भिंगार्डे इ. कलाकारांच्या अभिनयामुळे सिरीजला रंगत आली आहे. गीते अनिकेत कदम यांची असून, संगीत भाग्येश पाटील यांचे आहे, कोकणच्या मातीतले लोकप्रिय गायक रत्नाकर महाकाळ बुआ यांच्या आवाजाने सिरीजला अस्सल कोकणचा गोडवा आला आहे.
येवा कोकणातल्या आठवणी पुन्हा नव्याने अनुभवायला, काय समजलिव? ही सिरीज तुम्ही
कॅफे मराठीच्या युट्यूब चॅनलवर मोफत पाहू शकता.



*लोणी येथील सुवर्णकार समाजाचा वाढदिवसातुन स्तुत्य सामाजिक उपक्रम*



(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे)

 पुणेः-     समाजात वाढदिवस साजरा करतांना विविध प्रकारचे केक,डेकोरेशन,हाॕटेल पार्टी आदी,रस्त्यावर होर्डींग,बॕनर,जाहिराती आदी  खर्च करण्यात येतो.या प्रथेच्या नाहक खर्चावर आळा कसा घालता येईल.यावर सुवर्णकार समाजातील कांही सामाजिक कार्यकर्त्यांनी मंथन करुन याबाबत  सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार केला.व त्यानुसार डिंगाबर ज्वेलर्स ,लोणी प्रवरा , ता.राहता,जि.अहमदनगर येथील श्री.अशोक मैड यांच्या  दुकानात  नुकतीच एक छोटेखानी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये  आपल्या समाजातील  वाढदिवस निमित्ताने " गोर गरीब मुलांना मदत करुन त्यांना शिक्षण  उपयोगी साहित्य देण्यात यावे".असे सर्वानुमते ठरले.यामुळे निश्चितच सुवर्णकार समाजाचे नाव सुवर्णाक्षाराने लिहिले जाईल.हा सामाजिक उपक्रम स्तुत्य असुन अशा वाढदिवस/जन्मदिनी या नाहक खर्चाचा विनियोग सामाजिक कार्यात आर्थिक,दुर्बल व्यक्ती  यांना मदतकार्य व  समाजापयोगी संस्था,संघटनाच्या माध्यमातून  कार्य करण्याचाही सर्वांनी निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी सुवर्णकार समाजातील सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय माळवे,श्री,सुनिल उदावंत यांनी मार्गदर्शन केले.या उपक्रमाची उद्देशपुर्ती म्हणुन यावेळी श्री.उदयशेठ महाले यांनी१००नग वह्या देण्याचे जाहीर केले.या बैठकीस सर्वश्री उदयशेठ महाले, राम मैड,नारायण लोळगे,विजय माळवे,रवि माळवे,श्यामशेठ बुराडे,हरिषशेठ माळवे,संतोषशेठ माळवे ,सुनिल उदावंत,अशोक मैड आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.निमंत्रित श्री .ज्ञानेश्वर साबळे यांनीही समर्थन देऊन आपले मनोगत व्यक्त केले.या सामाजिक संकल्पना उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असुन अभिनंदन होत आहे.

Friday, September 30, 2022

UPI मधून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्यानंतर

या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात

UPI मधून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला मिळणारा मेसेज सेव्ह करा. जर मेसेज डिलीट झाला तर पैसे रिफंड करण्यात खूप अडचणी येतील. व्यवहार पुष्टीकरण संदेशामध्ये PBBL क्रमांक असतो.

पैसे परत करण्याच्या प्रक्रियेसाठी हे आवश्यक आहे. आरबीआयने आपल्या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे की, जर तुम्ही चुकून इतर कोणत्याही बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील, तर तुम्ही http://bankingombudsman.rbi.org.in वर जाऊन तक्रार करू शकता.

या प्रक्रियेनंतर, तुम्हाला बँकेकडे अर्ज देखील लिहावा लागेल. अर्जामध्ये तुम्हाला खाते क्रमांक, नाव, ज्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.


Thursday, September 29, 2022

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी ‘सुधारित’ शिष्यवृत्ती योजना; शिष्यवृत्तीची रक्कम ५० हजारापर्यंत वाढणार

राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेत शिष्यवृत्तीची रक्कम ५० हजारापर्यंत वाढविण्यात येणार आहे.

वर्ष २०११ मध्ये ही शिष्यवृत्तीची रक्कम २५ हजार रुपये इतकी होती. २०१८ मध्ये देखील यात काही बदल झाले नाहीत. केवळ पालकांच्या उत्पन्नाची वार्षिक मर्यादा २ लाखांवरून ८ लाखांपर्यंत वाढवली गेली होती. सुधारित योजनेमुळे प्रत्यक्ष शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क किंवा पन्नास हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, ती शिष्यवृत्ती म्हणून विद्यार्थ्यांना देण्यात येईल. त्याचप्रमाणे बारावीपर्यंत कला, वाणिज्य आणि विज्ञान या बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क यांची एकत्रित रक्कम किंवा पाच हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, ती शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येईल. जुन्या शिष्यवृत्ती योजनेतील इतर सर्व अटी, नियम पुर्वीप्रमाणेच राहतील.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली,लातूर* *महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांची जळगाव जिल्हाधिकारी पदी नियुक्ती.*.

ब्रेकिंग:-
🔥🔥🔥
*जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली,लातूर* *महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांची जळगाव जिल्हाधिकारी पदी नियुक्ती.*.


नवीन जिल्हाधिकारी साहेब यांचे तरुण तडफदार न्यूज तर्फे आणि राष्ट्रीय जनता दलाचे वतीने हार्दिक हार्दिक स्वागत
अभिजित राऊत साहेब यांना नवीन भागातील संधी साठी शुभेच्छा..

नाशिक विभाग पदवीधर निवडणुकीसाठी नोंदणी सुरू! नोंदणी करून मतदान करा. आमदार निवडीची संधी

। २९ सप्टेंबर २०२२ । भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी येत्या एक ऑक्टोबरपासून सुरु होणार असून 7 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरून देता येणार आहे. पदवी परीक्षा 1 नोव्हेंबर, 2022 पूर्वी उत्तीर्ण झालेल्या सर्व पदवीधरांना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार आहे. याकरीता विहीत नमुन्यातील फॉर्म क्र. 18 भरून द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.मतदार नोंदणी अर्ज नमुना 18 स्वीकारण्यासाठी कक्षाची स्थापन
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारास आपला आधार क्रमांक मतदार नोंदणी अर्जात नमूद करता येईल. तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे ऐच्छिक आहे. नाशिक विभागातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, उपविभागीय अधिकारी कार्यालयात तसेच तालुक्यातील तहसिलदार कार्यालयात व विभागीय आयुक्त कार्यालयात मतदार नोंदणी अर्ज नमुना 18 स्वीकारण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. याच कार्यालयातून नमुना 18 उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असेही श्री गमे यांनी केले आहे

पात्र नागरिकांनी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, बँका इ. कार्यालयातील कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या पात्र पदवीधर अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून फॉर्म नं. 18 भरुन घ्यावेत व आवश्यक कागदपत्रासह साक्षांकन करुन संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय या ठिकाणी जमा करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त नाशिक तथा नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी, श्री गमे यांचेकडून करण्यात आले आहे.

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन आणि नूतनीकरण च्या अर्जाची ऑनलाईन स्वीकृती २२ सप्टेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे. सदर शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येते.

केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार नोंदणीकृत होणाऱ्या अर्जावर तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया करून हे अर्ज विहीत वेळेत निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा पातळीवर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयांकडून त्यांच्या अधिनस्त असलेल्या शैक्षणिक व महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या प्रत्यक्ष बैठका घेऊन वेळापत्रकानुसार तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाकडून दिले आहेत.

वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज कार्यवाही वेळापत्रक:-

दिनांक 20 ऑक्टोबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे. तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत करणे आवश्यक राहील. तर नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत 15 ऑक्टोबर, 2022 तर सहायक आयुक्तांसाठी 31 ऑक्टोबर ही असेल.

वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक


अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज कार्यवाही वेळापत्रक:-

दिनांक 07 नोव्हेंबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे. तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही 15 नोव्हेंबर, 2022 पर्यंत करणे आवश्यक राहील.


तर नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत 31 ऑक्टोबर, 2022 तर सहायक आयुक्तांसाठी 07 नोव्हेंबर, 2022 ही असेल असे समाजकल्याण विभागाकडून प्रसिध्दीस देण्यात आले आहे.


आवश्यक कागदपत्रे:-

1.जातीचे प्रमाणपत्र

2. उत्पन्नाचा दाखला

3. मागील वर्षाची मार्कशीट

4. जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यापेक्षा निवडलेला व्यावसायिक अभ्यासक्रम

Tuesday, September 27, 2022

पदवीधर व शिक्षक निवडणूकीसाठी मतदार नाव नोंदणी करण्याचे आवाहन


कोकण, नागपूर व औरंगाबाद या विभागात शिक्षक मतदारसंघ तसेच नाशिक व अमरावती या विभागात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका २०२३ मध्ये होणार असल्याने, येत्या १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी नाव नोंदणीसाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेस त्यांचेसोबत उप मुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.
राज्यात विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका दर सहा वर्षांनी घेतल्या जातात. त्याकरीता पात्र शिक्षक व पदवीधरांनी प्रत्येकवेळी नव्याने मतदार नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याने, पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी किमान ३ वर्षे अगोदर कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त नागरीक अर्ज क्र.- १८ भरुन पदवीधर मतदार नाव नोंदणी करु शकतात. हा अर्ज नाशिक व अमरावती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसिलदार कार्यालयात उपलब्ध असणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceo.maharashtra.gov.in/downloads/downloadforms/forms-18.pdf या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध असून, अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची किंवा गुणपत्रिकेची साक्षांकित छायाप्रत जोडणे आवश्यक असल्याचे व दि.१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पदवीधर मतदारसंघाकरीता ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा देण्याचा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले.
तसेच शिक्षक मतदार नोंदणीकरीता १ नोव्हेंबर २०२२ रोजी लगतच्या सहा वर्षांमधील किमान ३ वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक हे मतदार नाव नोंदणीसाठी पात्र असून, ते अर्ज क्र.- १९ भरुन शिक्षक मतदार नाव नोंदणी करु शकतात. हा अर्ज कोकण, नागपूर व औरंगाबाद विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसिलदार कार्यालयात उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceo.maharashtra.gov.in/downloads/downloadforms/form-19.pdf या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध राहणार असून, अर्जासोबत विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्था प्रमुखांचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
येत्या कालावधीत होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदार नाव नोंदणीसाठी राजकीय पक्ष, मतदान केंद्र स्तरीय प्रतिनिधी किंवा रहिवासी वा कल्याणकारी संस्थाकडून एकगठ्ठा स्वरुपात प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे, तसेच पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरीताची प्रारुप मतदार यादी २२ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून, यादी संबंधी दावे व हरकतींचा कालावधी २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२२ असणार आहे. २५ डिसेंबर २०२२ रोजी दावे व हरकती निकालात काढून अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

Thursday, September 8, 2022

बार्टी’ मार्फत एम.फिल, पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई- सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF-2021) अंतर्गत दिनांक 01 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम नोंदणी (Confirmed Registration) असणाऱ्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामधून पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

BANRF-2021 अंतर्गत एकूण 200 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येणार आहे. याअंतर्गत एम.फिल/ पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना RGNF/NFSC च्या धर्तीवर JRF साठी रु. 31000/- व SRF साठी रु. 35000/- प्रतिमहा प्रमाणे अधिछात्रवृत्ती रक्कम तसेच वार्षि आकस्मिक खर्च, घरभाडे रक्कम देण्यात येते. एम.फिल साठी एकूण 2 वर्ष, पीएच.डी. साठी एकूण 5 वर्षे तसेच एम.फिल / पीएच.ड (Integrated Course) एकूण 5 वर्षे अधिछात्रवृत्ती

विद्यार्थ्यांना देण्यात येते. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी बार्टीचे अधिकृत संकेतस्थळ https://barti-maharashtragov.in ला भेट देण्याचे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आह

Tuesday, September 6, 2022

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार ७.५० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज



शासकीय योजना


मुंबई- नवे शैक्षणिक वर्ष 2022-23 आता सुरु होत असून राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची योजना सुरु आहे.


या योजनेच्या लाभासाठी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांनी केले आहे. अल्पसंख्याक समाजातील दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग, मेडीकल, नर्सिंग, फॅशन डिझायनींग, टुरीजम, पत्रकारीता, मास मीडिया, चित्रपट निर्मितीशी संबंधित विविध व्यावसायिक अभ्यासक्रम, ॲनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहेत, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क परत योजनेबाबत सविस्तर माहिती


1.योजनेचे नाव:- मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क.

2.योजनेचा प्रकार:- राज्य

3.योजनेचा उद्देश:- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयिन/उच्च शिक्षण घेता यावे, विद्यार्थ्याचे गळतिचे प्रमाण कमी व्हावे.


4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव:- अनुसूचित जाती

5.योजनेच्या प्रमुख अटी:- विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखपेक्षा जास्त मात्र उच्च उत्पन्न मर्यादा नाही. विद्यार्थी शालांत परीक्षेत्तर व पुढील शिक्षण घेत असलेला असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा

6.दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप:- शालांत परीक्षोत्तर शिक्षण घेणा-या अनु. जातीच्या विद्यार्थाना त्यांचे उत्पन्न विचारात न घेता सर्व मॅट्रिकोत्तर शैक्षणिक अभ्यास क्रमासाठी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर विहीत केलेले शुल्क देण्यात येते.

7. अर्ज करण्याची पध्दत:- या योजनेसाठी http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक

8. योजनेची वर्गवारी:- शिक्षण

9.संपर्क कार्यालयाचे नाव:- संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि महाविद्यालयाचे प्राचार्य

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे! महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु



सन २०२२ या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर कार्यान्वीत झाले असून,
खालील MAHADBT च्या संकेतस्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करुन हा अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करुन महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेस्तव सादर करावा.

Thursday, September 1, 2022

एलआयसी एजंट यांचे भारत भर विविध मागण्यासाठी आज धरणे आंदोलन

*आज दिनांक 1 सप्टेंबर एलआयसी स्थापना दिन या दिवशी  ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशनच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये आंदोलन पुकारण्यात येत आहे एजंट बांधवांच्या मागण्यांची निवेदन आज प्रत्येक शाखेत शाखाप्रबंधकांना देण्यात आले नाशिक विभागीय अध्यक्ष कैलासभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये  96K शाखेचे शाखा प्रबंध विठ्ठल नातू सर यांना एजंटांच्या विविध मागण्यांचे निवेदन 96Kशाखेचे अध्यक्ष चंद्रकांत घोडके,सेक्रेटरी गिरीश कुमार गुप्ता, उपाध्यक्ष अरुण पाटील, कार्याध्यक्ष अनिलभाऊ वाघ, ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप सोनवणे सर, ज्येष्ठ विमा प्रतिनिधी दिनकर पाटील सर, किशोर सूर्यवंशी, संदीप दापोरकर ,विजय पाटील, नारायण सूर्यवंशी, राजेंद्र विभांडिक,निलेश आजळकर ज्ञानेश्वर पाटील, काशिनाथ बोडरे, 968 शाखेचे अध्यक्ष आर आर पाटील सर विवेक पाटील सर ,बाजीराव पाटील, संजय पाटील इत्यादी विमा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Wednesday, August 31, 2022

*🙏जागृत देवस्थान🙏**श्री सप्तशृंगी देवस्थान* *व महादेव मंदिर रावेर* आज मंगळवार आरतीचे मानकरी वाढदिवसा निमित्त आरतीचा मान श्री चंद्रकांत चौधरी व श्री प्रशांत बोरकर यांना देण्यात आला.

*🙏जागृत देवस्थान🙏*
*श्री सप्तशृंगी देवस्थान* 
*व महादेव मंदिर रावेर*
 आज मंगळवार आरतीचे मानकरी वाढदिवसा निमित्त आरतीचा मान श्री चंद्रकांत चौधरी व श्री प्रशांत बोरकर यांना देण्यात आला. 
 आरतीला उपस्थित 
श्री पद्माकर भाऊ महाजन श्री दिलीप पाटिल श्री विकास देशमुख श्री धोंडू पासे श्री अरुण शिंदे श्री शैलू सेठ अग्रवाल श्री सचिन जगताप श्री रमेश चौधरी श्री किरण मावले केदार महाराज इत्यादि उपस्थित होते

माजी नगराध्यक्ष श्री पद्माकर महाजन मित्र मंडळी कडून प्रशांत बोरकर यांच्या वाढदिवस साजरा

*🪴🌹🪴वाढदिवसाच्या शुभेच्छा  💐🎂*
रावेर शहरातील आपल्या सर्वांचे परिचित जनसेवेत कार्यरत असलेले तरुण तडफदार पत्रकार श्री प्रशांत बोरकर  तसेच  श्री चंद्रकांत चौधरी यांचा आज वाढदिवस ....!!

श्री.पद्माकरभाऊ महाजन भा.ज.पा.जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष यांच्या खास उपस्थितीत 'वाढदिवस ' साजरा करण्यात आला. उपस्थित 
भाजपा शहराध्यक्ष श्री.दिलीप पाटील, राजे श्री विकास देशमुख श्री अरुण शिंदे श्री गणेश मराठे ,श्री. प्रकाश महाजन, प्रा ई.जे.महाजन सर श्री धोंडूभाऊ पासे श्री रमेश चौधरी श्री.आर.आर.महाजन श्री राकेश गडे वगैरे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

तेजस्वीजीके शुभहस्ते जगत कुमार को एशियाई युवा ऑनलाइन शतरंज चैंपियनशिप प्रतियोगिता में अच्छे प्रदर्शन के लिए बिहार सरकार की तरफ से “बिहार राज्य खेल सम्मान”

बिहार सरकार के माननीय उपमुख्यमंत्री श्री Tejashwi Yadav जी, के शुभ हस्ते  जगत कुमार को एशियाई युवा ऑनलाइन शतरंज चैंपियनशिप प्रतियोगिता में अच्छे प्रदर्शन के लिए बिहार सरकार की तरफ से “बिहार राज्य खेल सम्मान” देकर हौसलाफजाई  की
जगत कुमार प्रसिद्ध कोच्निग क्लासेस सुपर 30 के आनंद कुमार , बेटे हे

ओबीसी समाजबांधवांना शिष्यवृत्ती योजना वाढ करण्यासाठी मागील काँग्रेसच्या ओबीसी मंत्री कडून आजगायत दुर्लक्ष

नवीन  जुन्या अभ्यासक्रम विद्यार्थी यांना स्वाधार  सारख्या एकावन्न हजार रुपये प्रति वर्षे योजना ओबीसी आदिवासी यांना लागू करावी
राजद चे ओबीसी आदिवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांची मागणी.
मुंबई..सध्या अनेक योजना असून त्या योजना चे लाभ ओबीसी  आदिवासी समाज बांधवांना  विद्यार्थी यांना मिळत नसून ओबीसी आदिवासी समाज यांचे साठी भरीव मदतीची योजना लागू करण्याची गरज असल्याची मागणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर  यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचे कडे केली आहे
सध्या अनेक योजना असल्या तरी त्या योजनाचा लाभ ओबीसी समाज बांधवांना विद्यार्थी यांना मिळत नाही
त्यामुळे ओबीसी समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण शुल्क माफ योजना बरोबर समाज कल्याण विभाग मार्फत स्वाधार सारख्या योजना 11पासून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात आली पाहिजे
तसेच अनेक नवीन अभ्यासक्रम बाबतीत शिष्यवृत्ती योजना शिक्षण शुल्क माफ योजना लागू करण्यात मागील सरकार चे ओबीसी मंत्री यांनी चालढकल केली. तंत्र शिक्षण विभागाने प्रस्ताव पाठविला तरी पण ओबीसी आदिवासी विभागाने प्रस्ताव मंजूर केला नाही उलट मनमानी करून दुसऱ्या अभ्यासक्रमास मान्यता दिली गेली आणि केंद्र सरकारच्या मान्यता प्राप्त पदवी अभ्यासक्रम स्कॉलरशिप योजना लागू केली नाही.त्यामुळे शेकडो विद्यार्थी  यांचे वर अन्याय झाला असून शिष्यवृत्ती नसलेल्या  पदवी अभ्यासक्रम हे बंद पडत आहेत.अनेक शिकत असलेले विद्यार्थी यांचे हाल ही कोणी विचारात नसून भविष्य  अंधारात आहे
त्यामुले  नवीन अभ्यासक्रम बाबतीत आता पंत प्रधान मोदी जी यांनी हस्तक्षेप करून BVOC नवीन अद्यावत अभ्यासक्रमास शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क माफ योजना राजश्री शाहू महाराज शिक्षण परत योजना लागू करावी तसेच स्वाधार सारखी योजना नव्याने  सुरू करावी अशी मागणीही यावेळी जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांनी केली आहे

आज तेलंगाना केमुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव जी के बिहार आगमन पर Tejashwi Yadav जी उनका हार्दिक स्वागत व अभिनंदन किया ।

आज तेलंगाना के जनप्रिय मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव जी के बिहार आगमन पर Tejashwi Yadav जी उनका हार्दिक स्वागत व अभिनंदन किया । देश मे तिसरे मोर्चे कीhalvhlतेजस्वी यादव जी ने बिहार में सरकार स्थापन कर प्रादेशिक पक्ष के इरादे बुलंद कर दिये हे

श्री क्षेत्र ओंकारेश्वर ते श्री उमामहेश्वर सांबरपाट भव्य कावड यात्रा🔴@TARUN TADAFDAR NEWS" on YouTube

https://youtu.be/epYkgzH53Zo 

atch "🔴श्री क्षेत्र ओंकारेश्वर ते श्री उमामहेश्वर सांबरपाट भव्य कावड यात्रा🔴@TARUN TADAFDAR NEWS" on YouTube

Wednesday, August 24, 2022

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) दि 30 ऑगस्ट, 2022 पर्यंत

शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यावसायिक, कारखाने, कंपनी इ. यांनी त्यांच्याकडील 30 जून 2022 या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) दि 30 ऑगस्ट, 2022 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे, असे रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी कळविले आहे.

सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा, 1959 व नियमावली, 1960 अन्वये त्रैमासिक विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने 30 जून,2022 अखेर आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-1) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरील नियोक्ता (Employer) या ऑप्शनवर क्लिक करुन आपल्या नियोक्ता लॉग–इन आयडी (Employer Login ID) व पासवर्डच्या सहाय्याने 30 ऑगस्ट, 2022 पर्यंत भरावे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 0257-2959790 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त वि.जा. मुकणे यांनी केले आहे

Wednesday, August 10, 2022

राष्ट्रीय ओबीसी महासंघ जी ओर से लालू प्रसाद यादव जी को सन्मानित किया गया

ओबीसी पिछडे समाज के उत्थान के लिये भरीव योगदान के किये राष्ट्रीय जनता दल के सुप्रीमो माजी मुख्यमंत्री रेलमंत्री श्रीमान लालू प्रसाद यादव जी को राष्ट्रीय ओबीसी महासंघ के ओरसे  सन्मान पत्र दिल्ली मे दिया गया
सन्मान पत्र  उनके दिल्ली के निवास स्थान पर जांकर राष्ट्रीय अध्यक्ष श्री बबनराव तायवाडे ओर उनके सहयोगी ने दियं
लालू जी का स्वास्थ ठीक ना होणे से वो ओबीसी मेळावा को नहीं आ सके.
ओबीसी महासंघ ने लालू जी के योगदान  संमझ कर ऊंका सन्मान करणे से अच्छा लगा. ओबीसी समाज प्रबोधन जनजागृती  करणे वाले नेतांका मान सन्मान करेगा तब भी आने वाले नेता कार्यकर्ता संघर्ष करणेगे यह बात ओबीसी विचारवंत श्री प्रशांत बोरकर प्रवक्ते महाराष्ट्र राज्य महासचिव राष्ट्रीय जनता दल   उन्होंने की..

Monday, August 8, 2022

ओबीसींच्या हक्कांसाठी पाठपुरावा करणार उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ओबीसी महाअधिवेशनात ग्वाही

ओबीसींच्या हक्कांसाठी पाठपुरावा करणार
 उपमुख्यमंत्री फडणवीस यांची 
ओबीसी महाअधिवेशनात ग्वाही

नवी दिल्ली 
ओबीसींचा हक्कांसाठी लढा सुरू आहे. या घटकाचा सर्वंकष विकास व्हायला हवा. या महाअधिवेशनात केल्या गेलेल्या मागण्यांना माझा पाठिंबा आहे. त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करेल, अशी ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन येथील तालकटोरा स्टेडियममध्ये झाले. यावेळी उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते. 
व्यासपीठावर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, खा. बाळू धानोरकर, आमदार परिणय फुके, आमदार अॅड. अभिजित वंजारी, माजी मंत्री महादेव जानकर, व्ही. ईश्वरय्या, राष्ट्रीय  जनता दलाचे महासचिव तसेच ओबीसी   विचारवंत नेते श्री प्रशांत बोरकर सुशीला मारोळे,  अॅड. फिरदोस मिर्झा आदी उपस्थित होते. महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे हे अध्यक्षस्थानी होते. ओबीसींची जातीनिहाय गणना, ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करणे, केंद्रात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करणे, आरक्षणावर लावलेली ५० टक्क्यांची मर्यादा रद्द करणे, क्रीमिलेअरमधील असंविधानिक तरतुदी रद्द करणे आदी २२ मागण्या यावेळी करण्यात आल्या. ओबीसींच्या हक्कांसाठी पाठपुरावा करणार
 उपमुख्यमंत्री फडणवीस यांची 
ओबीसी महाअधिवेशनात ग्वाही

, नवी दिल्ली 
ओबीसींचा हक्कांसाठी लढा सुरू आहे. या घटकाचा सर्वंकष विकास व्हायला हवा. या महाअधिवेशनात केल्या गेलेल्या मागण्यांना माझा पाठिंबा आहे. त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करेल, अशी ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन येथील तालकटोरा स्टेडियममध्ये झाले. यावेळी उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते. 
व्यासपीठावर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, खा. बाळू धानोरकर, आमदार परिणय फुके, आमदार अॅड. अभिजित वंजारी, माजी मंत्री महादेव जानकर, व्ही. ईश्वरय्या, सुशीला मारोळे, अॅड. फिरदोस मिर्झा आदी उपस्थित होते. महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे हे अध्यक्षस्थानी होते. ओबीसींची जातीनिहाय गणना, ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करणे, केंद्रात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करणे, आरक्षणावर लावलेली ५० टक्क्यांची मर्यादा रद्द करणे, क्रीमिलेअरमधील असंविधानिक तरतुदी रद्द करणे आदी २२ मागण्या यावेळी करण्यात आल्या. 
डॉ. तायवाडे म्हणाले, संविधानाच्या कलम ३४०नुसार ओबीसींना संविधानिक अधिकार मिळाले, मात्र गेल्या ७५ वर्षांत या अधिकारांवर अंमल झाला नाही. न्यायासाठी हा महासंघ स्थापन करावा लागला. आंदोलने करावी लागली. हक्कांसाठी लढाई अशीच सुरू राहणार आहे. ओबीसींच्या २२ मागण्यांना देशभरातील ओबीसीबांधवांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 
केंद्र सरकार ओबीसीच्या पाठीशी आहे. ओबीसींचाही सरकारला पाठिंबा हवा, असे केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले. विविध भाषांमध्ये विखुरलेल्या ओबीसींनी देशपातळीवर एकत्र यायला हवे. शिक्षण, सरकारी नोकऱ्यांत अन्याय होतच आहे. याविरुद्ध एकत्रित लढा हवा, असे आवाहन पटोले यांनी केले. देशातील आरक्षण संपविले जात असल्याचा आरोप जस्टीस व्ही. ईश्वरय्या यांनी केला. खा. धानोरकर यांनी समाजाची परिस्थिती मांडली. भुपेंद्र बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल, तेलंगाणा चे खासदार यादव माजी खासदार व्ही. हनुमतराव, आ. फुके,आ महादेव जानकर, प्रशांत बोरकर .इंदरपाल सिंग, सुशीला मोराळे, शब्बीर अन्सारी,श्रीनिवास जाजूला, शंकर राव यांचीही भाषणे झालीत.
यावेळी महासंघाच्या "अस्मितेचा लढा "स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी प्रास्ताविक केले. बिहार ओबीसी महासंघाचे अध्यक्ष शिवप्रसाद सहा यांनी आभार मानले. कार्यक्रम करिता शरद वानखेडे, शेषराव येलेकर,मुकेश नंदन, मनोज चव्हाण, विनोद उलीपवार, विजय पिदूरकर,गुणेश्वर आरिकर युवा अध्यक्ष ,सुभाष घाटे,प्रकाश भांगरथ, मंगेश सातपुते, अरुण टिकले, विक्रम मानकर, बावनकुडे,शाम लेडे, चेतन शिंदे, दिनेश चोखारे शकील पटेल, राजू चौधरी, पराग वानखेडे, विनोद हजारे,शुभम वाघमारे,निलेश कोडे रोशन कुंभलकर,ऋषभ राऊत, मयूर वाघ, सुषमा भड, शरयू तायवाडे, कल्पना मानकर, ठाकरेताई, निशा खडसे,यांनी मेहनत घेतली. बॉक्स , बिहारचे माजी मंत्री लालू प्रसाद यादव यांचा घरी जाऊन सन्मान करण्यात आला,या वेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते
डॉ. तायवाडे म्हणाले, संविधानाच्या कलम ३४०नुसार ओबीसींना संविधानिक अधिकार मिळाले, मात्र गेल्या ७५ वर्षांत या अधिकारांवर अंमल झाला नाही. न्यायासाठी हा महासंघ स्थापन करावा लागला. आंदोलने करावी लागली. हक्कांसाठी लढाई अशीच सुरू राहणार आहे. ओबीसींच्या २२ मागण्यांना देशभरातील ओबीसीबांधवांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 
केंद्र सरकार ओबीसीच्या पाठीशी आहे. ओबीसींचाही सरकारला पाठिंबा हवा, असे केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले.  विविध भाषांमध्ये विखुरलेल्या ओबीसींनी देशपातळीवर एकत्र यायला हवे. शिक्षण, सरकारी नोकऱ्यांत अन्याय होतच आहे. याविरुद्ध एकत्रित लढा हवा, असे आवाहन पटोले यांनी केले. देशातील आरक्षण संपविले जात असल्याचा आरोप जस्टीस व्ही. ईश्वरय्या यांनी केला. खा. धानोरकर यांनी समाजाची परिस्थिती मांडली. भुपेंद्र बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल,  तेलंगाणा चे खासदार  यादव माजी खासदार व्ही. हनुमतराव, आ. फुके,आ महादेव जानकर,  प्रशांत बोरकर .इंदरपाल सिंग, सुशीला मोराळे, शब्बीर अन्सारी,श्रीनिवास जाजूला, शंकर राव यांचीही भाषणे झालीत.
यावेळी महासंघाच्या  "अस्मितेचा लढा "स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी प्रास्ताविक केले. बिहार ओबीसी महासंघाचे अध्यक्ष शिवप्रसाद सहा यांनी आभार मानले. कार्यक्रम करिता शरद वानखेडे, शेषराव येलेकर,मुकेश नंदन, मनोज चव्हाण, विनोद उलीपवार, विजय पिदूरकर,गुणेश्वर आरिकर युवा अध्यक्ष ,सुभाष घाटे,प्रकाश भांगरथ,  मंगेश सातपुते, अरुण टिकले, विक्रम मानकर, बावनकुडे,शाम लेडे, चेतन शिंदे, दिनेश चोखारे शकील पटेल, राजू चौधरी, पराग वानखेडे, विनोद हजारे,शुभम वाघमारे,निलेश कोडे  रोशन कुंभलकर,ऋषभ राऊत, मयूर वाघ,  सुषमा भड, शरयू तायवाडे, कल्पना मानकर, ठाकरेताई, निशा खडसे,यांनी मेहनत घेतली.                                    बॉक्स   , बिहारचे माजी मंत्री लालू प्रसाद यादव यांचा घरी जाऊन सन्मान करण्यात आला,या वेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...