Monday, August 8, 2022

ओबीसींच्या हक्कांसाठी पाठपुरावा करणार उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ओबीसी महाअधिवेशनात ग्वाही

ओबीसींच्या हक्कांसाठी पाठपुरावा करणार
 उपमुख्यमंत्री फडणवीस यांची 
ओबीसी महाअधिवेशनात ग्वाही

नवी दिल्ली 
ओबीसींचा हक्कांसाठी लढा सुरू आहे. या घटकाचा सर्वंकष विकास व्हायला हवा. या महाअधिवेशनात केल्या गेलेल्या मागण्यांना माझा पाठिंबा आहे. त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करेल, अशी ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन येथील तालकटोरा स्टेडियममध्ये झाले. यावेळी उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते. 
व्यासपीठावर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, खा. बाळू धानोरकर, आमदार परिणय फुके, आमदार अॅड. अभिजित वंजारी, माजी मंत्री महादेव जानकर, व्ही. ईश्वरय्या, राष्ट्रीय  जनता दलाचे महासचिव तसेच ओबीसी   विचारवंत नेते श्री प्रशांत बोरकर सुशीला मारोळे,  अॅड. फिरदोस मिर्झा आदी उपस्थित होते. महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे हे अध्यक्षस्थानी होते. ओबीसींची जातीनिहाय गणना, ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करणे, केंद्रात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करणे, आरक्षणावर लावलेली ५० टक्क्यांची मर्यादा रद्द करणे, क्रीमिलेअरमधील असंविधानिक तरतुदी रद्द करणे आदी २२ मागण्या यावेळी करण्यात आल्या. ओबीसींच्या हक्कांसाठी पाठपुरावा करणार
 उपमुख्यमंत्री फडणवीस यांची 
ओबीसी महाअधिवेशनात ग्वाही

, नवी दिल्ली 
ओबीसींचा हक्कांसाठी लढा सुरू आहे. या घटकाचा सर्वंकष विकास व्हायला हवा. या महाअधिवेशनात केल्या गेलेल्या मागण्यांना माझा पाठिंबा आहे. त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी पाठपुरावा करेल, अशी ग्वाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन येथील तालकटोरा स्टेडियममध्ये झाले. यावेळी उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते. 
व्यासपीठावर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, खा. बाळू धानोरकर, आमदार परिणय फुके, आमदार अॅड. अभिजित वंजारी, माजी मंत्री महादेव जानकर, व्ही. ईश्वरय्या, सुशीला मारोळे, अॅड. फिरदोस मिर्झा आदी उपस्थित होते. महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे हे अध्यक्षस्थानी होते. ओबीसींची जातीनिहाय गणना, ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करणे, केंद्रात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करणे, आरक्षणावर लावलेली ५० टक्क्यांची मर्यादा रद्द करणे, क्रीमिलेअरमधील असंविधानिक तरतुदी रद्द करणे आदी २२ मागण्या यावेळी करण्यात आल्या. 
डॉ. तायवाडे म्हणाले, संविधानाच्या कलम ३४०नुसार ओबीसींना संविधानिक अधिकार मिळाले, मात्र गेल्या ७५ वर्षांत या अधिकारांवर अंमल झाला नाही. न्यायासाठी हा महासंघ स्थापन करावा लागला. आंदोलने करावी लागली. हक्कांसाठी लढाई अशीच सुरू राहणार आहे. ओबीसींच्या २२ मागण्यांना देशभरातील ओबीसीबांधवांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 
केंद्र सरकार ओबीसीच्या पाठीशी आहे. ओबीसींचाही सरकारला पाठिंबा हवा, असे केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले. विविध भाषांमध्ये विखुरलेल्या ओबीसींनी देशपातळीवर एकत्र यायला हवे. शिक्षण, सरकारी नोकऱ्यांत अन्याय होतच आहे. याविरुद्ध एकत्रित लढा हवा, असे आवाहन पटोले यांनी केले. देशातील आरक्षण संपविले जात असल्याचा आरोप जस्टीस व्ही. ईश्वरय्या यांनी केला. खा. धानोरकर यांनी समाजाची परिस्थिती मांडली. भुपेंद्र बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल, तेलंगाणा चे खासदार यादव माजी खासदार व्ही. हनुमतराव, आ. फुके,आ महादेव जानकर, प्रशांत बोरकर .इंदरपाल सिंग, सुशीला मोराळे, शब्बीर अन्सारी,श्रीनिवास जाजूला, शंकर राव यांचीही भाषणे झालीत.
यावेळी महासंघाच्या "अस्मितेचा लढा "स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी प्रास्ताविक केले. बिहार ओबीसी महासंघाचे अध्यक्ष शिवप्रसाद सहा यांनी आभार मानले. कार्यक्रम करिता शरद वानखेडे, शेषराव येलेकर,मुकेश नंदन, मनोज चव्हाण, विनोद उलीपवार, विजय पिदूरकर,गुणेश्वर आरिकर युवा अध्यक्ष ,सुभाष घाटे,प्रकाश भांगरथ, मंगेश सातपुते, अरुण टिकले, विक्रम मानकर, बावनकुडे,शाम लेडे, चेतन शिंदे, दिनेश चोखारे शकील पटेल, राजू चौधरी, पराग वानखेडे, विनोद हजारे,शुभम वाघमारे,निलेश कोडे रोशन कुंभलकर,ऋषभ राऊत, मयूर वाघ, सुषमा भड, शरयू तायवाडे, कल्पना मानकर, ठाकरेताई, निशा खडसे,यांनी मेहनत घेतली. बॉक्स , बिहारचे माजी मंत्री लालू प्रसाद यादव यांचा घरी जाऊन सन्मान करण्यात आला,या वेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...