Saturday, October 29, 2022

पहिली पासून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री-मेट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता १ ली ते १० वी), बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी ते १२ वी फक्त मुली), राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी ते १२ वी), दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी व १० वी) या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी

www.scholarships.in या संकेतस्थळावर ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. तसेच नूतनीकरणासाठी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याने अर्ज भरणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.scholarships.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे, असे आवाहन शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे

Thursday, October 27, 2022

अर्चनाताई सोनार यांना 'सन्मान स्त्री शक्तीचा समाजसेविका'पुरस्कार*

*अर्चनाताई सोनार यांना 'सन्मान स्त्री शक्तीचा समाजसेविका'पुरस्कार*

(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे)
पुणेः- पिंपरी चिंचवड महानगर पालिका बहुउद्देशीय सभागृह स्व.प्रमोद महाजन हाॕल या ठिकाणी माजी नगरसेविका  योगिताताई नागरगोजे यांच्या हस्ते 'सन्मान स्त्री शक्तीचा उत्कृष्ट समाजसेविका 'पुरस्कार  योगगुरु अर्चनाताई सोनार यांना नवरात्रौत्सवाच्या आयोजित भव्य कार्यक्रमात देण्यात आला.
           स्री शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अंतर्गत सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक क्षेत्रात विविध कार्यक्रमात   फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.अर्चना ईश्वर सोनार यांचा सहभाग सातत्याने असतो.तसेच निःशुल्क योगशिक्षण देत असतात .मोफत आरोग्य शिबिर ,बालसंस्कार वर्ग आदी उपक्रमात सहभाग . त्यांच्या विविध कार्याचा आढावा घेऊन  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ.योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे यांनी  सौ.अर्चनाताई सोनार यांना "सन्मान स्त्री शक्तीचा उत्कृष्ट समाजसेविका "पुरस्कार खास महिलासाठीआयोजित नवरात्र उत्सव निमित्त महाभोंडला कार्यक्रमात सन्मानचिन्ह ,शाल,श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.या पुरस्काराबद्दल अनेक महिला,संस्था,संघटना यांनी अभिनंदन करुन कौतुक केले.

Monday, October 24, 2022

ब्रिटन के प्रधान मंत्री ऋषि सुनक ने दिवाली पर निकाला था महात्मा गांधी के नाम का सिक्का

ऋषि सुनक ने दिवाली पर निकाला था महात्मा गांधी के नाम का सिक्का

 अब प्रधान मंत्री  हुये हे  पूर्व ब्रिटेन के वित्त मंत्री के पद पर रहकर ऋषि सुनक ने भारत के राष्ट्रपिता महात्मा गांधी के नाम का सिक्का जारी किया। जिसमें भारत का राष्ट्र चिन्ह और मां सरस्वती का सिंहासन कमल अंकित किया हुआ है। ये पहली बार हुआ है कि एक ब्रिटिश देश में भारतीय सिक्के को जारी किया गया हो।

Thursday, October 20, 2022

अपघात स्थळी संकटकाळात धावून जाणारा***कर्तव्य तत्पर "वासुदेव"*************************

***कर्तव्य तत्पर "वासुदेव"***
**********************
दिनांक 16,10,2022 रोजी सकाळी 11 ते 11:15 दरम्यान गुरुवर्य ना.भि.वानखेडे प्रतिष्ठानच्या ॲम्ब्युलन्स चा मोबाईल खणखणला. ॲम्ब्युलन्स चालक वासुदेव महाजन यांनी कर्तव्यात कसूर न करता अपघात स्थळी धाव घेतली.🚑.🚑🚑
बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर मोटर सायकल स्वार  मामा/भाचे खड्डे चुकवित असताना एका मिनी ट्रकची धडक लागून मोटर सायकल स्वार गंभीर रित्या जखमी झाला. ट्रकचे चाक पायावरून गेल्याने गंभीर दुखापत झाली, सदर अपघात  रावेर पासून एक किलोमीटर अंतरावर झाला.
अपघाताच्या ठिकाणी शेजारीच शेतामध्ये श्री राजू रामदास महाजन हे काम करीत होते. त्यांनी गुरुवर्य ना.भि.वानखेडे प्रतिष्ठानचे ॲम्ब्युलन्स चालक वासुदेव महाजन यांच्याशी संपर्क केला व काही वेळातच ॲम्ब्युलन्स घटनास्थळावर पोहोचली. तोपर्यंत गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्ती तेथेच पडून होती. वासुदेव महाजन यांनी त्वरित उचलून अस्थिरोग तज्ञ डॉक्टर भगवान कुयटे यांच्याशी संपर्क केला. त्याचेवर प्राथमिक उपचार करून व प्रसंगावधान राखून पुढील उपचारासाठी पाठवीले.🚑🚑🚑
************************

Tuesday, October 18, 2022

फसवणुकीची ३ दिवसांच्या आत तक्रार कराऑनलाईन बँक फसवणूक झाल्यास RBI च्या या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वागा


हॅकर्स तुमच्या खात्याचा तपशील मिळवतात आणि त्यातून पैसे काढतात. मात्र, नुकसान सोसूनही लोक गप्प बसतात कारण त्यांना काय करता येईल हे माहीत नसते. परंतु अशा घटना घडल्यास तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे परत मिळू शकतात हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. डिजिटलायझेशन हे भविष्य आहे आणि डिजिटल
व्यवहारांच्या वाढत्या युगात बँक खात्यातील फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत हे आपणा सर्वांना माहीत आहे.

अनधिकृतपणे अवैध व्यवहार होत आहेत. ऑनलाइन फसवणूक, डिजिटल फसवणूक किंवाvसायबर फसवणूक अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने म्हटले आहे की कोणत्याही अनधिकृत व्यवहारानंतरही तुम्हाला पूर्ण परतावा मिळू शकतो. आरबीआयने पुढे सांगितले की,अशा कोणत्याही व्यवहाराची तत्काळ माहिती देऊन तुम्ही नुकसान टाळू शकता.

परतावा कसा मिळवायचा:- लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की जर फसवणूक झाली असेल तर पैसे परत कसे होणार? तसेच बँक खात्यातून पैसे काढल्यानंतर तक्रार केल्यास बँक पैसे कोठून परत करणार. अशा सायबर फसवणुकीमुळे बँका विमा पॉलिसी घेतात हे तुम्हाला माहिती आहे. बँक फसवणुकीची माहिती थेट विमा कंपनीला देईल आणि तिथून विम्याचे पैसे घेऊन
तुमचे नुकसान भरून काढेल. सायबर फसवणूक
टाळण्यासाठी विमा कंपन्याही लोकांना थेट कव्हरेज देत आहेत. तुम्हाला हवे असल्यास, सायबर फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही विमा देखील मिळवू शकता. अनेक कंपन्या असा विमा देतात. रिझर्व्ह बँकेने ग्राहक संरक्षण, अनाधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांमधील ग्राहकांचे मर्यादित दायित्व (अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारातील ग्राहकांचे संरक्षण मर्यादित दायित्व) यावर नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

फसवणुकीची ३ दिवसांच्या आत तक्रार करा:- जर कोणी चुकीच्या पद्धतीने तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले तर तुम्हाला या घटनेची तक्रार तीन दिवसांत बँकेकडे करावी लागेल. असे केल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान सहन करावे लागणार नाही. आरबीआयने असेही म्हटले आहे की ग्राहकाच्या खात्यातून फसवणुकीने काढलेली रक्कम निर्धारित वेळेत बँकेला कळवल्यानंतर 10 दिवसांच्या आत त्याच्या बँक खात्यात परत केली जाईल. तथापि, जर व्यक्तीने 4-7 दिवसांनंतर फसवणुकीची माहिती दिली तर अशा प्रकरणांमध्ये ग्राहकाला 25,000 रुपयांपर्यंतचे नुकसान सहन करावे लागेल, असे आरबीआयने म्हटले आहे.

सायबर फ्रॉड्स हेल्पलाइन:- गृह मंत्रालयाने “नागरिक आर्थिक सायबर फ्रॉड रिपोर्टिंग आणि मॅनेजमेंट सिस्टीम” मॉड्यूलवर आर्थिक फसवणुकीच्या तत्काळ अहवाल देण्यासाठी आणि सायबर गुन्हे दाखल करण्यात मदत मिळवण्यासाठी टोल- फ्री हेल्पलाइन क्रमांक ‘1930’ (पूर्वी ‘155260) कार्यान्वित केला आहे.

स्थानिक पोलीस मिळविणार माहिती:- ही हेल्पलाइन भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरद्वारे आरबीआय, पेमेंट बँक आणि इतर प्रमुख बँकांच्या मदतीने चालवली जाते. एवढेच नाही तर याबाबत तक्रार दाखल होताच तत्काळ कारवाईही सुरू केली जाते. सोबतच पोलीस ठाण्यातही माहिती देण्यात येते. तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती तपास यंत्रणेला देणे ही स्थानिक पोलिसांची जबाबदारी आहे. या हेल्पलाइनचे वैशिष्ट्य म्हणजे, ही हेल्पलाइन थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आली. गृहमंत्रालयही यावर लक्ष ठेवते. अनेकांच्या तक्रारीनंतर पैसे परत केले जातात. तक्रार केल्यानंतर काही तासांत फ्रॉडला बळी पडलेल्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवर एक्नॉलेजमेंट क्रमांकही पोहोचतो.

नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल:- जर हेल्पलाईन क्रमांकावरील कॉलमध्ये काही अडचण येत असेल तर, तर तुम्ही cybercrime.gov.in या वेबसाइटला भेट देऊन तक्रार नोंदवू शकता.

Monday, October 17, 2022

सीताफळ लागवड अनुदान योजना अर्ज भरण्याची पद्धत.

महाराष्ट्रात औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, जळगाव, सातारा, नाशिक, सोलापूर आणि भंडारा जिल्ह्यात बीड कोथिंबीरचे सर्वाधिक पीक घेतले जाते. रोजगार हमी योजनेच्या संबंधित फलोत्पादन विकास योजनेंतर्गत महाराष्ट्रात २५ हजार ९०६ हेक्टर क्षेत्रात सीताफळाची लागवड करण्यात आली आहे. आणि मराठवाड्यातील धारूर आणि बालाघाट ही गावे सीताफळासाठी प्रसिद्ध आहेत.

योजनेच्या पात्रता

हा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. योजनेचा लाभ संस्थात्मक लाभार्थ्यांना देय नाही.

शेतकऱ्याच्या नावावर 7/12 असावा. संयुक्त मालकीच्या बाबतीत, इतर खातेदारांच्या संमतीने, शेतकरी त्याच्या हिश्श्याच्या मर्यादेपर्यंत लाभ घेऊ शकतो.

इथे करा ऑनलाइन अर्ज



https://mahadbtmahait.gov.in/Farmer/login/login

7/12 वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे.

पारंपारिक वन अधिवास (वन हक्कांची मान्यता) अधिनियम 2006 नुसार, वनपट्टे धारक शेतकरी लाभासाठी पात्र आहेत.

त्या क्षेत्राव्यतिरिक्त शासकीय योजनांद्वारे फळबागांची लागवड केल्यास वरील कलमानुसार शेतकऱ्याला क्षेत्र मर्यादेत लाभ मिळू शकतो.

सीताफळ लागवड अनुदान योजना अर्ज भरण्याची पद्धत.

जर तुम्ही भाऊसाहेब फंडकर सीताफळ अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करू शकता.

Sunday, October 16, 2022

शेकडो एकर पडित जमीन विकासासाठी हा उपक्रम प्रोजेक्ट आदर्श सर्वत्र राबविण्याचि गरज।। प्रशांत बोरकर।

कृषी मधून पर्यावरण रक्षणासाठी पाचशे एकरापेक्ष्या जास्त
जिनसी सांबार पाटअभोडा उपक्रम।
🤳🌱🌿🌲🌳🌴🪴🍃🌍🌈💫
शेकडो एकर  पडित जमीन विकासासाठी हा उपक्रम   प्रोजेक्ट आदर्श  सर्वत्र राबविण्याचि गरज।। प्रशांत बोरकर।

रावेरपाल  मधील आभोडा जिनसी सांभरपाट भागात  पूर्वी खूप प
डीत शेती होती  माजी सैनिक यांना दिलेली  पाचशे एकर पेक्षा जास्त शेतजमीन खडकाळ जमीन आणि उत्पन्न  येत नसल्याने  कुणी लक्ष देत नसे त्याचे वारसदार यांना पण आपली जमीन कुठे आहे हे समजत नव्हते पण  जुन्या पुणे हून  नकाशे रेकॉर्ड  आणून जमीन शोधल्या  खूप कडक दगडाची जमीन म्हणून कोणी करण्यास तयार होईना ,मग त्यातून जय जवान जय किसान कृषी पर्यावरण सहकारी संथाचा जन्म झाला त्यात  माजी सैनिक शेतकरी आदिवासी  भटके विमुक्त जाती जमातीचे लोक यांना बरोबर घेवून  पाचशे  500एकर मद्ये  वूर्क्षारोपण करण्याचे ठरविले रोज जावून खड्डे खोदणे हा उपक्रम पण तरीपण त्यास प्रतिसाद मिळाला नाहीये म्हणून  आदिवासी पावरा समाजाचे मजुरांना बरोबर घेतले रोप लावली पण उन्हाळा मधे पाणी नसल्याने रोप वाळून गेली मद्ये बिबटे वन्य प्राणी यांचा धोका असल्याने जाणे ही जोखमीचे होत गेले, म्हणून प्रत्येक झाडाजवळ माठ  इंजेक्शन सलाईन चां प्रयोग पण केला पण    प्रचंड उन्हाळा कडक दगड म्हणून काही रोप जगली  त्यात बंधारे पाणी जिरवा पाणी अडवा चां प्रयोग केला उस का  केली लावण्याचा  स्वप्न होते म्हणून मग विहिरी तलाव चर्चा झाली पण आता  निधी नाही म्हणून आमदार राजाराम भाऊ यांना त्या स्पॉट वर बोलावले ते सकाळी च हजर आणि तो परिसर पाहून झाडे लावलेली जुनी झाडे  पाहून थक्क झाले त्यांना आम्ही जवाहर विहिरी चे माहिती सांगितले लगेच त्यायर म्हणाले किती तर आम्ही 25प्रस्ताव दिले त्याचा पाठपुरावा करून सर्व जिल्हा चे बजेट रावेर अभौडा जिनसी पाल भागात विहारी खोदल्या  काहीना पाणी लागले काही फेल गेल्या पण त्यामुळे त्यात पाणी जाण्यामुळे जमीन भुसभुशीत झाली रोज  जावून जेथे दिसेल तेथे झाडे लावली, इतकी  डोंगराळ भागात विहारी खोदल्या पण वीज मिळेना त्यासाठी पुन्हा  चकरा काही शेतकऱ्यांनी या जमिनी सुपीक केल्या धरणाचा गाळ काढण्याचे व डोंगराळ जमीन मद्ये आणून टाकण्याचे प्रयत्न झाले  आज ही जमीन सुजलाम सुफलाम दिसत आहे संस्था बंद पडली असली तरी भू मातेने आले दान दिले आहे आज आमचे  मार्गदर्शक  माजी  मुख्याधिकारी एम एम पाटील  शहादाकर प्रल्हाद नारायण पाटील बलवाडीकर हे हयात नाही पण आम्ही  आमचे काका वसंत विठ्ठल महाजन यांच्या बरोबर जमिनी पोट खराब  जमिनी रेकॉर्ड ला दुरुस्त करणे सुरू आहे
कृषी बरोबर पर्यावरण बचाव त्यातून कृषी पर्यटन विकास आणि जोड प्रकल्प जोड धंदे ची साथ मिळाली तर शेतकरी वर्ग बरोबर मजूर गावा गावातली मुलं यांना रोजगार उपलब्ध होईल , तसे वातावरण तयार होत आहे साथ साशनाची मिळावी यासाठी माहिती सहकार्य महत्वाचे आहे 
महात्मा गांधी यांचे खेड्याकडे चला ह्या धोरणच खूप ताकदीचे आणि तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणार आहे हे शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्षात घेतले पाहिजे तेव्हाच मोठ्या शहराकडे जाणारी   लोंढI कमी होतील
पर्यावरण रक्षण कृषी फळबाग लागवड मधून मोठ्या प्रमाणात वन आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होतील त्यासाठी सरकारने काही नवीन योजना पडीत
 जमीन विकास हा जन सहभागाने केला पाहिजे,. 
प्रशांत बोरकर
मुक्त पत्रकार
 जय जवान जय किसान
कृषी पर्यावरण प्रकल्प योजना
कृषी पर्यटन अभ्यासक कार्यकर्ता💚🪴🦚🐥🍀🦜🌈🌈🎯🐥💫💫💫🎯
8208361187
11/07/2021

Friday, October 14, 2022

कोकणकन्या रिटर्न” या कॅफे मराठीच्या नव्या युट्यूब सीरिजमधून.


“कोकणकन्या रिटर्न” मधून घडणार कोकणची सफर !
प्रशांतबोरकर यांजकडून
मुबई – आज आपण मोठ-मोठ्या महानगरात आणि आलिशान ऑफिस आणि घरात राहत असलो तरी आपल्या सगळयांची नाळ ही गावाशी जोडली गेली आहे. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आपण गाव सोडून शहरात आलो खरे पण ती गावची गोडी इथे नाही अशीच कोकणातल्या एका गावाची गोष्ट तुम्हाला पहायला मिळणार आहे ते, “कोकणकन्या रिटर्न” या कॅफे मराठीच्या नव्या युट्यूब सीरिजमधून.
ही गोष्ट आहे राधाची आणि तिच्या भाव-विश्वाची. अनेक वर्ष आपल्या गावापासून दूर राहिलेली राधा अचानक काही कामानिमित्त आपल्या गावी कोकणात परतते. इथे आल्यावर तिला आपले घर, बालपणाच्या गोष्टी आठवू लागतात. गावची माती आणि नाती यांची खरी गोडी तिला आपल्या कोकणातल्या या छोट्याश्या गावात लोकांना भेटून येते. गावातल्या
लोकांचे निरागस वागणे, तेवढ्याच जोरात भांडण करून पुन्हा दुसऱ्या क्षणी गोड होणे.
एकमेकांच्या सुख-दुखात सामील होणे, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधणे. खरतर राधा सोबत आपण प्रेक्षक म्हणून सुध्दा आपल्या गावच्या आठवणीत रमून जातो. ही सीरिज म्हणजे आपल्या गावाची एक सफ़र आहे.
गावची धमाल-मस्ती सोबत यातली सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू म्हणजे निसर्गरम्य
कोकण, तिकडची साधी भोळी माणसं आणि तिकडच्या भाषेचा गोडवा. गावची माती आणि
नाती यांचा एक मेळ इथे आपल्याला नव्याने अनुभवायला मिळतो. कॅफे मराठीच्या निखिल
रायबोले अणि भूपेंद्रकुमार नंदन यांची निर्मिती असून, लेखक रोहन कदम तर कथा,पटकथा आणि दिग्दर्शन सुयोग हांदे यांचे आहे आशय प्रमुख कोमल कुडाळकर आहेत.
सिरीजमध्ये राधा ही मध्यवर्ती भूमिका वैष्णवी खाडे हिने साकारली आहे तर तिच्यासोबत अस्सल कोकणचे स्थानिक कलाकार अमोल रेडीज, अमित कुबड़े, प्रितेश रहाटे, तेजस घाडीगावकर, किशोर साळुंखे , प्रितम जाधव, ओमकार गावडे, जगदीश शेलार, राजेश गोसावी, स्नेहा पांचाळ, दामिनी भिंगार्डे इ. कलाकारांच्या अभिनयामुळे सिरीजला रंगत आली आहे. गीते अनिकेत कदम यांची असून, संगीत भाग्येश पाटील यांचे आहे, कोकणच्या मातीतले लोकप्रिय गायक रत्नाकर महाकाळ बुआ यांच्या आवाजाने सिरीजला अस्सल कोकणचा गोडवा आला आहे.
येवा कोकणातल्या आठवणी पुन्हा नव्याने अनुभवायला, काय समजलिव? ही सिरीज तुम्ही
कॅफे मराठीच्या युट्यूब चॅनलवर मोफत पाहू शकता.



*लोणी येथील सुवर्णकार समाजाचा वाढदिवसातुन स्तुत्य सामाजिक उपक्रम*



(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे)

 पुणेः-     समाजात वाढदिवस साजरा करतांना विविध प्रकारचे केक,डेकोरेशन,हाॕटेल पार्टी आदी,रस्त्यावर होर्डींग,बॕनर,जाहिराती आदी  खर्च करण्यात येतो.या प्रथेच्या नाहक खर्चावर आळा कसा घालता येईल.यावर सुवर्णकार समाजातील कांही सामाजिक कार्यकर्त्यांनी मंथन करुन याबाबत  सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार केला.व त्यानुसार डिंगाबर ज्वेलर्स ,लोणी प्रवरा , ता.राहता,जि.अहमदनगर येथील श्री.अशोक मैड यांच्या  दुकानात  नुकतीच एक छोटेखानी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये  आपल्या समाजातील  वाढदिवस निमित्ताने " गोर गरीब मुलांना मदत करुन त्यांना शिक्षण  उपयोगी साहित्य देण्यात यावे".असे सर्वानुमते ठरले.यामुळे निश्चितच सुवर्णकार समाजाचे नाव सुवर्णाक्षाराने लिहिले जाईल.हा सामाजिक उपक्रम स्तुत्य असुन अशा वाढदिवस/जन्मदिनी या नाहक खर्चाचा विनियोग सामाजिक कार्यात आर्थिक,दुर्बल व्यक्ती  यांना मदतकार्य व  समाजापयोगी संस्था,संघटनाच्या माध्यमातून  कार्य करण्याचाही सर्वांनी निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी सुवर्णकार समाजातील सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय माळवे,श्री,सुनिल उदावंत यांनी मार्गदर्शन केले.या उपक्रमाची उद्देशपुर्ती म्हणुन यावेळी श्री.उदयशेठ महाले यांनी१००नग वह्या देण्याचे जाहीर केले.या बैठकीस सर्वश्री उदयशेठ महाले, राम मैड,नारायण लोळगे,विजय माळवे,रवि माळवे,श्यामशेठ बुराडे,हरिषशेठ माळवे,संतोषशेठ माळवे ,सुनिल उदावंत,अशोक मैड आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.निमंत्रित श्री .ज्ञानेश्वर साबळे यांनीही समर्थन देऊन आपले मनोगत व्यक्त केले.या सामाजिक संकल्पना उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असुन अभिनंदन होत आहे.

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...