Friday, October 14, 2022

*लोणी येथील सुवर्णकार समाजाचा वाढदिवसातुन स्तुत्य सामाजिक उपक्रम*



(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे)

 पुणेः-     समाजात वाढदिवस साजरा करतांना विविध प्रकारचे केक,डेकोरेशन,हाॕटेल पार्टी आदी,रस्त्यावर होर्डींग,बॕनर,जाहिराती आदी  खर्च करण्यात येतो.या प्रथेच्या नाहक खर्चावर आळा कसा घालता येईल.यावर सुवर्णकार समाजातील कांही सामाजिक कार्यकर्त्यांनी मंथन करुन याबाबत  सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार केला.व त्यानुसार डिंगाबर ज्वेलर्स ,लोणी प्रवरा , ता.राहता,जि.अहमदनगर येथील श्री.अशोक मैड यांच्या  दुकानात  नुकतीच एक छोटेखानी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये  आपल्या समाजातील  वाढदिवस निमित्ताने " गोर गरीब मुलांना मदत करुन त्यांना शिक्षण  उपयोगी साहित्य देण्यात यावे".असे सर्वानुमते ठरले.यामुळे निश्चितच सुवर्णकार समाजाचे नाव सुवर्णाक्षाराने लिहिले जाईल.हा सामाजिक उपक्रम स्तुत्य असुन अशा वाढदिवस/जन्मदिनी या नाहक खर्चाचा विनियोग सामाजिक कार्यात आर्थिक,दुर्बल व्यक्ती  यांना मदतकार्य व  समाजापयोगी संस्था,संघटनाच्या माध्यमातून  कार्य करण्याचाही सर्वांनी निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी सुवर्णकार समाजातील सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय माळवे,श्री,सुनिल उदावंत यांनी मार्गदर्शन केले.या उपक्रमाची उद्देशपुर्ती म्हणुन यावेळी श्री.उदयशेठ महाले यांनी१००नग वह्या देण्याचे जाहीर केले.या बैठकीस सर्वश्री उदयशेठ महाले, राम मैड,नारायण लोळगे,विजय माळवे,रवि माळवे,श्यामशेठ बुराडे,हरिषशेठ माळवे,संतोषशेठ माळवे ,सुनिल उदावंत,अशोक मैड आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.निमंत्रित श्री .ज्ञानेश्वर साबळे यांनीही समर्थन देऊन आपले मनोगत व्यक्त केले.या सामाजिक संकल्पना उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असुन अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...