Thursday, October 27, 2022

अर्चनाताई सोनार यांना 'सन्मान स्त्री शक्तीचा समाजसेविका'पुरस्कार*

*अर्चनाताई सोनार यांना 'सन्मान स्त्री शक्तीचा समाजसेविका'पुरस्कार*

(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे)
पुणेः- पिंपरी चिंचवड महानगर पालिका बहुउद्देशीय सभागृह स्व.प्रमोद महाजन हाॕल या ठिकाणी माजी नगरसेविका  योगिताताई नागरगोजे यांच्या हस्ते 'सन्मान स्त्री शक्तीचा उत्कृष्ट समाजसेविका 'पुरस्कार  योगगुरु अर्चनाताई सोनार यांना नवरात्रौत्सवाच्या आयोजित भव्य कार्यक्रमात देण्यात आला.
           स्री शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अंतर्गत सामाजिक ,शैक्षणिक ,सांस्कृतिक क्षेत्रात विविध कार्यक्रमात   फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.अर्चना ईश्वर सोनार यांचा सहभाग सातत्याने असतो.तसेच निःशुल्क योगशिक्षण देत असतात .मोफत आरोग्य शिबिर ,बालसंस्कार वर्ग आदी उपक्रमात सहभाग . त्यांच्या विविध कार्याचा आढावा घेऊन  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ.योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे यांनी  सौ.अर्चनाताई सोनार यांना "सन्मान स्त्री शक्तीचा उत्कृष्ट समाजसेविका "पुरस्कार खास महिलासाठीआयोजित नवरात्र उत्सव निमित्त महाभोंडला कार्यक्रमात सन्मानचिन्ह ,शाल,श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.या पुरस्काराबद्दल अनेक महिला,संस्था,संघटना यांनी अभिनंदन करुन कौतुक केले.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...