Saturday, March 28, 2020

मा, रावेर न्यायालयाने स्वतः पुढाकार घेऊन पोम्प्लेट सुद्धा जनजागृतीसाठी छापण्यात आले , सॅनिटायझर ने नेहमी हात स्वच्छ ठेवावे,कोरोनाचे प्रसार होणार नाही या दृष्टीने प्रत्येक नागरिकांना सहकार्याचे आवाहन

प्रेस नोट
------------
रावेर न्यायालयाचे न्यायाधीश श्री आर एल राठोड,न्यायाधीश श्री आर एम लोळगे सो यांनी प्रमुख उपस्थितीत न्यायालयाचे आवारात कोरोना या व्हायरस संदर्भात प्रादुर्भाव वाढू नये,प्रत्येकांनी  घरातच राहावे,भाजीपाला ,मेडिकल घेतांना गर्दी करू नये,भाजीपाला विक्रेते यांनी एकाच ठिकाणी दुकान न लावता दूरदूर लावावे,प्रत्येक नागरिकांनी सोशल डिस्टन्स ठेवावे,स्वच्छतेवर प्रत्येकाने लक्ष केंद्रित करावे,नाकाला मास लावावे,साबून, डेटॉल,फिनाईल,           सॅनिटायझर ने नेहमी हॅट स्वच्छ ठेवावे,कोरोनाचे प्रसार होणार नाही या दृष्टीने प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावे,मा न्यायालयाने स्वतः पुढाकार घेऊन पोम्प्लेट सुद्धा छ्यापण्यात आले आहे, नमूद मीटिंग करीता डॉ महाजन PHC रावेर,DYSP पिंगळे,पो नि रामदास वाकोडे,तहसीलदार सौ देवगुणे,CO श्री लांडे रावेर,ADV निळे, ADV सुरज चौधरी    सरकारी वकील प्रवीण वारुळे असे अधिकारी हजर होते व कोरोना व्हायरस संदर्भात जनतेत सुरक्षिततेचे दृष्टीने काळजी घेणे व उपाय योजना संदर्भात मीटिंग झाली असता यावर सर्वात महत्वाचे म्हणजे नागरिकांनी घराचे बाहेर निघू नये व स्वच्छतेवर भर देणे याचे प्रत्येकाने पालन केले पाहिजे असे आव्हाहन करण्यात आले आहे

रावेर शहरात चालू असलेली संचारबंदी(कर्फ्यु)आज दि 29/3/2020 चे वेळ 09/30वाजे ते 12/30वाजे पर्यंत मा SDM सो यांचे आदेशावरून शिथिल करण्यात येत आहे,

रावेर शहरातील सर्व नागरिकांना सूचना-
--------------------------
रावेर शहरात चालू असलेली संचारबंदी(कर्फ्यु)आज दि 29/3/2020 चे वेळ 09/30वाजे ते 12/30वाजे पर्यंत मा SDM सो यांचे आदेशावरून शिथिल करण्यात येत आहे,दररोजच्या नित्यउपयोगी वस्तूची उदा.भाजीपाला,दूध, मेडीकल,किराणा सामान खरेदी करण्याकरिता.
रावेर शहरातील शांती अबाधित राहणे करिता सर्वांनी  सहकार्य करावे.
पेट्रोल पंप बंद आहे,टू व्हीलर,फोर व्हीलर वाहतूक बंद आहे,नगर पालिकेने भाजीपाला,फ्रुट विक्री करणारे विक्रेत्यांच्या जागा आखून दिलेल्या आहेत,दूर दूर अंतर ठेवून विक्री करावी,एका जागी गर्दी होणार नाही याची प्रत्येकांनी दक्षता घ्यावी,मास लावणे अत्यावश्यक आहे.

पोलीस निरीक्षक
रावेर पोलीस स्टेशन

रावेरच्या दंगल मुळे असलेल्या संचारबंदीत 24 तासांची वाढ करण्यात आली आहे 29 मार्चच्या रात्री 11 वाजेपर्यंत संचारबंदी  वाढविण्यात आली आहे प्रांत अजित धोरबोले यांचा आदेश ,,

रावेर येथे दंगलीच्या पार्श्‍वभूमीवरलागू करण्यात आलेल्या कर्फ्यू आज पुन्हा उद्या 29 मार्च 2020 रात्री अकरा वाजेपर्यंत तर्फे संचारबंदी लावण्यात आली आहे तसे आदेश प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी दिले आहेत,,
रावेर  शहरांमध्ये कायदा-सुव्यवस्था हा व्यवस्थित  ठेवण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते दरम्यान फरार आरोपींचा कसून शोध घेतला जात असून प्रशासन रावेरमध्ये शांतता ठेवण्यासाठी कडकबंदोबस्त ठेवण्यात आला आहे मोठ्याप्रमाणावर शोध कार्य राबववण्यात येत आहे,,

Friday, March 27, 2020

वायरल मॅसेज##बँकेत जाण्यासाठी ची ही फालतू कारण,(फक्त या परिस्थितीत)

१.पासबुक भरणे
2.खात्यावर बॅलन्स किती आहे पहाणे
3.सहज अनुदान जमा झाल आहे का पहायला आलो होतो
4.स्टेटमेंट हवं आहे
5.आधार लिंक करायच आहे
6.संजय गांधी अनुदान जमा झाल आहे का पाहणे
7 माझा हप्ता कट झाला का ते पाहणे
8 चेक भरणा करायचा आहे
9 बचत गट पैसे भरायचे आहेत
10 काही नाही मित्रा सोबत बँकेत आलो आहे
11 बँकेत काय चालल आहे पाहायला आलो आहे
12.माझा हप्ता बाऊन्स झाला तर माझा सीबील खराब होईल म्हणून आलो आहे
मित्रांनो आणि सुजाण नागरिक हो बँक सध्या या कामासाठी उघडी नाही
बँक फक्त तुम्हला किराणा किंवा मेडिकल,आणि साफ सफाई साहित्य खरेदी साठी पैसे हवे असतील त्या साठी उघडी आहे.आणि खात्यावर पैसे नसतील तर बँकेत यायचा प्रश्न च नाही, सध्या आपल्या आयुष्याचा सीबील खराब हॊयची वेळ आली आहे तेव्हा घरीच रहा🙏🏻🙏🏻🙏🏻

रावेरच्या संचारबंदीत 24 तासांची वाढ करण्यात आली आहे 28 मार्च च्या रात्री 11 वाजेपर्यंत संचारबंदी  वाढविण्यात आली आहे प्रांत अजित थोरबोले यांचे आदेश

रावेर दंगल संचारबंदी कायम ठेवून 28मार्च चे रात्री 11वाजेपर्यंत वाढ केलेली आहे 

Thursday, March 26, 2020

अमरावतीचे पालकमंत्री आदेशानुसार अमरावती कारागृहात मिशनमोडवर मास्कनिर्मिती , कोरोनाच्या प्रतिबंधासाठी बंदीजनांकडून मास्कची निर्मिती

अमरावतीचे पालकमंत्री आदेशानुसार अमरावती कारागृहात मिशनमोडवर मास्कनिर्मिती

      कोरोनाच्या प्रतिबंधासाठी बंदीजनांकडून मास्कची निर्मिती  

      कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी अधिकाधिक मास्क उपलब्ध व्हावेत या हेतूने येथील जिल्हा कारागृहात बंदीजनांकडून मिशनमोडवर मास्कची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी याबाबत निर्देश दिले असून, त्यानुसार नागरिकांची गरज लक्षात घेऊन बंदीजनांकडूनही हे काम युद्धपातळीवर केले जात आहे.
      विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मास्क महत्वाचा मानला जातो. त्यामुळे सद्य:स्थितीत   नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा कारागृहातील कुशल कारागीर बंदीजनांकडून कापडी मास्क तयार करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक रमेश कांबळे यांना निर्देश दिले. कारागृह प्रशासनानेही तत्काळ पावले उचलत बंदीजनांना सद्य:स्थिती लक्षात  आणून देऊन आवाहन केले. त्यानुसार सर्वांनी कामाला गतीने सुरुवात केली आहे.

                          मास्क वारंवार वापरता येणार

          हा मास्क कापडापासून तयार होणार आहे. त्यामुळे त्याचा पुनर्वापर करता येणार आहे. अमरावती कारागृहातील बंदीजनांकडून विविध उपयुक्त वस्तू तयार करण्यात येतात. त्याच धर्तीवर बंदीजनांकडून कापडाचे मास्क तयार करण्याचे काम सुरू आहे. हे मास्क एकापेक्षा अधिक वेळ वापरता येतील. एकदा मास्क वापरल्यानंतर दुस-यांदा त्यावर सॅनिटायझर अथवा डेटॉलने धुवून निर्जंतुकीकरण केल्यानंतर पुन्हा हे मास्क वापरता येणार आहेत.
          जिल्हा मध्यवर्ती कारागृहात विविध गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेले अनेक बंदीजन कुशल कारागीर आहेत. दरवर्षी गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मातीच्या मूर्त्या, राखी, फर्निचर, कागदी पिशव्या तयार केल्या जातात.  त्यांची बाजारात विक्री केली जाते व त्याला चांगला प्रतिसादही मिळतो. कारागृहातील शेतीतही विविध प्रकारची उत्पादने घेतली जातात. आता कोरोना विषाणू संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांना उपयोगी पडणारा मास्क तयार करण्याच्या कामात अमरावती कारागृहातील बंदीजन गुंतले आहेत.

                                                000

कोरोना संसर्ग प्रतिबंध उपाययोजना नागरिकांच्या सुविधेसाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून हेल्पलाईन सुरू

अमरावती (जीमाक )   कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांबाबत आवश्यक माहिती व नागरिकांना येणा-या अडचणींचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून दूरध्वनी व व्हाटसॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. काहीही अडचण आल्यास या सुविधेचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
         कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. सुरक्षितता म्हणून संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात नागरिकांना आवश्यक माहिती व त्यांना येणा-या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
       त्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वत:च्या निवासस्थानाचा 07212665573 हा लँडलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. याच क्रमांकावर व्हाटस ॲप सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी   तीनजणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. नागरिकांनाही कुठलीही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रावेर चे टरबूज,, केळी पिकाला कोरोना च भय,,रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल याला उठाव नसल्याने शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान

टरबूज झाली खराब शेतकऱ्याचे नुकसान, 

रावेर##तरुण तडफदार टीम##रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल याला उठाव नसल्याने शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे अशाप्रकारे गावे तालुक्यात नांदूर खेड येथील जिओ महाजन यांच्या शेतात उन्हाळे टरबूज ही उठाव नसल्याने शेतातच वाढून खराब झाली आहेत त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अशाच प्रकारे शेतकऱ्यांना कोरोना व्हायरसमुळे शेतात जात येत नसल्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे केळी पिकाला सुद्धा पाणी देता येत नसल्यामुळे केळीचे बाग सुकू लागले आहेत शेतकऱ्यांचा शेतीमाल भाजीपाला विकला नाहीतर पुढे अजून अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना या वेळी पासेस देऊन त्यांना योग्य त्या प्रकारे मदत करून भाजीपाला फळ अन्नधान्याचे उत्पादन होईल याकडे शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रव्याच्या दंगलग्रस्त भागाला भेट देण्याचे यावेळी भेट दिली असता रावेरच्या पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले त्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची बोलू व त्यांच्यामार्फत अन्य मुख्यमंत्र्यांशी सुद्धा करू असे त्यांनी आश्वासन दिले त्यासंदर्भात सुद्धा हालचाली सुरू असून या कोरोनाव्हायरस मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळावी त्यांच्या शेतीचा माल योग्यप्रकारे विकला जाईल अशी व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

केंद्र सरकारने जनतेसाठी जाहीर केले पेकेजः,,

पुढील तीन महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ/गहू आणि एक किलो डाळ मोफत.
शेतकरयांना थेट ट्रान्स्फरने २०००रु
विधवा व दिव्यांगांना एक हजार रुपये विभागून दोन हप्त्यांत
रोजगार हमी योजनेच्या वेतनात वाढ
जनधन योजनेच्या अकाउंट मध्ये पुढील तीन महिन्यांसाठी पाचशे रुपये दरमहा
आशा वर्कर्स आणि मेडिकल स्टाफला पुढील तीन महिन्यांसाठी विमा कव्हर 50 लाखांचे
उज्वला गॅस योजना लाभार्थी ना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत सिलिंडर

Wednesday, March 25, 2020

रावेर शहरातील सर्व नागरिकांना सूचना- संचारबंदी(कर्फ्यु)आज दि 26/3/2020 चे वेळ 12/30वाजे ते 15/00वाजे पर्यंत मा SDM सो यांचे आदेशावरून शिथिल करण्यात येत आहे


रावेर शहरात चालू असलेली संचारबंदी(कर्फ्यु)आज दि 26/3/2020 चे वेळ 12/30वाजे ते 15/00वाजे पर्यंत मा SDM सो यांचे आदेशावरून शिथिल करण्यात येत आहे,दररोजच्या नित्यउपयोगी वस्तूची उदा.भाजीपाला,दूध, मेडीकल,किराणा सामान खरेदी करण्याकरिता.
रावेर शहरातील शांती अबाधित राहणे करिता सर्वांनी  सहकार्य करावे.
पेट्रोल पंप बंद आहे,टू व्हीलर,फोर व्हीलर वाहतूक बंद आहे

पोलीस निरीक्षक
रावेर पोलीस स्टेशन

या कठीण समयी लोकांनी गर्दी टाळण्यासाठी व व्यवसाय डबल कसा करता येईल,त्याची आयडिया

आज बरेच जण ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तू संदर्भात फिरत होते पण त्यांना केसलेस व्यवहार  प्रकरणी दुकानदार नकार देत होते,,कृपया  फोन पे गुगल पे सारखे अप डाऊन लोड करून घ्या,,कारण atm मधून सुद्धा रक्कम मिळत नाही अनेक atim बंद आहेत कृपया ग्राहकांना  सुविधा दिली तर आपले सेवा तो लक्षात घेवून आपणास पुढे व्यवसाय डबल होइल आणि आता मानवता धर्म माना ग्राहक संरक्षण कायदा तर आहेच,पण आता ती वेळ नाही ह्या संकटात आपण एकमेकांना समजून घ्या,, कोणाकडे काहीही पिसे नसले तर  त्याला माणूसकी म्हणून स्वस्त मध्ये वस्तू ध्या,, ह्या कठीण समयी जर लोकांना मदत केली तर कोण्ही ती जन्म भर विसरणार नाही,,

🔜
गर्दी टाळण्यासाठी काय करता येईल
दुकानावर गर्दी टाळण्यासाठी दुकानदार लोक आपला व्हास्ट अॅप नंबर मोबाईल वर मालाची यादी घेवून तो  समान वाटप करण्यात येवू शकतो krfu सुटण्याचे वेळी फकत सामान देवून पेमेंट घेणे  काम राहील,,काही सामान किलो अर्धा किलो वजन चा पेकिंग मध्ये तयार ठेवावे,,तसेच भीम अप गुगल पे सारखे अप ने पेमेंट स्वीकारावे म्हणजे उद्या आपणास काही पेमेंट  व्यपारी ला पाठवायचे असेल तर बेंकेत जायची गरज नाही,,आणि  त्यात रोख नोटा चलनातून काही खराब नोटा असतात त्यात मळलेली नोटा मुळे वाद होत्तात लिहलेले असते नकली नोटा ्चा धोका असतो,,,म्हणून केसलेश व्यवहार प्रकरणी दुकानदार यांनी पुढाकार घेतला पाहिजे,,सरकारने त्यासाठी आता प्रोत्साहन देणे गरजेचे आहे त्यासाठी त्यावरील चार्जेस रद्द करण्यात आले पाहिजे,, स्पिअप मशीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले पाहिजे,🙏🙏तरी आता नफेखोरी व साठेबाजी बिलकुल न करता स्वच्छ मनाने व्यवसाय डबल होईल,, कारण आता गर्दी टाळून द्रदी कसे होता येईल तेव्हा आपल्या देशात जे संकट टळो आणि पुन्हा एकदा अॅक्छे दिवस येतील,,,
प्रशांत बोरकर ग्राहक सेवा समिति
सर्व अधिकृत वेब
आप लिंक स्वतंत्रपणे दिली आहे

मूर्ख को शिक्षा नहीं भाती

मूर्ख को शिक्षा नहीं भाती
किसी पहाड़ पर बंदरों का एक झुंड रहता था । एक बार पहाडों पर काफी वर्षा और बर्फ पड़ने के कारण ठण्ड बहुत हो गई। इस ठण्ड से बचने के लिए बंदरों ने एक ऐसे फल को आग समझकर इकठ्ठा कर लिया, जिसकी शक्ल आग से मिलती थी । इस आग को सुलगाने के लिए सभी बंदर फूंक मारने लगे, बाकी के बंदर उसे आग समझ चारों ओर तापने के लिए बैठ गए । इन बंदरों को देखकर एक पक्षी बोला---
                             'अरे तुम सब पागल हो गए हो! यह अंगार नहीं, यह तो उससे मिलता-जुलता फल है । इससे भला सर्दी कहां दूर होगी! तुम लोग किसी पहाडी गुफा में छुपने की बात सोचो, क्योंकि अभी तो बर्फ और गिरेगी ।' बंदरों का सरदार बोला, "अरे तू हमें क्या बताएगा, हम सब समझते हैं ।' पक्षी ने एक बार फिर कहा, 'अरे भैया, मैं तुम्हारे ही हित की बात कह रहा हूं, तुम इस भयंकर ठंड से बचने के लिए कहीं पर भी छिप जाओ, नहीं तो मारे जाओगे ।' उस पक्षी की बात सुनकर एक बन्दर को क्रोध आ गया । उसने उस पक्षी के पर नोंचकर उसे पत्थर पर दे मारा । यह मिला उस बेचारे को  फ़ल भलाई और शिक्षा देने का । 
"मूर्ख को शिक्षा देने का कोई लाभ नहीं "
 Find at - आज जो चल रहा हे एस कथा से आपको सब याद आ गया ही होगा,,,,,, 🤣😃🤗😘🙄
 

ऑनलाइन पद्धतीने विमा लाईट बिल चे बिल लवकर वेळेवरभरावे

Join me on Google Pay, a secure app for money transfers, bills and recharges. Enter my code yt69l to earn ₹21 back on your first payment! https://g.co/payinvite/yt69l

Phone pay link
https://phon.pe/ru_PrasX3IUk

ऑनलाइन पद्धतीने विमा लाईट बिल चे बिल लवकर वेळेवरभरावे

सध्याचे वातावरण पाहता आपल्या विम्याचे हप्ते लाईट बिल आणि अत्यावश्यक अशा गोष्टी साठी वस्तू संदर्भात वेळोवेळी चक्रणा मारता एकाच वेळी ती कामे करून घ्यावी आपले विम्याचे हप्ते लाईट बील टेलीफोन बील कर्जाचे हप्ते आधी आपण ऑनलाइन सुद्धा भरू शकतो विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे,
 कोठेही गर्दी करू नये आपल्याLIC एलआयसी विम्याचे हप्ते एलआयसी च्या ॲप मधून सुद्धा आपण भरू शकतो आपल्या एलआयसीचे होते पेटीएम पे फोन गुगल प्ले मधून सुद्धा भरू शकतो त्या संदर्भात आपणास काही मदत मार्गदर्शन हवे असल्यास आम्हाला फोन करावा आपणास मोफत मार्गदर्शन केले जाईल आपले विम्याचे हप्ते वेळेवर भरावे व आपल्या संरक्षण प्राप्त करून घ्यावे व व पुढील वर्षात मिळणाऱ्या कराचा परताव्याच्या साठी योग्य नियोजन आतापासूनच करून घ्यावे🙏🙏🐢
प्रशांत बोरकर बोरकर विमासेवा केंद्र,PANCARD CREDIT CARD ZEROX AND AAL INSURANCE POLICY  SELL SERVICES
 8208361187

Tuesday, March 24, 2020

रावेरला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट व दंगलग्रस्त व कोरोना वायरस चा प्रतिबंधासाठी त्या बाबतीत घेतला आढावा

रावेरला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट व दंगल प्र्र्रकरणी वायरस चा  प्रतिबंधासाठी त्या बाबतीत घेतला आढावा घेेेेतला, संपूर्ण्ण्ण्ण्ण्ण जग करण्यासाठी लढत असताना रावेर येथे दंगल होणेे दुर्दैवी बाब आहे असे त्यांनी सांगितले तरुण तडफदार न्युज चॅनलवर पहा सविस्तर मुलाखत

रावेर चे आमदार श्री शिरिश भाई चौधरी यांनी महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना व पत्रकारांना आज मास्कवाटप

रावेर चे आमदार श्री शिरिश भाई  चौधरी यांनी महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना व पत्रकारांना आज मा स्क वाटप केले प्रतीक स्वरूपात मास्क  प्रांत श्री अजित थोरबोले यांना सुपूर्द करण्यात आले पत्रकारांंना दीपक नगरे यांचेहस्ते मा स्क वितरण करण्यात आले कोरोना व्हायरसपासून लोकांना जनजागृती सुविधा सेवाा देण्यासाठी महसूल कर्मचारी ठिकाणी फिरत असतात त्याचप्रमाणे पत्रकारही वूत्त साठी फिरत असतात म्हणून हा उपक्रम श्री शिरीष भाई चौधरी यांनी राबविला

Sunday, March 22, 2020

* *आपत्कालीन विभागात काम करणारे अधिकारी व कर्मचारी या सर्व सुपर हिरोंना मानाचा मुजरा,,,कडकडीत बंद रावेर व नाशिक शह भारतभर,बंद, टाळ्या व ताटल्या वाजून आभार व्यक्त

*कोरोना विरुद्ध हिंमतीने लढणाऱ्या सर्व डॉक्टर,नर्सिंग स्टाफ,पोलिस व होमगार्ड बांधव,अग्निशमन दलाचे अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी तसेच,* *आपत्कालीन विभागात काम करणारे अधिकारी व कर्मचारी या सर्व सुपर हिरोंना " मानाचा मुजरा ..... !!*रावेर  🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏*

Saturday, March 21, 2020

विवरे बु॥ गावात कोरोना बाबत जनजागृती व२२ मार्च रोजी जनता कर्फ्यूत सहभागी होण्याचे आवाहन


रावेर तालुक्यातील  बु॥ ग्रामस्थांना कोरोना या संसर्गजन्य रोगा ,बाबत जनजागृती करतांना व सुरक्षिततेचा उपाय म्हणून मास्क वाटप करण्यात आले. मास्क वाटप करतांना मा.सरपंच वासुदेव नरवाडे, उपसरपंच रविंद्र वासनकर, ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते, सदस्य चतुर राणे , निलिमा राणे , नुरअफजाबी पिंजारी, फातमा तडवी ,गफ्फार तडवी , आशा वर्कर सौ भारती जिरी, मोहीनी राणे,आशा तडवी , सरला खुर्दे , रोहीणी सपकाळ , सुनिता गाढे , क्लार्क सुरज नरवाडे , राहुल पाटिल यासह ग्रामस्थांनी गावातुन जागृती फेरी काढली ...

Friday, March 20, 2020

कोरोणा संदर्भात प्रशासन सज्ज #नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई- प्रांत अजित थोरबोले यांची रावेर येथे परिषद, #महत्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे,,#

कोरोणा संदर्भात प्रशासन सज्ज नियमाचे उल्लंघन केल्यास क डक कारवाई चे संकेत प्रांत अजित थोरबोले यांनीपत्रकार परिषदघेवून दिले व शासन स्तरावर होत असलेल्या तयारी ची माहिती दिली, अनेक खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते त्यात तहसील दार उषा राणी देव गुणे,नायब तहसीलदार संजय तायडे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, रावेर बिडी ओ सोनिया नाकोडे, निंभौराpsi मोरे,रावेर नपा अधिकारी, लांडे साहेब, आदी विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते,,सर्व अधिकारी यांची मीटिंग घेवून कोरोणा बद्दल घ्यावयाचा काळजी सूचना देण्यात आल्या,,, 

Thursday, March 19, 2020

श्री विजय सिंघल यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे या पदावर

*प्रत्येक_महिलेला_माहिती असावेत_हे_अधिकार.* महिलांसाठी मानव अधिकार

1)*रात्री_करू_शकत_नाहीत_अटक:-* सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सूर्यास्तानंतर महिलेला अटक करता येत नाही . अगदी महिला शिपाईही तसे करू शकत नाही . फारच गंभीर गुन्हा असल्यास न्यायालयात अटकेचे लेखी कारण द्यावे लागते . 
2) *प्रायव्हसीचा_अधिकार:-*
 रेप पीडिता खाणीत जबाब देऊ शकते . त्या वेळी मंजिस्ट्रेट सोबत असतात . पीडित लेडी कॉन्स्टेबल आणि पोलिस अधिका-यांनाही गुप्त जबाब देऊ शकते . पोलिस सर्वासमोर जवाब देण्यासाठी दबाव आणू शकत नाहीत .

 3) *कितीही_काळानंतर_देऊ_शकता_तक्रार:-* अनेक महिला समाज , कुटुंब वा इतर कारणांमुळे पोलिसांना घटनेनंतर तक्रार करत नाहीत . अशा वेळी महिला उशिरानेही तक्रार फरू शकतात . ही तक्रार नोंदवायला पोलिस नकार देऊ शकत नाहीत . महिला ईमेलच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवू शकतात.

4) *झीरो_FIR_चा_अधिकार:-* रेप पीडित महिलेला झीरो FIRचा अधिकार आहे . अशा केसमध्ये महिला कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देऊ शकते .

 5) *चौकशीसाठी_बोलवू_शकत_नाही:-* कोणत्याही महिलेला चौकशीसाठी पोलिस स्टेशनला बोलावले जाऊ शकत नाही,महिलेची चौकशी तिच्या घरीच एखाद्या महिला पोलिसाच्या उपस्थितीतच करू शकतात.

 6) *गोपनीयतेचा_अधिकार:-* रेप केसमध्ये महिलेची ओळखगोपनीय ठेवणे गरजेचे आहे पोलिस वा मीडिया कोणीही पीडितेचे नाव उजगर करू शकत नाही .

7) *गरोदर_कमर्चा_यांची_कंपनी* कामावरून हकालपट्टी करू शकत नाही.

8) *कोणत्याही_वेळी_कोणत्याही_हॉटेलमध्ये* तुम्हाला पिण्याच्या पाण्याची मागणी करता येईल . तसेच वॉशरूमचा वापरही करू शकता . तेही मोफत.

 9) *कायद्यानुसार_एखाद्या_हॉटेलमध्ये* एखाद्या अविवाहीत जोडप्याला प्रवेश नाकारण्याचा अधिकार  नाही .

10) *महिलांना_एखाद्याच्या_विरोधात* थेट पोलिस आयुक्त किंवा उपायुक्तांकडे इमेल किंवा रजिस्टर पोस्टच्या माध्यमातून तक्रार नोंदवता येते.

11) *एखाद्याला_अटक_केल्यानंतर* २४ तासांत कोर्टात हजर करावे लागते . नसता पोलिस त्याला ताब्यात ठेवू शकत नाही .

 12) *एखाद्या_विवाहीत_पुरुषाने* अविवाहीत महिलेबरोबर संबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरत नाही .

13)  *मुली_आणि_मुलांना* कायद्यानुसार समान वारस हक्क असतो .

 14) *लग्नाला_किमान_एक_वर्ष* झाल्याशिवाय एखाद्या दाम्पत्याला घटस्फोटासाठी अर्ज करता येत नाही .

15) *पोलिस_अधिका-याने* एखाद्याला अटक करताना किंवा विचारपूस करताना तो पोलिस आहे हे लक्षात येईल असे कपडे परिधान करणे किंवा ओळख  दाखवणे बंधनकारक असते . 

16) *सूर्यास्तानंतर_आणि_सूर्यास्तापूर्वी* महिलांना अटक करता येत नाही . 

17) *एखाद्या_महिलेवर_थेट* व्याभिचाराचा आरोप लावता येत नाही.

18) *सार्वजनिक_ठिकाणी* किसिंग किंवा मिठी मारणे हा  फौजदारी गुन्हा नाही . 

19) *तुमची_तक्रार_नोंदवण्यास* नकार देणा - या किंवा ' टाळाटाळ करणा या पोलिसाला 6महिने ते २वर्षाच्या तुरुंगवासापर्यंत शिक्षा होऊ शकते .

20) *विवाहित_जोडप्याला_दोन&मुले* किंवा दोन मुली ( दोन समलिंगी ) दत्तक घेता येत नाहीत . एक मुलगा आणि एक मुलगी दत्तक घेता येते .

 21) *एकटा_पुरुष_असल्यास* त्याला मुलगी दत्तक घेता येत नाही . 

 22) *एखाद्याला_अटक_झाल्यानंतर* त्याला कोणत्या 'कारणासाठी अटक झाली आहे हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार असत

23) *एखाद्याचा_रेकॉर्डेड_फोन_कॉल* न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येतो . 

24) *गुन्हा कुठेही झालेला असला* तरी एखाद्या महिलेला कोणत्याही ठिकाणच्या पोलिस ठाण्यात ' तक्रार दाखल करता येते . 

25) *पोलिस तक्रार नोंदवण्यास* नकार देऊ शकत नाहीत.

 26) *बलात्कार किंवा लैंगिक अत्याचारातील* पीडितांवर जबाब नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात जाण्याची बळजबरी करता येत नाही .

27) *बलात्काराच्या* प्रकरणामध्ये मोफत वायदेशीर मदत मिळवण्याचा अधिकार महिलेला असतो . 

28) *बलात्कार पीडितेला पोलिसांत* तक्रार न करता डॉक्टरकडे वैटाकीय तपासणीसाठी जाता येते .

 29) *बलात्कार झाला किंवा नाही* याबाबत डॉक्टरचे मत हा अंतिम पुरावा ग्राह्य धरला जात नाही .

30) *ब्रियलायझर चाचणीस नकार दिला तर* , एखाद्याला मद्यपान केल्याच्या आरोपावरून अटक करण्यासाठी पोलिसांना वॉरंटची गरज नसते . 

31)महिला आरोपीला केवळ महिला पोलिस अटक करू शकतात . तेही सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीच्या आत . 

32)एखाद्या महिलेला उलटतपासणीसाठी कोर्टात बोलावता येत नाही . त्याऐवजी घरीच तिचा जबाब  नोंदवावा लागतो .

33)कामाच्या ठिकाणी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळवण्याचा हक्क असतो

Wednesday, March 18, 2020

नुकसानग्रस्त पीकांचे सरसकट पंचनामे करा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश


  जळगाव, दि. 18 (जिमाका) - जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे तापी काठावरील गावांतील पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागास आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच त्या त्या गावांतील नुकसानग्रस्त पीकांचे सरसकट पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिले. 
  याप्रसंगी पालकमंत्र्यांसमवेत उप विभागीय अधिकारी दिपमाला चौरे, तहसीलदार वैशाली हिंगे, तालुका कृषि अधिकारी सचिन बऱ्हाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सुभाष राऊत यांचेसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, जनाआप्पा कोळी, राजेंद्र चव्हाण, भरत बोरसे, मुरलीधर पाटील यांच्यासह पं स सदस्य, विविध गांवाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 
  जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यातील पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये केळी, गहू, मका, बाजरी व भाजीपाला आदि पिकांचे नुकसान झाले असून वीजेचे खांब, तारा तसेच वृक्ष उन्मळून पडल्यामुळे आतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गुरे मेलेली आहेत. या अवकाळी पावसाचा तापी काठावरील गावांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल पालकमंत्री यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचेशी चर्चा करुन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी पंचनामे करण्याची सूचना केली होती. त्यानंतर पालकमंत्री यांनी आज सकाळीच जळगाव तालुक्यातील भोकर, भादली, नांद्रा, पिलखेड, सावखेडा, कठोरा, नंदगाव, किनोद आदि गावांना भेट देऊन या गावांतील शेतकऱ्यांची भेट घेतली तसेच त्यांचेशी चर्चा करुन नुकसान झालेल्या पीकांची पाहणी केली. व यंत्रणेला नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेशही दिले. 
  त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमध्ये वीजेचे खांब वाकले असून तारा तुटल्याने गावातील वीज पुरवठा बंद आहे. तुटलेल्या तारांची दुरुस्ती लवकरात लवकर करुन वीज पुरवठा सुरु करावा. तसेच रस्त्यांवर उन्मळून पडलेले वृक्ष बाजूला हटवून रस्ता मोकळा करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिलेत. तसेच पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आमदारांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन आपल्या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची व पिकांची माहिती घेतली. नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करुन शासनास नुकसानीचा अहवाल पाठविण्यात येईल. व जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न करु. असेही पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करतांना सांगितले व त्यांना धीर दिला. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीकांचा पीक विमा काढलेल्या आहे. अशा शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानीबाबत विहित नमुन्यातील पीक नुकसान सूचना फॉर्म पूर्ण भरुन 48 तासाच्या आत विमा कंपनीकडे अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले. 
0000

🙏,तरुण तडफदार न्युज तर्फे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे व सर्व आदेश तातडीने दिले कृषी महसूल अधिकारी पदाधिकारी यांचे व पंचनामे करणारे कर्मचारी यांचे advance धन्यवाद व अभिनंदन,,

http://taruntadafdarraver.blogspot.com/2020/03/blog-post_18.html

 शेतकऱ्यांना मधून अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई ची मागणी करण्या अगोदरच ठाकरे सरकारची दमदार कामगिरी,, नुकसाभरपाईसाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील सूचना फॉर्म भरून सादर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन,🙏🙏,तरुण तडफदार न्युज तर्फे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे व
 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे व सर्व    आदेश तातडीने दिले कृषी महसूल अधिकारी पदाधिकारी यांचे व   पंचनामे करणारे कर्मचारी यांचे advance धन्यवाद व अभिनंदन,, 
प्रशांत बोरकर, तरुण तडफदार सोशल मीडिया नेटवर्क ,मु पो ता लो रावेर🙏🙏👌,8208361187
http://taruntadafdarraver.blogspot.com/2020/03/blog-post_18.html

मागणी अगोदरच ठाकरे सरकारची दमदार कामगिरी,, नुकसाभरपाईसाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील सूचना फॉर्म भरून सादर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन


  जळगाव, दि. 18  - तरुण तडफदार न्युज मोफत मार्गदर्शन माहिती सेवा टीम,,,, ला सोशल मीडियावर मिळालेली पोस्ट शेतकरी वर्ग साठी माहिती साठी,, देत आहोत,, 
 अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे पिकाचं काढणीपश्चात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबींतर्गत गारपीट, भूसख्ख्लन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, विज कोसळून लागणारी आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे वैयक्तीक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात यावेत. 
  काढणी पश्चात नुकसान या बाबीतंर्गत ज्या पिंकाचे काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते.  अशा कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या पिकांचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत गारपीट, चक्रीवादळ व चक्रीवादळामुळे आलेल्या पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करावेत. 
  नुकसानीबाबतचा विहित नमुन्यातील पीक नुकसान सूचना फॉर्म पुर्ण भरून 48 तासांच्या आत विमा कंपनीच्या अधिकृत ई-मेल आयडी ro.mumbai@aicofindia.com, chandralantg@aicofindia.com वर पाठवावेत. अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जमा करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0000

Tuesday, March 17, 2020

दर्जीचा रोहीत काळे एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून पहीला**पीएसआय पदी 102 विद्यार्थ्यांची निवड*


जळगांव येथील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील महाराष्ट्रात अग्रगण्य *दर्जी फाऊंडेशनच्या 102 विद्यार्थ्यांची पीएसआय पदी निवड झाली आहे.* महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक कक्षाधिकारी - 2018 या परीक्षांचा निकाल आज जाहीर झाला. आयोगातर्फे जाहीर झालेल्या निकालात सहाय्यक कक्षाधिकारी पदी रोहीत मधुकर काळे व शितल विठ्ठल ऐवाळे हे यशस्वी झालेले आहेत. यातील *रोहीत काळे या विद्यार्थ्याने संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने बाजी मारलेली आहे.* तसेच  102 विद्यार्थ्यांनी पीएसआय पदी घवघवीत यश संपादन केलेले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रोशन आहिरे, महेश अंजनवाड, ज्ञानेश्‍वर आसबे, शेखर औटे, सिध्देश्‍वर अवचार, धनश्री बाजगीरे, निलेश बर्गे, पंकज बावने, राहुल बिघोत, सुनिल ब्रह्मनाथ, प्रियंका चव्हाण, संदिप चव्हाण, मनोज चव्हाण, श्रध्दा चोंधे, अमित देशमुख, सुदर्शन ढोबळे, ज्ञानेश्‍वर धुमाळ, ज्योती डोके, सुनीता घाडगे, अविनाश घोरपडे, अनंत गिरे, हर्षद इंगोले, कुणाल जाधव, योगेश जाधव, अजिंक्य जाधव, परमेश्‍वर जाधव, शशांक जाधव, विनाश जाधव, मनोज जासुद, अर्जुन कदम, विकास कदम, शरद काकळीज, गणेश काळे, विश्‍वंभर कारळे, दीपक खरात, अशोक खेडकर, ज्योती कोकणी, प्रविण काळे, संध्या कोळी, संतोष कोळी, श्रीकांत कोरेवार, मोहन कोतलवाल, दीपक कुंभार, गोविंद कुटे, सागर माने, सुजाता मनवर, प्रफुल्ल मासाळ, निशिगंधा मस्के, जीवन म्हस्के, करिष्मा मोरे, संतोष नागरगोजे, महेश निकम, नवनाथ पांढरे, पुजा पांढरे, अशोक पाटील, मंगेश पाटील, मयुर पाटील, सत्यशील पाटील, गोविंद पवार, युवराज पोमन, नागेश पुन्नावड, कल्याणी राजगुरू, रश्मिता साहू, संकेत सरवते, अक्षय शिलीमकर, गणेश शिंदे, लक्ष्मण शिंदे, सुमित सोनवणे, ऋषिकेश तळेकर, सखाहरी तायडे, निलकंठ तिळके, दिलीप वाव्हळ, आकाश व्हावळे, भारती यमगार, रुपाली सोनवणे, वर्षा शेडमे, दुर्गा खर्डे, राज डोड्यालकर, गोकुळ खैरनार, विशाल सपकाळे, मनोज तिपळे, अमित पवार, संजय सिंग, निलेश बोराडे, प्रियंका बागुल, विशाल पवार, साईनाथ नरवाडे, संगमेश्‍वर एकाडे, किरणकुमार ठोंबरे, गौरव राठोड, संतोष गुट्टे, सचिन भगत, चेतन पवार, शैलेश चौधरी, मंगेश बिडकर, प्रदिप बोर्‍हाडे हे विद्यार्थी पीएसआयपदी यशस्वी झालेले आहेत.      
या निकालाबाबत माहिती देतांना *प्रा. गोपाल दर्जी म्हणाले की, हे यशाचे गमक म्हणजे दर्जी फाऊंडेशनचे आयसीडीसीचे मॉड्युल होय. या मॉड्युलमध्ये 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांना तीन व पाच वर्षाचे पदवी या शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन दिल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने व सर्वोत्तम निकाल दर्जी फाऊंडेशनचा लागत आहे. तरी स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय करियर करु इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी समुपदेशनासाठी दर्जी फाऊंडेशन येथे संपर्क करावा, असे आवाहन प्रा. गोपाल दर्जी यांनी केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रा. गोपाल दर्जी यांच्यासह सौ. ज्योती दर्जी, श्रीराम पाटील, रविंद्र लढ्ढा तरुण तडफदार टीम चे श्री प्रशांत बोरकर शशांक बोरकर यांनी अभिनंदन केले.*

रास्तभाव दुकानातुन शिधावस्तुचे वितरण करतांना31 मार्चपर्यंत लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी करु नये


  जळगाव, दिनांक 17 (जिमाका) : जिल्ह्यात सर्वत्र परसत असलेला नवीन कोरोनाचा प्रादुर्भाव व त्यांच्या संसर्गाने बाधित होणा-या रुग्णांची संख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यविषयक आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहिर केलेली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधीत उपाययोजना यासाठी जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून दैनंदिन स्वरुपात सूचना देण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्यातही कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आजारास प्रतिबंध व निंयत्रण यासाठी तातडीच्या व आपत्कालीन उपाययोजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. यात रुग्ण शोध मोहिम, रुग्णांचे विलगीकरण व एकंदरच विषाणू प्रतिबंधात्मक या बाबींचा समावेश आहे. तसेच साथरोग अधिनियम 1987 मधील तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत. या परिस्थितीत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या आटोक्यात ठेवणे, प्रादुर्भाव राखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शासनामार्फत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.
  या पार्श्वभुमीवर कोरोना विषाणूचा प्रसार होवु नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होवु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन रास्तभाव दुकानातुन शिधावस्तुचे वितरण करतांना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणित करुन धान्य वाटपाची सुविधा या परिपत्रकाच्या दिनांकापासून ई-पॉस उपकरणावर उपलब्ध करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट / अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही व त्यामुळे विषाणूचा संसर्ग टाळता येईल. तसेच रास्तभाव दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षता देखील घेण्यात यावी. याकरिता टोकन देऊन लाभार्थ्यांना नियोजितवेळी दुकानावर येण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच धान्य घेण्यास आलेले लाभार्थी उचित अंतर ठेऊन रांगेत उभे राहतील याचाही दक्षता रास्तभाव दुकारदारांनी घ्यावी. 
  कल्याणकारी संसथांची संख्या मर्यादित असल्याने या संस्थांना गोदामातुन देण्यात येणारे धान्य वितरीत करतांना संबंधितांनी साबणाने / सॅनिटाईझरने हाज स्वच्छ करुन ई-पॉस उपकरणे हाताळण्याची काळजी घ्यावी. वरील सुविधेव्दारे लाभार्थ्यांना धान्य वाटप करतांना धान्याचा अपहार / अनियिमितता होणार नाही याची दक्षता रास्तभाव दुकानदारांनी घ्यावी. वाटप केलेल्या धान्याची जबाबदारी रास्तभाव दुकानदारावर राहील वरील सुविधा 31 मार्च, 2020 पर्यतच लागू राहील. 
  वरील वस्तुस्थिती विचारात घेता, अधिपत्याखालील रास्तभाव दुकानदारांना योग्य त्या सुचना संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी देण्यात याव्यात. तसेच कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहु नये याबाबतची दक्षता घेण्यात यावी, असे शासनाचे सहसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांची एका प्रसिध्दी पत्रकान्वये केलेले आहे.
00000

शॉपिंग मॉलमधील दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आदेश नाहीतअफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार - जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे


  जळगाव, दि. 17  (जिमाका) - कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-1897 लागु  करण्यात आला आहे. याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरीकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा सामान (Grocery) दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय (Chemist Shop) वगळून 31 मार्च, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले होते.
  परंतु या आदेशाच्या गैरअर्थ लावण्यात येऊन सोशल मिडीयावर प्रसारीत होणाऱ्या संदेशामधून जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना बंद करण्यात आल्याचे मेसेज व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 
  यानुसार सर्वांना कळविण्यात येते की, हा आदेश फक्त जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा सामान (Grocery) दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय (Chemist Shop) वगळून यांनाच लागू आहेत. सर्व शॉपिंग मॉल वगळता इतर दुकाने व आसथापना बंद करणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतेही निर्देश देण्यात आलेले नसल्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. ढाकणे  यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये म्हटले आहे.
00000

ऑनलाइन पद्धतीने विमा लाईट बिल चे बिल लवकर वेळेवरभरावे

Join me on Google Pay, a secure app for money transfers, bills and recharges. Enter my code yt69l to earn ₹21 back on your first payment! https://g.co/payinvite/yt69l

Phone pay link
https://phon.pe/ru_PrasX3IUk

ऑनलाइन पद्धतीने विमा लाईट बिल चे बिल लवकर वेळेवरभरावे

सध्याचे वातावरण पाहता आपल्या विम्याचे हप्ते लाईट बिल आणि अत्यावश्यक अशा गोष्टी साठी वस्तू संदर्भात वेळोवेळी चक्रणा मारता एकाच वेळी ती कामे करून घ्यावी आपले विम्याचे हप्ते लाईट बील टेलीफोन बील कर्जाचे हप्ते आधी आपण ऑनलाइन सुद्धा भरू शकतो विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे,
 कोठेही गर्दी करू नये आपल्याLIC एलआयसी विम्याचे हप्ते एलआयसी च्या ॲप मधून सुद्धा आपण भरू शकतो आपल्या एलआयसीचे होते पेटीएम पे फोन गुगल प्ले मधून सुद्धा भरू शकतो त्या संदर्भात आपणास काही मदत मार्गदर्शन हवे असल्यास आम्हाला फोन करावा आपणास मोफत मार्गदर्शन केले जाईल आपले विम्याचे हप्ते वेळेवर भरावे व आपल्या संरक्षण प्राप्त करून घ्यावे व व पुढील वर्षात मिळणाऱ्या कराचा परताव्याच्या साठी योग्य नियोजन आतापासूनच करून घ्यावे🙏🙏🐢
प्रशांत बोरकर बोरकर विमासेवा केंद्र,PANCARD CREDIT CARD ZEROX AND AAL INSURANCE POLICY  SELL SERVICES
 8208361187

Monday, March 16, 2020

सर्व मानवी व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहेत व त्यांना समान प्रतिष्ठा व समान आधिकार आहेत. त्यांना विचारशक्ती व सदसद्विवेकबुद्धी लाभलेली आहे व त्यांनी एकमेकांशी बंधुत्वाच्या भावनेने आचरण करावे.

मानवी हक्क च्या जागतिकघोषणापत्रातील मानवाधिकार संपादन करा
विशिष्ट मानवाधिकार [२] म्हणून मान्यता मिळालेली घोषणापत्रातील कलमे खाली उद्धृत केली आहेत.

कलम १
सर्व मानवी व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहेत व त्यांना समान प्रतिष्ठा व समान आधिकार आहेत. त्यांना विचारशक्ती व सदसद्विवेकबुद्धी लाभलेली आहे व त्यांनी एकमेकांशी बंधुत्वाच्या भावनेने आचरण करावे.
 २ 
या जाहीरनाम्यात नमूद केलेले सर्व अधिकार व सर्व प्रकारचे स्वातंत्र्य प्रत्येकास आहे व त्या बाबतीत वंश, वर्ण, स्त्री-पुरुषभेद, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मतप्रणाली, राष्ट्रीय किंवा सामाजिक मूलस्थान, संपत्ती, जन्म किंवा इतर दर्जा यासारखा कोणताही भेदभाव केला जाता कामा नये. आणखी असे की, एखादी व्यक्ती ज्या देशांची किंवा प्रदेशाची रहिवासी असेल त्या देशाच्या किंवा प्रदेशाच्या, मग तो देश किंवा प्रदेश स्वतंत्र असो, स्वायत्त्त शासन नसलेला असो किंवा कोणत्याही प्रकारच्या सार्वभौमत्वा़खाली असो, राजकीय, क्षेत्राधिकारात्मक किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कारणास्तव कोणताही भेदभाव करता कामा नये.
कलम ३ 
प्रत्येकास जगण्याचा, स्वातंत्र्य उपभोगण्याचा, सुरक्षित असण्याचा अधिकार आहे.
कलम ४ 
कोणालाही गुलामगिरीत किंवा दास्यात ठेवता कामा नये; सर्व प्रकारच्या गुलामगिरीस व गुलामांच्या व्यापारास मनाई करण्यात आली पाहिजे
कलम ५ 
कोणाचाही छळ करता कामा नये. किंवा त्यास क्रूर, अमानुष किंवा कमीपणा आणणारी वागणूक देता कामा नये.
कलम ६ 
प्रत्येकाला सर्वत्र कायद्याच्या दृष्टीने माणूस म्हणून मान्यता मिळण्याचा अधिकार आहे.
कलम ७ 
सर्व लोक कायद्याच्या दृष्टीने समान आहेत व कोणताही भेदभाव न करता कायद्याचे समान संरक्षण मिळण्याचा त्यांना हक्क आहे. या जाहीरनाम्याचे उल्लंघन करून कोणत्याही प्रकारचा भेदभाव झाल्याच्या बाबतीत व असा भेदभाव करण्यास चिथावणी देण्यात आल्याच्या बाबतीत सर्वांना समान संरक्षण मिळण्याचा हक्क आहे.
कलम ८ 
राज्यघटनेने किंवा कायद्याने दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग करणाऱ्या कृत्यांच्या बाबतीत सक्षम राष्ट्रीय अधिकरणामार्फत उपाययोजना करण्याचा प्रत्येकास अधिकार आहे.
कलम ९ 
कोणालाही स्वच्छंदतः अटक, स्थानबद्ध किंवा हद्दपार करता कामा नये.
कलम १० 
प्रत्येकाला समान भूमिकेवरुन त्याचे अधिकार व जबाबदाऱ्या निश्चित करण्याच्या संबंधात किंवा त्याच्यावरील कोणत्याही दंडनीय आरोपाचा न्यायनिर्णय करण्याच्या संबंधात स्वतंत्र व नि:पक्षपाती अधिकरणामार्फत न्याय्य व जाहीर सुनावणी केली जाण्याचा हक्क आहे.
कलम ११
दंडनीय अपराधाचा आरोप ज्यावर ठेवण्यात आला आहे अशा प्रत्येक इसमास जाहीर न्याय चौकशीत तो दोषी असल्याचे सिद्ध होईपर्यंत, तो निरपराध आहे असे गृहीत धरले जाण्याचा अधिकार आहे. अशा न्याय चौकशीत त्याच्या बचावासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची हमी त्यास देण्यात आलेली असली पाहिजे.
जे कोणतेही कृत्य किंवा वर्तन ज्या वेळी घडले त्या वेळी ते राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याने दंडनीय अपराध ठरत नसेल तर त्या कृत्याच्या किंवा वर्तनाच्या संबंधात कोणालाही कोणत्याही दंडनीय अपराधाचा दोषी म्हणून समजता कामा नये. त्याचप्रमाणे दंडनीय अपराध घडला असेल त्यावेळी जी शिक्षा करण्याजोगी असेल त्या शिक्षेपेक्षा अधिक कडक शिक्षा त्यास देता कामा नये.
कलम १२ 
कोणाचेही खाजगी जीवन, त्याचे कुटुंब, घर अथवा त्याचा पत्रव्यवहार यांच्या संबंधात स्वच्छंद ढवळाढवळ होता कामा नये; त्याचप्रमाणे त्याची प्रतिष्ठा किंवा नावलौकिक यावर हल्ला होता कामा नये. अशी ढवळाढवळ किंवा हल्ला झाल्यास त्याविरुद्ध प्रत्येकास कायद्याने संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे.
कलम १३ 
प्रत्येकास प्रत्येक राष्ट्राच्या हद्दीत संचार व वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे.
प्रत्येकास स्वतःचा देश धरुन कोणताही देश सोडून जाण्याचा अथवा स्वतःच्या देशात परत येण्याचा अधिकार आहे.
कलम १४ 
प्रत्येकास छळापासून मुक्तता करून घेण्यासाठी इतर देशात आश्रय मिळवण्याचा व तो उपभोगण्याचा अधिकार आहे.
अराजकीय स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या संबंधात अथवा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या उद्दिष्टांशी व तत्त्वांशी विरुद्ध असलेल्या कृत्यांच्या संबंधात वस्तुतः उद्भवलेल्या खटल्यांच्या बाबतीत प्रस्तुत अधिकाराचा आश्रय घेता येणार नाही.
कलम १५ 
प्रत्येकांस राष्ट्रीयत्व मिळण्याचा अधिकार आहे.
कोणाचेही राष्ट्रीयत्व स्वच्छंदतः हिरावून घेतले जाता कामा नये, तसेच कोणासही आपले राष्ट्रीयत्व बदलण्याचा अधिकार नाकारता कामा नये.
कलम १६ 
वयात आलेल्या पुरुषांना व स्त्रियांना वंश, राष्ट्रीयत्व, अथवा धर्म यांचे कोणतेही बंधन न ठेवता विवाह करण्याचा व कौटुंबिक जीवन जगण्याचा अधिकार आहे. विवाहाच्या संबंधात वैवाहिक जीवन चालू असताना आणि विवाह-विच्छेदनाच्या वेळी त्यांना समान अधिकार मिळण्याचा हक्क आहे.
नियोजित जोडीदारांनी स्वेच्छेने व पूर्ण संमती दिली असेल तरच विवाह करावा.
कुटुंब हे समाजाचा एक स्वाभाविक व मूलभूत घटक आहे व त्यास समाजाकडून आणि शासनाकडून संरक्षण मिळण्याचा हक्क आहे.
कलम १७ 
प्रत्येकास एकट्याच्या नावावर तसेच इतरांबरोबर मालमत्ता धारण करण्याचा अधिकार आहे.
कोणाचीही मालमत्ता स्वच्छंदतः हिरावून घेतली जाता कामा नये.
कलम १८ 
प्रत्येकास विचारस्वातंत्र्य, आपल्या सदसद्विवेकबुद्धीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य, धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. या अधिकारांत स्वतःचा धर्म अथवा श्रद्धा बदलण्याच्या स्वातंत्र्याचा आणि एकट्याने वा इतरांसह सामुदायिकरीत्या आपला धर्म अथवा श्रद्धा, शिकवणुकीत, व्यवहारात, उपासनेत व आचरणात जाहीर रितीने अथवा खाजगी रितीने व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो.
कलम १९ 
प्रत्येकास मतस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ न होता मत बाळगण्याच्या स्वातंत्र्याचा , तसेच कोणत्याही माध्यमातून व सीमांचा विचार न करता माहिती व विचार ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे, ती मिळवणे व इतरांना ती देणे यासंबधीच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो.
कलम २० 
प्रत्येकास शांततापूर्ण सभास्वातंत्र्य व संघटना असण्याचा अधिकार आहे.
कोणावरही कोणत्याही संघटनेचा सभासद होण्याची सक्ती असता कामा नये.
कलम २१ 
प्रत्येकास आपण स्वतः अथवा आपल्या इच्छेनुरूप निवडलेल्या आपल्या प्रतिनिधीमार्फत आपल्या देशाच्या शासनात भाग घेण्याचा अधिकार आहे.
प्रत्येकास आपल्या देशाच्या शासकीय सेवेत प्रवेश मिळण्याचा समान अधिकार आहे.
जनतेची इच्छा ही शासकीय प्राधिकाराचा पाया असली पाहिजे. जनतेची इच्छा नियतकालिक व खर्याखुऱ्या निवडणुकांद्वारे व्यक्त झाली पाहिजे व या निवडणुका गुप्त मतदानपद्धतीने अथवा त्यासारख्या निर्बंधरहित पद्धतीने घेतल्या पाहिजेत.
कलम २२ 
प्रत्येकास समाजाचा एक घटक या नात्याने सामाजिक सुरक्षितता प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे आणि राष्ट्रीय प्रयत्न व आंतरराष्ट्रीय सहकार्य यांच्या द्वारे व प्रत्येक राष्ट्राच्या व्यवस्थेनुसार व साधनसंपत्तीनुसार आपल्या प्रतिष्ठेस व आपल्या व्यक्तीमत्वाच्या मुक्त विकासासाठी अनिवार्य असलेले आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार संपादन करण्याचा हक्क आहे.
कलम २३ 
प्रत्येकास काम मिळण्याचा, आपल्या इच्छेनुरूप काम निवडण्याचा, कामाच्या न्याय्य व अनुकूल शर्तींचा फायदा मिळवण्याचा व बेकारीपासून संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे.
कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता प्रत्येकास समान कामाबद्दल समान वेतन मिळण्याचा अधिकार आहे.
काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस स्वतःला व आपल्या कुटुंबाला मानवी प्रतिष्ठेस साजेसे जीवन जगता येईल असे न्याय्य व योग्य पारिश्रमिक व जरूर लागल्यास त्याशिवाय सामाजिक संरक्षणाची इतर साधने मिळण्याचा अधिकार आहे.
प्रत्येकास आपल्या हितसंबंधांच्या संरक्षणार्थ संघ स्थापण्याचा व त्याचा सदस्य होण्याचा अधिकार आहे.
कलम २४ 
वाजवी मर्यादा असलेले कामाचे तास व ठरावीक मुदतीने पगारी सुट्ट्या धरून प्रत्येकास विश्रांती व आराम मिळण्याचा अधिकार आहे.
कलम २५ 
प्रत्येकास स्वतःचे व आपल्या कुटुंबीयांचे आरोग्य व स्वास्थ्य यांच्या दृष्टीने समुचित राहणीमान राखण्याचा अधिकार आहे.यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय मदत व आवश्यक सामाजिक सोई या गोष्टींचा अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणे बेकारी, आजारपण, अपंगता, वैधव्य किंवा वार्धक्य यामुळे किंवा त्याच्या आवाक्याबाहेरील परिस्थितीमुळे उदरनिर्वाहाचे दुसरे साधन उपलब्ध नसल्यास सुरक्षितता मिळण्याचा अधिकार आहे.
माता व मुले यांना विशेष देखरेख व मदत मिळण्याचा हक्क आहे; सर्व मुलांना, मग ती औरस असोत किंवा अनौरस, सारखेच सामाजिक संरक्षण मिळाले पाहिजे.
कलम २६ 
प्रत्येकास शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. निदान प्राथमिक व मूलावस्थेतील शिक्षण मोफत असले पाहिजे, माध्यमिक शिक्षण सक्तीचे असले पाहिजे. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देण्यात आले पाहिजे आणि गुणवत्तेप्रमाणे, उच्चशिक्षण सर्वांना सारखेच उपलब्ध असले पाहिजे.
ज्यायोगे मानवी व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास साधेल व मानवी अधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्य याविषयीची आदरभावना दृढ होईल अशी शिक्षणाची दिशा असली पाहिजे. तसेच शिक्षणाने सर्व राष्ट्रांमध्ये आणि वांशिक किंवा धार्मिक गटांमध्ये सलोखा, सहिष्णुता व मैत्री वृद्धिंगत झाली पाहिजे. शिवाय त्यायोगे शांतता राखण्यासंबंधीच्या संयुक्त राष्ट्रांच्या कार्यास चालना मिळाली पाहिजे.
आपल्या पाल्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण देण्यात यावे हे ठरविण्याचा अधिकार पालकांना आहे.
कलम २७ 
प्रत्येकास समाजातील सांस्कृतिक जीवनात मोकळेपणाने भाग घेण्याचा, कलांचा आनंद उपभोगण्याचा आणि वैज्ञानिक प्रगती व तिच्यापासून मिळणारे फायदे यांत सहभागी होण्याचा अधिकार आहे.
आपण निर्माण केलेल्या कोणत्याही वैज्ञानिक, साहित्यिक किंवा कलात्मक कृतीपासून निष्पन्न होणाऱ्या नैतिक व भौतिक हितसंबंधांना संरक्षण मिळण्याचा प्रत्येकास अधिकार आहे.
कलम २८ 
ह्या जाहीरनाम्यात ग्रथित केलेले अधिकार व स्वातंत्र्य पूर्णपणे साध्य करता येतील अशा सामाजिक व आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा प्रत्येकास हक्क आहे.
कलम २९ 
समाजामध्येच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास पूर्णपणे व निर्वेधपणे करता येत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची समाजाप्रत काही कर्तव्ये असतात.
आपले अधिकार व स्वातंत्र्य यांचा उपभोग घेताना इतरांचे अधिकार व स्वातंत्र्य यास योग्य मान्यता मिळावी व त्याचा योग्य तो आदर राखला जावा आणि लोकशाही समाज-व्यवस्थेत नीतिमत्ता, सार्वजनिक सुव्यवस्था व सर्वसाधारण लोकांचे कल्याण यासंबंधातील न्याय्य अशा आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या जाव्यात या आणि केवळ याच कारणासाठी कायद्याने ज्या मर्यादा घालून दिल्या असतील त्याच मर्यादांच्या आधीन प्रत्येक व्यक्तीस रहावे लागेल.
संयुक्त राष्ट्रांचे उद्देश व तत्त्वे यांच्याशी विरोधी ठरेल अशा रितीने ह्या अधिकारांचा व स्वातंत्र्याचा कोणत्याही स्थितीत वापर करता कामा नये.
कलम ३० 
ह्या जाहीरनाम्यात ग्रथित केलेल्या अधिकारांपकी कोणतेही अधिकार व स्वातंत्र्ये नष्ट करण्याच्या उद्देशाने कोणतीही हालचाल किंवा कोणतेही कृत्य करण्याचा अधिकार कोणत्याही राष्ट्रास, गटास किंवा व्यक्तीस आहे असे ध्वनित होईल अशा रितीने ह्या जाहीरनाम्यातील कोणत्याही मजकुराचा अर्थ लावता कामा नये.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीखाजगी क्लासेस, ट्युशन्स, अभ्यासिका 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश



  जळगाव, दि. 16  (जिमाका) - राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-1897 दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागु करून खंड 2 ते 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. 
  याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरीकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा सामान (Grocery) दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय (Chemist Shop) वगळून 31 मार्च, 2020 पर्यंत साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार बंद ठेवण्याचे आदेश असून त्याचबरोबर जिल्हयात सुरु असलेले सर्व खाजगी क्लासेस, टयुशन्स, अभ्यासिका पुढील आदेश होईपर्यत दिनांक 31 मार्च, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ अविनाश ढाकणे यांनी दिले आहे. 
या आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेकडून उल्लंघन/अवज्ञा केल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येऊन पुढील कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. ढाकणे  यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
0000

बहुजन क्रांती मोर्चा तर्फे NRC, CAA, EVM, NPR च्या विरोधात रावेर तहसिल कार्यालयावर रॅली प्रदर्शन



रावेर दि.16 (तरुण तडफदार प्रतिनिधी) येथे बहुजन क्रांती मोर्चा रावेर युनिट तर्फे रावेर तहसील कार्यालयावर NRC, CAA, EVM, NPR च्या विरोधात तहसील स्तरीय रॅली प्रदर्शन आज दि.१६/०३/२०२० सोमवार रोजी ठीक सकाळी 11 वाजेला बहुजन क्रांती मोर्चा रावेर तालुका संयोजक मा. नितीन गाढे सर यांचे नेतृत्वामध्ये करण्यात आले OBC प्रवर्गातील जनतेची जाती निहाय जनगणना झालीच पाहिजे, NRC हटाव देश बचाव, CAA हटाव देश बचाव, EVM हटाव देश बचाव, संविधान बचाव देश बचाव, गैर साविधानिक NPR बंद करो, व इतर घोषणा रॅली प्रदर्शन करत असताना देण्यात आल्या रेली मध्ये प्रामुख्याने कामगार नेते दिलीप कांबळे, साहेबराव वानखेडे, सुधीर सैंगमिरे, रविंद्र इंगळे, मुस्लीम पंच कमिटीचे शेख गयास शेख, रशीद युसुफ खान, इब्राहीम खान, शेख इरफान शेख कुतुबुद्दीन, नगरसेवक शेख सादिक,शेख नजीर शेख बशीर, जमायते इस्लामी हिंद चे शफ़िउद्दीन शेख कासम, प्रदीप सपकाळे, निसार खान, शेख मंजूर शेख कादर, अब्दुल रफ़िक़ व शेकडो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी होते रॅली संपन्न झाल्यावर एन.पी.आर.बॉयकॉट म्हणुन 26 मार्च रोजी भारत बंदची घोषणा करण्यात आली.तहसिल कार्यालया समोर घोषणा देऊन तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.  

          या वेळी रावेर पोलिस स्टेशनचे  पी.आय. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Sunday, March 15, 2020

वायरल msej ##विप्रोत ३ टक्के म्हणजेच ५ हजार कोटींचे शेअर्स अमळनेर गावचे आहेत*✍🙏


महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात गुंठा गुंठा जमिन विकून किलोने सोने करणारे मंत्री आहेत. तर दूसऱ्या कोपऱ्यात शे-दोनशे रुपयांसाठी आत्महत्या करणारे शेतकरी आहेत.संपुर्ण महाराष्ट्रात अस चित्र असताना महाराष्ट्रात काही अशी गावे आहेत ज्या गावांचा विकास एकत्रित असण्याने झाला. सामाजिक, राजकिय बाबतीत हिवरे बजार, राळेगणसिद्धी, पाटोदा अशी गावांची यादी आहे तर उद्योगिक क्रांन्तीमुळे विकास झालेली वालचंदनगर, किर्लोस्करवाडी अशी गावे आहेत.
अशाच यादीत वरचा नंबर लागतो तो अमळनेर गावाचा. अमळनेर जळगाव जिल्ह्यातलं गाव. या गावचं वैशिष्ट म्हणजे गावातले बहुतांश लोक आज कोट्याधीश आहेत.
रस्त्यांवरून चालत जाणारा एखादा साधा माणूस देखील तब्बल पाच, दहा कोटींचा मालक आहे. ते विप्रो सारख्या बलाढ्य कंपनीत समभागधारक आहे. गावाचं सांगायचं झालं तर,संपुर्ण गावात मिळून कंपनीच्या एकूण शेअर्सपैकी तीन टक्के शेअर्स आहेत व याची आजची मार्केट प्राईज ४,८०० कोटींहून अधिक आहे.
पण या गोष्टीची सुरवात झाली ती खूप खूप वर्षांपुर्वी.
अजिम प्रमेजी यांचे वडिल मोहम्मद हुसेन हाशन प्रेमजी हे बर्माचे प्रिन्स ऑफ राईस म्हणून ओळखले जात.  त्यानंतर प्रेमजी कुटूंब गुजरातच्या कच्छला आले. मात्र इंग्रजांच्या व्यापारी धोरणांना कंटाळून त्यांनी वनस्पती तूप अर्थात डालडा तयार करण्यास सुरवात केली.
२९ डिसेंबर १९५४ साली वेस्टर्न इंडिया वेजिटेबल प्रोडक्टस् लिमिडेट या कपंनीची स्थापना करण्यात आली. आज आयटी क्षेत्रात बाप असणाऱ्या कंपनीची सुरवात डालडा कंपनी म्हणून झाली होती.
जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर परिसरात भूईमुगाच्या शेंगाच उत्पादन होत असल्याने या कंपनीचा प्लॅन्ट इथे टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. डालड्याचे उत्पादन वाढू लागले, आणि कंपनी भारतातल्या नामांकित कंपन्यामध्ये गणली जावू लागली.
भारताची फाळणी झाली तेव्हा हा मोठ्ठा उद्योगपती पाकिस्तानात यावा म्हणून मोहम्मद अली जिना यांनी जोरदार प्रयत्न केले. त्यांना पाकिस्तानचे अर्थमंत्रीपद देखील देवू केले. मात्र मोहम्मद प्रेमजी पाकिस्तानात गेले नाहीत. 
त्यानंतरच्या काळावधीत म्हणजे ६०-७० च्या दशकात अमळनेर गावातील अनेक लोकं कंपनीत कामगार म्हणून लागले. कंपनी तेल आणि साबणाचे उत्पादन करु लागली होती. विप्रोच्या शेअर्सची किंमत तेव्हा १०० रुपये होती. शंभर रुपये देखील सर्वसामान्य गोष्ट नव्हती. मात्र गावात एक चर्चा सुरू झाली, ती म्हणजे कंपनी फायद्यात आहे शेअर्स घेवू.
अस सांगतात की प्रेमजींनी देखील त्या काळात शेअर्स घ्यावेत म्हणून चांगल मार्केटिंग केलं होतं. दरवर्षी शेअर्सच्या किंमतीवर चांगला लाभांक्ष देण्यात येत होता. कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येकानेच शेअर्स घेतले.
लोक म्हणत की,
पोरगी जन्मली तर तिच्या नावाने शेअर्स घ्या तिचं लग्न होईल.
१९८० च्या सुमारास एका व्यक्तीने २ लाख रुपयांचे शेअर्स विकत घेतले होते. आज त्यांची किंमत ४० कोटींच्या दरम्यान आहे. ते सांगतात की या शेअर्सच्या फक्त लाभांक्षातून मी माझ्या मुलीचं लग्न आणि मुलाचं शिक्षण करु शकलो.
सुरवातीला १०० रुपयांना असणारे हे शेअर्स एकाने घेतल्याने दूसऱ्याने घेतले आणि दूसऱ्याने घेतल्याने तिसऱ्याने घेतले. असं करत करत गावातील अनेकांकडे कंपनीचे शेअर्स आले.
काही लोकांना हे ही माहिती नव्हतं की त्यांच्या नावाने कंपनीत शेअर्स आहेत. वडिलांच्या पश्चात आपलं कंपनीच्या शेअर्सहोल्डरमध्ये आलेलं नाव पाहून आपण कोट्याधीश असल्याचं या मुलांना कळालं. पण याचा फायदा असा झाला की, या मुलांना गुंतवणूकीची भाषा कळली त्यामुळे शेअर्स विकून पैसा करण्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही.
११ ऑगस्ट १९६६ चा कंपनीला कलाटणी देणारा दिवस. 
मोहम्मद प्रेमजी हे काळाच्या पुढे जाणारे व्यक्ती होते. अजीम प्रेमजी या त्यांच्या मुलाचं वय तेव्हा फक्त २१ वर्ष होतं. तो स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकायचा. त्या दिवशी टॅंन्ककॉलच्या जमान्यात त्यांच्या आईने त्यांना फोन करुन वडिल वारल्याची बातमी दिली. सर्वकाही सोडून २१ वर्षाच्या या मुलाला कंपनीचा कारभार हाती घ्यावा लागला.
२१ व्या वर्षी कंपनी हातात घेतल्यानंतर अजिम प्रेमजी यांनी कंपनीला जागतिक स्तरावर घेवून जाण्याचा प्रयत्न चालू केला. भारतातील लालफितशाही कारभाराला कंटाळून IBM कंपनीने भारतातून काढता पाय घेतला.
याच क्षणाचा पुरेपुर फायदा घेवून प्रेमजी यांनी पर्सनल कॉम्प्युटरच्या क्षेत्रात पाय रोवला.
वेस्टर्न इंडिया वेजिटेबल प्रॉडक्ट लिमेटेड या नावातून वेजिटेबल हटवण्यात आलं. कंपनी आत्ता इतर गोष्टींचे प्रॉडक्शन करु लागली. त्यानंतर वेस्टर्नचा W आणि प्रोडक्ट पासून प्रो करण्यात आलं. अशा प्रकारे कंपनीचं नाव विप्रो झालं.
आज आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून विप्रोचं नाव घेण्यात येतं. २००२ साली न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीची लिस्टिंग झाली. अनेक प्रोडक्ट कंपनीमार्फत करण्यात येतात आणि या सर्वात महाराष्ट्राचं एक गाव ३ टक्यांच मालक असतं✍🙏

महत्वाची सूचना----------------------कोरोना व्हायरस संदर्भात कोणीही व्हाट्सएप,फेसबुक, ट्विटर,एस एम एस,द्वारे कोणीही नागरिकांमध्ये भीती उत्पन्न होईल असे चुकीचे कमेंट,अफवा पसरवू नये जर कोणी अफवा पसरविली तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम-54 अनव्ये गुन्हा दाखल करून सक्त कारवाई करण्यात येईल,याची प्रत्येकांनी नोंद घेणे.रामदास वाकोडेपोलीस निरीक्षक रावेर पोलीस स्टेशन

महत्वाची सूचना
----------------------
कोरोना व्हायरस संदर्भात कोणीही व्हाट्सएप,फेसबुक, ट्विटर,एस एम एस,द्वारे कोणीही  नागरिकांमध्ये भीती उत्पन्न होईल असे चुकीचे कमेंट,अफवा पसरवू नये जर कोणी अफवा पसरविली तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम-54 अनव्ये गुन्हा दाखल करून सक्त कारवाई करण्यात येईल,याची प्रत्येकांनी नोंद घेणे.
रामदास वाकोडे
पोलीस निरीक्षक 
रावेर पोलीस स्टेशन

जागतिक ग्राहक दिनजागतिक ग्राहक दिन १५ मार्च


आज जागतिक ग्राहक दिन है। ग्राहकों के बारे में बोलना तो आज हर तरफ ग्राहक एवम राजा ऐसी संकल्पना और उनका ही बोल बाला नजर आता है। ग्राहक और विक्रेता इन का संबंध हर दिन जाता जाता है। जैसे कि सुबह उठने के बाद जो जो चीज लगती है, और सोने तक जो जो चीज लगती है। वह हमें हर दिन या महीने में एक दो बार उसे परचेस करना होता है। ग्राहक तो वैसी संकल्पना बहुत पुरानी है। ग्राहकों के हित के बारे में हमारे भारतवर्ष में राजीव गांधी पंतप्रधान थे तब उन्होंने सन 1986 उन्होंने कानून बनाते समय हर वक्त ग्राहकों के बारे में सोचा था। और उन्हीं की सोच के बदौलत हर चीज को ग्राहक कानून में उन्होंने रख दिया था। सन 1986 के बाद ग्राहकों के लिए एक नया हक़ पैदा हुआ था। उसके पहले भारतवर्ष में कोई ऐसा काम नहीं था। जहां कोई दुकानदार, बेचने वाला ग्राहकों का कुछ गलत फायदा उठा था। मैं। आज बताऊंगा पहले कस्टमर को कोई भी सुरक्षा नहीं थी। लेकिन यह ग्राहक कानून का बील आने के बाद ग्राहकों के हित में ग्राहक न्यायालय में तीन-तीन जज की नियुक्ति हुई। जब कोई कस्टमर के  के साथ कोई गलत व्यवहार होता है। तो ग्राहक न्यायालय में तथा कंज्यूमर फोरम में अपील करने का रास्ता मुहैया कराया गया। इसके बाद भारतवर्ष में किसी कस्टमर का गलत फायदा उठाया जा रहा हो तभी सभी लोग ग्राहक न्यायालय में अपील दायर करने का मौका मिला। मैं आज आपको गैस सिलेंडर और पेट्रोल के बारे में कुछ जानकारी दे रहा हूं। जैसे कि हमें मालूम नहीं होता। हमारे घर में गैस होता है। और गैस में और गैस के साथ काम करते समय अगर हम खाना परोस रहे हैं। खाना पका रहे हैं । और कुछ कंपनी की गलती की वजह से हमारे घर में या गैस के वजह से कोई एक्सीडेंट होता है। तो हमें गैस सिलेंडर कंपनी के तरफ से इंश्योरेंस कव्हर दिया जाता है। इंश्योरेंस के बारे में कस्टमर को मालूम नहीं होता। उसका भी इंश्योरेंस कराया गया होता है। सिलेंडर की रिफिल हमें हमारे घर तक डिलीवरी करके देना यह गैस के एजेंसी का काम है। और यह हर ग्राहकों का हक है। इस बात की मालूमात किसी को नहीं होती। जैसे कि दवाइयां और फूड मे उनकी एक्सपायरी डेट रहती है। वैसे ही गैस की अंतिम तिथि होती है। और जैसे कि hp  हाइड्रो प्रेशर टेस्ट होता है। ऐसा हमने सुना था और इसके बारे मे लोगोंको में मालूम नहीं होता। लेकिन आज जागतिक ग्राहक दिन है। इस के दिन के बदौलत हमें यह हमारा हक जानने का अधिकार है। और मैं इस बारे में आपको ऐसा बताता हूं और बताने जा रहा हूं। सिलेंडर का हमें डिलीवरी लेते समय वेट करना जरूरी है। उसका वजन करना जरुरी है। सिलेंडर का वजन करके देना और वजन करके लेना यह हमारा हक है। जैसे कि कोई भी डिलीवरी बॉय अपने घर तक डिलीवरी देने आता है। तब उसके साथ वजन काटा रहना कम्पल्सरी है। नियम से बंधन है। और नियम के तहत कोई भी एजेंसी ऑफिस में या उनके गोडाउन में भी वेट का कांटा तथा वजन का कांटा रखना जरुरी है। और वजन का काटे का हर साल उसे रेनू करना होता है। और घर में जो सिलेंडर होता है उसका वजन 14 किलो रहता है। और खाली सिलेंडर का वजन 15 से 16 किलो के दरमियान होता है। जब भी हम सिलेंडर की डिलीवरी लेते हैं उस समय उसका वजन 29 किलो के ऊपर होता है। और इसके बारे में हमें जागरुक 
रहना चाहिए कि उसका हम हर समय डिलीवरी लेंगे तब वेट करना ही होता है। और जब भी हम नुकसान की बात करते हैं। अगर किसी के घर में सिलेंडर से आग लगती है। कुछ नुकसान होता है। उसकी 40 से 50 लाख तक हमें रिकवरी  मिल सकती है। और जैसे कि कोई बीमा कंपनी से 40 या 50 लाखों पर की रिकवरी इंश्योरेंस से होती है। हमें मालूम ही नहीं होता। और ऐसी जानकारी देने में कोई दिलचस्पी नहीं रखता था। लेकिन मैंने आज जागतिक ग्राहक दिन के समौके पर आपको इसकी इंफॉर्मेशन दी है। और हर सिलेंडर तथा गैस का पुनर्भरण होता है।  और उस की तिथि तथा डेट मौजूद होते हैं । गैस सिलेंडर के ऊपर जो रिंग रहता है। उसे स्टील की मिट्टी से जुड़ा हुआ रहता है। उनमें से एक पट्टी के अंदर के बारे में सिलेंडर की एक्सपायरी डेट लिखी होती है। और साल के अंत तिमाही alphabetically last December दिसंबर के बाद इसे हम यूज नहीं कर सकते और जब भी हम इसे लेते वक्त यह बात जरूर देखनी चाहिए। हमें मालूम होनी चाहिए यहीं दूसरी बात हमारा रोज संबंद है। पेट्रोल  के बारे में अगर हम पूरी तरह से ध्यान दें तो पेट्रोल भरने से पहले अगर हम पेट्रोल पंप के ऊपर जो मीटर लगा रहता है। वहां का जीरो अखडा देखकर उसकी उस की तसल्ली कर सकते हैं। और हर पेट्रोल पंप के ऊपर एक नोटबुक रहता है।हम कम्पलेट कर सकते हैं। और वह कंप्लेंट रजिस्टर के नाम से जाना जाता है। और हर पेट्रोल पंप के ऊपर महिला एवं old, नागरिक, पत्रकार, पुलिस इनके लिए प्रधान्य क्रम दिया जाता है। और हर पेट्रोल पंप में free air देना बंधन कारक है। लेकिन हमें कोई भी पेट्रोल पंप में हवा भरने के लिए सुविधा मुहैया किया नहीं जाता।  जब पी छुट्टे पैसे हमारे पास नहीं होते तो उनसे हम हक से मांग सकते हैं। हमारा छोटा पैसा और दूसरी एक महत्वपूर्ण बात में आपको बताने जा रहा हूं। जैसे कि कोई भी ड्राइवर हो या गाड़ी का मालिक अगर एक खबर हम लेते हैं। अगर हम कोई भी पेट्रोल पंप पर जाते हैं। तो मीटर रीडिंग के ऊपर राउंड फिगर के लिए हम अप्लाई करेंगे मतलब एग्जांपल के तौर पर 205 ऐसे कम पेट्रोल अगर डालेंगे गाड़ी में तो हमे लूट आ जा सकता है। और यही जानकारी बहुत लोगों के रहती है। लेकिन अगर हम पेट्रोल पंप के फीलिंग ऑपरेटर को बता दे कि हमें और फिगर का पेट्रोल भरना है। जैसे कि ₹130 ₹170 ₹70 या ₹210 ऐसा पेट्रोल फील करने के लिए हम से कहेंगे तो हमें पेट्रोल पंप का कोई भी कर्मचारी फंसा नहीं सकता। तो हमें हर पेट्रोल पंप पर जाते समय सतर्क रहना चाहिए। और कभी भी एक ही पेट्रोल पंप पर पेट्रोल या डीजल हमेशा के लिए नहीं भरना चाहिए। अलग अलग पेट्रोल पंप से पेट्रोल भरेंगे तो हमें पेट्रोल की क्वालिटी और कांटेटी  इसके बारे में हम उसे जान सकते हैं। और हमें तसल्ली हो सकती है।  कि हम जो सर्विस ले रहे हो अच्छी है ना क्वालिटी में टाइट है। तो हम कस्टमर कंप्लेंट रजिस्टर में हमारा कंमप्लेट कर सकते हैं। या ऑनलाइन तेल कंपनियों को मेल कर सकते हैं। लेकिन जब तक आपकी कंपनी सामने होती रिसोल नहीं होती। आपके कंप्लीट के ऊपर कोई सलूशन नहीं निकलता तब तक उस पेट्रोल पंप के मालिक को कोई भी टैंकर तथा पेट्रोल डीजल प्लांट नहीं की जाती। तो यह बात ध्यान में रखिए अगर कोई भी पेट्रोल पंप हो या क्या उसके बारे में कोई भी दुर्घटना हो तो तुरंत टोल फ्री नंबर पर कॉल करके उंहें इन्फॉर्म करना चाहिए। और हमें भी हर समय ध्यान रखें काम करना चाहिए। तो आइए हम इस जागतिक ग्राहक दिन के इस विशेष दिन में सब को यह जानकारी देकर राष्ट्र हित में एक कदम आगे आए। 
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

कोरोणा बदल अधिकृत माहिती शासनाकडून देण्यात येणार ,अफवा विरूद्ध कडक कारवाई केली जाईल ,प्रांत अजिंत थोरबोले

रावेर,,कोरोणा बदल अधिकृत माहिती शासनाकडून देण्यात येणार ,अफवा विरूद्ध कडक कारवाई केली जाईल ,असे फेजपुरप्रांत अजिंत थोरबोले , यांनी तरुण तडफदार बोलताना सांगितले
कोरोणा बदल अधिकृत माहिती शासनाकडून देण्यात येणार ,अफवा विरूद्ध कडक कारवाई केली जाईल ,प्रांत अजिंत थोरबोले यांनी सांगितले,तसेच  कोणीही यासद्रभात अफवा माहिती देवू नये तसा कायदा मंजूर झाला असल्याचे त्यांनी सांगितले

विदेश जाने से पहले देनी होगी सूचना


एलआईसी की पॉलिसी लेने से पहले अगर नए ग्राहक आने वाले छह महीने के भीतर विदेश जाने की योजना बना रहे हैं तो उसकी भी पूरी जानकारी देनी होगी। इसके लिए भी अलग से फॉर्म भरना होगा। जिसमें जानकारी देनी होगी कि आप कौन से देश जा रहे हैं, कब और कितने दिन के लिए जाएंगे।

आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रितम शिरतुरे यांचा रावेर तालुका बौध्द समाजातर्फे सत्कार



रावेर दि. १५ (प्रतिनिंधी) साकरी ता. भुसावळ येथे कार्यरत असलेले व रावेर येथील रहिवाशी ग्रामविकास अधिकारी आयु. प्रितम रघुनाथ शिरतुरे यांना महाराष्ट्र शासना तर्फे दि. १२ मार्च रोजी मुंबई येथे मा. राज्यपाल भरतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत ग्रामीण विकास मंत्री मा.ना. हसन मुश्रीफ व ग्रामीण विकास राज्यमंत्री मा.ना. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आदर्श ग्राम विकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल आज रोजी रावेर तालुका बौध्द समाज्याच्या वतिने येथील फुले शाहु आंबेडकर वाचनालयात त्यांचा बुध्द आणि त्याचा धम्म हा ग्रंथ,शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
 या प्रसंगी भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे, मा. नगरसेवक अॅड. योगेश गजरे, सामाजिक कार्यकर्ते महेश तायडे व प्रदिप सपकाळे यांनी मनोगत व्यक्त करून आयुष्यमान प्रितम शिरतुरे यांच्या कार्याचा गौरव केला. सत्कार समारंभास भारतीय बौध्द महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, नगरसेवक जगदीश घेटे, भारतीय बौध्द महासभा जिल्हा संघटक विजय अवसरमल,अॅड. सुभाष धुंदले, अॅड. दिपक एच. गाढे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष सावन मेढे, सचिव संघरक्षक तायडे, कोषाध्यक्ष धनराज घेटे, सामाजिक कार्यकर्ते महेश तायडे, दिलीप साबळे, पंकज वाघ, समता सैनिक दलाचे बाळु रजाने, सामाजिक कार्यकर्ते महेश लोखंडे,प्रा. मोहन लहासे, राहुल डी. गाढे, भास्कर वाघ, नितीन तायडे, राहुल राणे, निलेश तायडे, सिताराम वानखेडे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.                

     कार्यक्रमाचे सुत्रसंलाचल संघरत्न दामोदरे यांनी केले तर आभार प्रदर्शन फुले,शाहु,आंबेडकर वाचलनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी केले.

Friday, March 13, 2020

करोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे - जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

जळगाव, दि. 11 (जिमाका) - सद्यस्थितीत जगातील बहुतांश देशांमध्ये करोना विषाणूचे रूग्ण आढळून येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आतापर्यंत एकूण 93 हजार 90 करोना रुग्ण आढळले असून त्यापैकी 3 हजार 198 लोक मुत्युमुखी पडले आहेत. करोना विषाणूची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडीत असून त्यामध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास, निमोनिया, ताप इत्यादि आहेत. करोना विषाणुचा प्रसार हा प्रामुख्याने हवेद्वारे त्याचप्रमाणे शिंकणे, खोकलणे, हस्तांदोलन इत्यादि कारणांमुळे होतो.
 करोना आजाराचे अनुषंगाने 50 वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर व किडनीचे रुग्णांनी विशेष काळजी आणि दक्षता घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून वेळोवेळी व जेवणापूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, शिंकताना, खोकतांना नाकावर व तोंडावर रुमाल धरावा तसेच हस्तांदोलन टाळावे. चेहरा, नाक व डोळ्यांना वारंवार हाताने स्पर्श करू नये, अर्धवट शिजवलेले तसेच कच्चे मांस खाऊ नये त्याचप्रमाणे आवश्यकता नसतांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
 शासनाच्या निर्देशानुसार करोना आजाराची व्याप्ती वाढू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणावरील सर्व गर्दीचे कार्यक्रम नागरिकांनी टाळावेत. करोना विषाणू हा आजार संसर्गजन्य असल्याने कार्यक्रमाचे आयोजकांनी गर्दीच्या/सार्वजनिक ठिकाणावरील कार्यक्रमांचे उदा. यात्रा, जत्रा, मेळावे, परिषदा, गर्दीचे कार्यक्रम, शाळा/महाविद्यालयातील स्नेहसंमेलने, प्रदर्शने, धार्मिक कार्यक्रम, पर्यटन स्थळे व सार्वजनिक उत्सव इत्यादि प्रसंगी योग्य ती काळजी /दक्षता घेण्यात यावी. असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0000

कोणत्या पत्रकाराने घेतली😰 कोरोणा पेशंट ची मुलाखत ,वायरल मॅसेज ला जोरदार उत्तर

👉👉🔜सध्या कोरोना वायरस लागण झालेल्या पेशंटला कोणता पत्रकार भेटायला गेला यासंबंधी एक पोस्ट काही लोक व्हायरल करीत आहेत खरतर पत्रकार हा सर्व ठिकाणी धावून जात असतो जनतेच्या प्रश्नासंदर्भात नेहमी आपला जीव धोक्यात घालून बातम्या देत असतो कुठेही रोगराई महामारी युद्ध दंगल असो किंवा कुठलाही प्रसंग असो पत्रकार त्या प्रसंगानुसार ठिकाणी त्या दुर्घटनेच्या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून जात असतो त्या तपश्चर्येचा त्याला लाखो पत्रकारांना कवडी मात्र लाभ मिळत नाही लाखू पत्रकार केवळ आपला भागाचा विकास व्हावा या ध्याने पत्रकारिता करीत असतात व त्या पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या भागातील प्रश्नांची सोडवणूक करीत असतात परंतु काही तथाकथित समाजसेवक नेतेमंडळी हे आपल्या फोकस भाजी साठी पत्रकारांचा वापर करून घेतात परंतु पत्रकारांच्या सुखदुःखात कधीही सहभागी होत नाही पत्रकारांच्या घरी कधी भेटली की नाही पहा त्याचे घरावर पत्र आहे त्याचे घर पडके आहे,त्याला तुमच्या हक्कसाठी जनतेचा अधिकारी पदाधिकारी यांच्या रोषाला बळी जावे लागतं,कोणत्या सुविधा मिळत नाही विनाकारण जीव धोक्यात घालून वाईट पना घ्यावा लागतो मिळत मात्र लाभ काही नाही,,, पत्रकाराच्या घरचे कुटुंब तुपाची आहे की उपाशी  आहे ते परिवार किती त्याग करतात जनतेच्या हितासाठी पत्रकारांबरोबर पत्रकारांच्या कुटुंबीयांना सुद्धा हाल-अपेष्टा धमक या संकटांना सामना करावा लागतो तेव्हा किती लोक त्यांना साथ देतात करुणा संदर्भात असलेल्या मेसेज म्हणजे माणुसकीशून्य असताना मेसेज आहे असा मेसेज तयार करणारा दिवाळखोरी मेंदूची झालेली आहे हेच म्हणावे लागेल हा मेसेज फॉरवर्ड करून काही लोक माणुसकीला सुद्धा काळिमा फासत आहेत पत्रकारांच्या हितासाठी सरकार काय आमदार खासदार मंत्री काय कोणीही लक्ष द्यायला तयार नाही त्यांना कुठलेही मानधन मिळत नाही कुठल्याही पगार पेन्शन मिळत नाही कुठलाही मान मिळत नाही तरीसुद्धा पत्रकार आपला निष्ठेने आणि सचोटीने काम करीत असतात मेसेज करू बसणाऱ्या लोकांनी पत्रकारांसाठी विधायक काम त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था या संस्थाचालकांनी पत्रकारांसाठी फी माफी तसेच त्याला जाहिराती मानधन म्हणून मदत करू शकता, टीव्ही वाहिन्यांवरील पत्रकार करोडो चे पॅकेज डील करीत असले  सामान्य पत्रकार म्हणून त्याला मोबाईल चां रिचार्ज चे बिल सुद्धा मिळत नाही,लाखो पत्रकार हे सैनिका प्रमाणे आमदार खासदार मंत्री यांचे पेक्षा जास्त काम करतात ते आदेश सेवक आहेत परंतु पत्रकारांच्या हितासाठी बत्यांचा सामाजिक शोषणा विरूद्ध  कोण आवाज उठविनार आहे,, माणूसकी बरोबर जगण्याचा हक्क पण पत्रकारांना आहे की नाही,,,,विचार करा, ,फेक मॅसेज, टवाळी करणारे मॅसेज पाठविताना ते विकार निर्माण करतील याची काळजी घ्यावी👉👉🎯🎯🤏🙉🙊🙈
पत्रकार म्हणून जनतेसाठी  जगणारा एक माणूस👉🎯
प्रशांत बोरकर ,मुक्त पत्रकार ,तरुण तडफदार समाज माध्यम टीम🙏🙏 8208361187

Thursday, March 12, 2020

मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा*महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोनाच्या 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत**नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*


मुंबई, दि. 12 : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 11 झाली असून या सर्व रुग्णांमध्ये लक्षणे कमी प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्वाचे आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या 7 देशांमधून प्रवास केलेल्यांना क्वॉरंटाईन करण्यात यावे. राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत. जे परदेशातून प्रवास करुन आले आहे त्यांनी 14 दिवसांपर्यंत घरीच थांबावे. आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरण आणि क्वॉरंटाईनची सुविधा तातडीने निर्माण करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध व्हावेत याचा आढावा घ्यावा. प्रत्येक शहरातील टुर ऑपरेटर्सनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.
कोरोनाबाबतचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी यावेळी उपस्थित होते.

*विषाणूची उत्पत्ती स्थानिक नाही*

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळले मात्र त्यांच्यात आढळून आलेली नाही. त्यामुळे या विषाणूची तीव्रता कमी झाली असेल तर समाधानाची बाब आहे. मात्र या विषाणूची उत्पत्ती स्थानिक नाही. परदेशी गेलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून त्याचा फैलाव झाला आहे. कालपासून राज्यात तपासणी अधिक तीव्र करण्यात आली असून विविध देशांच्या दुतावासांशी देखील चर्चा केली जात आहे.

*नागरिकांनी घाबरुन तपासणीसाठी रांगा लावू नये*

जी मुख्य शहरे आहे तेथील टुर ऑपरेटर्सनी शहरातील परदेशी गेलेल्या पर्यटकांची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली पाहिजे. जे पर्यटक परतणार आहे त्यांनी स्वत:हून घरीच 15 दिवस स्वतंत्र रहावे. कुटुंबात अथवा समाजात मिसळू नये असा संदेश द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत म्हणून नागरिकांनी घाबरुन तपासणीसाठी रांगा लावू नये. अधिकची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

राज्यस्तरावर याबाबत दर दोन तासांनी आढावा घेत असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, चाचणी करण्याची सुविधा केंद्र शासनाच्या मान्यतेने केली जाते. त्यामुळे केंद्र शासनाने परवानगी दिल्यानंतर प्रयोगशाळेला मंजुरी दिली जाईल. पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणे येथे गर्दी नियंत्रण करताना व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी. कोरोनाचे संकट उंबरठ्यापर्यंत आले आहे मात्र त्याला आत येऊ न देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

*सात देशातून आलेल्या प्रवाशांना 100 टक्के क्वॉरंटाईन करावे*

प्रशासनाला निर्देश देताना मुख्य सचिव म्हणाले, चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशातून 15 फेब्रुवारीनंतर ज्यांनी प्रवास केला आहे आणि ते देशात परतले आहे त्यांना सक्तीने 15 दिवस घरीच स्वतंत्र राहण्याच्या सूचना द्याव्यात. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या सात देशातून आलेल्या व येणाऱ्या प्रवाशांचे 100 टक्के क्वॉरंटाईन करण्यात यावे. पुणे, मुंबई, नागपूर येथे कशाप्रकारची क्वॉरंटाईन सुविधा केली आहे याची माहिती महापालिका आयुक्तांनी तातडीने द्यावी. अन्य शहराच्या महापालिका आयुक्तांनी देखील अशाप्रकारची माहिती उद्यापर्यंत देण्याबाबत मुख्य सचिवांनी सांगितले.

*शासकीय कार्यक्रम रद्द करा*

यात्रा, सामूदायिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करा. लोकांना प्रशिक्षित करा. कोरोनाच्या संशयित रुग्णांची ओळख, त्यांचे विलगीकरण या बाबींवर भर द्यावा. शहरातील पर्यटन कंपन्यांना पुढील काही दिवस बुकींग न करण्याच्या सूचना द्या. सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक जागा येथे स्वच्छता ठेवा. जे या सूचनांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करा.

*प्रत्येक गावासाठी एसओपी तयार करा*

बाधित रुग्ण आढळल्यास त्यांच्या प्रवासाची माहिती, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती याबाबत विचारपूस करण्यासाठी पथके तयार करा. प्रत्येक गावासाठी एसओपी तयार करा. पुढील किमान 15 ते 20 दिवस शहरांमधील धार्मिक कार्यक्रम, यात्रा रद्द करण्याबाबत विविध संस्थांना विनंती करा, अशा सूचना मुख्य सचिवांनी यावेळी केल्या.

*प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरु करावा*

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास यावेळी म्हणाले, केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार 7 देशातील जे प्रवाशी उद्यापासून परतण्यास सुरुवात होणार आहे त्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यवस्था करावी. परदेशातून प्रवास करुन आलेले व ज्यांना लागण झाली अशा प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या निकटवर्तीयांची तपासणी केली जाईल. या निकटवर्तीयांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:च घरी विलग राहावे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष सुरु करावा. सर्वसामान्य नागरिकाला तातडीने चाचणी करण्याची आवश्यकता नाही. ज्या रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले परंतु त्यांच्यात लक्षणे आढळून आली नाही त्यांना रुग्णालयात क्वॉरंटाईन करावे. क्वॉरंटाईनची सुविधा ही रुग्णालयापासून दूर करावी. विलगीकरणाची सुविधा मात्र रुग्णालयात असावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान यावेळी औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर, कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांनी विभागात सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत तसेच क्वॉरंटाईन  आणि विलगीकरणासाठी राखीव केलेल्या जागांबाबत माहिती दिली.

अजय जाधव/विसंअ/12.3.2020

Wednesday, March 11, 2020

चोपडा तहसीलदार कार्यालयावर लालबावटा शेतमजूर युनियनचां मोर्चा* २०मार्च दिल्लीला देशव्यापी धरणे सहभागाचे आवाहन .

चोपडा ( तरुण तडफदार टीम).तालुका लाल बावटा शेतमजूर युनियन तर्फे बस स्टॅन्ड आयटक ऑफिस जवळून बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे आझाद चौक बोहरा गल्ली वरून तहसीलदार कार्यालयावर शेतमजूर आदिवासींचां धडक मोर्चा देण्यात आला.. मोर्चात निर्धन आदिवासी दलित भटके-विमुक्त निर्धन जनतेला  त्रासदायक एन आर सी कायदा रद्द करा.. शेतमजुरांना दोन रुपये किलोने 35 किलो धान्य द्या.. रोख सबसिडी नको.. तालुक्यातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड वाटप करा ..त्यांना काम द्या शेतमजुरांना आदिवासींना राहत्या घराची जागा नावे करून घरकुल द्या ..ड यादीतील लोकांना घरकुले द्या.. शेतमजुरांचे थकीत कर्ज माफ करा.. बचत गटाला दहा लाख रुपये मुद्रा योजनेखाली कर्ज मिळावे.. तसेच  मोहीदा आदिवासी भिल्ल वस्तीत रस्ता गटार दिवाबत्ती ची सोय करा आदी मागण्यांसाठी घोषणा देत  तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चात  मोहीदा वढोदा.. अजनतीसिम ..नागलवाडी..आडगाव.. नारद.. खरद.. लासूर कुर्वेल शेवरे बुद्रुक.. उमर्टी.. भा येतील शेतमजूर सहभागी होते  मोर्चाचे नेतृत्व शेतमजूर नेते अमृत महाजन.. वासुदेव कोळी ..वना माळी.. हिराबाई सोनवणे.. रेखाबाई भालेराव  भागवत पाटील.. प्रकाश बुवा ..रतिलाल भिल..  पर्वताबाई बाविस्कर.. आदिनी केले ..तहसीलदार गावित यांनी ट् तयानचेशी चर्चा करून कार्यवाहीचे आश्वासन दिले..मोर्चासाठी हिराबाई सोंवने संजुबाई पाटील आबा भील शिवाजी पाटील गोपाळ भील छोटू कोळी लताबाई सोनवणे राजेंद्र पारधी नवाब तडवी प्रकाश बुवा संदीप कोळी सूर्भान बारेला प्रेमसिंग बारेला आदींनी परिश्रम घेतले.. *येत्या २० मार्च रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय खेत्मजदुर युनियन तर्फे देशव्यापी धरणे साठी शेत्ममजुरांनी भुसावळ रेल्वे स्टेशनवर जमावे असे आवाहन कॉम्रेड महाजन यांनी केले* ...

Tuesday, March 10, 2020

महिलांना आता एक नवी संधी,शाईन मिसेस महाराष्ट्र २०२० ची विजेती सारिका कदम, पहिली उपविजेती शीतल खोकाणी, दुसरी उपविजेती मंजुश्री सुतार ,

 मुंबई (तरुण तडफदार टीम)
ती फक्त घरात काम करते, तिला बाहेरच्या जगात काय चाललंय हे कुठे ठाऊक असतं... अशीच विधानं आपण आपल्या बायकोबद्दल, बहिणीबद्दल आणि वहिनीबद्दल करत असतो. परंतु हे सर्व प्रामाणिकपणे करत असताना आपल्या उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेव्हा ती उंबरठ्याबाहेर पाऊल टाकते तेव्हा तिची क्षमता आपल्या लक्षात येते. 
अशाच हरहुन्नरी विवाहित महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विनोद शिंदे यांनी आपल्या क्लॅप क्रिएशन्स संस्थेतर्फे "शाईन मिसेस महाराष्ट्र २०२०" या अनोख्या स्पर्धेचे आयोजन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आले होते. नुकताच याचा अंतिम सोहळा मुंबईत अभिनेत्री निशा परुळेकर, सिया पाटील आणि अभिनेते विजय कदम यांच्या उपस्थितीत हॉटेल कोहिनूर पार्क, प्रभादेवी येथे पार पडला.
संपूर्ण महाराष्ट्रातुन आलेल्या शेकडो विवाहित महिला स्पर्धकांमधून अंतिम फेरीत १५ महिलांची निवड करण्यात आली. या महिलांसाठी मुंबईत दोन दिवस इमेज कन्सलटिंग, लाईफ स्टाईल, रॅम्प वॉक, डाएट आणि स्कीन केअर आणि मेकअप टूटोरिअल इ. गोष्टींचे ग्रूमिंग सेशन घेण्यात आले. या स्पर्धेत विजेती ठरली सारिका कदम, पहिली उपविजेती शीतल खोकाणी आणि दुसरी उपविजेती ठरली मंजुश्री सुतार. 
या स्पर्धेसाठी रोसी बोन्स, अंजली नन्नाजकर आणि राखी सोनार यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले होते. प्रत्येक महिलेच्या अंगी वेगळा असा गुण असतो फक्त घर सांभाळण्यात तो गुण किंवा तो छंद हरवून जातो, या स्पर्धेमुळे तो त्यांना जोपासता यावा,जगासमोर आणता यावा यासाठी आम्ही हा पहिला प्रयत्न केला आणि यापुढे अशी स्पर्धा महाराष्ट्रात प्रत्येक शहरात घडवण्याचा आमचा मानस असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष विनोद शिंदे यांनी व्यक्त केले.

सरस्वती विद्या मंदिर चे संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान मुंबई आयोजित नैतिक शिक्षण योजना परीक्षेत घवघवित यश*

*
या संस्थे मार्फत नैतिक शिक्षण योजना गेल्या 16 वर्षांपासून सुरु आहे. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच उत्तम संस्काराची सुद्धा आवश्यकता आहे. रामायण, महाभारत, क्रांतिकारक  यांच्या कथेच्या आधारे हे साध्य होऊ शकते .मुंबई, पुणे, जळगाव, नागपूर, केरळ, गुजरात,इंग्लंड, अमेरिका सर्व दूर या योजनेचा विस्तार झाला आहे.2019/2020मध्ये महाराष्ट्रातील 700 शाळेतील विद्यार्थी या योजनेत सहभागी झाले होते. त्यात आपली शाळा सुद्धा सहभागी होते.शालेतिल सर्व सहभागी विद्यार्थी दरवर्षी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होवून प्रमाणपत्र मिळवितात. यावर्षी इयत्ता 8 वी तील *भुनेश गणेश पाटील या विद्यार्थ्यांचा रावेर तालुक्यात प्रथम क्रमांक आला आहे*. इयत्ता 8 वी साठी क्रांतिगाथा हा विषय होता. त्याला *राजकुमार जैन  (मुख्याध्यापक)वर्गशिक्षक, इतर विषय शिक्षकांचे* मार्गदर्शन लाभले.सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
💐🏆💐🏆💐🏆💐🏆💐

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...