Thursday, March 5, 2020

जळगाव जिल्ह्यातील 1 लाख 127 शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीआधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण -जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे•



  जळगाव, (जिमाका) दि. 4 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करतांना काही तांत्रिक अडचणी येत आहे. त्या सर्व संबंधित बँकांनी तातडीने सोडवाव्यात व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा. अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिल्यात. 
  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपनिबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वय अरुण प्रकाश, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी प्रमोद बोरोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे व राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
  यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेकरीता 1 लाख 43 हजार 832 शेतकरी पात्र ठरले आहे. यापैकी 1 लाख 127 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण झाले असून 43705 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यापैकी 1833 शेतकऱ्यांचे आधारक्रमांक व इतर तांत्रिक बाबींमुळे प्रमाणीकरण होण्यात अडचणी येत नसल्याने या तक्रारी जिल्हा समन्वय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. यावर तातडीने उपाययोजना करुन हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याकरीता संबंधित बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांचे आधार व इतर माहिती दररोज सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. माहिती सादर कताना संबंधित शेतकऱ्याचा विशेष क्रमांकही सादर करावा. जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणेने घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. 
0000

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...