Thursday, March 5, 2020

दीन विशेष♻१० पैकी आठ जणांना दातांचे आजार

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
🌞 शुभ प्रभात 🌞
🌹 शुभ दिन शुक्रवार 🌹
🌺 दंतवैद्य दिवस 🌺
🌷 गायिका देवकी पंडीत ज.दिन 🌷
🌸 चरित्रकार,संपादक शि.ल.करंदीकर ज.दिन 🌸
🌻 इटालियन शिल्पकार,चित्रकार मायकेल अँजेलो ज.दिन 🌻
💐 कादंबरीकार रणजित देसाई स्मृतिदिन 💐
💐 गुलाबराव महाराज पुण्यतिथी 💐
0⃣6⃣—0⃣3⃣—2⃣0⃣2⃣0⃣
♻♻♻♻♻♻♻♻♻♻♻♻♻
१० पैकी आठ जणांना दातांचे आजार
जागतिक पातळीवर सर्वसाधारणपणे ८० ते ९० टक्के लोकांमध्ये प्रामुख्याने दंतक्षय किंवा हिरड्यांचे आजार आढळून येतात. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. राज्यात सरासरी १० पैकी आठ जणांमध्ये दात किंवा हिरड्यांशी संब‌धित आजार आढळून येतात. पण याची वेळीच काळजी घेतली तर मुखरोगांना आळा घालता येतो, असे दातांचे डॉक्टर सांगतात.  
जागतिक पातळीवर सर्वसाधारणपणे ८० ते ९० टक्के लोकांमध्ये प्रामुख्याने दंतक्षय किंवा हिरड्यांचे आजार आढळून येतात. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. राज्यात सरासरी १० पैकी आठ जणांमध्ये दात किंवा हिरड्यांशी संब‌धित आजार आढळून येतात. पण याची वेळीच काळजी घेतली तर मुखरोगांना आळा घालता येतो, असे दातांचे डॉक्टर सांगतात.

जीवनशैलीचा परिणाम
इंडिया डेंटल असोसिएशनने मध्यंतरी देशपातळीवर दातांच्या आरोग्याबाबत सर्वेक्षण केले होते. त्यात १५ वर्षांच्या खालील ७० टक्के मुलांमध्ये हिरड्यांच्या समस्या आढळून आल्या. जंक फूड, शीतपेय, ब्रश न करण्याच्या सवयी व वेगवान जीवनशैलीमुळे दातांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे आढळून आल्याचे वाशीच्या फोर्टिस रुग्णालयाचे दंतवैद्य डॉ. अजय माथुर सांगतात.

यंदा ‘हेल्दी माऊथ-हेल्दी लाइफ’ या मध्यवर्ती संकल्पनेवर हा दिवस साजरा करण्यात आला.

जगाच्या तुलनेत भारताचा विचार केल्यास देशात ६० ते ७० टक्के लोक ग्रामीण भागात राहातात. तेथे तोंडाच्या आरोग्याविषयी फार जागरूकता नाही. त्यामुळे ग्रामीण भागात हिरड्यांचे विकार प्रामुख्याने आढळतात. शहरी भागात तुलनेत मौखिक आरोग्याबाबत जागरूकता असली तरी फास्टफूड, पिझ्झा बर्गर, चॉकलेट पेस्ट्रिज अशांमुळे दंतक्षयाचे प्रमाण अधिक आढळते.

निगा राखा

> जागतिक पातळीवर ७० ते ९० टक्के लोकांमध्ये दंतक्षय
> राज्यात १०पैकी आठ जणांमध्ये विकार
> ग्रामीण भागात हिरड्यांचे विकार अधिक
> ग्रामीण भागात गुटखा, पान तंबाखूमुळे धोका
> शहरात फास्ट फूड-चॉकलेटमुळे दातांना त्रास
> दंतक्षय व हिरड्यांची वेळीच काळजी घ्या
> गोड खाद्यपदार्थ टाळा
> गुटखा, तंबाखू,धूम्रपान वर्ज्य करा
> दिवसातून किमान दोनवेळा ब्रश करा
> दातांची नियमित तपासणी करा

राज्यातील गुटखा, पानमसाले, सुपारीवरील बंदीमुळे तोंडाच्या आरोग्याच्या तक्रारी नक्कीच कमी होतील. लोकांनीही दात व हिरड्यांची काळजी घेण्याची गरज आहे. दंतक्षय व हिरड्यांच्या विकारांना वेळीच प्रतिबंध करण्याची गरज आहे.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...