Wednesday, March 4, 2020

कर्जमुक्तीच्या तक्रारींसाठी दुरध्वनी व संकेतस्थळ उपलब्ध


 जळगाव, (जिमाका) दि. 4 - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 ची अंमलबजावणी सुरू असून सद्य:स्थितीमध्ये शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण होत नाही अथवा कर्जरक्कम व इतर तपशील चुकीचा आलेला आहे. त्यांचेबाबतीत पोर्टलवर ऑनलाईन तक्रार तयार होवून संबंधित तालुका तहसील कार्यालयात अथवा जिल्हास्तरीय समितीकडे वर्ग होत आहेत.
 असे असूनही ज्या शेतकऱ्यांच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 बाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक-3 पहिला मजला, आकाशवाणीजवळ, जळगाव या कार्यालयाशी प्रत्यक्ष किंवा कार्यालयाच्या 0257-2239729 या दुरध्वनी क्रमांवर तसेच karjmukti.jalgaon@gmail.com या कार्यालयीन संकेत स्थळावर तक्रार करावी. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव श्री. मेघराज राठोड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...