दि.5 रोजी मुक्ताईनगर तालुक्यात शेतकर्यांकडून प्रत्यक्षात नाफेड मार्फत तुर खरेदीला सुरुवात करण्यात आली. मुक्ताईनगर तालुका खरेदी विक्री संघ ली. मुक्ताईनगर येथे नाफेड अंतर्गत तुर खरेदी केंद्राचे उद्घाटन मा.आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांचे हस्ते करण्यात येणार होते., परंतु मा.भाऊ अधिवेशना निमित्ताने मुंबईला असल्याने मा.सौ.यामीनीताई चंद्रकांत पाटील यांचे हस्ते मोजणी काट्याचे पुजन करून तुर खरेदीला सुरूवात करण्यात आली. शेतकरी प्रल्हाद परशुराम राणे यांची पहीली तुर यावेळी मा.सौ.यामिनीताई चंद्रकांत पाटील याचे हस्ते मोजणी करुन खरेदी करण्यात आली. तसेच अनेक शेतकर्यांची नोंदणी यावेळी करण्यात आली. शासनाने प्रतिक्विंटल रु. 5,800 एवढा भाव निश्चित केला असून मुक्ताईनगर तालुका खरेदी विक्री संघ मुक्ताईनगर येथे तुर खरेदीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा मार्केटिंग अधिकारी परिनल साळुंके, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, संचालक विलास धायडे, शिवसेना तालुका प्रमुख छोटु भोई, शिवसेना महिला जिल्हा संघटीका कल्पना पालवे, नगरसेविका सविता भलभले, शिवसेना तालुका महिला संघटीका शोभा कोळी, अनंतराव देशमुख, स्विय्य सहाय्यक संतोष कोळी, शेतकी संघाचे सभापती प्रभाकर झोपे, दशरथ कांडेलकर, संचालक शांताराम गव्हाळ, मार्केट कमिटी संचालक कैलास पाटील, संघाचे मॅनेजर रतिराम सपकाळे, चंद्रकांत मराठे यांचेसह इतर कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपादक के बोल
मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय
—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...
-
येवला येथे पेठणी लोकप्रिय असले तरी तेथील माणसे ही तेवढीच आपुलकीने वागनारी आहेत. आमचे येवला येथे येणे जाणे झाले आम्हाला घ्यायला मनमाड स्टेशन ...
-
🌱🌱🌱जनहितार्थ प्रसिध्द* ✅ *मूलभूत अधिकार* मूलभूत अधिकार व्यक्तीला मूलभूत अधिकार असतात आणि ते अबाधित राखण्याची जबाबदारी शासनावर असते, हा वि...
-
..... आज अनेक जण राहतात मुंबईत पण त्यासाठी चा लढा पर्श्यभुमी लक्षात घेतली पाहिजे..आता आता आले मुंबईत म्हणून काही मुबईंमोठी झाली...
No comments:
Post a Comment