Saturday, March 7, 2020

बार्टी पुणे, महिला आर्थीक विकास महामंडळ वIDBIबॅंक तर्फे "जागतिक महिला दिनानिमित्त रावेर तालुकास्तरीय कार्यशाळा"संपन्न,

रावेर (तरुण तडफदार न्युज टीम )
"महिला सुरक्षितता व सन्मान" या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन मा. प्रज्ञा वाघमारे मॅडम (मुख्य प्रकल्प संचालीका, समतादूत प्रकल्प बार्टी, पुणे.), मा. यादव गायकवाड सर (मुख्य निबंधक, बार्टी), मा. दिलावर सय्यद सर (बार्टी), यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभरात जागतिक महिला दिनानिमित्त पुर्ण मार्च महिनाअखेर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

आज दिनांक ०७/०२/२०२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, महिला आर्थीक विकास महामंडळ व आय.डी.बी.आय बॅंक तर्फे ८ मार्च रोजी "जागतिक महिला दिनानिमित्त तालुकास्तरीय कार्यशाळा" आयोजित करण्यात आलेली होती. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश  व विषय "जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना सुरक्षितता, सन्मान व आर्थीक विकास" या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रम झाला
प्रथमतः कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचा स्वागत-सत्कार करण्यात आले तद्नंतर रावेर तालुका समतादूत मा. युनुस तडवी सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेबद्दल माहिती देऊन संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या महिला संबंधित विविध योजनांची माहिती दिली.  कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जळगाव तालुका समतादूत मा. चंद्रकांत इंगळे सर यांनी "महिला सुरक्षितता व महिला विषयक कायदे या विषयावर सखोल मार्गदर्शन व प्रबोधन केले, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महिला आर्थिक महामंडळ चे रावेर तालुका अध्यक्ष मा. मिना तडवी मॅडम यांनी महिलांनी आर्थीक सक्षम व्हावे याविषयी माहिती दिली व कार्यक्रमाचे अध्यक्ष आय.डी.बी.आय बॅंक चे शाखा व्यवस्थापक मा.प्रेमकुमार सर यांनी महिलांनी आर्थीक व्यवहार कसा करावा याबाबत सविस्तर माहिती दिली...., तसेच या कार्यक्रमास रावेर  आय.डी.बी.आय बॅंक चे सहायक प्रबंधक मा. अमित बागडे सर, शिरीष गिरणीकर, विजय कांबळे व महिला आर्थिक विकास महामंडळ चे रावेर तालुका कर्मचारी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी तालुकाभरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...