Sunday, October 8, 2023

*ओबीसी वधुवर परिचय मेळावा, ओबीसी महासंघाचा स्तुत्य उपक्रम*


तरुण तडफदार न्युज/प्रशांत बोरकर 
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे, धनवटे नॅशनल कालेज येथील विमलताई सभागृह येथे भव्य असा ओबीसी वधुवर परिचय मेळावा संपन्न.
मेळाव्याचे उद्घाटन ओबीसी महासंघाच्या महामानवांना पुष्पमाला, दिपप्रज्वलन करून , राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विचारमंचावर, मनोमिलन मॅरेज ब्युरो चे संचालक, सुधांशु मोहोड, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शरद वानखेडे, कुणबी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुरेश गुडधे, पांडुरंग वाकडे पाटील, अध्यक्ष तिरळे कुणबी समाज, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गुणेश्वर आरिकर, कल्पना मानकर, सुभाष घाटे,अनुसया मरेज च्या संचालीका जयश्री काळे, उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ बबनराव तायवाडे म्हणाले ओबीसी समाजाचे वधुवर परिचय मेळावे होणे, ही काळाची गरज आहे.देशात ओबीसी ६०%च्या वर असतांना,  जोपर्यत ओबीसी सामाजिक, सांस्कृतिक रित्या एकत्र होत नाही, तोपर्यंत ह्या समाजाला आपल्या अस्तित्वाची जाणीव होणार नाही. विवाह हा एक संस्कार आहे, तो वैचारिक हितसंबधातुन झाला, तर तो दिर्घकाळ  टिकून राहण्याची शक्यता असते. 
या मेळाव्यात ओबीसी मधिल विविध जातीचे वरवधु, आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परमेश्वर राऊत, विनोद हजारे, शुभम वाघमारे, अविनाश घागरे, वृंदाताई ठाकरे, राजु मोहोड, सूरेश कोंगे, गणेश नाखले,केशव शास्त्री,दौलत शास्त्री, वसंत राऊत, इत्यादी मोठ्या संख्येने सहकारी होते.
कार्यक्रमाचे संचलन अरुणा भोंडे यांनी केले.

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...