Thursday, November 16, 2023

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय


—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल नहीं प्रदान करते हैं ।

—रुद्राभिषेक से मंगल ग्रह के विपरीत प्रभाव की शांति होती है ।

—मंगल देवता के नामों का पाठ करने से ऋण से मुक्ति मिलती है । 

—तांबे के भौम-यन्त्र को हनुमानजी की मूर्ति या चित्र के सामने रख कर उसकी लाल पुष्प और लाल चंदन से पूजा करने से शीघ्र ही मंगल ग्रह की अशुभता दूर होने लगती है ।

—मंगल ग्रह के कुप्रभावों की तीव्रता कम करने में ‘अंगारक कवच’ का पाठ भी विशेष फलदायी है ।

—स्कन्दपुराण में मंगल देवता की प्रसन्नता के लिए ‘मंगल स्तोत्र’ या ‘अंगारक स्तोत्र’ का वर्णन है; जो इस प्रकार है—

अंगारक: शक्तिधरो लोहितांगो धरासुत: ।
कुमारो मंगलो भौमो महाकायो धनप्रद: ।।
ऋणहर्ता दृष्टिकर्ता रोगकृतदोषनाशन: ।
विद्युत्प्रभो व्रणकर: कामदो धनहृत् कुज: ।।
सामगानप्रियो रक्तवस्त्रो रक्तायतेक्षण: ।
लोहितो रक्तवर्णश्च सर्वकर्मावबोधक: ।
रक्तमाल्यधरो हेमकुण्डली ग्रहनायक:।
नामान्येतानि भौमस्य य: पठेत्सततं नरं ।।
ऋणं तस्य च दौर्भाग्यं दरिद्रयं च विनश्यति ।
धनं प्राप्नोति विपुलं स्त्रियं चैव मनोरमाम् ।
वंशोद्दयोतकरं पुत्रं लभ्यते नात्र संशय: ।
योऽर्चयेदह्नि भौमस्य मंगलं बहुपुष्पकै: ।।
सर्वा नश्यन्ति पीडाश्च तस्य ग्रहकृता ध्रुवम् ।।

इस स्तोत्र का भाव है कि धरतीपुत्र मंगल आप ऋण हरने वाले और रोगनाशक हैं । रक्त वर्ण, रक्तमालाधारी, ग्रहों के नायक आपकी आराधना करने वाला अपार धन और पारिवारिक सुख पाता है ।

ब्रह्माण्डपुराण में मंगल-ग्रह की पीड़ा दूर करने के लिए यह श्लोक बताया गया है—

भूमिपुत्रो महातेजा जगतां भयकृत् सदा ।
वृष्टिकृद् वृष्टिहर्ता च पीडां हरतु मे कुज: ।।

अर्थात्—भूमि के पुत्र, महान तेजस्वी, जगत को भय प्रदान करने वाले, वृष्टि (वर्षा) करने वाले तथा वृष्टि न करने वाले मंगल ग्रह मेरी पीड़ा का हरण करें ।

Sunday, October 8, 2023

*ओबीसी वधुवर परिचय मेळावा, ओबीसी महासंघाचा स्तुत्य उपक्रम*


तरुण तडफदार न्युज/प्रशांत बोरकर 
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे, धनवटे नॅशनल कालेज येथील विमलताई सभागृह येथे भव्य असा ओबीसी वधुवर परिचय मेळावा संपन्न.
मेळाव्याचे उद्घाटन ओबीसी महासंघाच्या महामानवांना पुष्पमाला, दिपप्रज्वलन करून , राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विचारमंचावर, मनोमिलन मॅरेज ब्युरो चे संचालक, सुधांशु मोहोड, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे शरद वानखेडे, कुणबी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुरेश गुडधे, पांडुरंग वाकडे पाटील, अध्यक्ष तिरळे कुणबी समाज, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे गुणेश्वर आरिकर, कल्पना मानकर, सुभाष घाटे,अनुसया मरेज च्या संचालीका जयश्री काळे, उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ बबनराव तायवाडे म्हणाले ओबीसी समाजाचे वधुवर परिचय मेळावे होणे, ही काळाची गरज आहे.देशात ओबीसी ६०%च्या वर असतांना,  जोपर्यत ओबीसी सामाजिक, सांस्कृतिक रित्या एकत्र होत नाही, तोपर्यंत ह्या समाजाला आपल्या अस्तित्वाची जाणीव होणार नाही. विवाह हा एक संस्कार आहे, तो वैचारिक हितसंबधातुन झाला, तर तो दिर्घकाळ  टिकून राहण्याची शक्यता असते. 
या मेळाव्यात ओबीसी मधिल विविध जातीचे वरवधु, आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परमेश्वर राऊत, विनोद हजारे, शुभम वाघमारे, अविनाश घागरे, वृंदाताई ठाकरे, राजु मोहोड, सूरेश कोंगे, गणेश नाखले,केशव शास्त्री,दौलत शास्त्री, वसंत राऊत, इत्यादी मोठ्या संख्येने सहकारी होते.
कार्यक्रमाचे संचलन अरुणा भोंडे यांनी केले.

Thursday, June 29, 2023

‼रावेर रेल्वे प्रवासी मित्रांना कडून मागणी‼

 रेल्वे बाबत अनेक वेळा पाठपुरावा करत असतो पण काही जण आपापल्या पद्धतीने निवेदन देतात त्यात आपल्या मागण्या तफावत आढळते आणि एकता पण दिसत नाही

म्हणून आपल्या मागण्या करतांना चर्चा करावी आणि त्यानुसार मागण्या करण्यात आल्या पाहिजेत

आमदार खासदार यांनी

स्वतः हुन प्रवाशी यांचे समस्या जाणून घेण्याची गरज आहे

पण आजगायत कोणत्या मागण्या रावेर सावदा निंभोरा साठी केल्या.हे जनतेनी पण विचारले पाहिजे

लोकसभेत विधानसभेत कोणते प्रश्न मांडले मार्गी लावले ते पण विचारले पाहिजे

आपण महामहीम राष्ट्रपती  महोदय रेल्वे मंत्री रेल्वे बोर्ड यांचे कडे यांचीका दाखल केल्या आहेत.

आणि रेल्वे प्रश्नाबाबत आपण कधीही प्रवाशी जनते कडू न कधीही वर्गणी एक रुपया घेतेल्ला  नाही

आपल्या लोकाची साथ हवी आहे

आपण आपल्या येथून धुळे चाळीसगाव सारख्या

**जळगाव अमळनेर पाचोरा ते रावेर बुऱ्हाणपूर ***लोकल ट्रेन दिवसातून च वेळा सुरु करण्या साठी मागणी करत आलो आहे

सध्या दुसरून येणाऱ्या प्रवासी गाड्या ह्या फुल भरून येत आहे

म्हणून राज्यात नव्या लोकल ट्रेन सुरु करण्याची मागणी वेळोवेळी करत आहे

प्रशांत बोरकर

 रेल्वेप्रवाशी मित्र 

8208361187

Monday, May 29, 2023

रावेर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी तुषार एकनाथ मानकर यांची बिनविरोध निवड.



रावेर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तुषार मानकर  यांची चेअरमन पदी तर विनोद तायडे यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे मावळते चेअरमन ज्ञानेश्वर हरिभाऊ महाजन यांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्त पदावर मानकर यांची निवड करण्यात आली आहे या निवडी दरम्यान रावेर विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते



माळी समाजाचे विश्वस्त प्रल्हाद महाजन , पद्माकर  महाजन माजी वाईस चेअरमन डी एन महाजन , भागवत सातव , विजय लोहार , रामदास महाजन , गिरीश पाटील , भावलlल पहिलवान , सुधाकर महाजन, छायाबाई न्यानेश्वर महाजन , देविदास नारायण महाजन , ललिताबाई भास्कर पाटील कैलास वाणी दिलीप पाटील यांच्यासह रवींद्र महाजन , चंद्रकांत पाटील आकाश भालेराव , इमरान शेख , योगेश ननवरे ,
सोसायटीचे सचिव  किशोर  कोतकर हे उपस्थित होते

Friday, April 21, 2023

*सौ, मनिषा संतोष चक्रनारायण अकोला जिल्हा अध्यक्ष महिला, भारतीय किसान संघटन निवड प्रशांत बोरकर यांनी केली जाहीर*....

*सौ, मनिषा संतोष चक्रनारायण  अकोला जिल्हा अध्यक्ष  महिला, भारतीय किसान संघटन  निवड  प्रशांत बोरकर यांनी केली जाहीर*....
*अकोला.*
आज भारतीय किसान संघटन चे  अकोला जिल्हा महिला अध्यक्ष पदी  सौ, मनिषा संतोष चक्रनारायण यांची
भारतीय किसान संघटनचे
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत बोरकर यांनी निवड जाहीर केली आहे


वविदर्भ  सचिव वंदना सावरकर यांनी केलेल्या शिफारशी नुसार त्यांचे वर ही जबाबदारी देण्यात आली आहे
त्याचे निवडी बद्दल राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र यादव यांचे सहीचे पत्र दिले असून त्याचा जाहीर प्रवेश अकोला येथे होणार आहे. भारतीय किसान संघटन ही  शेतकरी कष्टकरी महिला आदिवासी वंचित सर्व घटकाच्या विकासासाठी आवश्यक तो पाठपुरावा लढा देणार असल्याचे श्री प्रशांत बोरकर यांनी म्हटले आहे
महिला अध्यक्ष यांचे निवडी बद्दल राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र यादव प्रदेश अध्यक्ष श्री प्रशांत बोरकर.राष्ट्रीय उपअध्यक्ष शिवाजीराव म्हस्के विदर्भ सचिव वंदना सावरकर यांनी  अभिनंदन केले आहे

dr सुनील देवरे यांची भारतीय किसान संघटन चे प्रदेश उपाध्यक्ष निवड . महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रशांत बोरकर यांनी केली जाहीर

,*dr सुनील देवरे यांची भारतीय किसान संघटन चे  प्रदेश उपाध्यक्ष निवड  .

 प्रदेश अध्यक्ष प्रशांत बोरकर*....
*मुंबई..*
आज भारतीय किसान संघटन चे  उपाध्यक्ष पदी सुनील देवरे यांची प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत बोरकर यांनी निवड जाहीर केली आहे

त्याचे निवडी बद्दल राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र यादव यांचे सहीचे पत्र दिले असून त्याचा पदभार  जळगाव येथे  मेळाव्यात होणार आहे. भारतीय किसान संघटन ही  शेतकरी कष्टकरी महिला आदिवासी वंचित सर्व घटकाच्या विकासासाठी आवश्यक तो पाठपुरावा लढा देणार असल्याचे श्री प्रशांत बोरकर यांनी म्हटले आहे

Friday, April 14, 2023

भारतीय किसान संघटन चेप्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत बोरकर यांनी जलगावं जिल्हा अध्यक्ष पदी एकनाथ पाटील यांची निवड यांनी केली जाहीर..

जळगाव
भारतीय किसान संघटन चे जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी एकनाथ पाटील पाचोरा यांची निवड प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत बोरकर यांनी जाहीर केली आहे
श्री एकनाथ पाटील हे प्रगती शीलशेतकरी असून उद्योजक आहेत.त्याचे निवडी बद्दल प्रदेश अध्यक्ष श्री प्रशांत बोरकर उपाध्यक्ष शिवाजीराव म्हस्के.विदर्भ विभाग अध्यक्ष नाना ठाकरे प्रदेश सचिव कुमार कुंभार सांगली.अशोक पाटील डी डी वाणी फोटोग्राफर सुभाष अकोले वसंत महाजन शशांक बोरकर
यांनी अभिनंदन केले आहे

Thursday, April 6, 2023

परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक: विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन*

*अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स नोंदणीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्यात दुसरे*

*

पुणे, दि.२१- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी राज्यातील विद्यापीठाकडून जोरदार तयारी सुरू आहे. या शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांची श्रेयांक म्हणजेच क्रेडिट बँक असणार आहे.  या विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेत राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. विद्यापीठाने आतापर्यंत ४ लाख ४५ हजार ७५२ विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे.

केंद्र शासनाच्या वतीने देशातील विद्यापीठांसाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यावर सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठांनी नोंदणी करायची असून विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आपले श्रेयांक खाते उघडणे अपेक्षित आहे. भारतातील एकूण १ हजार १४६ संस्थांनी यामध्ये नोंदणी केली असून त्यातील ३१८ राज्य विद्यापीठे आहेत. आतापर्यंत देशभराच्या आकडेवारीत अन्य राज्यांच्या तुलनेत संस्था नोंदणीत महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. तर राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नोंदणीत दुसरे आहे.

याबाबत माहिती देताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण हे श्रेयांक पद्धतीवर आधारित असणार आहे. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी ठराविक श्रेयांक असतील ते श्रेयांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खात्यावर जमा होतील. मात्र हे असण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन खाते उघडणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आधीपासूनच याची तयारी सुरू केली असल्याने आतापर्यंत ४ लाख ४५ हजार ७५२ विद्यार्थ्यांनी हे खाते उघडले आहे.

*कुठे कराल नोंदणी?*
abc.gov.in या संकेस्थळावर जात तुम्हीही तुमचे शैक्षणिक खाते उघडू शकता.

कोट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर २०२२ पासून संलग्न महाविद्यालयांना 'एबीसी' साठी नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच पुढील वर्षाचे अर्ज भरण्यासाठी एबीसी आवश्यक केले आहे, त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर नोंदणी करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. दरम्यान अजुनही उर्वरित विद्यार्थिनी यासाठी नोंदणी करावी असे आवाहन आम्ही करत आहोत.
- डॉ.महेश काकडे, संचालक
परीक्षा व मूल्यमापन मंडळ
---

रावेर बदलापूर रावेर मनमाडयेवलाबस सेवा सुरू करण्याची राजद. नेते श्री प्रशांत बोरकर यांची मागणी.


रावेर..
रावेर तालुक्यातील रावेर  सावदा तसेच यावल फेजपूर् भुसावळ भागातील अनेक जण हे बदलापूर येथे रहिवाशी झाले असून त्याची मोठ्या प्रमाणावर ये जा करत असते.काही  जळगाव भुसावळ हून सुरू असलेल्या गाड्या ह्या फुल भरून जात आहेत.रावेर हून डायरेक्ट अशी बससेवा नाही म्हणून रोज सकाळी  संध्याकाळी  रावेर हून जव्हार  तसेच नाशिक  मार्ग  बदलापूर  बस सेवा  तसेच रावेर मनमाड येवला  शिर्डी बससेवा सुरू करण्याची मागणी मागणी भारतीय किसान संघटन चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष. राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रवासी नेते श्री प्रशांत बोरकर  प्रदेश उपाध्यक्ष श्री शिवाजीराव  म्हस्के बदलापूर  सुभाष पाटील सुभाष अकोले सह असंख्य शेकडो प्रवाशी मित्र यांनी केली आहे

Tuesday, March 14, 2023

MAHAJYOTI तर्फे OBC मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब!!!


 उच्च शिक्षण साठी सध्या दहावीत असणारे ओबीसी भटके विमुक्त विद्यार्थी या योजनेचा फायदा घेण्याचे.आवाहन ओबीसी आदिवासी नेते प्रशांत बोरकर यांनी केले आहे.
 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचण आल्यास  समाज कल्याण कार्यालय महाज्योती .अधिकृत संकेतस्थळ वर कार्यालयाशीकॉल करा..
सदरहू योजना चालू  करण्यासाठी ओबीसी नेते प्रशांत बोरकर यांनी पाठपुरावा केला होता   अन्य  स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी बेरोजगार पदवीधर यांना ही टेबलेट लेप टॉप योजना सुरू करावी शिष्यवृत्ती योजना मधे वाढ करण्यात यावी अशी मागणी ही ओबीसी आदिवासी विकास मंच चे श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय यांना केली आहे.

Saturday, March 4, 2023

पैन कार्ड को आधार कार्ड से कैसे लिंक करें

पैन कार्ड को आधार कार्ड से कैसे लिंक करें

यदि आपका पैन और आधार लिंक नहीं हैं, तो आप उन्हें SMS या ऑनलाइन के माध्यम से लिंक कर सकते हैं। SMS के माध्यम से पैन को आधार से लिंक करने के लिए, अपने पंजीकृत फोन नंबर का उपयोग करके या तो 567678 या 56161 पर SMS भेजें।

आप आयकर पोर्टल पर जाकर और लागू विलंब शुल्क या 1000 रुपये का भुगतान करके पैन को आधार से ऑनलाइन लिंक कर सकते हैं।

  • अपने पैन कार्ड को आधार कार्ड से लिंक करने के लिए भारत के आयकर विभाग की आधिकारिक वेबसाइट पर जाएं: incometaxindiaefiling.gov.in
  • यदि पहले से नहीं किया है तो अपनी आईडी पंजीकृत करें।
  • अपनी यूजर आईडी, पासवर्ड और जन्म तिथि का उपयोग कर पोर्टल में लॉग इन करें। लॉग इन करने के लिए उपयोगकर्ता की आईडी आपका पैन (Permanent Account Number) होगी।
  • आपको अपने पैन को आधार से लिंक करने के लिए एक पॉप-अप विंडो दिखाई देगी।
    लिंक करने के लिए मेन्यू बार पर ‘प्रोफाइल सेटिंग’ में जाएं और होमपेज पर ‘लिंक आधार’ पर क्लिक करें।
  • अपना पैन नंबर, आधार नंबर और अपना नाम दर्ज करें जैसा कि आपके आधार कार्ड में उल्लेखित है।
  • यदि लागू हो तो ‘I have only year of birth in Aadhaar card’ बॉक्स को चेक करें।
  • सत्यापित करने के लिए स्क्रीन पर प्रदर्शित कैप्चा कोड दर्ज करें।
  • Link Aadhaar बटन पर क्लिक करें।
  • अगर आपके द्वारा दर्ज किए गए विवरण आपके पैन और आधार रिकॉर्ड से मेल खाते हैं। यदि आपका विवरण मेल खाता है तो ‘link now’ बटन पर क्लिक करें।
  • आपका पैन कार्ड आपके आधार कार्ड से सफलतापूर्वक लिंक हो जाएगा।
  • एक सफल लिंकिंग प्रक्रिया के बाद, एक पॉप-अप संदेश आपको बताएगा कि आपका आधार आपके पैन से सफलतापूर्वक लिंक हो गया है।

सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजाला दिशा व प्रेरणा देणारे -प्राचार्य डॉ जे बी अंजने

*ऐनपूर महाविद्यालयात युवतीसभे द्वारे विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न* 
ऐनपूर: ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे युवतीसभेद्वारे महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भूषविले. उदघाटन सौ. सुनंदाबाई भागवत पाटील निंबोल यांच्या शुभहस्ते करण्यात आले प्रमुख वक्ते सौ. वंदनाबाई संजय पाटील सरपंच निंबोल ग्रामपंचायत, सौ. सुलभा किशोर पाटील निंबोल , सौ. विमल वेडू पाटील उपशिक्षिका स. व. प विद्यालय ऐनपूर , सौ. सुरेखा मनिष पाटील संचालक सुरेखमणी ब्युटी केयर रावेर, श्रीमती जोत्स्ना महाजन, अध्यक्ष, एकदंत महिला बचतगट या होत्या.
    कार्यशाळेचे उदघाटन सौ. सुनंदाबाई भागवत पाटील निंबोल यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुलेंच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. प्रास्ताविक आणि पाहुणे परिचय युवतीसभेच्या सचिव डॉ. नीता वाणी यांनी केले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार शाल व बुके देऊन करण्यात आला. प्रथम सत्रात उदघाटक सौ. सुनंदाबाई भागवत पाटील यांचे उदघाट्नपर भाषण संपन्न झाले कार्यशाळेस शुभेच्छा देऊन आपल्या मनोगतात त्यांनी विशेष कार्य केलेल्या महिलांचे दाखले देऊन तुम्हीही त्यांचा आदर्श घ्या असे विद्यार्थीनींना आवाहन केले. द्वितीय सत्राचे पहिले पुष्पगुच्छ उपशिक्षिका सौ. विमल पाटील स. व. प. विद्यालय, ऐनपूर यांनी स्त्री शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.त्यांनी स्वतःचे अनुभव कथन करून सुसंस्कृत पिढी घडविण्याचे शिक्षण हे एक माध्यम आहे असे त्या म्हणाल्या शिक्षणातून सुसंस्कार मुलींनी घ्यावे, चांगल्या वाईटाची पारख करा. आई वडिलांचे ऋण, आपली संस्कृती विसरू नका. आपले राहणीमान, वर्तन चांगले ठेवा, शैक्षणिक प्रगती चांगली करा असे त्या म्हणाल्या .दुसरे पुष्प निंबोल गावच्या सरपंच सौ.वंदनाबाई संजय पाटील यांनी गुंफले. महिलांची राजकारणातील भूमिका या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यकाळ ते आजपर्यंत चा काळ पाहिला तर महिला सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहे स्त्रियांच्या राजकीय प्रवेशामुळे गावाच्या, देशाच्या विकासाला योग्य दिशा मिळते असे मनोगत व्यक्त केले. तिसरे पुष्प सौ. सुलभा किशोर पाटील यांनी गुंफले साहित्यातील स्त्रीया या विषयावर त्या बोलल्या त्यांनी अनेक साहित्यिक स्त्रियांची उदाहरणे कथन करून स्वरचित गुजर भाषेतील कवितांचे वाचन करून त्याचा अर्थ सांगितला. तिसऱ्या सत्राचे पहिले पुष्पगुच्छ सुरेखमणी ब्युटीकेयर रावेर च्या संचालिका सौ. सुरेखा मनिष पाटील यांनी गुंफले त्या स्त्री सौंदर्य आणि त्वचेची निगा या विषयावर बोलल्या. उत्तम व्यक्तिमत्वासाठी वेशभूषा, उत्तम आरोग्य आणि त्वचेची निगा आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या त्वचेची निगा कशी राखावी त्यासाठीचे घरगुती उपायांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले तसेच त्यांनी मेकअप चा डेमो दाखविला. दुसरे पुष्पगुच्छ श्रीमती जोत्स्ना महाजन यांनी गुंफले महिला बचतगट आणि महिलांचे उन्नयन या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. एकदंत महिला ग्राम संघा मार्फत त्यांनी 20 बचतगटाची स्थापना करून 200 महिलांना एकत्रित कसे केले याबाबत माहिती देऊन आज महिलाबचतगट विविध व्यवसाय यशस्वीरीतीने करीत आहे. दारिद्ररेषेखालील महिलांचा विकास बचत गटामुळे होत आहे असे त्या म्हणाल्या. त्यानंतर प्रश्नोत्तरे चे सत्र झाले वक्त्यांना विविध प्रश्न विचारून विद्यार्थिनीनी शंका समाधान केले. कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने आपल्या समारोपीय अध्यक्षीय भाषणात सावित्रीबाई फुलेंच्या कार्यामुळेच आज स्त्रिया आघाडीवर आहे.सावित्रीबाई फुल्यांचे कार्य समाजाला दिशा व प्रेरणा देणारे आहे. मुलींनी केवळ लग्नाचे वेटिंग म्हणून शिकू नये तर करियर साठी शिकावे. आभार प्रा. यास्मिन पटेल यांनी मानले विशेष सहकार्य प्रा. सुषमा मोतेकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेखा पाटील यांनी केले कार्यशाळेस ६४ विद्यार्थीनी सहभागी होत्या.

Wednesday, March 1, 2023

*चिखलदरा येथे विदर्भ स्तरीय पत्रकार संमेलन संपन्न*


*पत्रकारांनाच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तांनुबाई बिर्जे पत्रकार संघ सदैव तत्पर...*
  - *विलास पाटील, प्रदेश अध्यक्ष*
चिखलदरा :
तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद व्दारे विदर्भ स्तरीय पत्रकार संमेलन अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे संपन्न याझाले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील महाजन, स्वागताध्यक्षपदी म्हणून प्रदेश अध्यक्ष विलास पाटील, कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ पत्रकार व सुप्रसिद्ध विचारवंत चंद्रकांत वानखडे, मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहकरे, दिनेश कदम राष्ट्रीय सचिव मराठा वस्तीगृह कक्ष गणेश कापसे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद सूर्यकांतजी ससाने राष्ट्रीय प्रवक्ते तानुबाई बिजे पत्रकार परिषद  चिखलदरा येथील तहसीलदार माया माने, स्तंभलेखक व प्रसिद्ध विचारवंत प्रा प्रेम बोके, अध्ययन समाचार वृत्तपत्राचे संपादक जितेंद्र रोडे,देशौन्नती अमरावती आवृत्ती प्रमुख अमोल इंगोले, पत्रकार मनोज शर्मा, नारायण येवले, दैनिक पुण्यनगरी सुनील धर्माळे, मोहम्मद अशरफ, विनायक येवले, भंडारा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण फुंडे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष विलास गोंदिले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष मयूर वानखडे, जेष्ठ पत्रकार शिवदास मते, हेमंत निखाडे, शेखर चौधरी, संजय बनारसे, अरविंद गावंडे, इतर मान्यवर मंडळी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विलास पाटील यांनी केले होते.विदर्भ स्तरीय पत्रकार संमेलनाला यशस्वी करण्यासाठी तानूबाई ब्रिर्जे पत्रकार संघ अमरावती जिल्हा अध्यक्ष प्रवीण बोके, अंजनगांव तालुका अध्यक्ष रविंद्र वानखडे, तालुका सचिव उमेश काकड, सचिन अब्रूक, जयेंद्र गाडगे,सागर साबळे, सुजित काठोडे, मयुर राय, मनोहर मुरकुटे, गजेंद्र मंडलिक, सुनील माकोडे, महेंद्र भगत,शरद कडू, बाळासाहेब गोंडचौर, ज्ञानेश तुरखेडे, यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमा बोके यांनी केले प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार वासुदेव काळपांडे यांनी केले तर आभार रवींद्र वानखडे यांनी केले.

*यावेळी उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी सांगितले की, आजच्या पत्रकारासमोर फार मोठे आव्हान आहे.सध्याची स्थिती पाहता पत्रकारीता करणे फार अवघड झाले आहे.तेव्हा जागृत राहून पत्रकारिता करायला हवी असे मत त्यांनी मांडले.*
"*रविश कुमार यांच्या पत्रकारीची दखल जगभरात घेतली जाते. आशिया खंडातील सर्व श्रेष्ठ पत्रकारीतेचा पुरस्कार दिल्या जातो.पण भारतात अश्या खऱ्या पत्रकाराची दखल घेतली जात नाही.उलट त्यांना मजबूर करून पत्रकारितेमधून काढण्यासाठी कट कारस्थान रचून त्यांना मिडिया मधून काढण्यात येते ही फार मोठी दुःखाची बाब आहे. सध्या भारतात हुकूमशाही सुरू असून लोकशाही संपण्याचे कटकारस्थान सुरू आहे"*
- प्रा प्रेमकुमार बोके , स्तंभ लेखक

"*जगा सोबत चालणे शिका, पत्रकारिता करताना सोबत साईड बिझनेस सुध्दा सुरू करा, पत्रकारांनी एस.टी.पास मागण्या पैक्षा स्वतः ची कार घ्या अशी प्रगती करा . ग्रामीण भागातील प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम करत राहा.नकीच तुम्हाला यश मिळेल."*
- जितेंद्र रोडे, संपादक अध्ययन समाचार

"*आजची पत्रकारिता करणे खुप कठीण झाले आहे.पेपर नियमित चालवणे हे एक अवघड झाले आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.त्याचा आवाज दाबण्याचे काम सध्या सुरू आहे.पत्रकारांचे विविध समस्या आहे.त्याकडे सुध्दा लक्ष देण्याचे काम आहे."*
 - शिवदास मते, जेष्ठ संपादक ग्राम वैभव

Monday, February 27, 2023

राष्ट्रीय जनता दलात बापू महाजन यांचा प्रवेश ।प्रदेश महासचिव प्रशांत बोरकर यांनी केले स्वागत।

नाशिक महानगर जील्हा धक्ष म्हणून निवड केली जाहिर
नाशिक=
नाशिक  जिल्हातिल सामाजिक कार्यकर्ते श्री बापू महाजन यानी  काल रोजी राष्ट्रीय जनता दल मधे प्रवेश केला  असुन त्यांचे स्वागत राजद नेते श्री प्रशांत बोरकर यानी केले असुन त्याची नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड जाहिर केली आहे।   काल श्री बापू महाजन यांचे प्रवेश बाबत जानकारी प्रदेश अध्यक्ष श्री विजय कंडारे यांना देवून त्यांच समतीने निवड आज श्री प्रशांत बोरकर यानी जाहिर केली आहे।  त्यांचे निवड़ी बद्दल प्रदेश अध्यक्ष श्री विजय कंडारे प्रदेश प्रवक्ते महासचिव श्री प्रशांत बोरकर प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव मस्के।नदूरबार जिला प्रमुख अविनाश पाटिल विदर्भ प्रमुख नानाभावू ठाकरे  कोकन प्रमुख मुद्दसर पटेल अमरावती जिला प्रमुख हरिभावू अरबत पाटिल। जलगांव जिला प्रमुख रामकृष्ण चौधरी raver  गुलाबराब पाटिल पारोला   जिला  सचिव अशोक पाटिल वसंत महाजन आदि अनेक कार्य करते यानी स्वागत केले आहे। श्री प्रशांत बोरकर याचे प्रवेश पासुन राजद मधे महाराष्ट्र भरा तून सेकडो  ओबीसी आदिवासी कार्यकर्त यानी प्रवेश केला आहे

Friday, February 17, 2023

*देवकर रुग्णालयात आता डायलिसिस सुविधा उपलब्ध*



महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व ESIC अंतर्गत होणार मोफत उपचार

जळगाव : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशलिटी व आयुष रुग्णालयात आजपासून डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत तसेच ESIC च्या रुग्णांसाठी संपूर्णपणे मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय आरोग्य विमाधारकांसाठी रुग्णालयात कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे.

रुग्णालयात मूत्ररोग व किडनी रोगाच्या योग्य व अचूक निदानासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णालयात उपलब्ध आहे. या सुविधेचा आरोग्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी मोठा फायदा होणार आहे. त्यांचा डायलिसिससारख्या आजारावर होणारा मोठा खर्च यातून वाचणार आहे. 

*खालील लक्षणे असलेल्या रुग्णांनी देवकर रुग्णालयाची संपर्क साधावा*

* डायलिसिस चालू असलेले रुग्ण

* बीपी, डायबेटिसमुळे होणारे किडनीचे आजार

* चेहरा व हातापायांवर सूज असणे

* लघवी कमी होणे व लघवी लालसर होणे

* लघवीला जळजळ होणे किंवा लघवीतून पू येणे

* लघवीतून प्रोटीन जाणे

* भूक न लागणे व मळमळ, उलट्या होणे

* किडनी स्टोन (मुतखड्याचे आजार)

* लहान मुलांचे किडनी विकार

वरील लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांनी देवकर रुग्णालयातील मो. क्र. ,9422977071 यावर संपर्क साधावा.

Thursday, February 16, 2023

*मा.गृहमंत्री श्री.अमित शहा जी नागपुर, पुणे व कोल्‍हापुर प्रवास का कार्यक्रम*



*(18, 19 व 20 फरवरी, 2023 )*

*18 फरवरी, 2023 (शनिवार)*
*समय- 10:15 -* 
*डॉ. भीम राव अम्‍बेडकर जी की दीक्षा भूमि पर श्रद्धांजली*
स्थान-दीक्षा भूमि, नागपुर 

*समय-10:30 -* 
*डॉ. हेडगेवार और गोलवलकर गुरू जी की समाधि स्‍थल पर माल्‍यार्पण*
स्थान- रेशिम बाग, नागपुर 
*समय-11:00 -* *लोकमत ग्रुप स्‍थापना के 50वें वर्ष का समारोह*
स्थान- सुरेश भट्ट सभागार, नागपुर

*समय-13:45-* *नागपुर एयरपोर्ट से पुणे एयरपोर्ट (यात्रा)*
*समय-15:00 -* 
*दैनिक सकाळ द्वारा आयोजित सहकार परिषद*
(चीनी मीलों के चेयरमैन / एमडी प्रमुख व्यक्ति)
स्थान- होटल टिपटॉप, पुणे

*समय-17:00 -* 
*शहीद कश्मीर पुलिस कर्मियों की बेटियों के साथ संवाद* 
स्थान- होटल JW मैरियट
*समय-19:45 -* 
*मोदी@ 20 मराठी अनुवादित पुस्‍तक का विमोचन तथा कार्यकर्ता*
स्थान- मॉडर्न कॉलेज ग्राउंड, पुणे भाषण
----------------------------------------------


*19 फरवरी, 2023 (रविवार)*

*समय-11:00 -* 
*शिव सृष्टि का लोकार्पण (शिव जयंती)*
स्थान- अम्‍बेगांव, पुणे

*समय-13:00 -* 
*पुणे एयरपोर्ट से कोल्‍हापुर एयरपोर्ट- यात्रा*

*समय-13:40 -* 
*राजर्षि शाहू महाराज की प्रतिमा पर माल्‍यार्पण*
स्थान- कोल्‍हापुर
 
*समय-15:00 -* 
*लोहिया हाई स्‍कूल का 100 वर्ष पूर्ण होने पर समारोह*
स्थान- कोल्‍हापुर

*समय-16:30 - कोल्‍हापुर लोकसभा विजय संकल्‍प रैली तथा जिला कार्यालय परिसर में गणपति मंदिर का शिलान्‍यास समारोह*
स्थान- भा.ज.पा. कार्यालय, कोल्‍हापुर

*समय-18:45 - महालक्ष्‍मी मंदिर में दर्शन, कोल्हापूर*

*समय-20:00 - कोल्‍हापुर लोक सभा प्रमुख कार्यताओं के साथ बैठक*
स्थान- कोल्‍हापुर

*समय-21:30 बजे- दिल्‍ली के लिए प्रस्‍थान (यात्रा)*

Thursday, February 9, 2023

जळगाव जिल्हा करानो एक वेळ येवला चे रस्ते पहा..*.येवलाचे रस्ते आणि येवल्याची माणुसकी*


येवला येथे पेठणी लोकप्रिय असले तरी तेथील माणसे ही तेवढीच आपुलकीने वागनारी आहेत.

आमचे येवला येथे येणे जाणे झाले आम्हाला घ्यायला मनमाड स्टेशन वर घ्यायला काही मिनिटात हजर.
गाडी अगदी वीस मिनिट पकडायची होती अगदी पोटातील पाणी ना हलता   पोहचलो
आपल्या कडे तर गेल्या काही दिवसापासून फिरलो तर  परचांड कंबरदुखी सुरू झाली काल x rey काध्याला pen किलर घ्यावी लागत आहे.एक प्रकारे दिवांग झालो आहे  मोटर सायकल असो रिक्षा चारचाकी  तुमचे शरीर  खिळखिळे झालेले आहे. रेल्वे सोयीच्या वेळी नाही.त्या ठिकाणी पण जाण्यासाठी रस्ते खराब आहेत.
अगदी ग्रामीण रुग्णालयात जात होतो खोकल्याचे दवा घेण्यासाठी तर कमर दुःखी वाढून गेली
पाय सुजून जात असतात
आपल्या पेक्षा....

 येवला येथे चांगल्या पद्धतीने रस्ते पाहायला मिळाले प्रतेक गावात सभागृह झाले आहे आणि रस्ते आणि अनेक विकास कामे पाहायला मिळाले
आपल्या जळगाव जिल्हा मधे रस्ते खराब आहे त्या येवला तालुक्यातील रस्ते पाहून आपले रस्ते दहा तक्के पण चांगले नाहीत असे दिसून आले
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी आपला येवला मतदार संघात खूप चांगले कामे केली आहेत..त्यामुळे तिथले लोक पण शांत आणि प्रसन्न आनंदी  मायाळू.दिसून आले .
आमचे व्याही जी चंद्रकांत पासेकर जी यांचे सोबत अनेक शेतकरी मान्यवर व्यक्ती यांची भेट झाली सर्व जण अगदी आस्थेवाईपणे विचारपूस करत असतात आपल्या भरीत पार्टी हे त्यांना आवडते ही जमेची बाजू. येवल्याची रस्ते येवल्याची माणुसकी दाखवीत आहेत.रावेर येथे जेव्हा ही🎷🎺 मंडळी आली तेव्हा इंद्र देवतेने त्यांचे स्वागत पावसाने केले होते.अजून काय सांगावे..
चांगली माणसे चांगले नेते घडवत असतात त्यांना चागले करण्याची  संधी देत असतात 🌈🌈💫💅🤳🤝🤝
तूर्त एवढेच

प्रशांत बोरकर
मुक्त पत्रकार
प्रवासी मित्र 
रावेर जळगाव.
8/2/2023.रात्री11-09..

Wednesday, February 8, 2023

कचोरी चे प्रेम. आणि शेंगा निवडण्याचे स्वातंत्र्य

रोज काय अनेक वेळा बाहेर ची कचोरी खाल्ली आहे दीड रुपया पासून बारा वीस रुपये पर्यंत.आज ही रावेर मधे पाच रुपये सात आठ दहा आणि बारा रुपये ची कचोरी मिळते पण

घरची ती घरची .असते ते प्रेम .स्वच्छ आणि सुंदर भेसळ रहित मिळते फ्कत त्यासाठी अगोदर बाहेर खावून झाल्यावर त्या खराब घरी पण खावू घ्याल्यावा .वय झाले की मग बायकोला दया येते .त्यात दात पण हळू हळू हलू लागतात
काय मग सकाळ पासून किती वेळा खावू घातल्या.माहीत नाही.चांगल्या झाल्या तरी सकाळीं काय त्रास होतो ते समजेल. देर हे पर अंधेर नाही हे मात्र कचोरी वरून  देवता प्रसन्न झाले..जय कचोरी पुराण आपण संपन्न .नाहीतर पुरण खावून ठार.😆🤩💁🤱👰🎂🙊🎊😳,,,,,,,,
नाव लिहीत नाही.नाहीतर उद्या जेवण मिळायचे नाही.
हा लेख कॉपी करताना सावधान बर😂👰🧑‍🏫✍️

Monday, February 6, 2023

रावेर येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी शिक्षक,शिक्षिका पाहिजेत*.

*
खालील शैक्षणिक पात्रता धारक गरजूंनी त्वरित  संपर्क साधावा.
*1)* एचएससी डी एड/ डीटीएड- 02 जागा 
*2)* बीए, बीएस्सी/ डीएड/ डीटीएड-02 जागा.
  वरील शैक्षणिक पात्रता  असणाऱ्यांना आकर्षक मानधन  दिले जाईल.
 *संपर्क प्राचार्य*
इंग्लिश मीडियम स्कूल  रावेर,तालुका रावेर जिल्हा जळगाव*
mob no 8459673035, 8805441168
धन्यवाद 🙏

रावेर चे त्र्यंबकेश्वर विद्यालय घेणार 151 विद्यार्थ्यांना दत्तक

& &
  त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालय रावेर तालुका रावेर जिल्हा जळगाव या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी शिक्षण घेत असलेल्या 151विद्यार्थ्यांना शाळा घेणार  दत्तक प्रवेशासाठी गरीब पिवळे  कार्डधारक निराधार तळागळातील विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत प्रवेश दिला जाणार आहे सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश शैक्षणिक वर्ग निहाय पाठ्यपुस्तके वह्या शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे पालकांनी  विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करून घेण्यासाठी शाळेतर्फे आवाहन करण्यात येत आहे
 संपर्कासाठी, मुख्याध्यापक - त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालय रावेर तालुका रावेर जिल्हा जळगाव
Mob no 8805441168,8459673035

Sunday, February 5, 2023

जोधपूरमधील त्या ‘दोन अंगठ्याची’ कमालमान, पाठ, कंबर यावर उपचार करणारे जादूगारमधुकर भावे


आॅगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दोन महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ.पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई-पिंपरी-चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा एक विपरीत परिणाम माझ्या कमरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही. कंबर दुखू लागली, पायापर्यंत चमक मारु लागली. मंगलाच्या आजारपणामुळे माझ दुखण महत्वाच नव्हतं, त्यामुळे ते अंगावर काढल. त्यानंतर चालण असह्य झालं. म्हणून प्रथम डॉ.सुबोध मेहता मग डॉक्टर कपिल अशा नामवंत वैद्यक शास्त्र्यांकडून तपासणी झाली, एम.आर.आय झाला, इंजेक्शन झाली, गोळ्या सुरु झाल्या. चालता येईना, दुखण थांबेना. वेदना असह्य झाल्यावर आणि दुखण बर होत नाही अस जाणवल्यावर निराशा येत गेली त्यातच मंगलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, निराशेत आणखी भर पडली. काय उपचार करावे सुचत नव्हते, डॉक्टरांनी मणक्याचे आॅपरेशन सुचवले, पण ते करणे धोक्याचे आहे, असे त्यांनीच मत दिले. आता काय करायचे?.. काही प्रश्नांची उत्तर नियती देत असते. एक दिवस अचानक माझे दोन मित्र श्री. किशोर अग्रहाळकर (नवी मुंबईचे माजी नगररचनाकार) आणि श्री. अशोक मुन्शी माझ्याकडे आले. माझ दुखण पाहून त्यांनी सुचवलं की, ‘जोधपुरला चला’ असं सांगायलाच आलो आहोत. दोन्ही जिव्हाळ्याचे मित्र. जोधपूरला उपाय काय माहित नाही, त्यांच्यावर विश्वास ठेऊन जोधपूरला जायचं ठरले. त्यांनी सांगितले की, डॉ. गोवर्धनलाल पाराशर हे विख्यात डॉक्टर दोन अंगठयांनी कंबर, मणका, मान, पाय याठिकाणी ज्या मांसपेशीमध्ये शीर दबलेली असते तिला बरोबर मार्गी लावतात आणि अवघी दहा मिनीटाची त्यांची जादू. करुन तर बघा.... चार डॉक्टर झाले होते, चार प्रयोग झाले होते. पाचवा प्रयोग करु या, असं समजून जोधपूरला निघालो, सोबत माझी सुविद्य कन्या डॉ. मृदूला (एम.एस. एफ.आर.सी.एस) हीसुध्दा होती. विमानात बसताना पायंड्या चढता आल्या नाहीत. व्हिलचेअरवरुन आत जावे लागले. उतरताना व्हिलचेअरची गरज लागली.... पुढे काय होणार माहित नव्हते. ४० मिनीटात
डॉ. पराशर यांच्या ‘आॅस्टियोपॅथी’ प्रयोगासाठी त्यांच्यासमोर उभा राहीलो. त्यांनी उपचार सुरु केले. त्यांच्या रुग्णालयात सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ५ पर्यंत रोज ३०० लोकांवर, या सर्व व्याधींवर उपचार केले जातात. त्यांचे बंधू डॉक्टर नंदु, ज्येष्ठ चिरंजीव डॉ. गिरीराज, दुसरे चिरंजीव डॉ.महेश आणि अन्य डॉक्टर सहकारी अशा १२ जणांची टीम ३०० रुग्णांवर पाचवाजेपर्यंत उपचार करते. जे रुग्ण लंगडत आलेले असतात, ज्या रुग्णांना कमरेला विळखा घालून उचलून आणलेले असते... अशा अनेक व्याधी असलेले रुग्ण जवळपास रडत रडतच येतात आणि १० मिनीटाच्या उपचारानंतर टकाटक चालत, हसत आनंदाने परतताना दिसतात, ते सर्व मी बघत होतो. डॉक्टर गोवर्धनजी मला म्हणाले ‘आपका तो कुछ भी नही है। दो दिन मे ठीक होके मुंबई जाओगे।...’ मी ऐकत होतो. पाचवा प्रयोग आहे असच म्हणत होतो. डॉक्टरांच्या सोबत उपचाराच्या खोलीत गेलो. एका रुंद टेबलावर त्यांनी झोपवलं. दोन अंगठयांनी मणक्याची शीर दाबायला सुरुवात करुन कमरेपर्यंत दोन अंगठ्यात दुखरी शीर पकडत ते खालपर्यंत येत होते, पुन्हा वर जात होते... मला फरक जाणवू लागला. पायापर्यंत जाणारी चमक पहिल्या पाच मिनीटात कमी झाल्याच जाणवलं. पुढच्या पाच मिनिटानंतर डॉक्टर म्हणाले, ‘चलो उठो.... आप खुद चल के जा सकते हो।’... मी टेबलवरुन खाली उतरलो. माझी पावलं ताड-ताड पडू लागली. काय झालयं मलाच समजेना आवाजात एकदम फरक पडला, उत्साहात फरक पडला.  नियती काय घडवतं असते. त्याचा अनुभव करत होतो.  डॉक्टरसाहेबांजवळ येऊन बसलो.... कैसा महसूस कर रहे हो।... त्यांच्या प्रश्नावर इतकच म्हणालो की, ‘विश्वास बसत नाही असं काही तरी घडलं आहे. पुराणामध्ये एक कथा आहे की, भगवान श्रीकृष्णांन एका करंगळीवर अख्खा गोवर्धन पर्वत उचलला होता... मोठी रोचक कथा आहे. त्याचे मित्र असलेले पेंदे काठ्या टेकून उभे होते, पर्वत उचलला होता श्रीकृष्णाच्या करंगळीवर , ते बघायला कुणीच गेल नाही. पण माझ्या समोरच्या डॉक्टरांनी हाताच्या दोन अंगठयांवर हजारो रुग्णांची व्यथा आणि पिडा गोवर्धन पर्वतासारखीच उचलली आणि त्यांची पिडा दूर केली. विलक्षण योगायोग म्हणजे त्या वैद्यकशास्त्राच नाव डॉक्टर गोवर्धनच आहे. अंगठयाची कमाल आहे. सेवेची आणि ‘आॅस्टियोपॅथीच्या अभ्यासाची ही साधना आहे.
डॉक्टरांनी एक पुस्तक हातात दिलं. उलटून बघितलं, विश्वास बसला नसता. फोटोसकट सगळी सचित्र माहिती होती. मान, पाठ, मणका, पोटºया एवढेच नव्हेतर हाताची एकमेकांवर चढलेली बोटं अशा अनंत व्याधी घेऊन डॉक्टरसाहेबांकडे कोणकोण आले आणि हे जागतिक किर्तीचे लोक अंगठयाच्या जादूने बरे होऊन गेले. त्यांनी कोणत्या कोणत्या शब्दात डॉक्टरांचं वर्णन कसं केलं... सगळ वाचून थक्क झाले. या उपचारामध्ये आहेत, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अमेरिकेचे माजी राष्टÑपती डॉ. जॉर्ज बुश, बराक ओबामा, भारताचे माजी राष्टÑपती डॉ. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, आजचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सिनेतारकांमध्ये देवानंद, राजेश खन्ना, धर्मेद्र, मिथुन चक्रवर्ती, सलमान खान, सनी देओल आणि शेवटची दोन नाव.... लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या सर्वांचे या ना त्या रुपात डॉक्टरांनी उपचार केलेले आहेत आणि त्या सर्वांच्या व्याधी दूर केलेल्या आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख््यमंत्रीु अर्जुनसिंग चक्क सहा दिवस दाखलच झाले होते. या महारथींच्यापेक्षा सुध्दा सकाळी ८ ते  संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जी सामान्य माणसं येतात त्यांच्या चेहºयावरचा आनंद विलक्षण आहे आणि प्रत्येकाची फी फक्त रुपये १००/-....
आणखी एका किस्सा सांगतो. ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मातोश्री श्रीमती कोकिलाबेन अंबानी यांच्या उपचारासाठी त्यांना जोधपुरात आणलं होतं. तो योग साधून त्यांचा वाढदिवस मुकेशजींनी जोधपूरमध्ये साजरा केला. ४०० मित्रांना वाढदिवसाला बोलावलं, १० चॅटर्ड विमान आणली, सगळी फाईव्हस्टार हॉटेल्स बुक केली, ५ कोटी रुपये खर्च केला म्हणतात आणि नंतर डॉक्टर गोवर्धनलालजींना ते म्हणाले, ‘मी मुंबईमध्ये ५-२५ कोटी रुपये लावून तुमच्या उपचारांसाठी फाईव्हस्टार रुग्णालय उभं करतो, तुम्ही तिथे या. मला डॉक्टर गोवर्धनलाल यांची विशेषता यातच वाटते की, त्यांनी काय सांगितलं?..
‘मुकेशभाई, आपका वह सेंटर तो फाईव्हस्टार हॉटेलसेभी उपर के लेवलका होगा, जाहीर है की ऐसे संस्थानमे मै गरीब तो क्या, मध्यमवर्ग का आदमी भी पहुंच नही सकता, मै विनम्रतापूर्वक इसे स्वीकार नही कर सकता, क्योंकी, जहा, गरीब रुग्ण की मेरे हाथसे सेवा नही हो सकती ऐसे हेल्थकेअर सेंटर मे  मेरी विद्या किस काम की?....’
डॉक्टर गोवर्धनलाल पराशर यांची प्रखर मानसिकता, त्यांची उच्च विचारसरणी, व्यावसायाची निष्ठा आणि सामाजिक धाडस या सर्व गोष्टीचा परिचय त्या एकाच घटनेत होऊ शकतो.
सहा दिवस उपचार घेतले, आज मी टकाटक पूर्वीप्रमाणे झपाटून कामाला लागलो आहे. जगात १६०० कोेटी लोक राहतात, त्यांचे ३२०० कोेटी अंगठे आहेत पण जोधपूरमधले डॉक्टर गोवर्धनलाल पाराशर यांचे दोन अंगठे जगातल्या ३२०० कोटी अंगठयांपेक्षा वेगळे अंगठे आहेत. ‘अंगठा दाखवला’ असा मराठीतला वाकप्रचार फार वाईट अर्थाने वापरला जातो. जोधपूरले हे दोन अंगठे कमाल करणारे अंगठे आहेत. मी मुंबईला परत निघताना डॉक्टरसाहेबांना सांगितलं की,....
‘डॉक्टरसाहब, आपका तहेदिलसे ऋणी हू। आज मुंबई जा रहा हू। जोधपूर के दोन अंगुठे का डंका मुंबई आणि पुरे महाराष्टÑ मे बजानेकी मेरी जिम्मेदारी, आप से मेरा इतनाही वादा....’
मुंबईला आल्यावर अनेक महिने थांबलेला व्यायाम पूर्ववत सुरु केला आहे. मंगलाच्या निधनाने दु:ख पचवून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. डॉक्टर गोवर्धन यांची ही यशस्वी गाथा महाराष्टÑभर सामान्य माणसाला उपयोगी पडेल यासाठी मुंबई, पुणे, नागपूर या दोन-तीन ठिकाणी डॉ. पाराशर यांची आरोग्य शिबीरे आयोजित करण्याचे काम सुरु केले आहे. नियती या कामात यश देते की नाही ते पाहूया..

Address: Shree Sanwar Lal Osteopath charitable sansthan 18 E, Chopasni Housing Board, Jodhpur, Rajasthan 342008

Phone: 0291 297 2777

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...