Thursday, April 30, 2020

कामगार दिनानिमित्ताने एक छान स्मरण,,रावेर चे बाजारपेठ ला बुधवार ची सुटी मिळाली

कामगार दिनानिमित्ताने एक छान स्मरण,,रावेर चे बाजारपेठ ला बुधवार ची सुटी मिळाली कामगार यांच्या बरोबर  व्यापारी विषेतः डॉक्टर ही या संधीचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबासह फिरायला जातात अनेक व्यापारी बुधवारला आपला खरेदी करण्यासाठी जातात पूर्वी ह्या सप्तक सुट्टीला मोठ्या प्रमाणात विरोध होता रावेरला शोपॅक्ट लागू नये म्हणून आम्ही कोणत्या प्रकारचे सुट्टी फायदे देनार नाही असे काही जणांचे मत होते    
त्या वेळी मला  महाराष्ट्र शासन कामगार खात्यातर्फे22जानेवारी 1998रोजी मध्यस्ती म्हणून बोलावणं आल होत,, समेट घडवून आंनेसाठी,,, आपल्याबरोबर आपल्या कुटुंबालाही वेळ द्यावा असं व्यापाऱ्यांना समजून सांगताना हाच त्याची आठवण येते वबुधवार बंद चां
 एक चांगला पायंडा पाडल्याबद्दल आनंद होतो🙏🙏

माझ्या सर्व कामगार मित्र  कार्यकर्तेदुकानदार असंघटित हॉटेल कामगार सफाई कामगार आदिवासी वनकामगार वनविकास महामंडळाचे वनमजूर अंगणवाडी  बालवाडीकर्मचारी  अंशकालीन कर्मचारी,एलआयसी विमा कंपनी चे प्रतिनिधी pigmi एजंट, रेल्वे अप्रेतेशिप iti croft ticahr  बांधकाम  कामगार कामगार दिनानिमित्त  कामगार व उद्योजक  व्यापारी यांना  आंतर रा्ट्रीय कामगार दीन व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
 प्रशांत बोरकर, 🙏🙏82083661187

जळगाव*जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी नागरीकांनी**तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा - जिल्हाधिकारी डॉ ढाकणे*


जळगाव, (जिमाका) दि. 28 - लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातून ज्या नागरीकांना परराज्यात अथवा इतर जिल्ह्यांमध्ये जायचे असेल त्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे. 
  जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरीकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार गेल्या दिड महिन्यापासून अडकून पडलेल्या नागरीकांचा आपल्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी ज्या नागरीकांना जिल्ह्याबाहेर जायचे असेल त्यांनी  संबंधित जी कार्यालयाकडे अर्ज करावा. या अर्जात नागरीकांनी आपले पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, कोणत्या ठिकाणी जायचे त्याची माहिती, आधारकार्डची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट साईज दोन छायाचित्रे, वाहन नेणार असल्यास वाहनाचा क्रमांक, वाहनचालकाचे नाव, प्रवासाचा मार्ग आदि माहिती असणे आवश्यक आहे. सदरची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकत्रित केली जाईल. त्यानंतर ती यादी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवतील. त्यानंतर जिल्हाधिकारी या नागरीकांना जाण्यासाठी पत्र देणार आहे. जिल्हाधिकारी यांचे पत्र असल्याशिवाय लोकांच्या कोणत्याही गटाला स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या व्यक्तीना कोविड किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नाहीत त्यानांच केवळ प्रवासाची परवानगी दिली जाईल. लक्षणे असल्यास निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे त्यांचेवर वैद्यकीय उपचार करण्यात येतील. 
वाहतुकीला वापरण्यात येणारी वाहने जंतुनाशकांनी फवारलेली असावी तसेच वाहनात देखील सोशल डिस्टेंसिंग पाळावे लागणार आहे. त्यानुसार किती लोक वाहनाने जाणार आहे त्याप्रमाणे परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात इतर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन कालावधीत राहावे लागणार आहे. जिल्ह्यात आलेल्या सर्व प्रवाशांची प्रथम वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर सबंधित व्यक्तीस घरीच क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल तसेच त्यांना केंद्र शासनाचे आरोग्यसेतू मोबाईल एप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येईल जेणे करून त्यांना कायम संपर्कात ठेवता येईल. असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे सांगित

Wednesday, April 29, 2020

रावेर पीपल्स बँक सुर्यवंशी सोसायटी तर्फे मुख्यमंत्री निधी साठी 51हजार व अकरा हजार रुपये चां चेक प्रांताधिकारी डॉक्टर श्री अजित थोरबोले यांचे कडे सुपूर्द,, आमदार श्री शिरिशभाई चोधरी यांचे प्रमुख उपस्थिती

 रावेर(प्रशांत बोरकर यांजकडून)रावेर तहसील कार्यालयात आज रावेर पीपल्स बँक सुर्यवंशी सोसायटी तर्फे मुख्यमंत्री निधी साठी 51हजार व अकरा हजार रुपये चां चेक प्रांताधिकारी डॉक्टर श्री अजित थोरबोले यांचे कडे सुपूर्द,, यावेळी आमदार श्री शिरिशभाई चोधरी यांचे प्रमुख उपस्थितीत चेअरमन श्री पंकज राजीव पाटील, माजी चेअरमन ज्ञानेश्र्वर महाजन, संचालक संजय वाणी अरुण महाजन, डॉक्टर राजेंद्र पाटील  
 मेनेजर प्रकाश पाटील यांनी धनादेश दिला यावेळी तहसील कार्यालयात रावेर तालुक्याचे तहसीलदार श्री उषा राणी देवगुणे नायब तहसीलदार संजय तायडे  गटविकास अधिकारी सानिया नाकोडे आदी अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते,,,
यावेळी सुर्यवंशी सोसायटी तर्फे ही अकरा हजार रुपये चां चेक देण्यात आला चेअरमन ज्ञानेश्वर महाजन यांच्या हस्ते देण्यात आला, त्याच बरोबर संचालक देविदास नारायण महाजन मोहन शिंदे मॅनेजर  सुरेश महाजन   कार्यकर्ते संतोष पाटील महेश लोखंडे, आमदार शिरीष चौधरी व  रावेर तालुका काँगेस कॅमेटी चे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्र्वर महाजन यांनी मुख्यमंत्री निधी साठी आवाहन केले
संकटकाळी मदत करण्यासाठी रावेर तालुक्यातील जनता संस्था  नेहमीच पुढाकार घेऊन मदत करण्यासाठी पुढे येत असतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तरुण तडफदार  सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त मदत करावी मदत करणारे  मान्यवर व्यक्ती  संस्था यांचे अभिनंदन करावे,👌👌🙏🎯

Tuesday, April 28, 2020

नोकरदार वर्गाला एप्रिल व मे महिन्याचा अर्धा पगार द्यावा !, सरकारने यासाठी वटहुकूम काढावा किवा कामगार यांच्या साठी पेके ज जाहीर करावे,,

   ): २४ मार्च ला देशभरात टाळेबंदी जाहिर झाली.
त्यावेळेस जवळपास सर्वच आस्थापनं आणि कंपन्यांनी आपापल्या कर्मचार्‍यांना मार्च महिन्यांचे पगार दिले.ओर
पण पहिल्या टाळेबंदीची तारिख १४ एप्रिल पर्यंत जाहिर करण्यात आली होती ,  त्यामुळे नोकरदार वर्ग अर्धा महिना घरीच बसला. त्यानंतर ३ मे पर्यंत टाळेबंदी जाहिर झाल्यामुळे संपुर्ण एप्रिल महिना सक्तीच्या रजेवर जाण्याची पाळी या वर्गावर आली.
त्यामुळे कंपन्या व आस्थापनात काम करणार्‍या नोकरदार वर्गाला एप्रिल महिन्याचा पगार देण्यात आला नाही.
त्यातच कोरोनाचे थैमान थांबायचे नांव घेत नाही म्हणजे मे महिन्यात देखील नोकरदार वर्गाला घरीच बसावे लागणार आहे असे सध्या तरी दिसत आहे. परिणाम मे महिन्याचा देखील पगार त्यांना मिळण्याची सध्या तरी लक्षण दिसत नाही.
सलग दोन महिने पगारा शिवाय घर चालविणे अशक्य .
त्यामुळे नोकरदार वर्गाचा कणाच मोडला जाणार आहे.
राज्य शासनाने जरी कामगार वर्गाला कामावरून कमी न करण्याचे आदेश दिले असले तरी सलग दोन महिने विनापगार आजच्या महागाईच्या काळात जगायचे कसे? असा प्रश्न नोकरदार वर्गाला पडला आहे.
नोकर्‍या शाबूत जरी असल्या तरी सलग दोन महिने विना पगार घरगाडा चालवायचा कसा?  हा यक्ष प्रश्न या वर्गाला भेडसावत आहे.
सर्वसामान्य घरांत महिन्याचा किमान खर्च हा १० हजाराच्या घरात असतोच. सलग २ महिन्याचा २० हजार खर्च विना पगार भागवायचा कसा?  हा प्रश्न घरा घरात पडलेला आहे.
त्यातच जुन महिन्यांत मुलांचे शैक्षणिक वर्ष चालू होणार. म्हणजे जुन  महिन्यात शाळेची फी, इतर खर्च क्लासेस, महाविद्यालयांचे प्रवेश या साठी किमान १० ते १५ हजार लागणारच ! आधीच दोन महिने पगार नाही त्यात हा  खर्च सामान्य माणूस करणार कोठून?  .या सर्वांचा विचार करता एप्रिल व मे महिन्याचा अर्धा पगार कंपन्या व आस्थापनांनी देण्याचा आदेश राज्य शासनाने दिल्यास नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळेल.
इतकी वर्ष आपल्या कंपनी / आस्थापना मध्ये ईनामेईतबारे सेवा देवून कंपनी/ आस्थापनाला करोडो रूपयांचा फायदा मिळवून देणार्‍या कर्मचारी वर्गाला संकटकाळात मदत करणे हे प्रत्येक कंपनीची/ आस्थापनाची जबाबदारी नाही का?
तरी राज्यशासनाने विनाविलंब  नोकरदार वर्गाला एप्रिल व मे महिन्याचा अर्धा पगार देण्याबाबत अध्यादेश काढावा अशी विनंती समस्त कामगार व नोकरदार वर्गाच्या वतीने करण्यात येत आहे.,,,
:  (अतुल साळवी , साप्ताहिक समाज मन यांनी लिहलेले कामगार समस्या   प्रतिनीधी चौधरी मॅडम  यांनी तरुण तडफदार  कडे कळवतात,,. असे प्रश्न  सर्व बाजूने उठाव करून लक्ष वेधले गेले यासाठी तरुण तडफदार टीम सर्व चांगल्या मानवता वादी धोरणाला पाठिंबा देत असते,,,
जनतेचे व्यासपीठ मत
,कामगार कायद्याप्रमाणे नोकरी वरून काढले तरी दोन महिन्याचा पगार द्यावा लागतो,,आणि आता तर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे, कर्ज बुडव्या उद्योगपती ना सवलती देण्यापेक्षा देशाची स्थिती श्रमशक्ती ना आधार देणे जिवंत  ठेवणे महत्त्वाचे आहे,,, कायद्यानुसार जनतेला जगण्याचा अधिकार आहे च म्हणून त्या कंपन्या जर देत नसतील तर त्यासाठी आता केंद्र सरकार ने योग्य भूमिका घेतली पाहिजे व जनतेचा कामगाराचा हक्क मिळवून देण्यासाठी अध्यादेश काढला पाहिजे,,, सर्वात जास्त कर देणाऱ्या महाराष्ट्र राज्य हे कामगार  यांच्या जोरावर च उधॉग धंदे चालू आहेत त्यांचे मेहनतीमुळे उद्योजक सरकारला कर.देतात कार्पोरेट टॅक्स  मधे मागे लाखो करोडो च लाभ उद्योगपती यांना यापूर्वी दिला आहे अनेकांचे कर्ज माफ केले आहे पण कधी जनतेचे  कामगार यांचे कर्ज माफ झालेले नाही सवलत मिळाली नाही,,म्हणून आता राज्य सरकारच्या माध्यमातून  केंद्र सरकारने आता जनता कामगार विमा कंपनी चे एजंट तसेच हातमजुरी करणारे  कामगार यांच्या साठी आता त्यांचे माहिती मागून मदत केली पाहिजे,🙏🙏, 
प्रशांत बोरकर   सल्लागार नेता  दुकानदार हॉटेल वन कामगार सफाई कामगार विमा एजंट सल्लागार समिती तर्फे तरुण तडफदार टीम सरकारचे लक्ष वेधत आहे,,🙏🙏🙏🌈🌈👍👍

श्री दत्त छाया प्रतिष्ठान व राज कंस्ट्रक्शन तर्फे गरजूंना किराणा साहित्य तहसीलदार देवगणे यांच्या हस्ते वाटप


रावेर,,(विलास ताठे याज कडून)
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या संचारबंदी काळात रावेर तालुक्यातील खिरवड येथे श्री दत्त छाया प्रतिष्ठान व राज कंस्ट्रक्शन चे अध्यक्ष राजेंद्र पंढरीनाथ चौधरी यांच्या तर्फे गरजूंना जीवनावश्यक किरणा साहित्य तहसीलदार उशारणी देवगुणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
देशात कोरोनाचा संसर्गामुळे संचारबंदी सुरु आहे. उद्योग, व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे गोर बरीब जनता व मजुरांना रोजगार मिळत नसल्याने व त्यांचे जवळील जीवनावश्यक खाद्य सामग्रीही संपण्याच्या स्थितीत आहे. गोर गरिबांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांची चूल सतत पेटत रहावी तसेच शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत खिरवड येथील प्रतिष्ठीत शेतकरी, समाजसेवक, श्री दत्त छाया प्रतिष्ठान व श्री दत्तछाया तोल काटा व राज कंस्ट्रक्शन चे अध्यक्ष तथा माजी सरपंच ग्रा.पं. खिरवड, माजी चेअरमन रावेर तालुका खरेदी विक्री संघ तसेच रावेर पं.स. च्या माजी उपसभापती रेखाबाई चौधरी यांचे पती राजेंद्र पंढरीनाथ चौधरी यांच्या तर्फे गरजूंना जीवनावश्यक किरणा साहित्य वितरीत करण्यात आले. 
तेल, साखर, चहा पावडर, मीठ, तूर डाळ, मुग डाळ, कांदे, मिरची पावडर, साबण आदी जीवनावश्यक किराणा साहित्याची पिशवी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार संजय तायडे, सर्कल टोंगळे, सरपंच व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी, उपसरपंच विनोद चौधरी, तलाठी राजेंद्र झामरे, ग्रामसेवक एच. डी. शिरसाठ, आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
श्री. चौधरी यांच्या या सामाजिक कार्याबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत असून गोर गरिबांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.सदरहू उपक्रम  स्वतः तहान भूक विसरून प्रांत डॉक्टर श्री अजित थोरबोले साहेब तहसीलदार उषाराणी देवगुणे व त्यांचे सहकारी मान्यवर व्यक्ती कडून गरजू लोकांना मदत करीत आहेत त्याबद्दल त्यांचे ही सर्वत्र कौतुक अभिनंदन होतं आहे तरुण तडफदार टीम चे प्रमुख श्री प्रशांत बोरकर यांनी त्यांचे खास अभिनंदन करीत आहे

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज गृहमंत्री अनिल. देशमुख साहेबांनी जिल्हा दौरा करत आढावा घेतला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या केसेस रोखण्यासाठी,  सोशल डिस्टनसिंग व लॉकडाऊनच्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस प्रशासनाला कडक सूचना करत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज गृहमंत्री अनिल. देशमुख साहेबांनी जिल्हा दौरा करत आढावा घेतला. परिस्थितीनुरूप प्रशासनाला योग्य सूचना देऊन सामान्य नागरिकांनाही प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. सोबत उपस्थित पालकमंत्री गुलाबाराव पाटील जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील महानगर अध्यक्ष अभिषेक दादा पाटील

#HomeMinisterInJalgaon♥️

Sunday, April 26, 2020

* जळगावजिल्ह्यात आजपासून तोंडाला मास्क लावणे सक्तीचे* *नाहीतर होणार पाचशे रुपये दंड**जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे*


जळगाव, (जिमाका) ता. 26: जिल्ह्यात वाढलेले  कोरोना बाधित रुग्ण पाहता जिल्ह्यात प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे, मास्क न लावल्यास पाचशे रुपये दंड करण्यात येईल, 
असा इशारा आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला . 

जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
  
बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील चार रुग्णांचे कोरोणा संसर्ग तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क  अथवा स्वच्छ धुतलेला रुमाल बांधणे बंधनकारक आहे.

त्याचबरोबर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे आवश्यक आहे.
जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी जाताना दुकानाबाहेर सोशल डिस्टन्सिंचे   पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक दुकानाच्या बाहेर सोशल डिस्टन्ससिंग पाळण्यासाठी आवश्यक ते चौकोन आखून देणे आवश्यक आहे. ज्या दुकानाच्या बाहेर सोशल डिस्टन्सिग पाळले जात नसल्याचे निदर्शनास आल्यास त्या दुकानदारावर ही कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये. त्याचबरोबर आवश्यकता असेल त्यावेळी बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. तसेच जे नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करतील वाहनावर दुचाकीवरून फिरतील त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
 त्यांच्या दुचाकी जप्त करण्याची मोहीम जिल्ह्यात अधिक गतीने राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ.  पंजाबराव उगले यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोना बाधित जे रुग्ण आढळलेले आहे ते रुग्ण बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोणाची बाधा झालेली आहे ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या गावात कोणी बाहेरगावावरून आलेली व्यक्ती आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावे. त्याचबरोबर ज्या नागरिकांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील त्यांनी तात्काळ त्यांची तपासणी करून घ्यावी.

जिल्ह्यात अमळनेर व भुसावळ येथील रुग्ण आढळून आल्याने या तालुक्यातील नागरिकांनी अधिक सजग राहून लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करावेत.असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

देशभरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉक डाऊन  जाहीर करण्यात आला आहे. परंतु काही नागरिक लॉक डाऊनचे पालन करीत नसल्याचे आढळून येत आहे. अशा नागरिकांवर आवश्यक ती कारवाई पोलीस विभागामार्फत करण्यात येणार आहे. तेव्हा सर्व नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. त्याचबरोबर कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.
=======

गाव ठरवतील ते मग राव ही घाबरतील,🌈🌈पोलिस पाटील व सरपंच यांनी पुढाकार घेऊन कोरोना जनजागृती समितीत काम करण्यास स्वत: हुन ईच्छुक लोकांना स्वयंसेवक ग्राम सुरक्षा दल स्थापन

आजची तरुण तडफदार विशेष बातमी,  
रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथे आजुबाजूच्या गावातील लोकांची संख्या सकाळ संध्याकाळ वर्दळ वाढली होती तरी पोलीस यंत्रणा मनुष्यबळ कमी असल्याने गावातील लोकांनी एक दृढ निच्चय करुन व सदर गावचे समिती अध्यक्ष सरपंच सौ.नुरजान तडवी, सदस्य/सचिव पोलीस पाटील श्री रईस तडवी, यांनी पुढाकार घेऊन कोरोना जनजागृती समितीत काम करण्यास स्वत: हुन ईच्छुक लोकांना स्वयंसेवक ( ग्राम सुरक्षा दल ) स्थापन करण्यात आले. व त्या स्वयंसेवकांना त्यांच्या वेळेनुसार दिवसातुन सकाळी ६ ते १० , १० ते २, २ ते ६ , व ६ ते १० अशा चार भाग करुन त्यांना  प्रत्येकी पाच व्यक्ती विभाजन करुन गावाच्या बाहेर बसविण्यात आले व तेथे स्वत: पो.पा.रईस जाफर तडवी पहारा देऊन सकाळ ते रात्री पर्यंत देत असुन समिती सदस्य आरोग्य सेवक श्री सरफराज तडवी , व ग्रां.पं.सदस्य श्री मुबारक तडवी सर तसेच कुसुंबा बुदृक सरपंच श्री सलीम तडवी व पो.पा.असलम तडवी यांचाही सहकार्य आम्हाला मिळत असुन जनु आज अस वाटत आहे कि, गाव करेल ते राव काय करेल ही म्हण प्रत्यक्षात स्पष्टपणे दिसत आहे..l

Saturday, April 25, 2020

सोन्या सारख दातृत्व ,स्वत:च्या मालकीची जमीन २५ लाखांना विकून त्या दोघांनी हजारो गरिबांना केली मदत______वायरल मॅसेज_____________________________



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशामधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा केली. २५ मार्चपासून सुरु झालेला हा लॉकडाउन १४ एप्रिल रोजी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र या लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर कर्नाटकमधील कोलार येथील दोन भावांनी स्वत:च्या मालकीचा जमीनीचा तुकडा विकला. शहरामधील आपल्या मालकीची जमीन या भावांनी २५ लाखांना विकली. आता लॉकडाउनचा याच्याशी काय संबंध असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. तर लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या हातावर पोट असणाऱ्या कामगारांना मदत करण्यासाठी पैसे उभारण्याच्या दृष्टीने तजामुल आणि मुझमील पाशा या दोन भावांनी आपल्या मालकीचा जमीनीचा तुकडा विकला.
कोलारमधील हाऊसिंग बोर्ड कॉलिनीमध्ये राहणाऱ्या या दोन्ही भावांनी मिळालेल्या पैश्यामध्ये गरिबांसाठी किराणा माल आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची खरेदी केली आणि त्याचे वाटप सुरु केले. “कोरोना विरुद्ध लढायचे असेल तर आयसोलेशन महत्वाचे आहे. गरिबांना जेवायला अन्न मिळालं नाही तर ते रस्त्यावर भटकत राहणार. त्यामुळेच त्यांनी घरामध्येच रहावे असं वाटतं असेल तर त्यांना किराणा माल आणि अन्न त्यांच्या घरी पोहचवणे हा एकच पर्याय आहे,” असं तजामुल पाशा याने   बोलताना सांगितलं.जिल्ह्यातील चिंतामणी तालुक्यामध्ये असणाऱ्या मोहम्मदपूर गावाचे मूळ रहिवाशी असणाऱ्या या दोघा भावंडांवरील पालकांचे छत्र लहानपणीच हरवले. तजामुल आठ वर्षांचा असताना आणि मुझमील पाच वर्षांचा असताना त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं. नंतर ते त्यांच्या आजीबरोबर कोलारमध्ये स्थायिक झाले.
गरिबीमुळे त्यांना चौथीपर्यंतच शिकता आलं. पैसे कमवण्याची जबाबदारी लहानपणीच अंगावर पडल्याने त्यांना पुढील शिक्षण घेता आलं नाही. “एका मुस्लीम व्यक्तीने आम्हाला मशीदीजवळ रहायला घर दिलं. त्या काळात तेथील हिंदू, मुस्लीम आणि शीख कुटुंबांनी अन्न देऊन आमची भूक भागवली. तेथील लोकांमध्ये धर्म आणि जात कधीच आडवी आली नाही. मानवता आणि प्रेम मिळाल्यानेच आम्ही खडतर परिस्थीतीमधून इथपर्यंतचा प्रवास करु शकतो आणि आज आम्ही परतफेड करत आहोत. अशा परिस्थितीमधून आल्याने अन्नाची किंमत काय असते हे आम्हाला ठाऊक आहे. लहानपणी आलेल्या या अनुभवामुळेच आम्ही लॉकडाउन संपेपर्यंत गरिबांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं तजामुल सांगतो.
१४ हजार गरिबांना केली मदत -

जमीन विकून हातामध्ये २५ लाख रुपये आल्यानंतर पाशा बंधूंनी जवळच्या मित्रांना सोबत घेऊन एक पुरवठा साखळी तयार केली. यामध्ये सर्व धर्माच्या व्यक्तींचा समावेश आहे हे विशेष. मोठ्या प्रमाणात किराणा माल खरेदी करुन तो पाशा बंधूंनी त्यांच्या घरात साठवून ठेवला. त्यानंतर त्यांची त्याची पाकिटं तयार केली. एका पाकिटामध्ये १० किलो तांदूळ, एक किलो पीठ, दोन किलो गहू, एक किलो साखर, खाद्यतेल, चहा पावडर, मसाले, सॅनिटायझर, मास्क या गोष्टींचा समावेश त्यांनी केला. त्यानंतर उरलेल्या धान्याचा वापर करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या घराजवळच रिकाम्या जागेवर एक तंबू उभारला आणि त्यामध्ये कम्युनिटी किचन सुरु केले. ज्या लोकांना घरी जेवण बनवणं शक्य नाही त्यांना या माध्यमातून जेवण पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. पाशा बंधूंबरोबर काम करणाऱ्यांना काही स्वयंसेवकांना पोलिसांनी विशेष पास दिले आहेत. त्यामुळे एकाद्या ठिकाणी अत्यावश्यक वस्तू पोहचवण्यासाठी दुचाकीवरुन जाणे शक्य झालं आहे. गरिबाच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला जेवण मिळावे हे पाशा बंधूंचे मुख्य हेतू आहे.
आतापर्यंत पाशा बंधूंनी २ हजार ८०० कुटुंबांना किराणा मालाचं वाटप केलं आहे. याचा फायदा १२ हजार लोकांना झाला आहे. तर कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दोन हजार लोकांचे पोट त्यांनी भरलं आहे. आता पाशा बंधूंनी त्यांच्यासारखे काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना सोबत घेऊन हे काम सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे.
“सरकार लॉकडाउन वाढवेल याची आम्हाला कल्पना नव्हती. आम्हाला जे शक्य आहे ते आम्ही केलं. देवाच्या कृपेने आमच्याकडे जे होतं ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. लॉकडाउन संपेपर्यंत आम्ही ही मदत सुरु ठेवणार आहोत,” असं तजामुल सांगतो.

Friday, April 24, 2020

अरे व्वा! दहावीच्या विद्यार्थ्याचे. युरेका संशोधन तेही कोरोनाचा संसर्ग रोखणारे आविष्कार,,,मास्क आणि रिस्ट्ट वॉच,,

विरार : जगभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असल्याने त्यावर उपाय शोधण्याचे काम युद्ध पातळीवर विविध देशातील संशोधक करत आहेत. विरार येथील शालेय विद्यार्थी हर्ष चौधरी याने व्हेंटिलेटेड मास्क तयार करून अनेकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तरुण तडफदार टीम तर्फे हर्ष व त्यांच्या कुटंबियांसाठी खास अभिनंदन 🌈🌈🙏👍
 मास्क बरोबरच त्याने चेहऱ्यावर स्पर्श रोखणारे रिस्ट बँड हि तयार केला आहे. त्याच्या ह्या संशोधनाचा फायदा पोलिस, नर्स, डॉक्टर आणि दवाखान्यात काम करणाऱ्या कामगारांना होणार आहे.विरार मधील नॅशनल इंग्लिश स्कुल मध्ये दहावीत शिकणाऱ्या हर्ष चौधरीच्या एका प्रयोगाची दखल खुद्द नासा नेही घेतली होती. हर्ष याला वडिलांनी त्याच्या साठी घरात प्रयोग शाळाच सुरु करून दिली आहे. हर्षने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वर संशोधन सुरु केले,तोंडावर असलेल्या मास्कमधून  थुंकी उडत असते तसेच उन्हामुळे गर्मी देखिल होत असते. म्हणून त्याने व्हेंटिलेटेड मास्क तयार केला आहे. हा मास्क सर्जिकल मास्क पासून बनवला जातो. तसेच मास्क थोडा फुगीर पद्धतीचा आणि नाकाच्या वरच्या बाजूने हवा तसा क्लिप द्वारे लावता येतो. मास्कच्या दर्शनी भागात कुलिंग फॅन लावला जातो. आणि या फॅनद्वारे आतल्या फुगीर भागात पंख्यातून आत बसवलेल्या छोट्या फिल्टर द्वारे ताजी हावा खेळती राहते. हा पंखा ठराविक काळानंतर स्वतः चालू बंद होऊ शकतो.सध्या हा एक मास्क 150 रुपयांना पडतोयाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यास त्याची किंमत कमी होणार असल्याचे हर्ष चौधरी यांनी शी बोलताना सांगितले. त्याचे संशोधन उपयोगी असले तरी त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यास त्याला अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे या मास्कच्या निर्मितीला शासनाची मदत मिळाल्यास मोठ्या प्रमाणात मास्कची निर्मीती केली जाऊ शकते असे हर्ष म्हणाला. असा आहे रिस्ट बॅंड
हर्ष याना चेहऱ्याला स्पर्श करण्यापासून रोखणारा रिस्ट बँड तयार केला आहे. हा रिस्ट बँड घातल्यानंतर आपण सातत्याने चेहऱ्याला होणार स्पर्श रोखू शकतो. या बँड मध्ये त्याने व्हायब्रेशन आणि बझर लावला आहे. त्यामुळे आपला हात चेहऱ्या जवळ गेल्यास त्यातून आवाज येतो. त्यामुळे आपण सावध होतो. हा बँड बनविण्यासाठी हर्ष याला 70 रुपये खर्च येत आहे.
Class X student research to prevent Corona spread

वायरल मॅसेज,,,एक माणुस ...रात्री अकरा वाजता एक ट्रक पाठवतो. त्या ट्रक मध्ये लहान लहान 2 किलोचे आटा पॉकेट होते त्यात पंधरा हजार रुपये,,,🌈🌈🙏🙏⛹️⛹️

एक माणुस ...रात्री  अकरा वाजता एक ट्रक पाठवतो. त्या ट्रक मध्ये लहान लहान 2 किलोचे आटा पॉकेट होते.  मुंबई मध्ये काही लोक झोपडपट्टी गरीब भागात फिरून लोकाना बोलवत होते, या ज्याला गरज आहे त्यानी 2 किलो आटा घेऊन जा ज्याना गरज होती त्यानी नेले.
घरी जावून ते आटा उघडतात तर त्यात 15000.. हजार रुपये निघतात.
      दान करावे तर असे, रात्रीची वेळ ज्याला खरच गरज होती तो आला 15000... हजार रुपये घेऊन गेला.
ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे ते आट्यासाठी आले. हेच आव्हान पैशासाठी असते तर गरजवंत दिसला नसता तर पैशाचा लोभी दिसला असता.अमीर खानच्या या दातृत्वाने खरा भुकेला शोधला गेला.
हा तोच अमीर खान....... 
 अमीर तुज्या कार्याला सलाम...... !♥️♥️♥️
#अमीर_खान 
#शोध_खऱ्या_भूकेल्याचा
#लढा_कोरोनाशी 
#लढा_द्वेषाशी

#गरिबीची_जाणिव_असलेला_अमीर 

#जहाँपन्हा_तुस्सी_ग्रेट_हो_तोहफा_कबुल_करो ...

Thursday, April 23, 2020

जेव्हा तुम्ही दुस-याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील

एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता.

त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला.

“ये तुला प्रत्यक्ष दाखवतो.”
देव म्हणाला.
 
त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं.

त्याने पहिला दरवाजा ढकलला.एका मोठ्या खोलीत प्रवेश केला.

एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती.

टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं.

त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं.

पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी भुकेलेली दिसत होती.
त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.

त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.

कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता
चमचा तोंडा पर्यंत पोहचतच नव्हता
त्यांच्या यातनांना अंत नव्हता.

भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते.

“हा नरक आहे...”देव म्हणाला.

“चल आता स्वर्ग पाहू.

”ते दुस-या दारातून आत आले.

ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती.

तेच टेबल तेच खिरीचं भांडं.

भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे.

पण ही सगळी माणसे तृप्त
समाधानी व आनंदी दिसत होती.

आपापसात हसत आनंदाने राहत होती.

“मला कळत नाहीये”
संत म्हणाला,”सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दु:खी का??
“सोपं आहे...”देव म्हणाला
" लांब दांड्याच्या चमच्याने स्वतः खाता आले नाही तरी दुसऱ्याला भरवता येते
या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत "

हावरट मनुष्य फक्त स्वत:चा विचार करतो”

जेव्हा तुम्ही दुस-याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील... 
 नेटवर्क मार्केटिंग ही असेच आहे आपण एकमेकांना मदत करण्याची भूमिका घेतली तर त्यांचे बरोबर  आपणास ही फायदा होत असतो,,, 

सुंदर बोधकथा ....कशी वाटली नक्की कळवा  अश्याच काही  वायरल कथा पाठवा व नवीन माहितीसाठी संपर्क साधावा
🙏🙏प्रशांत बोरकर नेटवर्क मार्केटिंग  मीडिया हाऊस
8208361187🙏🌈🌈🌈🌳🌳☀️👍⛹️⛹️


सप्रेम नमस्कार. 🌹🙏

परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडा' - उप मुख्यमंत्री श्रीअजित पवार

मुंबई,

केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत ३ मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर बांधव आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची आणि त्यामुळे गर्दी उसळून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने मुंबई आणि पुणे येथून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात तसेच त्यासाठीचे नियोजन आधीच करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.
. राज्य शासनातर्फे त्यांच्यासाठी शिबिरव्यवस्था केली असून त्यांना निवास, भोजन, आरोग्यसेवा पुरवण्यात येत आहे. राज्यशासनाच्या शिबिरांमध्ये आजमितीस साडेसहा लाख मजूरबांधव राहत आहेत. स्वयंसेवी संस्थांद्वारेही तितक्याच मजूरांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

टाळेबंदीमुळे राज्यातील उद्योग, बांधकाम. सेवाक्षेत्र बंद असल्यामुळे या मजूरांच्या हाताला काम नाही. दीड महिन्यांपासून शिबिरात राहिल्यामुळे ही मंडळी आपापल्या घरी, कुटुंबात जाण्यास अधीर आहेत. पहिल्या देशव्यापी टाळेबंदी समाप्तीच्या दिवशी मुंबईतील वांद्रे परिसरात उसळलेली गर्दी त्याच अधीरतेचे उदाहरण आहे. रेल्वे मंत्रालयाने सदर वस्तुस्थितीचा विचार करुन केंद्र सरकारतर्फे लागू टाळेबंदीची मुदत ३ मे रोजी किंवा केंद्राने ठरविल्याप्रमाणे टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर, ज्यावेळी रेल्वेसेवा सुरु होतील तेव्हा महाराष्ट्रातील परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी, मुंबई व पुणे येथून विशेष रेल्वेगाड्या सोडल्यास, या मजुरांना सुरक्षित घरी जाता येईल तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका टाळता येईल.
राज्यशासन आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे करण्यात आली आहे ती यापुढेही निश्चितपणे करण्यात येईल. परंतु, जे मजूर आपापल्या गावी परतण्यास अधीर आहेत ते टाळेबंदी संपल्यानंतर मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. या शक्यता गृहित धरुन रेल्वेमंत्रालयाने मुंबई व पुणे येथून, या परप्रांतीय मजूरांना त्यांच्या गावी घेऊन जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन पुरेसा कालावधी शिल्लक असतानाच करावे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Wednesday, April 22, 2020

सौ.मंगला भास्कर महाले* यांना *भावपूर्ण श्रद्धांजली !*

*सौ.मंगला भास्कर महाले* 
              यांना 
*भावपूर्ण श्रद्धांजली !*

           ◆◆🌸◆🌸◆◆
● *शोकाकुल :*
• *समस्त निंभोरा ग्रामस्थ व मित्रपरिवार  पत्रकार रावेर  यावल तालुका
       =====🌸=====
             *निधन वार्ता*
*सौ.मंगला भास्कर महाले*
*निंभोरा-* येथील माजी पत्रकार  भास्कर दौलत महाले यांची पत्नी *सौ.मंगला भास्कर महाले* 
वय ५५ वर्ष (ह.मु. फैजपूर ता.यावल) यांचे दुर्दैवी निधन झाले.त्यांच्यवर अंत्यसंस्कार आज, २२/०४/२०२० दुपारी ठीक २:३० वाजता निंभोरा बु।। येथे करण्यात येणार आहे.

*अत्यंत दुःखद असे की परवा सायंकाळी त्यांचे चिरंजीव सुधीर महाले यांचे अपघाती निधन झाले होते.* तरुण मुलाच्या अपघाती निधनाचा धसका घेऊन सौ.मंगलाकाकू यांचे दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण निंभोरा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Tuesday, April 21, 2020

इकडे तिकडे अडकलेल्या लोकांना मदत करा मानसिक उभारी देत जा,,, चांगले दिवस नक्की येतील,, त्यासाठी थोड पुण्याचं काम म्हणजे एकमेकांना मदत करा,,,,🙏🙏


 जे नातेवाईक मित्रमंडळी अडकली आहेत त्यांनी सरकार कडे email पाठवा  सरकार आपल्या परीने प्रयत्न करीत आहे,,, पण घाबरून न जाता संयम ठेवा,ही एक परीक्षा ची घडी आहे असे समजा की bigbos चे घरात आहोत,, आपल्या नातेवाईक  मुलाकडे लष्य  ध्या त्यांचे शी  बोलत रहा त्यांना. हसवत ठेवा,,आताची मुले खूप हुशार आहेत पण खूप हळवी आहेत, स्वाभिमानी आहेत,, म्हणून ते कोणाला मदत मागत नाहीत,,त्याकरता थोडे स्वतः हुन न मदत करता मित्रांकडून बा कमी स्वस्त शीवभोजण उपलब्ध करून द्यावे कृपया तेथे कोणतेही  फोटो बाजी करू नये,,  व्यापारी उद्योजक यांनी यावेळी कमी नफा घेवून विक्री करावी,,मानवता धर्म ठेवलात तर माणूस जगेल,, कोणताही भेदभाव न करता जवळच्या गावातल्या लोकांना मदत करा,,, तरुण मुलांना त्यांच्या मनात काहूर माजले असेल भविष्याबद्दल तर त्यांना समजावून सांगा की हे दिवस नक्की जातील चांगले दिवस येतील कोणीही आत्त्तयी पना करू नका आपला आत्मा तृप्त  हा दुसऱ्याला शांती समाधान दिल्यानेच मिळणार आहे या वेळी कोणताही पक्ष जात धर्म भाषा  भेदभाव न करता त्याग  करून मदत करणे संयमी शांतता वादी अहिंसा सत्य सनदशीर मार्गाने आपण जगा आणि  दुसऱ्यांना जगू द्यावे,तरच मानव जात शिल्लक राहील नाहीतर कोरोणा अगोदर दूसरी कारणे वेगवेगळी रूपे आहेत त्यामुळे जनतेने सुद्धा आता आपल सद स द विवेक विचार ठेवून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ,, मदत करणे माणूसकी आपले पंथ,,🙏🙏
प्रशांत बोरकर ,,21/042020

*AIIEA (विमा कर्मचारी संघटना) तर्फे करोना मुख्यमंत्री निधीसाठी रु. 5,55,555/- एवढ्या रकमेची मदत महाराष्ट्राचे परिवहनमंत्री मा.श्री अनिल परब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मुंबईचे मा. महापौर श्री वि. महाडेश्वर हेही उपस्थित होते.संघटनेतर्फे कॉ.संजयकुमार, उपाध्यक्ष WZIE कॉ.प्रशांत वाईरकर. बिमा कर्मचारी संघटने तर्फे मुख्यमंत्री निधी साठी मदत दिल्याबद्दल विमा ग्राहक व प्रतिनिधी समिती तर्फे तरुण तडफदार न्युज टीम तर्फे खास अभिनंदन,,,🙏🙏🌈प्रशांत बोरकर संपादक 8208361187

मुंबई एलआयसी*AIIEA (विमा कर्मचारी संघटना) तर्फे करोना मुख्यमंत्री निधीसाठी रु. 5,55,555/- एवढ्या रकमेची मदत महाराष्ट्राचे परिवहनमंत्री मा.श्री  अनिल परब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. मुंबईचे मा. महापौर श्री वि. महाडेश्वर हेही उपस्थित होते.संघटनेतर्फे कॉ.संजयकुमार, उपाध्यक्ष WZIE कॉ.प्रशांत वाईरकर.

Monday, April 20, 2020

जमेल ती मदत करण्याचे ना.गुलाबराव पाटील यांचे आवाहनवर जळगाव बाजार समितीतर्फे कोरोनग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत**



*जळगाव दि. 20  प्रतिनिधी : -  राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये येथील जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ५ लाख लाखांची मदत जाहीर केली. आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्त करण्यात आला.*

प्रत्येकाने आपल्या आर्थिक कुवतीनुसार कोरोनाग्रस्तांसाठी जमेल तशी मदत करून खारीचा वाटा उचलावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील जळगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केले. कृउबा सभापती कैलास चौधरी  व संचालक मंडळ यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ लाख रुपयांचा धनादेश नुकताच सुपूर्द केला.  शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीने ५ लाखाचा निधी दिल्याने पालकमंत्री या नात्याने ना. गुलाबराव पाटील यांनी आभार मानले आणि  दानशुर व्यक्ती व संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जमेल ती मदत करावी असेही आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

यावेळी कृ.उ.बा. समितीचे सभापती कैलास चौधरी, उपसभापती सुरेश पाटील, संचालक पंकज पाटील, भरत बोरसे, अनिल भोळे, वसंत भालेराव, मनोहर पाटील, प्रविण भंगाळे, संतोष नारखेडे, मुरलीधर पाटील, मच्छींद्र पाटील, प्रशांत पाटील, नवलसिंगराजे पाटील आदी उपस्थित होते.

Saturday, April 18, 2020

कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर**महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रावर कार्यरत* *कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व 25 लाखाचे विमा संरक्षण**पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती*

कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर*
Qq*महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रावर कार्यरत* 
*कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व 25 लाखाचे विमा संरक्षण*
*पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती*
   *मुंबई दि.18* : -  राज्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. केंद्र शासनाने कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तसेच राज्याच्या ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर पाणीपुरवठा विभागाने हा निर्णय  घेतला आहे 

     या निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रावर कार्यालयात असणारे व अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असणारे व गट क आणि गट-ड मधील नियमित कर्मचारी, रुपांतरित आस्थापनेवरील कर्मचारी तसेच प्राधिकरणाअंतर्गत जे कर्मचारी अद्यापही कार्यरत आहेत असे  कंत्राटी कर्मचारी अशा सर्वांना  90 दिवसाच्या कालावधीकरिता प्रत्येकी 1 हजार  रुपये इतका प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार असून 25 लाख रुपयांचे विमा संरक्षणही देण्यात येणार आहे. राज्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील  पाणीपुरवठा केंद्रावरील सुमारे 2 हजार 800 कर्मचाऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे असे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

   महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील एकूण 50 पाणीपुरवठा केंद्रामार्फत ग्रामीण तसेच शहरी भागात किरकोळ व ठोक पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची संबंधित गळती थांबवणे, पंप चालू करणे , व्हॉल्व उघडणे व बंद करणे ,मिटर रिडींग घेणे, बिले वाटणे ,वसुली करणे, जलशुद्धीकरण केंद्रावरील आवश्यक कामे करणे इत्यादी प्रकारचे काम अहोरात्र केले जात आहे. त्यांचे काम हे अत्यावश्यक सेवेत येते. त्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर भत्ता तसेच विमा संरक्षण  देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व यासंबंधीचा शासन निर्णयही आज जारी करण्यात आला आहे अशी माहितीही पाणीपुरवठा  मंत्र्यांनी यावेळी दिली.

          00000

वायरल मेसेज,,*सिप्ला चे जनक ए.के.हमीद यांचे संशोधनाने आज जगाला व भारताला तारले.....*🙏🙏🙏


*✨हेच कारण आहे ज्यामुळे आजही अमेरिकेला भारतापुढे औषधासाठी हात पसरावे लागते.*

*सध्या एकच विषय चर्चेचा आहे, जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाशी कस लढायचं ? अजूनही या संसर्गजन्य रोगावर इलाज सापडलेला नाही.*
*चीनपासून अमेरिकेपर्यंत सर्वत्र हजारो लोक या रोगाने मेले आहेत. रोज लाखो रुग्ण सापडत आहेत.*

*या रोगावर सध्याचा इलाज असलेलं हायड्रोक्सीक्लोरोक्वीन चा पुरवठा भारताने अमेरिकेला करावा म्हणून तिथले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकप्रकारे धमकीच दिलेली आहे.*

*आपल्या पैकी अनेकांना प्रश्न पडतो की हे औषध जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत उपलब्ध नाही पण भारतात उपलब्ध आहे, हे कसं काय ?*

*याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जावे लागेल 1924 मध्ये.*
*पारतंत्र्याचा काळ.*

 *सरकारी नोकरीत असलेल्या सुखवस्तू कुटुंबातील एक मुलगा शिकून बॅरिस्टर बनवण्यासाठी फॉरेनला निघाला होता.*

*त्याला इंग्लंडला पाठवण्याच स्वप्न वडिलांनी पाहिलेलं. पैसे जमवले.*

*पण पोराला रसायनशास्त्रात रस होता. वडिलांनी इंग्लंडला जाणाऱ्या जहाजात याला बसवलं पण पठ्ठ्याने नकळत जहाज बदललं आणि पोहचला जर्मनीला.*

*त्या बंडखोर मुलाचं नाव होतं, ख्वाजा अब्दुल हमीद म्हणजेच "के.ए.हमीद".*

*जर्मनी त्याकाळी केमिकल इंडस्ट्रीमध्ये सर्वात आघाडीवर होती. रसायनशास्त्रातील जगभरातील सर्वोत्तम शिक्षण , संशोधन तिथे चालत होते. के.ए.हमीद यांनी बर्लिनच्या हंबोल्ट विद्यापीठात प्रवेश मिळवला.* *फार्मासिटीकल मध्ये उच्च पदवी मिळवली.*

*याच काळात ते तिथल्याच एका मुलीच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्न देखील केलं. ती ज्यू होती आणि कम्युनिस्ट विचारांची होती.*

*पण याच काळात जर्मनीमध्ये हिटलर चा उदय झाला होता.*
*कट्टर वंशवादी असलेल्या हिटलरचा ज्यू आणि कम्युनिस्ट या दोन्ही लोकांवर प्रचंड राग होता. हळूहळू हिटलरने जर्मनीची सत्ता काबीज केली आणि ज्यूंचा सर्व नाश सुरू केला.*

*के.ए. हमीद यांनी आपल्या बायकोमुलांसह भारतात पळून येण्यात यशस्वी झाले पण त्यांचे सासू सासरे मात्र नाझी छळछावणीचे बळी ठरले.*

*भारतात के.ए.हमीद हे औषध कंपनी निर्मितीसाठी हातपाय मारत होते. आपल्या पत्नीच्या मदतीने त्यांनी मुंबईत एका औषध कंपनीची स्थापना केली होती, तीच नाव.*

*केमिकल,इंडस्ट्रीयल,फार्मासिटीकल लॅबोरेटरी उर्फ "सिप्ला".*
*"सिप्ला" ची स्थापना 1935 साली झाली.* *त्याच भांडवल होत 2 लाख रुपये. दोनच वर्षात त्यांनी कारखाना टाकून स्वतःची औषधनिर्मिती सुरू केली.*

*भारतात अजून शेकडो गावात गावठी औषधे हाच सहारा होता त्याकाळात सिप्लामध्ये जागतिक दर्जाची अत्याधुनिक औषध निर्मिती करण्यास सुरुवात झाली.*

*के.ए.हमीद फक्त भारतातच नाहीत तर जगभरात औषधशास्त्राचे स्कॉलर समजले जात होते. अनेक विद्यापीठे त्यांना गेस्ट लेक्चरर म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवत. मुंबई विद्यापीठ, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, इंग्लंडची रॉयल केमिकल सोसायटी येथे मानाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.*

*भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी त्यांचा जवळून संबंध आला. विशेषतः महात्मा गांधींना ते आपले गुरू मानायचे. कॉलेजमध्ये असतानाच असहकार आंदोलनात सहभाग घेतला म्हणून त्यांना जेल झाली होती. गांधीजींच्या प्रभावामुळे नफ्यापेक्षा आपली औषधे अगदी गरीबातील गरीब व्यक्तीला वाजवी दरात मिळेल याची काळजी हमीद घ्यायचे.*

*खुद्द महात्मा गांधींनी त्यांच्या कारखान्याला भेट दिली होती.*
*मुस्लिम लीगने त्यांना अनेकदा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला पण हमीद यांचा धर्मधारीत राजकारणाचा तिटकारा असल्यामुळे त्यांनी मोहम्मद अली जिना यांना नकार कळवला. याच कारणामुळे ते फाळणीनंतर पाकिस्तानात गेले नाहीत तर भारतात थांबून नवंराष्ट्र निर्मितीमध्ये साहाय्य केले.*
*राष्ट्रपातळीवर रसायनशास्त्राच्या मूलभूत संशोधनासाठी त्यांनी पुण्यात नॅशनल केमिकल लॅबोरेटरी स्थापन करण्यास पुढाकार घेतला. कौंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्चची (CSIR) स्थापना सुद्धा त्यांनीच केली.*

*त्यांचा वारसा चालवला त्यांच्या मुलाने म्हणजेच "युसुफ हमीद" यांनी. युसूफ हमीद हे केंब्रिज विद्यापीठातील रसायनशास्त्रातील पीएचडी धारक. अगदी कमी वयात त्यांच्या खांद्यावर सिप्लाची जबाबदारी पडली. त्यांच्या वडिलांनी कंपनी चालवण्यासाठी त्यांना एकच सूत्र सांगितला होता. युसूफ, आपल्या औषधांचा वापर गोरगरिब जनतेला लुटण्यासाठी नाही तर त्यांना बरं करण्यासाठी करायचा आहे. हे आयुष्यभर लक्षात ठेव.*

*त्याकाळी ICI नावाच्या अमेरिकन औषध कंपनीने propranolol नावाचे उच्च रक्तदाबावरील औषध बनवले होते.* *पण हे औषध अतिशय महागड्या किंमतीचे होते. सर्वसामान्य भारतीयांना हे औषध परवडत नसे. युसूफ यांनी अभ्यास केल्यावर लक्षात आलं की हे औषध अतिशय कमी खर्चात बनू शकते. त्यांनी रिव्हर्स इंजिनियरिंग करून हे औषध बनवलं आणि सिप्ला मध्ये त्याची निर्मिती सुरू केली. पाश्चात्य औषध कंपन्याना याचा सुगावा लागल्यावर त्यांनी पेटंट कायद्याचा दाखला देऊन भारत सरकारवर दबाव आणण्यास सुरवात केली. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी युसुफ हमीद याना भेटायला बोलावले.*

*अवघ्या 34 वर्षांचे युसूफ हमीद यांनी इंदिराजींना स्पष्ट सांगितलं की, “करोडो भारतीयांच आयुष्य वाचवणारे औषध त्यांना मिळणे हा त्यांचा हक्क आहे. फक्त हे औषध बनवणारे महागडे प्रॉफिट कमवण्यासाठी त्यांना त्यापासून वंचीत ठेवू शकत नाहीत. “*

*इंदिरा गांधींना हे पटलं. त्यांनी अमेरिकेच्या दबावाला झुगारून दिले आणि भारतीय संसदेत पेटंट कायदा 1970 आणला. या कायद्यानुसार औषध आणि रसायनांवरील उत्पादन पेटंट्स रद्द करून फक्त प्रक्रिया पेटंट्स देऊ केली, सक्तीच्या परवान्याची तरतूद केली. याचाच परिणाम जगातील औषध कंपन्याच्या तुलनेत अगदी एक चतुर्थांश दरात भारतीयांना औषधे मिळू लागली. पुढे जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे भारत सरकारला आपल्या पेटंट कायद्यात बदल करावे लागले मात्र तेव्हा इंदिरा गांधींच्या धाडसी निर्णयामुळे फक्त सिप्लाच नाही तर भारतातील सर्व औषध कंपन्यांना फायदा झाला.*

*भारतात मेडिसिन इंडस्ट्री दमदारपणे उभी राहिली. म्हणूनच आजही आपल्याला कधी औषधांसाठी इतर देशावर अवलंबून राहावे लागत नाही आणि अमेरिकेला देखील कोरोना साठी भारतापुढे  हात पसरावे लागतात.आजही जगभरातील गरीब देशामध्ये एड्स सारख्या दुर्धर रोगावर सिप्ला अत्यन्त मामुली दरात औषधे पुरवते.*

*जगातील सर्व नफेखोर औषध कंपन्या त्यांना शत्रू मानतात पण प्रत्येक गरीब रुग्णासाठी युसूफ हमीद हे आधुनिक रॉबिनहूड आहेत. भारत सरकारने त्यांना "पद्मभूषण" पुरस्कार दिला आहे तर संयुक्त राष्ट्राने त्यांच्या कार्याची दखल घेऊन आरोग्य व तंत्रज्ञान मंडळावर त्यांची नियुक्ती केली आहे.*

*आता कोरोनाचे संकट आल्यावरही सिप्लाने त्यावर औषध शोधण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या काही दिवसात अतिशय कमी खर्चात त्यांनी कोरोनावरची लस शोधून काढली तर आश्चर्य वाटायला नको..….*
🙏🙏🙏

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...