Friday, April 17, 2020

शिवभक्त काव्यकार लघुचित्रपट निर्माते दिग्दर्शक श्री सुजय देसाई यांचे विचार,, कोरोना निम्मित जाहीर पत्र,

🙏धन्यवाद कोरोना   

तू आमचा भारत देश सोडून दूर  दूर 
अगदी दूर जात आहेस. 
 खूपच दूर......

तू दूर जात आहेस ........

आम्हा भारतीयांचे आत्मबल, एकात्मता आणि उत्तुंग  मनोधैर्य पाहून...

आपत्कालीन परिस्थिती आल्यावर सर्व भारतीय  आपापल्या जाती - धर्माना बाजूला ठेवून मानवता धर्माचे किती मनोभावे पालन करतात ते पाहून..

आपापसातील मतभेद विसरून प्रेम हेच शाश्वत मूल्य कसे जीवापाड जपतात ते पाहून..

प्रत्येकजण प्रत्येक क्षण परिवाराची समाजाची राज्यासह देशाचीही काळजी घेऊन निःस्वार्थी भावनेने जगत आहे   हे पाहून ...

   तसेच येथील  सर्वच धर्मातील आंणि    माणूसकी हाच खरा धर्म माननारे लहान बालकांपासून   ते  मोठे  लोक   अखंड विश्वासाठीच  अतिशय  तळमळीने  ,आकांताने आणि  प्रेमाने   अहोरात्र प्रार्थना करत आहेत ते पाहून...

आमच्यातील जागा असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन पाहून....
    नुसती  चिंता  न करता  अफवांवर  विश्वास  न  ठेवता  आत्मविश्वासाने  निरंतर   सकारात्मक चिंतन करताना  पाहून...

 राज्यशासनाने व केंद्र  शासनाने  वेळोवेळी   आमच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने दिलेल्या सुचनांचे आम्ही किती गंभीरपणे व राष्ट्रीय हित विचारात घेऊन काटेकोरपणे  पालन करत आहोत ते पाहून....

 या भारतातील  प्रशासन यंत्रणा, वैद्यकीय यंत्रणा, पोलिस यंत्रणा, सामाजिक संस्था तसेच सर्वांच्याच कर्तव्याची  सर्वोच्च , सर्वोत्तम आणि असीम त्यागाची  महान उंची पाहून...

 यासह  सर्व नातेसंबंधाना एकत्र आलेलं व करोडो  लोकांना हृदयापासून  स्नेहाने सुसंवाद साधताना पाहून...

प्रसंग पडला की ही भारतमातेची लेकरे सारा व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून  बाहेरून  आलेल्या  शत्रूचा  असो की रोगाचा  असो कशी हिंमतीने  सामना करतात ते पाहून...

ही भूमी शुर - वीरांची,  वीर मातांची,  थोर संतांची ,परम पुण्याईची, त्यागाची, सेवेची आणि  आशीर्वादांची आहे हे पाहून....


 तुला  धन्यवाद यासाठी 

तू करोडो लोकांना पुन्हा एक केलस..

आमच्यातील सुप्त शक्तींना जागृत केलस....

मुळातच असलेल्या  आमच्यातील मानवीय मुल्यांना आव्हान देऊन  जागृत  केलस...

आमच्यातील  स्वच्छतेच्या  चांगल्या सवयींकडे  पुन्हा गंभीरपणे   आरोग्याच्या   दृष्टीने  व डोळसपणे बघायला शिकवलस...
आणि हो कोरोना  ..
हे ही लक्षात ठेव तुझ्या येण्यानं आम्ही खूपच मोठा धडा घेतला आहे..
तुझ्या इतर पिलावळींना, भावंडांना  व मित्रांना खबरदार कर ..म्हणावं हे भारतीय लोक आहेत .
पुन्हा इकडे फिरकणे नाही...
ते आता सावध आहेत व नेहमीच राहतील...
आपल्या आरोग्याची अगदी नीट काळजी घेतील..
यांच्या वाटेला परत यायचं नाही म्हणून बजाव त्याना आताच..
खरच ..दूर जा कोरोना   ..
दूर जा..
या विश्वापासून  अगदी  दूर..
 माझ्या  सर्व भारतीयांच्यावतीने  तुला हे अखेचचं आणि   हवं तर समज   धमकीचे पत्र 
            एक भारतीय 
    सुजय सुंदरराव देसाई
    🙏🙏🏇
हे पत्र सर्वत्र  पोहोचवाल हा दृढ विश्वास आहे. ##
.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...