Tuesday, April 28, 2020

श्री दत्त छाया प्रतिष्ठान व राज कंस्ट्रक्शन तर्फे गरजूंना किराणा साहित्य तहसीलदार देवगणे यांच्या हस्ते वाटप


रावेर,,(विलास ताठे याज कडून)
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या संचारबंदी काळात रावेर तालुक्यातील खिरवड येथे श्री दत्त छाया प्रतिष्ठान व राज कंस्ट्रक्शन चे अध्यक्ष राजेंद्र पंढरीनाथ चौधरी यांच्या तर्फे गरजूंना जीवनावश्यक किरणा साहित्य तहसीलदार उशारणी देवगुणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
देशात कोरोनाचा संसर्गामुळे संचारबंदी सुरु आहे. उद्योग, व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे गोर बरीब जनता व मजुरांना रोजगार मिळत नसल्याने व त्यांचे जवळील जीवनावश्यक खाद्य सामग्रीही संपण्याच्या स्थितीत आहे. गोर गरिबांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांची चूल सतत पेटत रहावी तसेच शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत खिरवड येथील प्रतिष्ठीत शेतकरी, समाजसेवक, श्री दत्त छाया प्रतिष्ठान व श्री दत्तछाया तोल काटा व राज कंस्ट्रक्शन चे अध्यक्ष तथा माजी सरपंच ग्रा.पं. खिरवड, माजी चेअरमन रावेर तालुका खरेदी विक्री संघ तसेच रावेर पं.स. च्या माजी उपसभापती रेखाबाई चौधरी यांचे पती राजेंद्र पंढरीनाथ चौधरी यांच्या तर्फे गरजूंना जीवनावश्यक किरणा साहित्य वितरीत करण्यात आले. 
तेल, साखर, चहा पावडर, मीठ, तूर डाळ, मुग डाळ, कांदे, मिरची पावडर, साबण आदी जीवनावश्यक किराणा साहित्याची पिशवी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार संजय तायडे, सर्कल टोंगळे, सरपंच व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी, उपसरपंच विनोद चौधरी, तलाठी राजेंद्र झामरे, ग्रामसेवक एच. डी. शिरसाठ, आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
श्री. चौधरी यांच्या या सामाजिक कार्याबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत असून गोर गरिबांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.सदरहू उपक्रम  स्वतः तहान भूक विसरून प्रांत डॉक्टर श्री अजित थोरबोले साहेब तहसीलदार उषाराणी देवगुणे व त्यांचे सहकारी मान्यवर व्यक्ती कडून गरजू लोकांना मदत करीत आहेत त्याबद्दल त्यांचे ही सर्वत्र कौतुक अभिनंदन होतं आहे तरुण तडफदार टीम चे प्रमुख श्री प्रशांत बोरकर यांनी त्यांचे खास अभिनंदन करीत आहे

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...