Wednesday, April 15, 2020

रावेर येथे सफाई कामगार यांचा महिलांनी गौरव करून मानले आभार

रावेर येथे सफाई कामगार यांचा महिलांनी गौरव करून मानले आभार 
रावेर दि  प्रतिनिधी 
शहरात करोना विषाणू संचारबंदी सुरु असून नागरिक आपापल्या घरांमध्ये अडकून आहेत परंतु शहरातील सफाई करण्याचे काम करणारे कर्मचारी रस्त्यावर आपले आरोग्य धोक्यात टाकून फिरत आहेत त्यांचा जागृती महिला मंडळ पदाधिकारी यांनी गौरव करून त्यांचे आभार मानल्याने सफाई कामगार भारावले आहेत. 
रावेर नगरपालिके मधील सफाई कर्मचारी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सफाईचे काम अथक परिश्रमाने करीत असून त्यांचे देखील आरोग्य आहे परिवार आहे पण सर्वांच्या हितासाठी झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा जागृती महिला मंडळ तथा महिला दक्षता समिती अध्यक्षा श्रीमती कांता बोरा यांनी आपल्या सर्व सहकारी भगिनीसह सकाळी सकाळी कचरा उचलून रस्ते आणि गटारी सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करून औक्षण देखील केले आणि आभार मानले. यावेळी त्यांचे सोबत सौ अंकिता बोरा, कल्पना वाणी, सिंधू गाडे, मधुरा वाणी आदींसह मीठाराम महाजन, एकनाथ महाजन, अश्विन परदेशी, ह्रिदम बोरा, यश बोरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...