Sunday, April 5, 2020

पाच रुपयात भरपेट शिवभोजन,,,राज्यातील पहिल्या तालुकास्तरीय शिवभोजन थाळी केंद्राचेआमदार.चंद्रकांतभाऊ पाटील यांचे हस्ते उद्घाटन,, सर्वत्र मुख्यमंत्री यांचे स्वागत,,

राज्यातील पहिल्या तालुकास्तरीय शिवभोजन थाळी केंद्राचे मुक्ताईनगर येथे आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांचे हस्ते उद्घाटन...
शिवसेनेच्या वचननाम्यातील 10 रूपयांमध्ये जेवण हि शिवसेनेची महत्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजना आज महाराष्ट्रभर जिल्हा स्तरावर सुरु करण्यात आलेली आहे. तसेच गत अर्थसंकल्पिय अधिवेशनात या योजनेसाठी महाविकास आघाडी सरकारकडून भरीव निधीची तरतुद ही करण्यात आली. मात्र सध्या उद्भवलेल्या कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन झाल्याने  दररोज च्या मजुरीवर ज्यांची चूल पेटते त्यांना उपासमारी होवू नये तसेच गरजूंना व लाॅकडावून मुळे अडकलेल्या प्रवाश्यांना आधार मिळावा यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांनी या योजनेचा विस्तार तालुका स्तरावर करण्याचे आदेश दिले. हेच सूत्र पाहून कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे साकडे घालत ही योजना मुक्ताईनगर येथे सुरू करावी यासाठी पाठपुरावा सुरू केला.  त्यानुसार दि.31/03/2019 रोजी मा.पालकमंत्री गुलाबरावजी पाटील,  मा.जिल्हाधिकारी सो.,जळगाव, मा. जिल्हा नियोजन अधिकारी सो.,जळगाव., मा.तहसीलदार सो.,मुक्ताईनगर यांना पत्रव्यवहार करुन तसा प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानुसार त्याच दिवशी  मा. जिल्हा पुरवठा अधिकारी सो.जळगाव यांचे 150 थाळी केंद्राच्या मंजूरीचे पत्र मुक्ताईनगर तहसीलला प्राप्त झाले.
आज दि 5 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते राज्यातील तालुकास्तरावरील पहिल्याच शिवभोजन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला .
  प्रसंगी  पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे , गटविकास अधिकारी सुभाष मावळे , नगरपंचायत मुख्याधिकारी विक्रम जगदाळे , तालुका प्रमुख छोटू भोई , शहर प्रमुख गणेश टोंगे , गटनेता राजेंद्र हिवराळे , नगरसेवक संतोष मराठे , नगरसेविका सविता भलभले , स्विय सहाय्यक प्रवीण चौधरी , स्विय्य सहाय्यक संतोष कोळी , शिवभोजन केंद्र संचालक वसंत भलभले ,सलीम खान , जहीर शेख , जाफर अली, प्रमोद भारंबे , अर्जुन भोई , बाळा भालशंकर यांची उपस्थिती होती .
       10 रूपयांमध्ये दिले जाणारे शिवभोजन हे कोरोना पार्श्वभूमीवर शासन अनुदानावर केवळ 5 रुपयात  लाभार्थ्याना देण्याच्या सूचना शासनाने केल्या असून शासनाच्या आदेशाप्रमाणे लाभार्थ्यांना फक्त  5 रूपयांमध्ये शिवभोजन केंद्र मुक्ताईनगर येथे दिले जात आहे. लाभार्थ्यांची माहीती शासनाच्या ॲपवर अपलोड करावा लागत असल्याने लाभार्थ्यांमध्ये सोशल डिस्टनसिंग रहावी यासाठी केंद्रासमोर चौकटी आखण्यात आलेल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार या केंद्रातून पार्सल देण्यात येत आहे अशी माहिती शिवभोजन केंद्र संचालक वसंत भलभले यांनी दिली ."

     तरी गरजूंनी शिवभोजन थाळी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवर्तन चौक मुक्ताईनगर येथील शिवभोजन केंद्रात सकाळी 11ते  4 या वेळेत संपर्क साधून शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. चंद्रकांतभाऊ पाटील व शिवभोजन थाळी केंद्राचे संचालक वसंत भलभले यंनी केले आहे. 
जय महाराष्ट्र!..  ही माहिती तरुण तडफदार न्युज ला कोळी (आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांचे स्विय्य सहाय्यक) यांनी दिली 

1 comment:

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...