Friday, April 29, 2022

उष्णतेच्या क्षेत्रात रावेर चा पण समावेश आहे कृपया काळजी घ्यावी काम नसल्यास घरा बाहेर पडू नये ।।वाढत्या तापमान पाहता यावेळी तरी झाडे वाचवा झाडे लावा।।🦚🦚☘️☘️☘️🌱☘️सुयश बोरकर नेचर लव्हर क्लब🙏🔥🌞

उष्णतेच्या क्षेत्रात रावेर चा पण समावेश आहे कृपया काळजी घ्यावी 
काम नसल्यास घरा बाहेर पडू नये ।।
वाढत्या तापमान पाहता यावेळी तरी झाडे वाचवा झाडे लावा।।🦚🦚☘️☘️☘️🌱☘️
सुयश बोरकर नेचर लव्हर क्लब
🙏🔥🌞

Saturday, April 23, 2022

*पृथ्वी दिनी वसुंधरेची जोपासना करूया आणि अध्यात्मिक रूपे विकसित होऊया**- संत राजिंदर सिंह जी महाराज*


'पृथ्वी दिवस' हा आपल्या सर्वांकरिता पृथ्वीच्या प्रति आभार व्यक्त करण्याचा दिवस आहे. कारण की, ही पृथ्वी आपल्याला कित्येक प्रकारची प्राकृतिक संसाधनं उपलब्ध करून देते. ही सर्व संसाधनं केवळ आपल्या करिताच नव्हे तर, आपल्या पुढील येणाऱ्या पिढ्यांसाठी मौल्यवान आहेत. म्हणूनच आपण सर्वांनी या संसाधनांचा उपयोग फार काळजीपूर्वक केला पाहिजे.
   या संसाधनांचा सदुपयोग करण्यासाठी आणि धरणी मातेला सन्मान देण्याकरिता आपणास अहिंसेचा मार्ग स्वीकारावा लागेल. ज्यामध्ये आपल्या पृथ्वीवरील राहणाऱ्या सर्व जीवांचा आणि प्राकृतिक संसाधनांचा आपण प्रेमपूर्वक वापर केला पाहिजे. यामध्ये मानवापासून तर सर्व जनावरांपर्यंत वनस्पती तसेच झाडेझुडपे सम्मिलीत आहेत. केवळ असाच विचार केल्याने आपल्याला प्रसन्नता वाटते, या विशाल अंतरिक्षामध्ये पृथ्वी या ग्रहाला फार सुंदर रत्नाप्रमाणे बनविले आहे, ज्यामध्ये आपण सर्व एका परिवारातील सदस्यां प्रमाणे आहोत. म्हणून आपल्याला असे कार्य केले पाहिजे ज्यामध्ये आपण एकमेकांना परस्पर सहाय्य करून प्रेमाने आणि शांतीपूर्ण जीवन जगू शकू.
   या भूतलावर आपण रहात असतांना स्वस्थपणे आपले जीवन यापन करावे, जेणेकरून आपला परिवार आणि संपूर्ण विश्वभरात वर्तमान काळात पुढे येणाऱ्या भविष्यात सुद्धा ही संसाधनं भरपूर प्रमाणात उपलब्ध राहतील.
     याकरिता आपण या भूतलाचे संवर्धन करीत असताना शारीरिक, मानसिक आणि आत्मिकरित्या विकसित झाले पाहिजे. ज्याकरिता आपल्याला शाकाहारी भोजन पद्धती आपल्या जीवनात आणावी लागेल आणि त्याच बरोबर आपल्या आत्मिक उन्नतीकरिता जीवनामध्ये सदगुणांना धारण केले पाहिजे. ज्यामध्ये आपण दुसऱ्याची सेवा करून ध्यान-अभ्यासाद्वारे प्रभू सत्तेशी जोडले जाऊन, अध्यात्मिक रित्या विकसित होऊ शकतो.
   दुसऱ्यांची सेवा करणे आणि मिळून-मिसळून राहणे, हे आध्यात्मिकतेचे एक अंग आहे. इतरांबरोबर मिळून-मिसळून राहून, या पृथ्वीचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, कारण या सृष्टीतील कणाकणांमध्ये परमात्मा विद्यमान आहे.
    चला तर, अध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होत असतांना आपण या पृथ्वीवरील झाडे-झुडपे ,जनावरं आणि मानवांची काळजी करीत, आपण 'पृथ्वी दिवस' साजरा करूया आणि पृथ्वी कडून प्राप्त झालेल्या बहुमूल्य बक्षिसांचा सर्वोत्तम उपयोग करूया !

Wednesday, April 13, 2022

*बैसाखी निमित्त नवजीवनाचा संदेश**- संत राजिन्दर सिंह जी महाराज


वैशाख महिन्यात प्रकृतीच्या नियमानुसार झाडा-झुडपांना नवीन पालवी फुटू लागते. त्याच्यातूनच एका नवीन जीवनाची सुरुवात होते, तर आपण ही यावरून एक नवीन बोध घेतला पाहिजे कि आपल्या जीवनात नवीन विचारांचा अंकुर फुटावा आणि आपल्या जीवनाची नवीन सुरुवात व्हावी. आपल्या मनातील सर्व भेदभाव नष्ट व्हावेत. समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये बैसाखी म्हणजे वैशाख मास साजरा करण्यात येतो.
सन 1699 वैशाखीच्या दिवशी शिखांचे दशम गुरु 'गुरु गोविंद सिंह जी महाराज' यांनी खालसा पंथाची स्थापना केली. या दिवशी दशम गुरू साहेबांनी पाच प्रिय लोकांची निवड केली. बौद्ध लोकांना सुद्धा बैसाखी पवित्र मानला जातो. बैसाखी (वैशाखी) च्या दिवशी महात्मा गौतम बुद्धांचा सुद्धा जन्म झाला. बैसाखी च्या दिवशी त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आणि याच दिवशी त्यांचे निर्वाण झाले.
महापुरुष जेव्हा-जेव्हा या दुनियेत येतात तेव्हा एकच संदेश वारंवार जगाला देतात. तो संदेश काय आहे? नरदेह मोठ्या भाग्याने प्राप्त होतो, त्याच्यातूनच आपण आपल्या निजधामास परत जाऊ शकतो. परमात्मा महाचैतन्याचा महासागर आहे आणि आपला आत्मा त्याचा एक अंश आहे. परमात्मा प्रेम आहे आणि आत्मा सुद्धा त्याचा अंश असल्याकारणाने प्रेमच आहे. याच्यातच सहजपणे प्रभु मिलनाची आस आहे आणि याचा विशेष गुण म्हणजे आपल्या प्रियतमा बरोबर एकरूप होणे असा आहे.
बैसाख धीरन क्यों वाडिया जिना प्रेम बिछोह'
बैसाख धरीन क्यों...... वैशाख मास आलेला आहे, ज्या प्रमाणे धान्य पिकल्यानंतर त्याची कापणी होते, त्याच प्रमाणे कर्मफळाच्या सिद्धांतानुसार नरदेह प्राप्त झालेला असून सुद्धा हा जीव भगवंतापासून विन्मुख झाला. त्याला त्याचा विसर पडला. तरी ही त्या प्रभूलाच विसरून प्रभू विना निष्क्रिय पणे तुम्ही जीवन कसे जगू शकता ? त्याला कसे विसरलात?
हर साजन पुरुख विसार के लगी माया धोह 
आपण परमात्म्यापासून दूर झालेले आहोत, त्याला विसरलेले आहोत आणि मोह-माया आपल्या पाठी हात धुऊन लागलेली आहे. माया म्हणजेच अज्ञान. या अज्ञानाची सुरुवात कुठून झाली? ही एक दुःखदायक गोष्ट आहे. पिक बाहेर कापून पडलेलं आहे. महापुरुष हे पाहून म्हणतात, तुम्ही प्रभू पासून विभक्त झालेले आहात, तुम्ही त्याचे अंश आहात, तुम्ही त्या जगन्नाथाला विसरलात आणि हे सर्व विनाशाचे मूळ कारण आहे. भगवंताला विसरून आपण आपला जन्म व्यर्थ घालवत आहोत. "प्रभू बिना अवर न कोय"  प्रभू शिवाय तुमच्या आत्म्याचा कोणी साथी नाही. मुलं, पत्नी ही सर्व प्रारब्ध कर्मानुसार प्रभूंनी आपल्याशी जोडलेली आहेत. हे समजून आपली देणी-घेणी प्रेमपूर्वक निभवावीत आणि आपल्या स्वगृही जावे. तो परमात्मा जो आपल्या आत्म्याच्या संगतीत आहे, त्याचा साथी आहे, तोच तुमच्याबरोबर राहील. आपल्याला हा नरदेह प्रभु प्राप्तीकरिता मिळालेला आहे हे लक्षात ठेवावे.
आत्मा चेतन स्वरूप आहे. जोपर्यंत त्या महाचेतन प्रभूशी त्याचे मीलन होत नाही तोपर्यंत त्याला चैन पडणार नाही. जो पर्यंत परिपूर्ण परमात्म्याच्या नामाशी तो एकरुप होत नाही तो पर्यंत या मनावर नियंत्रण पण करता येणार नाही. "नाम मिलिये  मन तृप्तीये". भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो की, त्यांनी एकदा यमुना नदीत उडी मारली, त्या डोहात हजार मुखी कालिया नाग होता, त्यांनी बासरी वाजवून हजार मुखी कालिया नागाचे मर्दन केले. हा सर्प कुठला होता बरे? मन! ज्याचे आपल्याला डंक मारण्याचे हजारो प्रकार आहेत आणि त्याच्यावरच आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे. "मन जीते जग जिते" ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले. आपल्यात आणि प्रभु मध्ये मन हाच एक अडथळा आहे.
जर तुम्ही परमेश्वर प्राप्तीचा निश्चय केला असेल तर एक पाऊल मनावर ठेवा अर्थात त्याला स्थिर करा, आणि आणि दुसरे पाऊल जे तुम्ही उचलाल ते थेट प्रभूच्या ईश्वरीय साम्राज्यात पडेल.
हा वैशाख मास तेव्हाच फलदायी होईल जेव्हा, नवीन जीवनाचा आरंभ होईल. तेव्हाच यश प्राप्त होईल. ज्यांनी त्या परमात्म्या ला प्राप्त केले आहे, त्यांच्या संगतीत राहा. जर कोणी संत भेटले तर आपला उद्देश सफल होईल. ज्यांना पूर्ण संत-सद्गुरू भेटले ते भगवंताच्या दरबारात शोभा प्राप्त करतील. आणि तुमच्या जीवनात प्रेम आणि भक्तीभाव जागृत होईल आणि या बाह्य जगताच्या मायेच्या विषाचा प्रभाव तुमच्यावर होणार नाही. तुम्ही सुख-शांती च्या महासागराला जाऊन मिळाल व तुम्ही या भवसागरातून तरुन जाल. तोच महिना, तोच दिवस, तोच मुहूर्त चांगला ठरेल ज्यात आपण प्रभूला प्राप्त करू. ज्याच्यावर परमेश्वराची कृपादृष्टी होते त्यांच्यावर संतां कृपा होते व त्याचे जीवन सफल होते.

Tuesday, April 5, 2022

*हुजूर बाबा सावन सिंह जी महाराज यांनी लाखो लोकांना अध्यात्मिक मार्गाचे आचरण करण्याचे शिकविले.*

*प्रेस विज्ञप्ति*
*-  संत राजिन्दर सिंह जी महाराज*
*हुजूर बाबा सावन सिंह जी महाराज यांनी लाखो लोकांना अध्यात्मिक मार्गाचे आचरण करण्याचे शिकविले.*
2 एप्रिल रोजी हुजूर बाबा सावन सिंह जी महाराज यांच्या 74 व्या वार्षिक भंडारा सत्संग प्रसंगी सावन कृपाल रुहानि मिशनचे अध्यक्ष परम संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी युट्युब वर शिकागो, अमेरिका येथून जिवंत प्रसारणा द्वारे आपला पावन संदेश समस्त मानव जाती करिता दिला.

संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी या विशेष प्रसंगी आपल्या संदेशात म्हटले की हुजुर बाबा सावन सिंह जी महाराज यांनी आपल्या कृपेने आणि दिव्य प्रेमाने लाखो लोकांचे जीवन चैतन्याने भरले. त्यांनी या अंधकारमय दुनियेत प्रभूच्या ज्योती चा प्रसार केला. यामुळे लोकांचे लक्ष अध्यात्माकडे गेले आणि ते लोक या मार्गावर अग्रेसर झाले. त्यांनी त्या सर्व लोकांना प्रभूची ज्योती आणि प्रेम यांची अनुभूती प्रदान केली. 

संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी मागील शतकातील महान संतांनी दर्शविलेल्या अध्यात्मिक मार्ग समजाविताना म्हटले की त्यांनी दिलेलं प्रेम आणि एकतेचा संदेश कुण्या आस्था व धर्माशी संबंधित नसून तो संपूर्ण विश्वासाठी होता. ज्या लोकांनी त्यांची शिकवण जीवनात उतरविली केवळ तेच लोक मनुष्य जीवनाचा वास्तविक उद्देश समजू शकले आणि ते सर्व जीवनाच्या अंतिम ध्येया पर्यंत म्हणजे पिता-परमेश्वरा पर्यंत पोहोचले. त्यांची अशी इच्छा होती की आपण आपल्या जीवनाचे ध्येय 'स्वतःला ओळखणे आणि परमेश्वराला प्राप्त करणे' हे समजून घ्यावे व ते पूर्ण करण्यासाठी आपली पावलं उचलावीत.

हुजूर बाबा सावन सिंह जी महाराज यांचा जन्म 27 जुलै 1858 रोजी ग्राम महिमासिंहवाला, लुधियाना जिल्ह्यात पंजाब प्रांतात झाला. ते आपल्या सत्संगाद्वारे समजावून सांगत की आपण पिता-परमेश्वराची संतान या नात्याने आपल्यातील प्रत्येक जण त्यांना प्राप्त करू शकतो जो आपल्या जीवनाचा प्रमुख उद्देश आहे.

त्यांनी मानवजातीच्या कल्याणार्थ अध्यात्मिक जागृती ची भविष्यवाणी केली होती की पाश्चिमात्य देशात या अध्यात्माचा प्रसार जलद गतीने होईल. त्यांच्या पश्चात संत कृपाल सिंह जी महाराज आणि संत दर्शन सिंह जी महाराज यांनी विश्वभरात अनेक यात्रा करून या अध्यात्मिकतेचे ज्ञान व तंत्र लोकांपर्यंत पोहोचविले आणि सध्या सावन कृपाल रुहानी मिशनचे अध्यक्ष वर्तमान सद्गुरु परम संत राजिन्दर सिंह जी महाराज आपणा सर्वांना मार्गदर्शन करीत आहेत.

सावन कृपाल रुहानी मिशनचे अध्यक्ष संत राजिन्दर सिंह जी महाराज जी संपूर्ण विश्वामध्ये ध्यान-अभ्यासाद्वारे प्रेम, एकता व शांतीचा संदेश प्रसारित करीत आहेत. याकरिता त्यांना विविध देशांनी अनेक शांती पुरस्कार व सन्माना बरोबर 5 डॉक्टरेट पदव्या प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
सावन कृपाल रुहानि मिशन ची संपूर्ण विश्वात 3200 पेक्षा अधिक केंद्रे स्थापित झालेली आहेत. तसेच मिशनचे साहित्य विश्वातील 55 हून अधिक भाषांमध्ये प्रकाशित केले गेले आहे. त्यांचे मुख्यालय विजयनगर दिल्लीत येथे असून आंतरराष्ट्रीय मुख्यालय नेपरवीले, अमेरिकेत आहे.


सावन कृपाल रुहानि मिशन
मीडिया प्रभारी 
सौरव नारुला

Friday, April 1, 2022

भुसावळ कटनी रेल्वे गाडीचे रावेर येथे स्वागत.जळगाव नंदुरबार पुणे मुंबई अमरावतीसाठी नवीन मेमु ट्रेन सुरू करण्याची प्रशांत बोरकर यांची. मागणी..



रावेर    अनेक वर्षे पासून बंद असलेली  भुसावळ कटणी  रेल्वे गाड्या सुरू झाल्या बद्दल  रावेर रेल्वे प्रवासी मित्र नेते राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांनी मध्य रेल्वे प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त केले असून जळगाव साठी सकाळी सात वाजता रेल्वे सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
जनरल तिकीट सुरू नसल्याने आणि  प्सेंजर गाड्या सुरू नसल्याने विद्यार्थी आणि कामगार मजुर व्यापारी दुकानदार यांची मोठ्या प्रमाणावर  गेरसोय होत आहे.
काही महिन्यांपासून भुसावळ इतारशी मेमु ट्रेन सुरू झाली  परंतु  योग्य वेळ नसल्याने प्रवाशी यांना रेल्वे सेवाचा लाभ घेता येत नाही.म्हणून सकाळी जळगाव साठी खंडवा रावेर हून  जळगाव अमळनेर नंदुरबार  अशी मेमु पेसेजर ट्रेन तसेच मुंबई पुणे अमरावती साठी विशेष गाड्या सुरू करावी अशी अपेक्षा  रेल्वे प्रवाशी मित्र श्री प्रशांत बोरकर रशीद तडवी रामकृष्ण चौधरी सुभाष अकोले यांनी व्यक्त केली आहे

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...