Tuesday, April 5, 2022

*हुजूर बाबा सावन सिंह जी महाराज यांनी लाखो लोकांना अध्यात्मिक मार्गाचे आचरण करण्याचे शिकविले.*

*प्रेस विज्ञप्ति*
*-  संत राजिन्दर सिंह जी महाराज*
*हुजूर बाबा सावन सिंह जी महाराज यांनी लाखो लोकांना अध्यात्मिक मार्गाचे आचरण करण्याचे शिकविले.*
2 एप्रिल रोजी हुजूर बाबा सावन सिंह जी महाराज यांच्या 74 व्या वार्षिक भंडारा सत्संग प्रसंगी सावन कृपाल रुहानि मिशनचे अध्यक्ष परम संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी युट्युब वर शिकागो, अमेरिका येथून जिवंत प्रसारणा द्वारे आपला पावन संदेश समस्त मानव जाती करिता दिला.

संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी या विशेष प्रसंगी आपल्या संदेशात म्हटले की हुजुर बाबा सावन सिंह जी महाराज यांनी आपल्या कृपेने आणि दिव्य प्रेमाने लाखो लोकांचे जीवन चैतन्याने भरले. त्यांनी या अंधकारमय दुनियेत प्रभूच्या ज्योती चा प्रसार केला. यामुळे लोकांचे लक्ष अध्यात्माकडे गेले आणि ते लोक या मार्गावर अग्रेसर झाले. त्यांनी त्या सर्व लोकांना प्रभूची ज्योती आणि प्रेम यांची अनुभूती प्रदान केली. 

संत राजिन्दर सिंह जी महाराज यांनी मागील शतकातील महान संतांनी दर्शविलेल्या अध्यात्मिक मार्ग समजाविताना म्हटले की त्यांनी दिलेलं प्रेम आणि एकतेचा संदेश कुण्या आस्था व धर्माशी संबंधित नसून तो संपूर्ण विश्वासाठी होता. ज्या लोकांनी त्यांची शिकवण जीवनात उतरविली केवळ तेच लोक मनुष्य जीवनाचा वास्तविक उद्देश समजू शकले आणि ते सर्व जीवनाच्या अंतिम ध्येया पर्यंत म्हणजे पिता-परमेश्वरा पर्यंत पोहोचले. त्यांची अशी इच्छा होती की आपण आपल्या जीवनाचे ध्येय 'स्वतःला ओळखणे आणि परमेश्वराला प्राप्त करणे' हे समजून घ्यावे व ते पूर्ण करण्यासाठी आपली पावलं उचलावीत.

हुजूर बाबा सावन सिंह जी महाराज यांचा जन्म 27 जुलै 1858 रोजी ग्राम महिमासिंहवाला, लुधियाना जिल्ह्यात पंजाब प्रांतात झाला. ते आपल्या सत्संगाद्वारे समजावून सांगत की आपण पिता-परमेश्वराची संतान या नात्याने आपल्यातील प्रत्येक जण त्यांना प्राप्त करू शकतो जो आपल्या जीवनाचा प्रमुख उद्देश आहे.

त्यांनी मानवजातीच्या कल्याणार्थ अध्यात्मिक जागृती ची भविष्यवाणी केली होती की पाश्चिमात्य देशात या अध्यात्माचा प्रसार जलद गतीने होईल. त्यांच्या पश्चात संत कृपाल सिंह जी महाराज आणि संत दर्शन सिंह जी महाराज यांनी विश्वभरात अनेक यात्रा करून या अध्यात्मिकतेचे ज्ञान व तंत्र लोकांपर्यंत पोहोचविले आणि सध्या सावन कृपाल रुहानी मिशनचे अध्यक्ष वर्तमान सद्गुरु परम संत राजिन्दर सिंह जी महाराज आपणा सर्वांना मार्गदर्शन करीत आहेत.

सावन कृपाल रुहानी मिशनचे अध्यक्ष संत राजिन्दर सिंह जी महाराज जी संपूर्ण विश्वामध्ये ध्यान-अभ्यासाद्वारे प्रेम, एकता व शांतीचा संदेश प्रसारित करीत आहेत. याकरिता त्यांना विविध देशांनी अनेक शांती पुरस्कार व सन्माना बरोबर 5 डॉक्टरेट पदव्या प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
सावन कृपाल रुहानि मिशन ची संपूर्ण विश्वात 3200 पेक्षा अधिक केंद्रे स्थापित झालेली आहेत. तसेच मिशनचे साहित्य विश्वातील 55 हून अधिक भाषांमध्ये प्रकाशित केले गेले आहे. त्यांचे मुख्यालय विजयनगर दिल्लीत येथे असून आंतरराष्ट्रीय मुख्यालय नेपरवीले, अमेरिकेत आहे.


सावन कृपाल रुहानि मिशन
मीडिया प्रभारी 
सौरव नारुला

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...