Thursday, October 20, 2022

अपघात स्थळी संकटकाळात धावून जाणारा***कर्तव्य तत्पर "वासुदेव"*************************

***कर्तव्य तत्पर "वासुदेव"***
**********************
दिनांक 16,10,2022 रोजी सकाळी 11 ते 11:15 दरम्यान गुरुवर्य ना.भि.वानखेडे प्रतिष्ठानच्या ॲम्ब्युलन्स चा मोबाईल खणखणला. ॲम्ब्युलन्स चालक वासुदेव महाजन यांनी कर्तव्यात कसूर न करता अपघात स्थळी धाव घेतली.🚑.🚑🚑
बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर मोटर सायकल स्वार  मामा/भाचे खड्डे चुकवित असताना एका मिनी ट्रकची धडक लागून मोटर सायकल स्वार गंभीर रित्या जखमी झाला. ट्रकचे चाक पायावरून गेल्याने गंभीर दुखापत झाली, सदर अपघात  रावेर पासून एक किलोमीटर अंतरावर झाला.
अपघाताच्या ठिकाणी शेजारीच शेतामध्ये श्री राजू रामदास महाजन हे काम करीत होते. त्यांनी गुरुवर्य ना.भि.वानखेडे प्रतिष्ठानचे ॲम्ब्युलन्स चालक वासुदेव महाजन यांच्याशी संपर्क केला व काही वेळातच ॲम्ब्युलन्स घटनास्थळावर पोहोचली. तोपर्यंत गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्ती तेथेच पडून होती. वासुदेव महाजन यांनी त्वरित उचलून अस्थिरोग तज्ञ डॉक्टर भगवान कुयटे यांच्याशी संपर्क केला. त्याचेवर प्राथमिक उपचार करून व प्रसंगावधान राखून पुढील उपचारासाठी पाठवीले.🚑🚑🚑
************************

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...