Friday, September 30, 2022

UPI मधून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्यानंतर

या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात

UPI मधून चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला मिळणारा मेसेज सेव्ह करा. जर मेसेज डिलीट झाला तर पैसे रिफंड करण्यात खूप अडचणी येतील. व्यवहार पुष्टीकरण संदेशामध्ये PBBL क्रमांक असतो.

पैसे परत करण्याच्या प्रक्रियेसाठी हे आवश्यक आहे. आरबीआयने आपल्या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे की, जर तुम्ही चुकून इतर कोणत्याही बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील, तर तुम्ही http://bankingombudsman.rbi.org.in वर जाऊन तक्रार करू शकता.

या प्रक्रियेनंतर, तुम्हाला बँकेकडे अर्ज देखील लिहावा लागेल. अर्जामध्ये तुम्हाला खाते क्रमांक, नाव, ज्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.


Thursday, September 29, 2022

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी ‘सुधारित’ शिष्यवृत्ती योजना; शिष्यवृत्तीची रक्कम ५० हजारापर्यंत वाढणार

राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेत शिष्यवृत्तीची रक्कम ५० हजारापर्यंत वाढविण्यात येणार आहे.

वर्ष २०११ मध्ये ही शिष्यवृत्तीची रक्कम २५ हजार रुपये इतकी होती. २०१८ मध्ये देखील यात काही बदल झाले नाहीत. केवळ पालकांच्या उत्पन्नाची वार्षिक मर्यादा २ लाखांवरून ८ लाखांपर्यंत वाढवली गेली होती. सुधारित योजनेमुळे प्रत्यक्ष शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क किंवा पन्नास हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, ती शिष्यवृत्ती म्हणून विद्यार्थ्यांना देण्यात येईल. त्याचप्रमाणे बारावीपर्यंत कला, वाणिज्य आणि विज्ञान या बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क यांची एकत्रित रक्कम किंवा पाच हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल, ती शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येईल. जुन्या शिष्यवृत्ती योजनेतील इतर सर्व अटी, नियम पुर्वीप्रमाणेच राहतील.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली,लातूर* *महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांची जळगाव जिल्हाधिकारी पदी नियुक्ती.*.

ब्रेकिंग:-
🔥🔥🔥
*जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली,लातूर* *महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांची जळगाव जिल्हाधिकारी पदी नियुक्ती.*.


नवीन जिल्हाधिकारी साहेब यांचे तरुण तडफदार न्यूज तर्फे आणि राष्ट्रीय जनता दलाचे वतीने हार्दिक हार्दिक स्वागत
अभिजित राऊत साहेब यांना नवीन भागातील संधी साठी शुभेच्छा..

नाशिक विभाग पदवीधर निवडणुकीसाठी नोंदणी सुरू! नोंदणी करून मतदान करा. आमदार निवडीची संधी

। २९ सप्टेंबर २०२२ । भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी येत्या एक ऑक्टोबरपासून सुरु होणार असून 7 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरून देता येणार आहे. पदवी परीक्षा 1 नोव्हेंबर, 2022 पूर्वी उत्तीर्ण झालेल्या सर्व पदवीधरांना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार आहे. याकरीता विहीत नमुन्यातील फॉर्म क्र. 18 भरून द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.मतदार नोंदणी अर्ज नमुना 18 स्वीकारण्यासाठी कक्षाची स्थापन
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारास आपला आधार क्रमांक मतदार नोंदणी अर्जात नमूद करता येईल. तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे ऐच्छिक आहे. नाशिक विभागातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, उपविभागीय अधिकारी कार्यालयात तसेच तालुक्यातील तहसिलदार कार्यालयात व विभागीय आयुक्त कार्यालयात मतदार नोंदणी अर्ज नमुना 18 स्वीकारण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. याच कार्यालयातून नमुना 18 उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असेही श्री गमे यांनी केले आहे

पात्र नागरिकांनी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, बँका इ. कार्यालयातील कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या पात्र पदवीधर अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून फॉर्म नं. 18 भरुन घ्यावेत व आवश्यक कागदपत्रासह साक्षांकन करुन संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय या ठिकाणी जमा करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त नाशिक तथा नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी, श्री गमे यांचेकडून करण्यात आले आहे.

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज प्रक्रिया सुरू

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन आणि नूतनीकरण च्या अर्जाची ऑनलाईन स्वीकृती २२ सप्टेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे. सदर शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येते.

केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार नोंदणीकृत होणाऱ्या अर्जावर तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया करून हे अर्ज विहीत वेळेत निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा पातळीवर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयांकडून त्यांच्या अधिनस्त असलेल्या शैक्षणिक व महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या प्रत्यक्ष बैठका घेऊन वेळापत्रकानुसार तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाकडून दिले आहेत.

वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज कार्यवाही वेळापत्रक:-

दिनांक 20 ऑक्टोबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे. तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत करणे आवश्यक राहील. तर नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत 15 ऑक्टोबर, 2022 तर सहायक आयुक्तांसाठी 31 ऑक्टोबर ही असेल.

वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक


अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज कार्यवाही वेळापत्रक:-

दिनांक 07 नोव्हेंबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे. तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही 15 नोव्हेंबर, 2022 पर्यंत करणे आवश्यक राहील.


तर नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत 31 ऑक्टोबर, 2022 तर सहायक आयुक्तांसाठी 07 नोव्हेंबर, 2022 ही असेल असे समाजकल्याण विभागाकडून प्रसिध्दीस देण्यात आले आहे.


आवश्यक कागदपत्रे:-

1.जातीचे प्रमाणपत्र

2. उत्पन्नाचा दाखला

3. मागील वर्षाची मार्कशीट

4. जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यापेक्षा निवडलेला व्यावसायिक अभ्यासक्रम

Tuesday, September 27, 2022

पदवीधर व शिक्षक निवडणूकीसाठी मतदार नाव नोंदणी करण्याचे आवाहन


कोकण, नागपूर व औरंगाबाद या विभागात शिक्षक मतदारसंघ तसेच नाशिक व अमरावती या विभागात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका २०२३ मध्ये होणार असल्याने, येत्या १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी नाव नोंदणीसाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेस त्यांचेसोबत उप मुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.
राज्यात विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका दर सहा वर्षांनी घेतल्या जातात. त्याकरीता पात्र शिक्षक व पदवीधरांनी प्रत्येकवेळी नव्याने मतदार नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याने, पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी किमान ३ वर्षे अगोदर कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त नागरीक अर्ज क्र.- १८ भरुन पदवीधर मतदार नाव नोंदणी करु शकतात. हा अर्ज नाशिक व अमरावती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसिलदार कार्यालयात उपलब्ध असणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceo.maharashtra.gov.in/downloads/downloadforms/forms-18.pdf या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध असून, अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची किंवा गुणपत्रिकेची साक्षांकित छायाप्रत जोडणे आवश्यक असल्याचे व दि.१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पदवीधर मतदारसंघाकरीता ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा देण्याचा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले.
तसेच शिक्षक मतदार नोंदणीकरीता १ नोव्हेंबर २०२२ रोजी लगतच्या सहा वर्षांमधील किमान ३ वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक हे मतदार नाव नोंदणीसाठी पात्र असून, ते अर्ज क्र.- १९ भरुन शिक्षक मतदार नाव नोंदणी करु शकतात. हा अर्ज कोकण, नागपूर व औरंगाबाद विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी तसेच तहसिलदार कार्यालयात उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceo.maharashtra.gov.in/downloads/downloadforms/form-19.pdf या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध राहणार असून, अर्जासोबत विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्था प्रमुखांचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
येत्या कालावधीत होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदार नाव नोंदणीसाठी राजकीय पक्ष, मतदान केंद्र स्तरीय प्रतिनिधी किंवा रहिवासी वा कल्याणकारी संस्थाकडून एकगठ्ठा स्वरुपात प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे, तसेच पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरीताची प्रारुप मतदार यादी २२ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून, यादी संबंधी दावे व हरकतींचा कालावधी २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२२ असणार आहे. २५ डिसेंबर २०२२ रोजी दावे व हरकती निकालात काढून अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

Thursday, September 8, 2022

बार्टी’ मार्फत एम.फिल, पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई- सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF-2021) अंतर्गत दिनांक 01 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम नोंदणी (Confirmed Registration) असणाऱ्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामधून पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

BANRF-2021 अंतर्गत एकूण 200 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येणार आहे. याअंतर्गत एम.फिल/ पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना RGNF/NFSC च्या धर्तीवर JRF साठी रु. 31000/- व SRF साठी रु. 35000/- प्रतिमहा प्रमाणे अधिछात्रवृत्ती रक्कम तसेच वार्षि आकस्मिक खर्च, घरभाडे रक्कम देण्यात येते. एम.फिल साठी एकूण 2 वर्ष, पीएच.डी. साठी एकूण 5 वर्षे तसेच एम.फिल / पीएच.ड (Integrated Course) एकूण 5 वर्षे अधिछात्रवृत्ती

विद्यार्थ्यांना देण्यात येते. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी बार्टीचे अधिकृत संकेतस्थळ https://barti-maharashtragov.in ला भेट देण्याचे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आह

Tuesday, September 6, 2022

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार ७.५० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज



शासकीय योजना


मुंबई- नवे शैक्षणिक वर्ष 2022-23 आता सुरु होत असून राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची योजना सुरु आहे.


या योजनेच्या लाभासाठी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांनी केले आहे. अल्पसंख्याक समाजातील दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग, मेडीकल, नर्सिंग, फॅशन डिझायनींग, टुरीजम, पत्रकारीता, मास मीडिया, चित्रपट निर्मितीशी संबंधित विविध व्यावसायिक अभ्यासक्रम, ॲनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहेत, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क परत योजनेबाबत सविस्तर माहिती


1.योजनेचे नाव:- मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क.

2.योजनेचा प्रकार:- राज्य

3.योजनेचा उद्देश:- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयिन/उच्च शिक्षण घेता यावे, विद्यार्थ्याचे गळतिचे प्रमाण कमी व्हावे.


4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव:- अनुसूचित जाती

5.योजनेच्या प्रमुख अटी:- विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखपेक्षा जास्त मात्र उच्च उत्पन्न मर्यादा नाही. विद्यार्थी शालांत परीक्षेत्तर व पुढील शिक्षण घेत असलेला असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा

6.दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप:- शालांत परीक्षोत्तर शिक्षण घेणा-या अनु. जातीच्या विद्यार्थाना त्यांचे उत्पन्न विचारात न घेता सर्व मॅट्रिकोत्तर शैक्षणिक अभ्यास क्रमासाठी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर विहीत केलेले शुल्क देण्यात येते.

7. अर्ज करण्याची पध्दत:- या योजनेसाठी http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक

8. योजनेची वर्गवारी:- शिक्षण

9.संपर्क कार्यालयाचे नाव:- संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि महाविद्यालयाचे प्राचार्य

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे! महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु



सन २०२२ या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर कार्यान्वीत झाले असून,
खालील MAHADBT च्या संकेतस्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करुन हा अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करुन महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेस्तव सादर करावा.

Thursday, September 1, 2022

एलआयसी एजंट यांचे भारत भर विविध मागण्यासाठी आज धरणे आंदोलन

*आज दिनांक 1 सप्टेंबर एलआयसी स्थापना दिन या दिवशी  ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशनच्या वतीने संपूर्ण भारतामध्ये आंदोलन पुकारण्यात येत आहे एजंट बांधवांच्या मागण्यांची निवेदन आज प्रत्येक शाखेत शाखाप्रबंधकांना देण्यात आले नाशिक विभागीय अध्यक्ष कैलासभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये  96K शाखेचे शाखा प्रबंध विठ्ठल नातू सर यांना एजंटांच्या विविध मागण्यांचे निवेदन 96Kशाखेचे अध्यक्ष चंद्रकांत घोडके,सेक्रेटरी गिरीश कुमार गुप्ता, उपाध्यक्ष अरुण पाटील, कार्याध्यक्ष अनिलभाऊ वाघ, ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप सोनवणे सर, ज्येष्ठ विमा प्रतिनिधी दिनकर पाटील सर, किशोर सूर्यवंशी, संदीप दापोरकर ,विजय पाटील, नारायण सूर्यवंशी, राजेंद्र विभांडिक,निलेश आजळकर ज्ञानेश्वर पाटील, काशिनाथ बोडरे, 968 शाखेचे अध्यक्ष आर आर पाटील सर विवेक पाटील सर ,बाजीराव पाटील, संजय पाटील इत्यादी विमा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते*

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...