Thursday, September 29, 2022

नाशिक विभाग पदवीधर निवडणुकीसाठी नोंदणी सुरू! नोंदणी करून मतदान करा. आमदार निवडीची संधी

। २९ सप्टेंबर २०२२ । भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी येत्या एक ऑक्टोबरपासून सुरु होणार असून 7 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरून देता येणार आहे. पदवी परीक्षा 1 नोव्हेंबर, 2022 पूर्वी उत्तीर्ण झालेल्या सर्व पदवीधरांना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार आहे. याकरीता विहीत नमुन्यातील फॉर्म क्र. 18 भरून द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.मतदार नोंदणी अर्ज नमुना 18 स्वीकारण्यासाठी कक्षाची स्थापन
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारास आपला आधार क्रमांक मतदार नोंदणी अर्जात नमूद करता येईल. तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे ऐच्छिक आहे. नाशिक विभागातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, उपविभागीय अधिकारी कार्यालयात तसेच तालुक्यातील तहसिलदार कार्यालयात व विभागीय आयुक्त कार्यालयात मतदार नोंदणी अर्ज नमुना 18 स्वीकारण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. याच कार्यालयातून नमुना 18 उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असेही श्री गमे यांनी केले आहे

पात्र नागरिकांनी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, बँका इ. कार्यालयातील कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या पात्र पदवीधर अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून फॉर्म नं. 18 भरुन घ्यावेत व आवश्यक कागदपत्रासह साक्षांकन करुन संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय या ठिकाणी जमा करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त नाशिक तथा नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी, श्री गमे यांचेकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...