Saturday, February 29, 2020

महिला स्वच्छतागृहांसाठी निधी फाऊंडेशन करणार जनजागृती**पोस्टरचे महिला मान्यवरांच्या हस्ते अनावरण : जिल्हाभर लावणार पोस्टर*.सुप्रिया सुळें यांचेकडून दखल

*
जळगाव, दि.29 - शहरात नुकतेच एक 65 वर्षीय महिला कारच्या आडोशाला लघुशंकेला बसल्याने तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचा प्रकार घडला होता. घडलेल्या प्रकाराची तात्काळ दखल घेत निधी फाऊंडेशनच्या वैशाली विसपुते यांनी महिला स्वच्छतागृहांविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. निधी फाऊंडेशनतर्फे तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे अनावरण शनिवारी महिला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
भोईटेनगर स्थित निधी फाऊंडेशनच्या आवारात करण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शहराच्या प्रथम नागरिक महापौर भारती सोनवणे, अपर पोलीस अधिक्षिका भाग्यश्री नवटके, स्थायी समिती सभापती शुचिता हाडा, डॉ.श्रध्दा चांडक, रोटरीच्या संगीता पाटील उपस्थित होत्या.
राईट टू पी कायद्यानुसार कोणत्याही हॉटेल किंवा पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृह महिलांना मोफत वापरू देणे बंधनकारक आहे. बहुतांश महिलांना याबाबत माहिती नसल्याने त्या लघुशंका रोखून ठेवतात किंवा आडोसा शोधतात. लघुशंका रोखून ठेवल्याने महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. हॉटेल्स किंवा पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहांबाबत महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी महिलांना लक्ष द्या.. या मथळ्याखाली काही पोस्टर फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी तयार केले आहे. शनिवारी त्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. प्रसंगी जळगाव महिला व बाल सहाय्य कक्षाच्या समन्वयक विद्या सोनार, शोभा हंडोरे, भुसावळच्या समन्वयक भारती रंधे, साहस फाऊंडेशनच्या सरीता माळी, निवेदिता ताठे, स्मिता वेद, युथ फॉर हेल्प फाऊंडेशनच्या हेतल वाणी, स्वाती सोनगिरे आदी उपस्थित होत्या.
*उपक्रमाचे कौतुक, सहकार्याचे आश्वासन*
निधी फाऊंडेशनतर्फे जळगाव जिल्ह्यात महिलांसाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे मत सर्व महिला मान्यवरांनी व्यक्त केले. महानगरपालिकेतर्फे याबाबत आदेश पारीत करण्याचे आश्वासन महापौर भारती सोनवणे व स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी दिले. तसेच उपक्रमासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन अपर पोलीस अधिक्षिका भाग्यश्री नवटके यांनी दिले.
*खा.सुप्रिया सुळेंकडून फेसबुक पोस्ट शेअर*
राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांना घडलेल्या घटनेची आणि निधी फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येणार्‍या उपक्रमाची वैशाली विसपुते यांनी माहिती दिली. खा.सुप्रिया सुळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत राज्यस्तरावर देखील त्याची दखल घेण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, खा.सुप्रिया सुळे यांनी निधी फाऊंडेशनच्या उपक्रमाची दखल घेत पोस्टर अनावरणचा फोटो त्यांच्या फेसबुक पेजवरून देखील शेअर केला.

रेल्वे चे महत्त्व जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी🙏 महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमा भागात रेल्वे गाड्या सुविधा उपलब्ध करून देण्याची तातडीची गरज

रेल्वे चे महत्त्व  जिंदगी के साथ भी  जिंदगी के बाद भी🙏
रेल्वेही सर्वसामान्य माणसाचे जीवन रेखा झालेली आहे महत्वाचे दळणवळण साधन संपर्काचे साधन झाले आहे काल मी स्मशानभूमीत असताना बऱ्याच जणांनी रेल्वे संपर्क नसल्यामुळे अनेकजण मूर्त व्यक्तीला भेटण्यासाठी येऊ शकत नसल्याची खंत व्यक्त करीत होते त्याच वेळी दुसऱ्या समाजातील दफनभूमी सुद्धा रावेरला सचखंड पुणे साठी रेल्वे गाड्या स्टॉप मंजूर होणे आवश्यक असल्याचे फोनवरून सांगितले कारण रेल्वे ही संपर्कासाठी दळणवळणासाठी एक महत्त्वाचे माध्यम आहे आणि नातेवाईक मित्रमंडळी यांना सुख दुःखात  भेटण्यासाठी नोकरी  व्यापार व्यवसायासाठी गरीब लोकापासून ते श्रीमंत पर्यंत सर्वांना सोयीचे असे असे रेल्वे ते माध्यम आहे तेव्हा कामायनी ताप्ती गंगा या गाड्या चां स्टॉप मंजूर झाला नंतर एक वरसापुर्वी चां महानगरी चा स्टॉप रावेर लामंजूर झाला तेव्हा अनेक पेशंट यांनी मला धन्यवाद व्यक्त केले त्यात अनेक कॅन्सर चे पेशंट नासिक मुंबईला उपचारासाठी जातात व रस्ते खराब झाले आहेत त्यामुळे पेशंट ची तब्येत आणखी बिघडते रोज शेकडो लोक रस्ता अपघातात मृत्यू पडत आहेत त्यामुळे रेल्वे ही सुरक्षित व कमी पेश्यात लवकर पोहचण्याचे साधन आहे, रावेर चा स्टॉप मुळे लाखो प्रवासी जनतेकडून प्रचंड स्वागत झाले लोकपरतिनिधींनीही शुभारंभ व श्रेय संधी  मिळाली त्यांना राजकीय फायदा झाला त्याबरोबर प्रवास करणाऱ्या लोकांची , श्रेय  घेण्याची त्यांना गाडीचा  स्टॉप मुळे सोय झाली   आमचे सर्वाचे प्र्यंत्त असले मुळे शेकडो लोकांनी फोन करून सांगितले अनेक अनेक माता-भगिनींना आमच्या नातेवाईकांच्या शेवटचे अंत्यदर्शन आम्हाला घेता आले ते केवळ ह्या थांबल्यामुळे त्याबद्दल धन्यवाद कृतज्ञता व्यक्त केली रावेरला रेल्वे गाड्यांचे स्टॉप होणे आवश्यक आहे किंवा खंडवा भरपूर रावेर पासून मुंबई पुणे नागपूर साठी रेल्वे गाड्या सुरू होणे महत्त्वाचे आहे कारण लांब पल्ल्यांच्या गाड्यांना स्टॉप देण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमी करते व वेळ आणि पैशाचा तळवेल वसंत नसल्याचे कारण सांगून नागरिकांना सुविधा देण्यापासून पर्वत करते त्यामुळे त्या भरलेल्या गाड्या घेण्यापेक्षा बुऱ्हानपूर खंडवा रावेर पासून नव्याने पॅसेंजर फास्ट पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू होणे आवश्यक आहे रावेर मध्यप्रदेशच्या सीमारेषेवरील तालुका लोकसभा केंद्र आहे त्यामुळे ह्या भागातील महाराष्ट्र मध्यप्रदेश च्या सीमा भागातील लोकांना सुविधा मिळणे आवश्यक आहे त्यासाठी रेल्वे प्रशासनाने खांडवा बुरानपुर रावेर पासून फास्ट पॅसेंजर सुरू करण्याची अत्यंत आवश्यकता आहे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी गरज आहे हे लक्षात घेऊन त्यासंदर्भात कारवाई व्हावी व जबाबदार लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे लक्ष देऊन केवळ मतांसाठी जनतेचा प्रवाशांचा वापरण्याकरता सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी आमची सर्व लाखो प्रवासी जनतेकडून अपेक्षा आहे
🙏🙏 आपलाच प्रवासी मित्र प्रशांत बोरकर व सर्व सदस्य रावेर परिसर लोकसभा रावेर

तरुण तडफदार न्युज चॅनलवर पाहा प्रा नितीन बानगुडे पाटील यांच्या भाषणातील ठळक वैशिष्ट्ये शिवरायावर जोषपूर्ण व्याख्यान

pra Nitin bangude patil speechhttps://youtu.be/rWjUdLHE97E

रावेर ला मुद्रा योजना व शासकीय योजना मेळावा संपन्न उद्या मुक्ताईनगर ला आयोजन,

बुऱ्हाणपूर के खासदार नदू भेय्या की जनविकास काम का सेलाब, भावसा डेम बनना शाहपुर क्षेत्र के सैकड़ों किसानों के खेती के लिए वरदान साबित होगा

आखिरकार श्री नन्दू भैय्याजी की मेहनत हुई सार्थक भावसा डेम को केंद्र के वनमंत्रालय से कार्य प्रारम्भ की स्वीकृति::::---नरेंद्र शिंदे बुरहानपुर:::-(--संजय दीक्षित  )
बहुप्रतीक्षित बुरहानपुर जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम भावसा डेम के कार्य को प्रारम्भ  करवाने के लिए खंडवा संसदीय क्षेत्र के लोकप्रिय संसद सदस्य माननीय श्री नंदकुमारसिंह जी चौहान के अथक प्रयासों को आखिरकार केंद्र सरकार के वनमंत्रालय से प्राप्त पत्र के फाइल  क्रमांक 8-54/2017-FC दिनांक 28/2/2020 को केंद्र के वनमंत्रालय विभाग के डेप्युटी इंस्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट श्री ब्रिजेन्द्रजी स्वरूप के हस्ताक्षर से   स्वीकृति जारी की गई हैं।   इस महत्वाकांक्षी योजना को लाने के लिए सांसद श्री चौहान जी सतत केंद्र सरकार के वनमंत्रालय से सम्पर्क बनाये हुए थे, साथही प्रण की इस योजना को बुरहानपुर लाना ही हैं,के उद्देश्य से कार्य करते रहें थे।   यह भावसा डेम बनना शाहपुर क्षेत्र के सैकड़ों  किसानों के खेती के लिए वरदान साबित होगा।।  इस स्वीकृति से क्षेत्र मे सारे किसानों मे हर्ष की लहर व्याप्त हैं।    इस महत्वाकांक्षी योजना को मूर्तरूप प्रदान करने के लिए क्षेत्र के सरल सहज सांसद श्री चौहान जी ने देश के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र जी मोदी एवम वन एवम पर्यावरण मंत्रालय के केंद्रीय मंत्री माननीय श्री प्रभाकर जी जावड़ेकर को बहुत बहुत आभार व्यक्त कर धन्यवाद दिया एवम आशा व्यक्त कि भविष्य मे भी केंद्र से ऐसा ही सहयोग खंडवा संसदीय क्षेत्र को मिलता रहे।।    भावसा डेम की इस स्वीकृति की खबर लगते ही सारे शाहपूर क्षेत्र एवम परिसर मे आंनद के साथ हर्ष व्याप्त हो गया किसानों ने अपने लाडले सांसद माननीय श्री ओनंदकुमारसिंह जी चौहान का आभार व्यक्त करते हुए भावसा डेम की महती सौगात देकर पूरे क्षेत्र को हरा भरा करने की पहल के लिए उन्हें धन्यवाद दिया।

Friday, February 28, 2020

चेतना फोटो चे संचालक नारायण गोटीवाले यांचे निधन

नारायण गोटोवाले यांचे निधन
रावेर येथील चेतना फोटो चे संचालक श्री नारायण गोटिवाले यांचे निधन झाले त्याची दुपारी १वाजता अंत्त्यात्रा त्याचे उट खेड्या रोडवरील घरापासून निघणार आहे, गोटीवाले हे विवरे येथील शाळेत शिक्षक म्हणून सेवा केली होती, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

*अदित्य इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठया उत्साहात साजरा*


       *माउली फाउंडेशन संचलित अदित्य इंग्लिश मेडियम स्कुल व श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय रावेर येथे विज्ञान दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला*. 
      तसेच *शाळेत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते*. त्यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे *उद्घाटन अदित्य इंग्लिश मेडियम स्कुल चे मुख्याध्यापक श्री. संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात* आले. त्यावेळी विज्ञान प्रदर्शनात *शाळेच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारीत प्रोजेक्ट जसे की पवनचक्की, विदयुत निर्माण करणारे उपकरण, वॉटरपंप, सौर ऊर्जा, ज्वालामुखी स्त्रोत्र, कुलर व टेक्नॉलॉजी चा वापर करून टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तू असे प्रोजेक्ट तयार केले होते*. त्यावेळी त्यांना शाळेच्या *विज्ञान विषयाच्या शिक्षिका जयश्री साळुंके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले*. 
          *सौ. गौरांगिणी कोळपकर यांनी आज २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी आजच्या दिवशी जी किमया केली होती. त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आज देशभरातील शाळा, महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा केला जातो. महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिकच्या गंभीर विषयावर एक महत्त्वपूर्ण शोध लावला होता. ही माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.*

सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रकाश विश्वनाथ पाटील नाशिक यांचे रावेर येथे स्वागत, करतांना डॉक्टर राजन अकोले श्री प्रशांत बोरकर शशांक बोरकर, डॉक्टर प्रकाश पाटील यांनी अनेक पेशंटचीआज तपासणी करण्यात आली व असंख्य लोकांना मार्गदर्शन केले

मुक्ताईनगर मतदार संघातील बेरोजगारांचा प्रश्न MIDC स्थापनेमुळे लवकरच मिटणार...MIDC चा शब्द दिलाय...तो पुर्ण करणारच:- आ. चंद्रकांतभाऊ पाटील...

आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी MIDC साठी दिलेल्या शब्दाची लवकरच होणार वचनपुर्ती...

MIDC स्थापनेसाठीचा नियोजित जागा पहाणीच्या  अहवाला साठी MIDC क्षेत्र व्यवस्थापक डी.डी.पारधी यांनी केली सारोळा, निमखेडी,हरताळा परिसरातील जमिनीची पाहणी...


मुक्ताईनगर -;मतदार संघातील तरुण शिक्षीत बेरोजगारांना आपल्याच मतदार संघात रोजगार मिळावा, बेरोजगारांना रोजगारासाठी वण-वण भटकावे लागू नये  यासाठी मतदार संघातच MIDC स्थापन व्हावी व बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी आ.चंद्रकांतभाऊ पाटील हे शिवसेना जिल्हाप्रमुख असतांना पासुनच कायम धडपड करीत आहेत. अनेकदा सभांमधून त्यांनी हा विषय बोलून दाखविला. मा.मुख्यमंत्री श्री.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा नुकताच शेतकरी दौरा मुक्ताईनगर शहरात पार पडला यावेळी, आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी MIDC ची मागणी मा.मुख्यमंत्री साहेबांना केली. मा.मुख्यमंत्री साहेबांनी यावर तात्काळ अॅक्शन घेत तसे शासानाचे जागा पाहणीचे पत्र नुकतेच प्रशासनाला प्राप्त झाल्याने आज दिनांक 28 रोजी MIDC क्षेत्र व्यवस्थापक, जळगाव श्री.बी.डी.पारधी, वरिष्ठ भुमापक आर.डी.बकरे, भुमापक  श्री. एकनाथ ठाकरे यांनी सारोळा, निमखेडी, हरताळे शिवारातील नियोजित  जमीनीची MIDC स्थापनेसाठी पुर्व पहाणी केली तसेच, पाणी, विज, वाहतुक, इ. उपलब्ध सुविधां विषयी माहीती जाणून घेतली. तसा अहवाल वरिष्ठांनी मागवला असून वरीष्ठांना पुढील जागा पहाणी अहवाल सादर केला जाईल व पुढील कारवाई ही वरिष्ठ स्थरावरुन करण्यात येईल असे MIDCचे क्षेत्र व्यवस्थापक श्री. बी.डी. पारधी यांनी शासकीय विश्राम गृह,मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले जमिन पहाणी स्थळी शिवसेना तालुका प्रमुख छोटु भोई  शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल पाटील, अनंतराव देशमुख , संचलाल वाघ, उज्वल बोरसे तुषार बोरसे, संतोष कोळी, यांची उपस्थिती होती.

Thursday, February 27, 2020

मुद्रा योजनेचा रावेरात मेळावा**रावेर तालुक्यातील बेरोजगार युवक, लघु उद्योजकांनी मोठ्या संख्येने**उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*


जळगाव, दि. 27 (जिमाका) - जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावेत. याकरीता संपूर्ण जिल्ह्यात प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या मेळाव्यांचे तालुकानिहाय आयोजन करण्यात येत आहे. रावेर तालुक्याचा मेळावा 29 फेब्रुवारी, 2020 रोजी विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रावेर येथे सकाळी 10.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास तालुक्यातील बेरोजगार युवकांनी तसेच लघु उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे. 
या मेळाव्यात शासनाच्या विविध योजनांबाबत तसेच प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतंर्गत स्वयंरोजगारासाठी तसेच लघु उद्योगासाठी त्याचबरोबर आपला व्यवसाय वृध्दीगंत करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणेबाबत विविध शासकीय विभागांचे व बँकांचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर या मेळाव्याच्या ठिकाणी शासनाच्या कृषि विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, कौशल्य विकास विभाग, महिला व बालविकास, विविध राष्ट्रीयकृत बँका तसेच शासनाचे अंगिकृत व्यवसाय असलेली विविध विकास महामंडळांचे स्टॉलही लावण्यात येणार आहे. 
याचप्रकारचे मेळावे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार असून  रावेर येथे 29 फेब्रुवारी रोजी विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य  होणार असून या सर्व मेळाव्यांची वेळ ही सकाळी 10 वाजता राहणार आहे. 
  या मेळाव्यांना जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण, स्वयंरोजगार करु ईच्छिणारे युवक व लघु उद्योजकांसह ज्यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत कर्ज मागणी केलेली अशा व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहनही जिल्हाधि‍कारी तथा मुद्रा बॅक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
000

*सोनार समाजाचे जळगाव येथे निवेदन सादर


नाशिक येथील सुवर्ण व्यापारी *श्री. विजय बुधूशेठ बिरारी (सोनार)*  यांचे संशयास्पद झालेल्या मुत्यूची निष्पक्ष चौकशी करून हैद्राबाद पोलिसांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे व इं. पि. कोड ४११ कायदा महाराष्ट्रात जमीनपात्र करावा या बाबत निवेदन *मा.जिल्हाधिकारी साहेब यांना महाराष्ट्र सुवर्णकर सेना, जळगाव, जि. जळगाव यांच्या वतीने* *निवेदन सादर कारण्यात आले.* 
*प्रसंगी अखिल भारतीय अहिर सुवर्णकार संस्था जळगाव, महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव, संत नरहरी महाराज बहुउद्देशीय संस्था मेहरूण, जळगाव सोनार समाज महिला मंडळ, कर्तव्य प्रतिष्ठान जळगाव, सुवर्णकार कारागीर संघ जळगाव , सराफ व्यावसायिक, माजी आमदार जयप्रकाशजी बाविस्कर, नगरसेविका सौ.रंजनाताई विजयराव वानखेडे, मा. नगरसेविका सौ. लताताई मोरे, सर्व वरील संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.*
निवेदनात पुढील बाबींचा समावेश करण्यात आला- दि. २५.०२.२०२०, मंगळवार रोजी नाशिक येथील प्रसिद्ध सराफ *विजय बुधूशेठ बिरारी* यांना हैद्राबाद पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाण व त्यात त्यांचा झालेला संशयास्पद मृत्यू या प्रकरणी दोषी हैद्राबाद पोलिसांना अटक करून सत्य बाहेर आणणे व हैद्राबाद पोलिसांवर व त्यांच्या सोबत असलेल्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा व त्यांच्या दुकानातून घेऊन गेलेली रोकड व दागिने त्यांच्या परिवारास परत करावे व या प्रकरणाची सी.आय.डी मार्फत चौकशी करावी.  अशा प्रकारच्या घटना म्हणजे इं.पि.कोड ४११ अजामीनपात्र असल्याचा भ्रष्ट पोलिस अधिकारी गैरवापर करणे होय. म्हणून इं.पि.कोड ४११ महाराष्ट्रात जामीनपात्र करावा. ही सोनार समाज व सराफ व्यावसायिकांची जुनी मागणी असून तशी तात्काळ कार्यवाही व्हावी. ही मागणी सुद्धा या निवेदनाद्वारे करण्यात आली.

*...अन्यथा महाराष्ट्रातील सुवर्णकार बांधव व सराफ व्यवसायिक, सुवर्णकार शाखा, संस्था, मंडळ तीव्र आंदोलन करतील असे सर्वानुमते ठरले.*

आम्ही सर्व सराफ व सुवर्णकार बांधव कै. श्री. विजय बुधूशेठ बिरारी (सोनार)  यांचे संशयास्पद झालेल्या मुत्यूचा व या सम्पुर्ण घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत.
*निषेध-निषेध-निषेध...*

बिरारी प्रकरणीमानवी हक्काचे उलंघन झाल्याची निवासी उपजील्हाधिकारी यांना चर्चेत श्री प्रशांत बोरकर यांनी दिली माहिती ,बिरारी हत्याकांड प्रकरणी जळगाव ला विविध संघटना मार्फत देवून सखोल चौकशी ची मागणी

आत्महत्या की हत्या......!!!!

हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध 

चोरीच्या गुन्ह्यातील सोने चोरट्याकडून घेतल्याच्या संशयावरुन मंगळवारी (दि.२५) सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली. त्यांना नाशिक शासकीय विश्रामगृहातील चौथ्या मजल्यावरील खोलीत आणले. त्या ठिकाणी बिरारी यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस हैदराबाद पोलीस जबाबदार आहेत. त्यांच्या मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी SIT मार्फत  करुन दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी.
        पोलिसांनी अटक करण्यापुर्वी स्थानिक पोलिसांची मदत घेतली नसल्याचे समोर आले असून कारवाई करण्याची पद्धती चुकीची आहे.
हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध आणि संबधीत प्रकराणाची सखोल चौकशी करुन सर्वासमोर आणावी.आणि यात दोषी असणार्‍यावर कठोरातील कठोर शिक्षा करावी
 यासाठी निवासी जिल्हाधिकारी वामन कदम यांना देवा तुझा मी सोनार,सुवर्ण कार युवा मंच,स्व.विलास भाऊ सोनार बहुउद्देशिय सोनार या संघटनांनी संयुक्त निवेदन दिली.यावेळी
सुनील बिरारी, प्रशांत बोरकर ,प्रमोद विसपुते, मणिशंकर वर्मा, निलेश वाघ, हर्षल सोनार, हरीष जगताप, प्रदीप सोनार, शशांक बोरकर
आदी उपस्थित होते...निवासी उजिल्हाधिकारी वामन कदम यांनी विचारले की काय घटना घडली त्यांना ओबासि नेते श्री प्रशांत बोरकर यांनी माहिती दिली त्यानुसार चौकशी करावी व राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या कायदा सुव्यवस्था मधे बाहेरील राज्यातील पोलीस हस्थशेप केला आहे असे सागितले

शेतमाल निर्यातसंबंधी जळगावात**शनिवारी नि:शुल्क कार्यशाळा

** 
*पूर्वनोंदणी आवश्यक*
मा.पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने शेतमाल निर्यात करण्यासाठी व त्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य सुरु केले आहे. त्याच अनुषंगाने *आत्मा* , जळगांव (कृषी विभाग) व *अॅग्रोवर्ल्ड* यांच्या संयुक्त विद्यमाने जळगांव येथे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील *जिल्हा नियोजन भवन सभागृह* येथे *दिनांक २९.०२.२०२० रोजी ३.३० ते ६.००* या वेळेत *शेतमाल निर्यात कार्यशाळा* आयोजित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी ही कार्यशाळा *नि:शुल्क* असली तरी त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. पूर्वनोंदणी  असलेल्यानांच प्रवेश दिला जाईल, तरी *९१३००९१६२१* या संपर्क क्रमांकावर आपले नाव नोंदणी करावी.
*ठिकाण* :- *जळगांव जिल्हा नियोजन भवन सभागृह* ( *जिल्हाधिकारी कार्यालय* )
*दिनांक* :- *दिनांक २९.०२.२०२०*      
*वेळ*     :- *३.३० ते ६.००*
*नोंदणीसाठी संपर्क क्र* . :-  *९१३००९१६२१*
           *सकाळी १०.०० ते सायंकाळी  ६.०० या कार्यालयीन वेळेत नावनोंदणी करावी* .

*श्री शिव प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्या मंदिर रावेर शाळेत खेलो इंडिया अंतर्गत गो गर्ल्स गो या रनिंग स्पर्धेचे तालुका स्तरीय आयोजन*

        रावेर दि.27/02/2020 रोजी सरस्वती विद्यामंदिर रावेर शालेत सदरील कार्यक्रमाचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री जयंत कुलकर्णी सर होते प्रमुख अतिथि म्हणून ए. पी.पाटील सर, प्रफुल्ल मानकर सर,राजकुमार जैन सर तसेच तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सर्व क्रीड़ाशिक्षक यांनी प्रतिमापूजन केले.
त्यानंतर सदरील स्पर्धा घेण्यात आली.  
       याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल मानकर सर यांनी प्रास्ताविक ए पी पाटील सर यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
💐💐🙏💐💐💐🙏💐💐

Wednesday, February 26, 2020

आता खेलो इंडिया मध्ये गरीब मुलाने गोविंदा ने केली कमाल,,रावेर शहरात सर्व स्थरातून अभिनंदन , तरुण तडफदार तर्फे अभिनंदन

आजचरावेर चां गरीब मजुराचा मुलगा रावेर कॉलेज व बहीणाबाई चौधरी विद्यापीठ मार्फत खेळणारा गोविंदा महाजन याने खेलो इंडिया वे ट लेपट्टींगऑल इंडिया युनिव्हर्सिटी मध्ये स्वर्ण पदक कमाई केली तसेच येथे नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया पोलीस गेम्स मध्ये भोलानाथ चौधरी याने सिल्वर पदक पटकावले💐 एवढे शिखर सहजासहजी साध्य होत नाही पण माझे मित्र योगेश महाजन यांच्या अथक परिश्रमामुळे हे सर्व साध्य होत आहे🙏असे त्यांचे मित्र अशोक पाटील यांनी सांगितले व  अभिनंदन अभिनंदन 💐गोल्ड मेडल सिल्वर मेडल असे अनेक पदक तालिका कमावणारे रावेरचे वेटलिफ्टर व त्यांचे सर्वेसर्वा गुरु योगेश महाजन यांचेही तरुण तडफदार न्युज तर्फे आणि रावेर तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने श्री प्रशांत बोरकर शशांक बोरकर अशोक पाटील वसंत महाजन रामकृष्ण चोधारी  युवराज महाजन,  यांनी अभिनंदन केले आहे,

शिवभोजनालय चालविण्यास इच्छूक संस्थांनी29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शिवभोजनालय चालविण्यास इच्छूक संस्थांनी
29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
        जळगाव, (जिमाका) दि.26 :-  जळगाव शहरातील शिवभोजन योजनेतील भोजनालयांचा इष्टांक दुप्पटीने वाढविण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. जळगाव शहरात, गरीब व गरजू जनतेच्या सेवेसाठी वर्दळीच्या ठिकाणे असलेल्या नविन बस स्थानक, रुग्णालये, जुने बस स्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा इत्यादी सार्वजनिक ठिकाणी शिवभोजन योजनेतंर्गत शिवभोजनालय सुरु करण्यासाठी इच्छुक असलेल्या महिला बचत गट, भोजनालय चालक, खानावळ चालक, हॉटेल चालक, रेस्टॉरंट चालक, अशासकीय संस्था, महिला गृहउद्योग संस्थांनी 29 फेब्रुवारी, 2020 पर्यंत जिल्हा पुरवठाअधिकारी, जळगाव यांचेकडे अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे. 
           शिवभोजनालयासाठी अर्ज करणाऱ्या महिला बचत गट, भोजनालय, खानावळ, हॉटेल रेस्टॉरंट, अशासकीय संस्था, महीला गृहउद्योग संस्था इत्यादींना भोजनालयाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सद्यपरिस्थीतीत सुरु असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी भोजनालयात एकाचवेळी किमान 25 व्यक्ती भोजन करु शकतील एवढी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. शिवभोजनालयासाठी संबंधित व्यक्ती अथवा संस्थांची जागा स्वमालकीची अथवा भाडे तत्वावर असलेबाबतचा स्पष्ट उल्लेख करुन जागा किती स्वेअर फुटाची आहे याचा उल्लेख अर्जात करणे आवश्यक राहील. संबंधित अर्जदाराची शिवभोजनालय चालक म्हणून निवड झाल्यावर शासनाकडून वेळोवेळी निर्गमीत होणा-या अटी व शर्तीचे पालन करणे त्यांचेवर बंधनकारक राहील.
   इच्छूक अर्जदारांनी अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह प्रस्ताव सादर करणे आवश्यक राहील. असे जिल्हाधिकारी, जळगाव तथा अध्यक्ष, शिवभोजन योजना डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 
०००

Tuesday, February 25, 2020

हैदराबाद पोलिसांनी नाशिकमध्ये स्थानिक पोलिसांची मदत न घेता परस्पर सराफ व्यावसायिक भाजपचे पदाधिकारी विजय बिरारी यांना अटक केल्यानंतर त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. बुधवार रोजी नाशिक बंद

हैदराबाद पोलिसांनी नाशिकमध्ये स्थानिक पोलिसांची मदत न घेता परस्पर सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांना अटक केल्यानंतर त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी दोषी हैदराबाद पोलिसांना अटक करून सत्य बाहेर आणवे अन्यथा हैदराबाद पोलीसांविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नाशिक सराफ असोसिएशनने दिला आहे.

चोरीच्या गुन्ह्यातील सोने चोरट्याकडून घेतल्याच्या संशयावरुन मंगळवारी (दि.२५) सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली. त्यांना नाशिक शासकीय विश्रामगृहातील चौथ्या मजल्यावरील खोलीत आणले. त्या ठिकाणी बिरारी यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस हैदराबाद पोलीस जबाबदार आहेत. त्यांच्या मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी. पोलिसांनी अटक करण्यापुर्वी स्थानिक पोलिसांची मदत घेतली नसल्याचे समोर आले असून कारवाई करण्याची पद्धती चुकीची आहे. नाशिक सराफ असोसिएशन हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे.

बुधवारी सराफ दुकाने राहणार बंद
हैदराबाद पोलिसांनी सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली. त्यांच्या कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी (दि.२६) नाशिक जिल्ह्यात सराफ दुकाने बंद ठेवून निषेध केला जाणार आहे. आंदोलनात सराफ व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक सराफ असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

Monday, February 24, 2020

महाराष्ट्र विद्या मंदिर वाघोड.येथे संध्याकाळी वार्षिक स्नेह संमेलन संपन्न

महाराष्ट्र विद्या मंदिर वाघोड.येथे आज संध्याकाळी वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहाने साजरा केला त्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री पी.एम महाजन सर, चेअरमन अरविंदजी पाठक, संचालक भगवान महाजन, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि मंडळी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले

डोनाल्ड ट्रंप का रावेर प्रोग्राम वायरल मॅसेज😊🏋️🤸🤸🤓🤺🏇

*डोनाल्ड ट्रंप का रावेर प्रोग्राम* 


सुबह 7.30 बजे जलगाव से भुसावळ होते हुये कालीपीली से आगमन
रावेर के रजनी गंधा लॉज पर फ्रेश होंगे
8 बजे लक्ष्मी माता मंदिर दर्शन करेंगे
9 बजे पारा के गणपती के दर्शन करके  रगडा और कचोरी खायेंगे 
11 बजें स्टेट बँक के बाजू मे छोटू वडा खाके सावदा रोड पे का  पुल का  निरीक्षण करेंगे क्या यह पुल आवाजाही के लिए सुरक्षित हैं ? अधिकारियों से चर्चा 
12.30 पे  टांगा स्टँड स्टेशन रोड पे देखणे जायेंगे फिर वहासे शनी मंदिर में   दर्शन करेंगे और वही पास में खाली जगह पे सिगरेट पियेगा
बाद मे मशहूर ममता फोटो स्टुडिओ मे फोटो सेशन होगा बाद में हाँटेल मानस गार्डन मे भोजन लस्सी पान.
3 बजे रेस्ट हाऊस के पास बाकडे पे थोड़ी देर आराम करेंगे
4 बजे बीजसन माता मंदिर के पास अंगुर और पेरू खरीदेंगे  साथ   अचार की केरी खरीदेंगे 
4.30 बजे रावेर  जंशन पे कचोरी चाय 
5 बजे दुर्गा माता दर्शनऔर शिवाजी महाराज के पुतळे  का अवलोकन और फिर 
5.30 बजे ग्राम पंचायत में लोगो से मुलाकात  
6 बजे रुची मोटार के पास चौक मे  आमलेट खाएंगे,
7 बजे श्री साई बाबा मंदिर में आरती करेंगे ओर गरीबो को मिठाई वितरण करेगे 
7.30 बजे पाटबंधारे डिपार्टमेंट का सर्किट हाऊस पे अधिकारियों से चर्चा   
8.30 बजे हाँटेल साई सतगुरु  में खाना 
9 बजे तरुण तडफदार से बातचित
 9।30  रातराणी पुणे गाडी से जळगांव  रवाना होंगे और वाहासे बाय प्लेन अमेरिका 
😜😜😜😜🙏🏻🙏🏻🙏🏻😛😛😃 ये सपना आया कुछ भक्त लोगो को, नष्या कुछ अलग बात हे दीन मे जो सपने देखते हे

कमाल धमाल ची हॅट्रिक, आता दूधवाला चे मुलाने केली धमाल गोल्ड मेडल मिळवून केली कमाल

श्री कृष्ण डेअरी वाल्याच्या मुलांनी केली कमाल जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग
मध्ये केली धमाल  गोल्ड मेडलिस्ट शिवराज चौधरी ,
शिवजयंतीला जन्मलेला हा मुलगा ? महाराज घोड्यावर स्वार होत होते .हे स्केटिंगवर .... जळगाव जिल्ह्यातील वयोगटात त्याने पहिला क्रमांक मिळवला गोल्ड मेडल मिळालं एकूण तीन घटना नी यशस्वी हेट्रिक झाले आहे,...  रावेर ला आपला शींगाडी गावातून दूध जमा करून रावेर ला दूध विकणाऱ्या होतकरू शेतकरी कम दूधवाला म्हणजे श्रीकृष्णा डेयरी चे चालक रामकृष्ण चोध्ररी चां मुलगा शिवराज हा शिवजयंती ला  जन्म झाला आहे म्हणून शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने त्याचे नाव शिवराज ठेवले आहे छोट्या गावातील यांची मुले बुऱ्हाणपूर चे मायक्रोेव्हिजन स्कूल मध्ये शिकत असून  रावेर तालु काच नाव रोशन करीत आहे रावेर मध्ये अश्या यशस्वी मुलाचे तरुण तडफदार न्युज तर्फे श्री प्रशांत बोरकर यांनी अभिनंदन केले आहे

Sunday, February 23, 2020

भाजीपाला विकणाऱ्या गजानन चौधरि चा मुलाने केली कमाल ,रोलर स्केटिंग मध्ये चांदीचे पदक मिळवून केली धमाल



दि, २३/२/२०२०रोजी जळगाव जिल्हा स्तरीय रोलर स्केटिंग मध्ये मोहीत गजानन चौधरी याला दुसऱ्या क्रमांकाचे सिल्वर मेडल्स मिळाले .

रावेर को आगे लाने वाले हर शक्स को तरुण तडफदार का सलाम👍👏 .

सिल्वर बॉय ✌

शिवजयंतीचा निमित्ताने अमोलदादा मिटकरी यांच्याशी मुलाखत

शिवजयंतीचा निमित्ताने अमोलदादा मिटकरी यांच्याशी तरुण तडफदार न्युज साठी विविध प्रश्नांवर मुलाखत घेतली .त्याबद्दल उर्वरित बातमी तरुण तडफदार न्युज यूट्यूब चॅनलवर बघा.

शिवश्री अमोलदादा मिटकरी यांचे व्याख्यान सभा सुरू

https://www.dailymotion.com/video/x7s404uशिवश्री अमोलदादा मिटकरी यांचे व्याख्यान सभा सुरू

मूर्ख को शिक्षा नहीं भाती


किसी पहाड़ पर बंदरों का एक झुंड रहता था । एक बार पहाडों पर काफी वर्षा और बर्फ पड़ने के कारण ठण्ड बहुत हो गई। इस ठण्ड से बचने के लिए बंदरों ने एक ऐसे फल को आग समझकर इकठ्ठा कर लिया, जिसकी शक्ल आग से मिलती थी । इस आग को सुलगाने के लिए सभी बंदर फूंक मारने लगे, बाकी के बंदर उसे आग समझ चारों ओर तापने के लिए बैठ गए । इन बंदरों को देखकर एक पक्षी बोला---
                             'अरे तुम सब पागल हो गए हो! यह अंगार नहीं, यह तो उससे मिलता-जुलता फल है । इससे भला सर्दी कहां दूर होगी! तुम लोग किसी पहाडी गुफा में छुपने की बात सोचो, क्योंकि अभी तो बर्फ और गिरेगी ।' बंदरों का सरदार बोला, "अरे तू हमें क्या बताएगा, हम सब समझते हैं ।' पक्षी ने एक बार फिर कहा, 'अरे भैया, मैं तुम्हारे ही हित की बात कह रहा हूं, तुम इस भयंकर ठंड से बचने के लिए कहीं पर भी छिप जाओ, नहीं तो मारे जाओगे ।' उस पक्षी की बात सुनकर एक बन्दर को क्रोध आ गया । उसने उस पक्षी के पर नोंचकर उसे पत्थर पर दे मारा । यह मिला उस बेचारे को  फ़ल भलाई और शिक्षा देने का ।
"मूर्ख को शिक्षा देने का कोई लाभ नहीं "
 Find at - आज जो चल रहा हे एस कथा से आपको सब याद आ गया ही होगा,,,,किसीं नेता पर बेवकुफ जेस्सा प्यार करणे वाले वो बंदर ही हे ओर share करणेवाले हम पक्षी हे,, 🤣😃🤗😘🙄



                                   https://youtu.be/v-zb7k3pBZk


Saturday, February 22, 2020

संत गाडगे महाराज जयंती


संत गाडगे महाराज यांनी अनिष्ट रूढी परंपरा यांचे बद्दल जनतेचे समाजप्रबोधन केले ते विचार पोहचवणे जन जागृती निर्माण करून त्यांना अभिवादन करणे होय..

स्वामी विवेकानंद यांचे विचार

 सत्‍य, पवित्रता और नि:स्‍वर्थता विद्यमान है, उन्‍हें स्‍वर्गलोक, मृत्‍युलोक और पाताललोक की कोई भी शक्ति कुछ क्षति नहीं पहुँचा सकती. इन गुणों के रहने पर चाहे समस्‍त विश्‍व ही किसी व्‍यक्ति के विरूद्ध क्‍यों न हो जाये, वह अकेला ही उसका सामना कर सकता है.

छत्रपती शिवजयंती उत्साहात साजरी


शिवाजी राजे केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरूष नसून ,त्याचे शरीरही डौलदार आहे. त्याच्या चेहरा आकर्षक आहे आणी निसर्गतः त्याचे व्यक्तित्व अत्यंत परिपूर्ण आहे. 

विशेषतः त्याचे काळेभोर आणी विशाल नेत्र इतके विलक्षण भेदक आहेत की तो टक लावून पाहू लागला तर त्यातून ठिणग्या बाहेर पडतात की काय , असे वाटते. त्याचबरोबर तरल, तीक्ष्ण,स्पष्ट आणी तंतोतंत निर्णय करणारी त्याची प्रतिमाही व्यक्त होते. 

-कोस्मा दी गार्डा

स्वामी विवेकानंद यांचे विचार

जो आप की मदद करता है, उसे कभी मत भूलों. जो आप से प्रेम करता है, उससे कभी घृणा मत करो.. जो आप पर भरोसा करता है, उसे कभी भी धोखा मत दो.

आज अमोल मिटकरी यांचे रावेरला भव्य शिव व्याख्यान....

amol mitkari Raver शिवजयंतीआज२३ फेब्रुवारी रोजी अमोल मिटकरी यांचे रावेरला भव्य शिव व्याख्यान  यशवंत हायस्कूल येथे सायंकाळी साडेपाच वाजता रावेर ला आयोजीत केले असून या शिव विचार ऐकण्यासाठी शिवप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पंचायत समिती सदस्य श्री दिपक पाटील सचिन पाटील श्रीराम पाटील यांनी शिवजयंतीउत्सव समितिचेवतीने  तरुण तडफदार टीम शी बोलताना सांगितले
https://youtu.be/v-zb7k3pBZk

अमेरिकेची मुलगी झाली रावेर जळगाव चे योगेश माळी शी विवाहबद्ध.सोशल मीडियाचा कमाल,योगेश ने केली अमेरिकेत धमाल


रावेर तालुक्यातील शेतकरी कुटुबातून असलेल्या सद्या जळगाव चां योगेश विठ्ठल माळी सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत असताना सोशल मीडिया साइटवर त्याची ऍना रेनवॉल अमेरिकेतील तरुणीशी ओळख होऊन मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ऍना त्याच्या कुटुंबीयांसह जळगावला आली असून भारतीय संस्कृती प्रमाणे आज (ता. 22) हळद व गोरज मुहूर्तावर शुभमंगल संपन्न झाले  रावेर येथील आनंद टेलर यांचा तो पुतण्या आहे,  रावेर तालुक्यातील वाघो ड येथील संदीप महाजन यांचा योगेश आतेभाऊ आहे त्याने तरुण तडफदार न्युज शी बोलताना ही माहिती दिली

रावेर यावल विधानसभा आमदार शिरीषदादा चौधरी यांना NRC बाबत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदन


       

रावेर दि. २२ (प्रतिनिंधी) 

 
       वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस व सेना यांच्या आमदार खासदारांच्या घरावर मोर्च अथवा निवेदन देवून महाआघाडी सरकारने एन.पी.आर.एन आर.सी. ची अंमलबजावणी करणार नाही. असा ठराव विधानसभेत मांडून  बहुमताने संमत करुन घ्याया कारण देशातील  केरळ, पंजाब सहीत अनेक गैर भाजपा राज्य सरकारांनी विधानसभेचे विशेष अधीवेशन बोलावून एन.आर.सी,सी.ए.ए.व एन.पी.आर विरोधात ठराव केला परंतु महाराष्ट्रातील गैर भाजपा सरकार ने अद्याप असा कोणताही ठराव पारीत केलेला नाही. एन.आर.सी चे पहीले पाऊल म्हणुन केंद्र सरकारने एक मे पासुन एन.पी.आर ची अंमलबजावनी करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहे.

       यामुळे राज्यसरकारने एन.आर.सी,सी.ए.ए.व एन.पी.आर विरोधात तात्काळ  ठराव पारीत न केल्यास महाराष्ट्रातील ४० टक्के एस.सी. /एस.टी/ओ.बी.सी सहीत मुस्लीम व अल्पसंख्यांक धोक्यात येणार आहेत.      

       एन.पी.आर ची अंमलबजावणी रोखायची असेल तर विधानसभेमध्ये बहुमताने एन.पी.आर/एन.आर.सी. विरोधी ठराव पास करणे आवश्यक आहे.

       महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने एन.पी.आर/एन.आर.सी. ची अंमलबजावणी करणार नाही. असा ठराव विधानसभेत मांडून बहुमताने संमत करुन घ्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे.अशा मागणीचे निवेदन रावेर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रावेर यावल विधान सभा आमदार शिरीषदादा चौधरी यांचे प्रतिनिंधी शेखर बडगे, संजय चौधरी , यांना वंचित बहुजन आघाडी च्या वतीने  निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनावर जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ सोनवणे, तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे, रफिक बेग,सुरेश अटकाळे, सलीम शाह, बाळा  शिरतुरे, नितीन तायडे,विनोद तायडे,आदीनी  निवेदनावर सहया आहे.

       यावेळी सावदा ए.पी.आय.राहुल वाघ, पो.कॉ स्टे कोमलसिंग पाटील,  देवेंद्र पाटील, जगदीश पाटील यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता
.

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...