Saturday, February 22, 2020

रावेर यावल विधानसभा आमदार शिरीषदादा चौधरी यांना NRC बाबत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदन


       

रावेर दि. २२ (प्रतिनिंधी) 

 
       वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस व सेना यांच्या आमदार खासदारांच्या घरावर मोर्च अथवा निवेदन देवून महाआघाडी सरकारने एन.पी.आर.एन आर.सी. ची अंमलबजावणी करणार नाही. असा ठराव विधानसभेत मांडून  बहुमताने संमत करुन घ्याया कारण देशातील  केरळ, पंजाब सहीत अनेक गैर भाजपा राज्य सरकारांनी विधानसभेचे विशेष अधीवेशन बोलावून एन.आर.सी,सी.ए.ए.व एन.पी.आर विरोधात ठराव केला परंतु महाराष्ट्रातील गैर भाजपा सरकार ने अद्याप असा कोणताही ठराव पारीत केलेला नाही. एन.आर.सी चे पहीले पाऊल म्हणुन केंद्र सरकारने एक मे पासुन एन.पी.आर ची अंमलबजावनी करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहे.

       यामुळे राज्यसरकारने एन.आर.सी,सी.ए.ए.व एन.पी.आर विरोधात तात्काळ  ठराव पारीत न केल्यास महाराष्ट्रातील ४० टक्के एस.सी. /एस.टी/ओ.बी.सी सहीत मुस्लीम व अल्पसंख्यांक धोक्यात येणार आहेत.      

       एन.पी.आर ची अंमलबजावणी रोखायची असेल तर विधानसभेमध्ये बहुमताने एन.पी.आर/एन.आर.सी. विरोधी ठराव पास करणे आवश्यक आहे.

       महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने एन.पी.आर/एन.आर.सी. ची अंमलबजावणी करणार नाही. असा ठराव विधानसभेत मांडून बहुमताने संमत करुन घ्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे.अशा मागणीचे निवेदन रावेर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रावेर यावल विधान सभा आमदार शिरीषदादा चौधरी यांचे प्रतिनिंधी शेखर बडगे, संजय चौधरी , यांना वंचित बहुजन आघाडी च्या वतीने  निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनावर जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ सोनवणे, तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे, रफिक बेग,सुरेश अटकाळे, सलीम शाह, बाळा  शिरतुरे, नितीन तायडे,विनोद तायडे,आदीनी  निवेदनावर सहया आहे.

       यावेळी सावदा ए.पी.आय.राहुल वाघ, पो.कॉ स्टे कोमलसिंग पाटील,  देवेंद्र पाटील, जगदीश पाटील यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता
.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...