Friday, February 28, 2020

*अदित्य इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठया उत्साहात साजरा*


       *माउली फाउंडेशन संचलित अदित्य इंग्लिश मेडियम स्कुल व श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय रावेर येथे विज्ञान दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला*. 
      तसेच *शाळेत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते*. त्यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे *उद्घाटन अदित्य इंग्लिश मेडियम स्कुल चे मुख्याध्यापक श्री. संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात* आले. त्यावेळी विज्ञान प्रदर्शनात *शाळेच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारीत प्रोजेक्ट जसे की पवनचक्की, विदयुत निर्माण करणारे उपकरण, वॉटरपंप, सौर ऊर्जा, ज्वालामुखी स्त्रोत्र, कुलर व टेक्नॉलॉजी चा वापर करून टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तू असे प्रोजेक्ट तयार केले होते*. त्यावेळी त्यांना शाळेच्या *विज्ञान विषयाच्या शिक्षिका जयश्री साळुंके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले*. 
          *सौ. गौरांगिणी कोळपकर यांनी आज २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी आजच्या दिवशी जी किमया केली होती. त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आज देशभरातील शाळा, महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा केला जातो. महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिकच्या गंभीर विषयावर एक महत्त्वपूर्ण शोध लावला होता. ही माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.*

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...