Friday, February 28, 2020

मुक्ताईनगर मतदार संघातील बेरोजगारांचा प्रश्न MIDC स्थापनेमुळे लवकरच मिटणार...MIDC चा शब्द दिलाय...तो पुर्ण करणारच:- आ. चंद्रकांतभाऊ पाटील...

आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी MIDC साठी दिलेल्या शब्दाची लवकरच होणार वचनपुर्ती...

MIDC स्थापनेसाठीचा नियोजित जागा पहाणीच्या  अहवाला साठी MIDC क्षेत्र व्यवस्थापक डी.डी.पारधी यांनी केली सारोळा, निमखेडी,हरताळा परिसरातील जमिनीची पाहणी...


मुक्ताईनगर -;मतदार संघातील तरुण शिक्षीत बेरोजगारांना आपल्याच मतदार संघात रोजगार मिळावा, बेरोजगारांना रोजगारासाठी वण-वण भटकावे लागू नये  यासाठी मतदार संघातच MIDC स्थापन व्हावी व बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी आ.चंद्रकांतभाऊ पाटील हे शिवसेना जिल्हाप्रमुख असतांना पासुनच कायम धडपड करीत आहेत. अनेकदा सभांमधून त्यांनी हा विषय बोलून दाखविला. मा.मुख्यमंत्री श्री.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा नुकताच शेतकरी दौरा मुक्ताईनगर शहरात पार पडला यावेळी, आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांनी MIDC ची मागणी मा.मुख्यमंत्री साहेबांना केली. मा.मुख्यमंत्री साहेबांनी यावर तात्काळ अॅक्शन घेत तसे शासानाचे जागा पाहणीचे पत्र नुकतेच प्रशासनाला प्राप्त झाल्याने आज दिनांक 28 रोजी MIDC क्षेत्र व्यवस्थापक, जळगाव श्री.बी.डी.पारधी, वरिष्ठ भुमापक आर.डी.बकरे, भुमापक  श्री. एकनाथ ठाकरे यांनी सारोळा, निमखेडी, हरताळे शिवारातील नियोजित  जमीनीची MIDC स्थापनेसाठी पुर्व पहाणी केली तसेच, पाणी, विज, वाहतुक, इ. उपलब्ध सुविधां विषयी माहीती जाणून घेतली. तसा अहवाल वरिष्ठांनी मागवला असून वरीष्ठांना पुढील जागा पहाणी अहवाल सादर केला जाईल व पुढील कारवाई ही वरिष्ठ स्थरावरुन करण्यात येईल असे MIDCचे क्षेत्र व्यवस्थापक श्री. बी.डी. पारधी यांनी शासकीय विश्राम गृह,मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले जमिन पहाणी स्थळी शिवसेना तालुका प्रमुख छोटु भोई  शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनिल पाटील, अनंतराव देशमुख , संचलाल वाघ, उज्वल बोरसे तुषार बोरसे, संतोष कोळी, यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...