Thursday, February 27, 2020

*सोनार समाजाचे जळगाव येथे निवेदन सादर


नाशिक येथील सुवर्ण व्यापारी *श्री. विजय बुधूशेठ बिरारी (सोनार)*  यांचे संशयास्पद झालेल्या मुत्यूची निष्पक्ष चौकशी करून हैद्राबाद पोलिसांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे व इं. पि. कोड ४११ कायदा महाराष्ट्रात जमीनपात्र करावा या बाबत निवेदन *मा.जिल्हाधिकारी साहेब यांना महाराष्ट्र सुवर्णकर सेना, जळगाव, जि. जळगाव यांच्या वतीने* *निवेदन सादर कारण्यात आले.* 
*प्रसंगी अखिल भारतीय अहिर सुवर्णकार संस्था जळगाव, महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव, संत नरहरी महाराज बहुउद्देशीय संस्था मेहरूण, जळगाव सोनार समाज महिला मंडळ, कर्तव्य प्रतिष्ठान जळगाव, सुवर्णकार कारागीर संघ जळगाव , सराफ व्यावसायिक, माजी आमदार जयप्रकाशजी बाविस्कर, नगरसेविका सौ.रंजनाताई विजयराव वानखेडे, मा. नगरसेविका सौ. लताताई मोरे, सर्व वरील संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.*
निवेदनात पुढील बाबींचा समावेश करण्यात आला- दि. २५.०२.२०२०, मंगळवार रोजी नाशिक येथील प्रसिद्ध सराफ *विजय बुधूशेठ बिरारी* यांना हैद्राबाद पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाण व त्यात त्यांचा झालेला संशयास्पद मृत्यू या प्रकरणी दोषी हैद्राबाद पोलिसांना अटक करून सत्य बाहेर आणणे व हैद्राबाद पोलिसांवर व त्यांच्या सोबत असलेल्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा व त्यांच्या दुकानातून घेऊन गेलेली रोकड व दागिने त्यांच्या परिवारास परत करावे व या प्रकरणाची सी.आय.डी मार्फत चौकशी करावी.  अशा प्रकारच्या घटना म्हणजे इं.पि.कोड ४११ अजामीनपात्र असल्याचा भ्रष्ट पोलिस अधिकारी गैरवापर करणे होय. म्हणून इं.पि.कोड ४११ महाराष्ट्रात जामीनपात्र करावा. ही सोनार समाज व सराफ व्यावसायिकांची जुनी मागणी असून तशी तात्काळ कार्यवाही व्हावी. ही मागणी सुद्धा या निवेदनाद्वारे करण्यात आली.

*...अन्यथा महाराष्ट्रातील सुवर्णकार बांधव व सराफ व्यवसायिक, सुवर्णकार शाखा, संस्था, मंडळ तीव्र आंदोलन करतील असे सर्वानुमते ठरले.*

आम्ही सर्व सराफ व सुवर्णकार बांधव कै. श्री. विजय बुधूशेठ बिरारी (सोनार)  यांचे संशयास्पद झालेल्या मुत्यूचा व या सम्पुर्ण घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत.
*निषेध-निषेध-निषेध...*

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...