Wednesday, April 13, 2022

*बैसाखी निमित्त नवजीवनाचा संदेश**- संत राजिन्दर सिंह जी महाराज


वैशाख महिन्यात प्रकृतीच्या नियमानुसार झाडा-झुडपांना नवीन पालवी फुटू लागते. त्याच्यातूनच एका नवीन जीवनाची सुरुवात होते, तर आपण ही यावरून एक नवीन बोध घेतला पाहिजे कि आपल्या जीवनात नवीन विचारांचा अंकुर फुटावा आणि आपल्या जीवनाची नवीन सुरुवात व्हावी. आपल्या मनातील सर्व भेदभाव नष्ट व्हावेत. समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये बैसाखी म्हणजे वैशाख मास साजरा करण्यात येतो.
सन 1699 वैशाखीच्या दिवशी शिखांचे दशम गुरु 'गुरु गोविंद सिंह जी महाराज' यांनी खालसा पंथाची स्थापना केली. या दिवशी दशम गुरू साहेबांनी पाच प्रिय लोकांची निवड केली. बौद्ध लोकांना सुद्धा बैसाखी पवित्र मानला जातो. बैसाखी (वैशाखी) च्या दिवशी महात्मा गौतम बुद्धांचा सुद्धा जन्म झाला. बैसाखी च्या दिवशी त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आणि याच दिवशी त्यांचे निर्वाण झाले.
महापुरुष जेव्हा-जेव्हा या दुनियेत येतात तेव्हा एकच संदेश वारंवार जगाला देतात. तो संदेश काय आहे? नरदेह मोठ्या भाग्याने प्राप्त होतो, त्याच्यातूनच आपण आपल्या निजधामास परत जाऊ शकतो. परमात्मा महाचैतन्याचा महासागर आहे आणि आपला आत्मा त्याचा एक अंश आहे. परमात्मा प्रेम आहे आणि आत्मा सुद्धा त्याचा अंश असल्याकारणाने प्रेमच आहे. याच्यातच सहजपणे प्रभु मिलनाची आस आहे आणि याचा विशेष गुण म्हणजे आपल्या प्रियतमा बरोबर एकरूप होणे असा आहे.
बैसाख धीरन क्यों वाडिया जिना प्रेम बिछोह'
बैसाख धरीन क्यों...... वैशाख मास आलेला आहे, ज्या प्रमाणे धान्य पिकल्यानंतर त्याची कापणी होते, त्याच प्रमाणे कर्मफळाच्या सिद्धांतानुसार नरदेह प्राप्त झालेला असून सुद्धा हा जीव भगवंतापासून विन्मुख झाला. त्याला त्याचा विसर पडला. तरी ही त्या प्रभूलाच विसरून प्रभू विना निष्क्रिय पणे तुम्ही जीवन कसे जगू शकता ? त्याला कसे विसरलात?
हर साजन पुरुख विसार के लगी माया धोह 
आपण परमात्म्यापासून दूर झालेले आहोत, त्याला विसरलेले आहोत आणि मोह-माया आपल्या पाठी हात धुऊन लागलेली आहे. माया म्हणजेच अज्ञान. या अज्ञानाची सुरुवात कुठून झाली? ही एक दुःखदायक गोष्ट आहे. पिक बाहेर कापून पडलेलं आहे. महापुरुष हे पाहून म्हणतात, तुम्ही प्रभू पासून विभक्त झालेले आहात, तुम्ही त्याचे अंश आहात, तुम्ही त्या जगन्नाथाला विसरलात आणि हे सर्व विनाशाचे मूळ कारण आहे. भगवंताला विसरून आपण आपला जन्म व्यर्थ घालवत आहोत. "प्रभू बिना अवर न कोय"  प्रभू शिवाय तुमच्या आत्म्याचा कोणी साथी नाही. मुलं, पत्नी ही सर्व प्रारब्ध कर्मानुसार प्रभूंनी आपल्याशी जोडलेली आहेत. हे समजून आपली देणी-घेणी प्रेमपूर्वक निभवावीत आणि आपल्या स्वगृही जावे. तो परमात्मा जो आपल्या आत्म्याच्या संगतीत आहे, त्याचा साथी आहे, तोच तुमच्याबरोबर राहील. आपल्याला हा नरदेह प्रभु प्राप्तीकरिता मिळालेला आहे हे लक्षात ठेवावे.
आत्मा चेतन स्वरूप आहे. जोपर्यंत त्या महाचेतन प्रभूशी त्याचे मीलन होत नाही तोपर्यंत त्याला चैन पडणार नाही. जो पर्यंत परिपूर्ण परमात्म्याच्या नामाशी तो एकरुप होत नाही तो पर्यंत या मनावर नियंत्रण पण करता येणार नाही. "नाम मिलिये  मन तृप्तीये". भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो की, त्यांनी एकदा यमुना नदीत उडी मारली, त्या डोहात हजार मुखी कालिया नाग होता, त्यांनी बासरी वाजवून हजार मुखी कालिया नागाचे मर्दन केले. हा सर्प कुठला होता बरे? मन! ज्याचे आपल्याला डंक मारण्याचे हजारो प्रकार आहेत आणि त्याच्यावरच आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे. "मन जीते जग जिते" ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले. आपल्यात आणि प्रभु मध्ये मन हाच एक अडथळा आहे.
जर तुम्ही परमेश्वर प्राप्तीचा निश्चय केला असेल तर एक पाऊल मनावर ठेवा अर्थात त्याला स्थिर करा, आणि आणि दुसरे पाऊल जे तुम्ही उचलाल ते थेट प्रभूच्या ईश्वरीय साम्राज्यात पडेल.
हा वैशाख मास तेव्हाच फलदायी होईल जेव्हा, नवीन जीवनाचा आरंभ होईल. तेव्हाच यश प्राप्त होईल. ज्यांनी त्या परमात्म्या ला प्राप्त केले आहे, त्यांच्या संगतीत राहा. जर कोणी संत भेटले तर आपला उद्देश सफल होईल. ज्यांना पूर्ण संत-सद्गुरू भेटले ते भगवंताच्या दरबारात शोभा प्राप्त करतील. आणि तुमच्या जीवनात प्रेम आणि भक्तीभाव जागृत होईल आणि या बाह्य जगताच्या मायेच्या विषाचा प्रभाव तुमच्यावर होणार नाही. तुम्ही सुख-शांती च्या महासागराला जाऊन मिळाल व तुम्ही या भवसागरातून तरुन जाल. तोच महिना, तोच दिवस, तोच मुहूर्त चांगला ठरेल ज्यात आपण प्रभूला प्राप्त करू. ज्याच्यावर परमेश्वराची कृपादृष्टी होते त्यांच्यावर संतां कृपा होते व त्याचे जीवन सफल होते.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...