Friday, April 17, 2020

अभिनेत्री मंजुश्री सुतारचा वेगळा उपक्रम ##खास तरुण तडफदार न्युज वाचक टीमसाठी खास मॅसेज शृंखला,

अभिनेत्री मंजुश्री सुतारचा वेगळा उपक्रम खास तरुण तडफदार न्युज वाचक टीमसाठी खास मॅसेज

मुंबई (- तरुण तडफदार टीम )जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातलाय. कोरोनामय संकट टळून जावे यासाठी सरकार आणि अनेक सेवाभावी संस्था दिवस-रात्र काम करत आहेत. नागरिकांनी घरात थांबून ही लढाई जिंकायची असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. आता इतके दिवस घरात बसून करणार तरी काय? टीव्ही, घरकाम, कुटुंबासोबत गप्पा, मोबाईल, नवनवीन पदार्थ बनवणे आणि खाणे यापलिकडे काय? असं वाटत असतानाच अभिनेत्री मंजुश्री सुतार हिला एक वेगळीच कल्पना सुचली (बहुमूल्य स्रोत)ती म्हणजे सोशल मीडियावरुन बालगीतांना उजळणी देणे.
या दिवसात घरी बसून पालकांचा आणि सोबत बालकांचा वेळ सत्कारणी लागावा या हेतूने अभिनेत्री मंजुश्री सुतार फेसबुकच्या माध्यमातून या दिवसात रोज एक बालगीत सादर करत आहे. यात अशीही काही गाणी आहेत जी खूप दुर्मिळ आहेत, काही आपल्या परिचयाची आहेत. यामुळे लहान मुलांना पुन्हा एकदा आपल्या बाल साहित्याची,गाण्यांची ओळख व्हावी हाच याचा मुख्य उद्देश आहे. विशेष बाब म्हणजे ही गाणी फक्त वाचली जात नसून मुलांना आकर्षक वाटावी म्हणून अभिनयातून सादर केली जात आहे.
या दिवसात अनेक व्यक्ती, संस्था आपल्या परीने कार्य करत आहेत, नागरिकांनी घरात बसावे म्हणून आवाहन करत आहेत, त्यात आपला देखील खारीचा वाटा असावा या हेतूने मंजुश्री सुतार हिने हे पाऊल उचलले आहे. तिच्या फेसबुक पेजवरून आपण ही गाणी बघू शकतो. यावर्षातल्या शाईन सौ.महाराष्ट्र ची तृतीय विजेती असलेल्या मंजुश्रीने अभिनय केलेले मराठी सिनेमे आणि मराठी वेब सिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहेत. एक अभिनेत्री म्हणून हा तिचा सामाजिक वाटा आहे, असे ती म्हणाली.,,पुढील मॅसेज अर्चना सावंत,, व नागीण फेम मोनी रॉय

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...