Thursday, April 6, 2023

परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक: विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन*

*अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स नोंदणीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्यात दुसरे*

*

पुणे, दि.२१- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी राज्यातील विद्यापीठाकडून जोरदार तयारी सुरू आहे. या शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांची श्रेयांक म्हणजेच क्रेडिट बँक असणार आहे.  या विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेत राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. विद्यापीठाने आतापर्यंत ४ लाख ४५ हजार ७५२ विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे.

केंद्र शासनाच्या वतीने देशातील विद्यापीठांसाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यावर सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठांनी नोंदणी करायची असून विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आपले श्रेयांक खाते उघडणे अपेक्षित आहे. भारतातील एकूण १ हजार १४६ संस्थांनी यामध्ये नोंदणी केली असून त्यातील ३१८ राज्य विद्यापीठे आहेत. आतापर्यंत देशभराच्या आकडेवारीत अन्य राज्यांच्या तुलनेत संस्था नोंदणीत महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. तर राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नोंदणीत दुसरे आहे.

याबाबत माहिती देताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण हे श्रेयांक पद्धतीवर आधारित असणार आहे. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी ठराविक श्रेयांक असतील ते श्रेयांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खात्यावर जमा होतील. मात्र हे असण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन खाते उघडणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आधीपासूनच याची तयारी सुरू केली असल्याने आतापर्यंत ४ लाख ४५ हजार ७५२ विद्यार्थ्यांनी हे खाते उघडले आहे.

*कुठे कराल नोंदणी?*
abc.gov.in या संकेस्थळावर जात तुम्हीही तुमचे शैक्षणिक खाते उघडू शकता.

कोट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर २०२२ पासून संलग्न महाविद्यालयांना 'एबीसी' साठी नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच पुढील वर्षाचे अर्ज भरण्यासाठी एबीसी आवश्यक केले आहे, त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर नोंदणी करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. दरम्यान अजुनही उर्वरित विद्यार्थिनी यासाठी नोंदणी करावी असे आवाहन आम्ही करत आहोत.
- डॉ.महेश काकडे, संचालक
परीक्षा व मूल्यमापन मंडळ
---

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...