Saturday, March 4, 2023

सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजाला दिशा व प्रेरणा देणारे -प्राचार्य डॉ जे बी अंजने

*ऐनपूर महाविद्यालयात युवतीसभे द्वारे विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न* 
ऐनपूर: ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे युवतीसभेद्वारे महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भूषविले. उदघाटन सौ. सुनंदाबाई भागवत पाटील निंबोल यांच्या शुभहस्ते करण्यात आले प्रमुख वक्ते सौ. वंदनाबाई संजय पाटील सरपंच निंबोल ग्रामपंचायत, सौ. सुलभा किशोर पाटील निंबोल , सौ. विमल वेडू पाटील उपशिक्षिका स. व. प विद्यालय ऐनपूर , सौ. सुरेखा मनिष पाटील संचालक सुरेखमणी ब्युटी केयर रावेर, श्रीमती जोत्स्ना महाजन, अध्यक्ष, एकदंत महिला बचतगट या होत्या.
    कार्यशाळेचे उदघाटन सौ. सुनंदाबाई भागवत पाटील निंबोल यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुलेंच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. प्रास्ताविक आणि पाहुणे परिचय युवतीसभेच्या सचिव डॉ. नीता वाणी यांनी केले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार शाल व बुके देऊन करण्यात आला. प्रथम सत्रात उदघाटक सौ. सुनंदाबाई भागवत पाटील यांचे उदघाट्नपर भाषण संपन्न झाले कार्यशाळेस शुभेच्छा देऊन आपल्या मनोगतात त्यांनी विशेष कार्य केलेल्या महिलांचे दाखले देऊन तुम्हीही त्यांचा आदर्श घ्या असे विद्यार्थीनींना आवाहन केले. द्वितीय सत्राचे पहिले पुष्पगुच्छ उपशिक्षिका सौ. विमल पाटील स. व. प. विद्यालय, ऐनपूर यांनी स्त्री शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.त्यांनी स्वतःचे अनुभव कथन करून सुसंस्कृत पिढी घडविण्याचे शिक्षण हे एक माध्यम आहे असे त्या म्हणाल्या शिक्षणातून सुसंस्कार मुलींनी घ्यावे, चांगल्या वाईटाची पारख करा. आई वडिलांचे ऋण, आपली संस्कृती विसरू नका. आपले राहणीमान, वर्तन चांगले ठेवा, शैक्षणिक प्रगती चांगली करा असे त्या म्हणाल्या .दुसरे पुष्प निंबोल गावच्या सरपंच सौ.वंदनाबाई संजय पाटील यांनी गुंफले. महिलांची राजकारणातील भूमिका या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यकाळ ते आजपर्यंत चा काळ पाहिला तर महिला सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहे स्त्रियांच्या राजकीय प्रवेशामुळे गावाच्या, देशाच्या विकासाला योग्य दिशा मिळते असे मनोगत व्यक्त केले. तिसरे पुष्प सौ. सुलभा किशोर पाटील यांनी गुंफले साहित्यातील स्त्रीया या विषयावर त्या बोलल्या त्यांनी अनेक साहित्यिक स्त्रियांची उदाहरणे कथन करून स्वरचित गुजर भाषेतील कवितांचे वाचन करून त्याचा अर्थ सांगितला. तिसऱ्या सत्राचे पहिले पुष्पगुच्छ सुरेखमणी ब्युटीकेयर रावेर च्या संचालिका सौ. सुरेखा मनिष पाटील यांनी गुंफले त्या स्त्री सौंदर्य आणि त्वचेची निगा या विषयावर बोलल्या. उत्तम व्यक्तिमत्वासाठी वेशभूषा, उत्तम आरोग्य आणि त्वचेची निगा आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या त्वचेची निगा कशी राखावी त्यासाठीचे घरगुती उपायांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले तसेच त्यांनी मेकअप चा डेमो दाखविला. दुसरे पुष्पगुच्छ श्रीमती जोत्स्ना महाजन यांनी गुंफले महिला बचतगट आणि महिलांचे उन्नयन या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. एकदंत महिला ग्राम संघा मार्फत त्यांनी 20 बचतगटाची स्थापना करून 200 महिलांना एकत्रित कसे केले याबाबत माहिती देऊन आज महिलाबचतगट विविध व्यवसाय यशस्वीरीतीने करीत आहे. दारिद्ररेषेखालील महिलांचा विकास बचत गटामुळे होत आहे असे त्या म्हणाल्या. त्यानंतर प्रश्नोत्तरे चे सत्र झाले वक्त्यांना विविध प्रश्न विचारून विद्यार्थिनीनी शंका समाधान केले. कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने आपल्या समारोपीय अध्यक्षीय भाषणात सावित्रीबाई फुलेंच्या कार्यामुळेच आज स्त्रिया आघाडीवर आहे.सावित्रीबाई फुल्यांचे कार्य समाजाला दिशा व प्रेरणा देणारे आहे. मुलींनी केवळ लग्नाचे वेटिंग म्हणून शिकू नये तर करियर साठी शिकावे. आभार प्रा. यास्मिन पटेल यांनी मानले विशेष सहकार्य प्रा. सुषमा मोतेकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेखा पाटील यांनी केले कार्यशाळेस ६४ विद्यार्थीनी सहभागी होत्या.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...