Wednesday, March 1, 2023

*चिखलदरा येथे विदर्भ स्तरीय पत्रकार संमेलन संपन्न*


*पत्रकारांनाच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तांनुबाई बिर्जे पत्रकार संघ सदैव तत्पर...*
  - *विलास पाटील, प्रदेश अध्यक्ष*
चिखलदरा :
तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद व्दारे विदर्भ स्तरीय पत्रकार संमेलन अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे संपन्न याझाले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील महाजन, स्वागताध्यक्षपदी म्हणून प्रदेश अध्यक्ष विलास पाटील, कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ पत्रकार व सुप्रसिद्ध विचारवंत चंद्रकांत वानखडे, मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहकरे, दिनेश कदम राष्ट्रीय सचिव मराठा वस्तीगृह कक्ष गणेश कापसे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद सूर्यकांतजी ससाने राष्ट्रीय प्रवक्ते तानुबाई बिजे पत्रकार परिषद  चिखलदरा येथील तहसीलदार माया माने, स्तंभलेखक व प्रसिद्ध विचारवंत प्रा प्रेम बोके, अध्ययन समाचार वृत्तपत्राचे संपादक जितेंद्र रोडे,देशौन्नती अमरावती आवृत्ती प्रमुख अमोल इंगोले, पत्रकार मनोज शर्मा, नारायण येवले, दैनिक पुण्यनगरी सुनील धर्माळे, मोहम्मद अशरफ, विनायक येवले, भंडारा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण फुंडे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष विलास गोंदिले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष मयूर वानखडे, जेष्ठ पत्रकार शिवदास मते, हेमंत निखाडे, शेखर चौधरी, संजय बनारसे, अरविंद गावंडे, इतर मान्यवर मंडळी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विलास पाटील यांनी केले होते.विदर्भ स्तरीय पत्रकार संमेलनाला यशस्वी करण्यासाठी तानूबाई ब्रिर्जे पत्रकार संघ अमरावती जिल्हा अध्यक्ष प्रवीण बोके, अंजनगांव तालुका अध्यक्ष रविंद्र वानखडे, तालुका सचिव उमेश काकड, सचिन अब्रूक, जयेंद्र गाडगे,सागर साबळे, सुजित काठोडे, मयुर राय, मनोहर मुरकुटे, गजेंद्र मंडलिक, सुनील माकोडे, महेंद्र भगत,शरद कडू, बाळासाहेब गोंडचौर, ज्ञानेश तुरखेडे, यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमा बोके यांनी केले प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार वासुदेव काळपांडे यांनी केले तर आभार रवींद्र वानखडे यांनी केले.

*यावेळी उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी सांगितले की, आजच्या पत्रकारासमोर फार मोठे आव्हान आहे.सध्याची स्थिती पाहता पत्रकारीता करणे फार अवघड झाले आहे.तेव्हा जागृत राहून पत्रकारिता करायला हवी असे मत त्यांनी मांडले.*
"*रविश कुमार यांच्या पत्रकारीची दखल जगभरात घेतली जाते. आशिया खंडातील सर्व श्रेष्ठ पत्रकारीतेचा पुरस्कार दिल्या जातो.पण भारतात अश्या खऱ्या पत्रकाराची दखल घेतली जात नाही.उलट त्यांना मजबूर करून पत्रकारितेमधून काढण्यासाठी कट कारस्थान रचून त्यांना मिडिया मधून काढण्यात येते ही फार मोठी दुःखाची बाब आहे. सध्या भारतात हुकूमशाही सुरू असून लोकशाही संपण्याचे कटकारस्थान सुरू आहे"*
- प्रा प्रेमकुमार बोके , स्तंभ लेखक

"*जगा सोबत चालणे शिका, पत्रकारिता करताना सोबत साईड बिझनेस सुध्दा सुरू करा, पत्रकारांनी एस.टी.पास मागण्या पैक्षा स्वतः ची कार घ्या अशी प्रगती करा . ग्रामीण भागातील प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम करत राहा.नकीच तुम्हाला यश मिळेल."*
- जितेंद्र रोडे, संपादक अध्ययन समाचार

"*आजची पत्रकारिता करणे खुप कठीण झाले आहे.पेपर नियमित चालवणे हे एक अवघड झाले आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.त्याचा आवाज दाबण्याचे काम सध्या सुरू आहे.पत्रकारांचे विविध समस्या आहे.त्याकडे सुध्दा लक्ष देण्याचे काम आहे."*
 - शिवदास मते, जेष्ठ संपादक ग्राम वैभव

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...