Friday, February 17, 2023

*देवकर रुग्णालयात आता डायलिसिस सुविधा उपलब्ध*



महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व ESIC अंतर्गत होणार मोफत उपचार

जळगाव : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशलिटी व आयुष रुग्णालयात आजपासून डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत तसेच ESIC च्या रुग्णांसाठी संपूर्णपणे मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय आरोग्य विमाधारकांसाठी रुग्णालयात कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे.

रुग्णालयात मूत्ररोग व किडनी रोगाच्या योग्य व अचूक निदानासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णालयात उपलब्ध आहे. या सुविधेचा आरोग्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी मोठा फायदा होणार आहे. त्यांचा डायलिसिससारख्या आजारावर होणारा मोठा खर्च यातून वाचणार आहे. 

*खालील लक्षणे असलेल्या रुग्णांनी देवकर रुग्णालयाची संपर्क साधावा*

* डायलिसिस चालू असलेले रुग्ण

* बीपी, डायबेटिसमुळे होणारे किडनीचे आजार

* चेहरा व हातापायांवर सूज असणे

* लघवी कमी होणे व लघवी लालसर होणे

* लघवीला जळजळ होणे किंवा लघवीतून पू येणे

* लघवीतून प्रोटीन जाणे

* भूक न लागणे व मळमळ, उलट्या होणे

* किडनी स्टोन (मुतखड्याचे आजार)

* लहान मुलांचे किडनी विकार

वरील लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांनी देवकर रुग्णालयातील मो. क्र. ,9422977071 यावर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...