Thursday, March 5, 2020

राजधानी एक्सप्रेसला भुसावळ स्थानकावर तांत्रिक थांबा देण्यात यावा. माजी महसूलमंत्री एकनाथरावजी खडसे व खासदार रक्षाताई खडसे यांची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी



काल दि. 4 मार्च रोजी रेल्वेमंत्री पियुषजी गोयल यांची भेट माजी महसूलमंत्री एकनाथरावजी खडसे व खासदार रक्षाताई खडसे यांनी घेतली.

आठवड्यातून चार दिवस 22221/22222 राजधानी एक्सप्रेस मध्य रेल्वे विभागातून सुरू आहे. राजधानी एक्सप्रेसमुळे जळगाव ते दिल्ली अंतर अत्यंत कमी वेळात पार पडत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील उद्योजक, विद्यार्थी, प्रवासी यांची मोठी सोय होत असल्याने सदर गाडी रोज सुरू करावी अशी मागणी केली.

राजधानी ट्रेनविषयी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अधिकाऱ्यांनी जळगाव येथे थांबा असल्यामुळे तांत्रिक अडचणी येत आहेत.
जळगाव स्थानकावर पाणी भरणे, चालक दल बदलणे या सुविधा उपलब्ध नाहीत. या सुविधा जळगाव स्थानकावर उपलब्ध करून देण्यासाठी भरपूर वेळ आणि निधीची तरतूद करावी लागेल. जळगाव हे जंक्शन असल्याने पश्चिम रेल्वेकडून नागपूर कडे जाणारी मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सुरू असते. चालक दलास भुसावळ येथून पाठवावे लागते त्याकारणाने भोपाळ येथे एक्सप्रेस पोहोचेपर्यंत त्यांच्या कामाच्या तासात वाढ होते याचा परिणाम त्यांच्या कार्यशैलीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भुसावळ येथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. भुसावळ येथे तांत्रिक थांबा दिल्यास वेळ आणि पैश्याची बचत होऊन गाडीला उशीर होण्याची शक्यता नाही. या मुद्द्यांवर विचार करून भुसावळ स्थानकावर 22221/22222 राजधानी एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा अशी मागणी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे आणि खासदार रक्षाताई खडसे यांनी रेल्वेमंत्री पियुषजी गोयल यांच्याकडे केली.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...