Tuesday, March 10, 2020

महिलांना आता एक नवी संधी,शाईन मिसेस महाराष्ट्र २०२० ची विजेती सारिका कदम, पहिली उपविजेती शीतल खोकाणी, दुसरी उपविजेती मंजुश्री सुतार ,

 मुंबई (तरुण तडफदार टीम)
ती फक्त घरात काम करते, तिला बाहेरच्या जगात काय चाललंय हे कुठे ठाऊक असतं... अशीच विधानं आपण आपल्या बायकोबद्दल, बहिणीबद्दल आणि वहिनीबद्दल करत असतो. परंतु हे सर्व प्रामाणिकपणे करत असताना आपल्या उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेव्हा ती उंबरठ्याबाहेर पाऊल टाकते तेव्हा तिची क्षमता आपल्या लक्षात येते. 
अशाच हरहुन्नरी विवाहित महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विनोद शिंदे यांनी आपल्या क्लॅप क्रिएशन्स संस्थेतर्फे "शाईन मिसेस महाराष्ट्र २०२०" या अनोख्या स्पर्धेचे आयोजन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आले होते. नुकताच याचा अंतिम सोहळा मुंबईत अभिनेत्री निशा परुळेकर, सिया पाटील आणि अभिनेते विजय कदम यांच्या उपस्थितीत हॉटेल कोहिनूर पार्क, प्रभादेवी येथे पार पडला.
संपूर्ण महाराष्ट्रातुन आलेल्या शेकडो विवाहित महिला स्पर्धकांमधून अंतिम फेरीत १५ महिलांची निवड करण्यात आली. या महिलांसाठी मुंबईत दोन दिवस इमेज कन्सलटिंग, लाईफ स्टाईल, रॅम्प वॉक, डाएट आणि स्कीन केअर आणि मेकअप टूटोरिअल इ. गोष्टींचे ग्रूमिंग सेशन घेण्यात आले. या स्पर्धेत विजेती ठरली सारिका कदम, पहिली उपविजेती शीतल खोकाणी आणि दुसरी उपविजेती ठरली मंजुश्री सुतार. 
या स्पर्धेसाठी रोसी बोन्स, अंजली नन्नाजकर आणि राखी सोनार यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले होते. प्रत्येक महिलेच्या अंगी वेगळा असा गुण असतो फक्त घर सांभाळण्यात तो गुण किंवा तो छंद हरवून जातो, या स्पर्धेमुळे तो त्यांना जोपासता यावा,जगासमोर आणता यावा यासाठी आम्ही हा पहिला प्रयत्न केला आणि यापुढे अशी स्पर्धा महाराष्ट्रात प्रत्येक शहरात घडवण्याचा आमचा मानस असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष विनोद शिंदे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...