Thursday, March 5, 2020

वायरल मेसेज,,,===आर्थिक नियोजन करा.**प्रत्येक व्यक्तिने आर्थिक नियोजन खालील प्रमाणे करावे, असे मला वाटते. अनेक नोकरी,धंदा,व्यवसाय नियोजन अभावी अडचणीत किंवा डब घाईला जातात.*

*💰आर्थिक नियोजन करा.*
*प्रत्येक व्यक्तिने आर्थिक नियोजन खालील प्रमाणे करावे, असे मला वाटते. अनेक नोकरी,धंदा,व्यवसाय नियोजन अभावी अडचणीत किंवा डब घाईला जातात.*

*👉 आपल्या महिन्याच्या एकूण इन्कम पैकी जास्तीत जास्त 25% च रक्कम ही घर खर्चासाठी वापरली गेली पाहिजे.बाकीच्या रकमेचे सुनियोजित नियोजन केले पाहिजे*

*👉दरवर्षी 25% रक्कम ही बँक कर्ज, देणी, ईतर देण्यासाठी नियोजन करुन बाजुला गुंतवणूक करुन ठेवावी.*

*👉 दरवर्षी 30% रक्कम ही धंदा,व्यवसाय वाढविण्यासाठी गुंतविली पाहिजे.*

*👉 दरवर्षी 10% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी बचत केली पाहिजे.*

*👉 दरवर्षी 10% रक्कम ही आपल्या मनोरंजनासाठी, वैयक्तिक वापरासाठी किंवा राखीव निधी म्हणून असावी.*

*👉बॅंकेतच एखादी मासिक गुंतवणूक म्हणून रिकरिंग (R.D).ही असावी कारण अडचणीच्या  वेळी कामाला येते.*

*👉कमीतकमी पुढील "6" महिन्यांचा घर-ऑफिस खर्चाची तरतूद अगोदरच असायला हवी, धंदा व्यवसायात मंदि आली तरीही त्यावर "6" महिने पुढील सोय होईस्तोपर्यंत आपले घर व इतर खर्च चालवता येतील.*

*👉 सेकंड होम ही इन्व्हेस्टमेंट नाही.सर्व्हे असे दर्शवतो को सेकंड होम हे एकूण व्याज,खर्च,आणि वाढती महागाई वगळून जास्ती जास्त 5% फायदा करून देऊ शकते.*

*👉 "50" वयानंतर कुठली ही देणी, कर्जे आपल्या अंगावर शक्यतो असू नयेत ,कारण या काळात मुलांची उच्चशिक्षण, लग्न ही या काळात होतात त्याचे प्लॅनिंग आपल्या "25" वर्ष वयापासूनच करायला हवेत.*

*👉 बँकेत पती-पत्नीचे जॉईंट अकौंट असणे अनिर्वाय व आवश्यकच आहे. सदर खात्यावर वर्षातून एकदातरी व्यवहार करा म्हणजे बैंक खाते नियमित चालू राहील*

*👉 आपली प्रॉपर्टी ही पती-पत्नी दोघांच्या नावे असावी, कारण कायदेशीररीत्या पती/पत्नीच्या मृत्यू नंतर पत्नी/पती वारसदार असतात आणि नंतर मुले असतात.*

*👉 प्रत्येकाचा जनरल व मेडिक्लेम इन्शुरन्स असणे गरजेचे आहे.कारण काही अचानक संकटात तेच आर्थिक मदत म्हणून कामाला येते*

*👉 टर्म इन्शुरन्स असणे ही आता काळाची गरजच आहे, हेच पुढे तुमच्या कुटुंबाला संरक्षण देते.*

*👉 कुठलेही इन्व्हेस्टमेंटचे निर्णय हे भावनिक दृष्टिकोनातून घेऊ नये.पूर्ण विचार करुन आर्थिक नियोजन सांभाळून करावी कर्जबाजारी होऊन करू नये*

*👉 आजच्या युगात मेडिक्लेम असणे अत्यंत आवश्यक आहे हॉस्पिटलाचा खर्च खुप वाढलेत त्यासाठी प्रत्येक कुटुंबात मेडिक्लेम पॉलिसी ही अत्यन्त गरजेची आहे.*

*👉 जर बँकेत चोरी, किंवा आग लागल्यास आपल्या बँकेतील लॉकर वर फक्त आता पाच लाख पर्यन्त रक्कम बँक रिटर्न म्हणून देऊ शकते.उरलेले नुकसान आपले असते.*
*👉 तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करणे टाळू नाही शकत,पण योग्य इन्व्हेस्टमेंट करून टॅक्स कमी करू शकतात.तुमचे उत्पन्न जास्त असो वा कमी असो, टॅक्स फाईल केल्यास भविष्यात खूप फायदे होतात.सर्वात मोठा फायदा म्हणजे योग्य लोन, हेच तुम्हाला धंदा व्यवसायात पुढे नेऊ शकते.*

*👉 सर्व संपत्ति,जमीन,जागा,गुंतवणूक,सर्व कर्जे, इतर येणी/देणी फायनेन्शियल कागदपत्रे ही व्यवस्थित ठेवा,याची माहिती आपल्या कुटुंबाला सर्व जबाबदार म्हणजे पती/पत्नी ,मुले, इत्यादिना आवश्य देऊन ठेवाच. जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत किंवा तुमच्या संकटात तुमचे फॅमिली मेंबर्स ते योग्यप्रकारे वापरु शकतील.*

*👉आपला प्रोग्रेस ग्राफ दर तीन महिन्यांनी चेक करा.कारण त्या ग्राफ प्रमाणे आपली इनवेस्टमेंट, व्यवसाय निर्णय बदलता येतात.विचार करा व पुन्हा वाचा व आताच निर्णय घ्या!दिवसा मागुन दिवस,वर्षा मागुन वर्ष निर्णयाशिवाय कसे निघुन जातात हे कळत नाही.म्हणुन..आजच या मुद्द्यांवर आधारीत उज्वल व सुरक्षित भविष्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करा...!*
-----------------------
💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹 अाधिक माहिती साठी संपर्क साधावा 8208361187

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...