Monday, March 9, 2020

रावेर येथे आज होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 रावेर येथे आज होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  अंबिका व्यायामशाला स्वामी विवेकानंद चो क, भाजी मार्केट ,आठवडे बाजार आदित्य इग्लिश स्कूल आदी  विविध ठिकाणी शहरात ठिकठिकाणी होळी साजरी केली होळी वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणारा एक महत्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंगांच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस साजरा करतात. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धूलिवंदन असे म्हटले जाते. *होळीची विधीवत पुजा राकेश गडे यांच्या हस्ते करण्यात आली*. *पुजा करुन होळी पेटविण्यात आली*. व मुलांनी *होळी रे होळी पुरणाची पोळी साहेबाच्या पाठीवर बंदुकाची गोळी अशा घोषणा दिल्या*. तसेच *राहुल पाटील यांनी विद्यार्थांना  जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णू चे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपू ला अजिबात पसंत नव्हते. वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे*. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लाद ला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं कि तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेंव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रह्लाद ला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अश्या प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले. असे सांगुन होळीचे मार्गदर्शन केले. व *अदित्य इंग्लिश मेडियम स्कुल चे मुख्याध्यापक श्री.संजय पाटील व श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक विदयालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मनिषा सोहनी यांनी सर्व विद्यार्थांना  होळीच्या शुभेच्छा दिल्या*. *कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले*.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...