Tuesday, November 15, 2022

आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती दिन साजरा


जळगाव :- इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरुद्ध आदिवासींचे  संघटन उभारून क्रांती लढा उभारणारे जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त त्यांच्या शौर्य शाली  इतिहासाला उजाळा देऊन शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
     महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने काव्य रत्नावली चौकात बिरसा मुंडा जयंती दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन केले होते.
      यावेळी अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी बिरसा मुंडा यांचा पराक्रमी इतिहास सांगताना जिथे जिथे अन्याय अत्याचार आहे,तिथे विद्रोह, बंड पुकारणाऱ्या कार्यकर्त्यांना बिरसा मुंडे हे प्रेरणा देतात.आज देशात,जमातवाद,धर्मवाद वाढीस लागला असून देशाची एकात्मता धोक्यात आली आहे.अशा भयग्रस्त काळात नागरिकांना संकटाची जाणीव होत नसेल तर त्यासाठी लोकचळवळ उभारावी लागेल.
      याप्रसंगी संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे,शिरतुरे यांनी आपले विचार व्यक्त करून बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकला.
       सुरुवातीला आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मुकुंद सपकाळे, सचिन धांडे यांनी पुषपहार अर्पण केले.
     सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी तर आभार वाल्मीक सपकाळे यांनी मानले.यावेळी प्रा.प्रीतीलाल पवार,अमोल कोल्हे,रमेश सोनवणे,दिलीप सपकाळे,मिलिंद सोनवणे,  बापूराव पानपाटील,महेंद्र केदारे,साहेबराव वानखेडे,संजय सपकाळे,सुभाष साळुंखे,सुधाकर पाटील,श्रीकांत बाविस्कर,चंद्रकांत नन्नवरे,अजय मनोरे,कृष्णा सपकाळे,विजय सुरवाडे,सचिन बिऱ्हाडे,दिलीप त्र्यंबक सपकाळे,विवेक जावळे,संजय सपकाळे,भिमराव सोनवणे,भारत सोनवणे,सत्यजित सपकाळे,राहुल सपकाळे यांच्यासह विविध संघटनाचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...