Saturday, May 23, 2020

५५ ते ६० वयोगटातील काम करणारे आढळल्यास कार्यवाही --प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले


फैजपूर ता. यावल 

रावेर यावल तालुक्याचाफैजपूर प्रांतात कोरोना च्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या दुकानांमध्ये ५५ ते ६० वर्षे वा त्या वरील वयोगटातील दुकान मालक अथवा त्या वयोगटातील कामगार आढळल्यास दुकाने सील करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी एका लेखीपत्रा असे आदेश जारी केले आहेत. याचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे,
       प्रांताधिकारी थोरबोले यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्यात दिनांक १४ मार्च पासून साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणीही सुरू झालेली आहे. विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोना ची बाधा होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण हे साधारणत: ५५ ते ६० वयोगटातील असल्याने हे आतापर्यंतच्या वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
       त्यामुळे या वयोगटातील व्यक्ती कोणत्याही कारणास्तव घराच्या बाहेर पडणे हे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे. असे असतांनाही अनेक ठिकाणी फळ विक्री, किराणा दुकानदार, भाजीपाला व विक्री करणारे व्यापारी तसेच अन्य अत्यावश्यक सेवा देण्यासाठी परवानगी दिलेल्या दुकानांमध्ये बऱ्याच ठिकाणी याच वयोगटातील दुकानमालक, मजूर काम करीत असताना व खरेदीसाठी त्याच वयोगटातील नागरिक येत असल्याचे दिसून येत आहेत. तर त्यांच्यासोबत लहान मुलेसुद्धा येतात त्या ठिकाणी  सोशल डिस्टन्सींगचे पालन होताना दिसत नाही.या वयोगटातील व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी असल्याने व अशा व्यक्तीस मधुमेह, हृदयरोग व अन्य आजाराचे प्रमाण असल्याने अशांना संसर्ग लवकर होण्याची शक्यता असते.
    त्यामुळे दुकानांमध्ये ज्येष्ठ नागरिक वयोगटातील व्यक्तींना पाय बंदी घातलेली आहे. तसे आढळल्यास दुकाने सील करण्याची स्थानिक स्वराज्य व पोलीस प्रशासन यांना आदेश करण्यात आलेले आहे तर या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांनी विरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी थोरबोले यांनी आदेशात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...