Saturday, May 2, 2020

ताजा व्हायरल मेसेज😊😊💃👍👍🤓 जागतिक हास्य दिन: आरोग्याच्या दृष्टीनं हसण्याचे दहा फायदे

😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃
🌞 शुभ प्रभात 🌞
🌹 शुभ दिन रविवार 🌹
😍 जागतिक हास्य दिन 😍
📰 वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन 📰
🌞 आंतरराष्ट्रीय सुर्य दिन 🌞
🌻 जागतिक श्वसनदाह निवारण दिन 🌻
🌷 चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर ज.दिन 🌷
🌸 भारतीय राजकारणी उमा भारती ज.दिन 🌸
🥀 भारताचे संरक्षणमंत्री व मुत्सद्दी व्ही.के.कृष्ण मेनन ज.दिन 🥀
💐 प्रमोद महाजन स्मृतिदिन 💐
💐 कवी विठ्ठल दत्तात्रेय घाटे स्मृतिदिन 💐
💐 अभिनेत्री नर्गिस दत्त स्मृतिदिन 💐
0⃣3⃣—0⃣5⃣—2⃣0⃣2⃣0⃣
📰📰📰📰📰📰📰📰📰📰📰📰📰
हसण्याचे दहा फायदे!

Updated: May 03, 2018, 12:11 PM IST

जागतिक हास्य दिन: आरोग्याच्या दृष्टीनं हसण्याचे दहा फायदे!

आज जागतिक हास्य दिन... सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसाचा निवांतपणा हरवला गेलाय. ताणतणाव आणि दगदग जगण्याचा हिस्सा झालाय. त्याचा परिणाम शारीरिक तसंच मानसिक स्वास्थ्यावर होतो. हे टाळण्याचा साधासरळ उपाय म्हणजे खळखळून हसणं. हसण्याचं महत्त्व समजून देण्यासाठीच जगभर हा दिवस साजरा केला जातो. 
मुंबई: आज जागतिक हास्य दिन... सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसाचा निवांतपणा हरवला गेलाय. ताणतणाव आणि दगदग जगण्याचा हिस्सा झालाय. त्याचा परिणाम शारीरिक तसंच मानसिक स्वास्थ्यावर होतो. हे टाळण्याचा साधासरळ उपाय म्हणजे खळखळून हसणं. हसण्याचं महत्त्व समजून देण्यासाठीच जगभर हा दिवस साजरा केला जातो. 

विविध लाफ्टर क्लबतर्फे नेहमीच हा संदेश दिला जातो. आजच्या दिवशी लोकांनी आवर्जून लाफ्टर क्लबला हजेरी लावली आणि आनंदी जीवनाचा मूलमंत्र असलेल्या हसण्याचा आनंद अनुभवला. 

जाणून घ्या आरोग्याच्या दृष्टीने हसण्याचे दहा महत्वपूर्ण फायदे -

हसणे हे अनेक रोगांवर गुणकारी ठरू शकते. व्यस्त दिनक्रमात स्वत:साठी आनंदाचे दोन क्षण काढणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारी ठरते. नियमित हसणे स्वभाव आणि आरोग्य दोन्हीसाठी चांगले आहे.

१. खाण्याची कमी इच्छा
मनमुराद आणि मोकळेपणाने हसल्याने शरीरात एंडोर्फिस हार्मोन सक्रिय होतात. ज्यामुळे खाण्याची इच्छा किंवा लालसा नियंत्रणात राहते. मूड खराब झाल्यावर पीडित व्यक्तीला जास्त गोड किंवा चटपटीत खाण्याची तीव्र इच्छा होते.
२. अँटी एजिंग
चेहऱ्यावरील स्नायू सक्षम ठेवणे आणि रक्तसंचार वाढवण्यात हसण्याची भूमिका महत्त्वाची असते. यामुळे चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहतो. एका संशोधनानुसार मधुमेहाने पीडित लोकांनी जेवण केल्यानंतर कॉमेडी शो पाहिल्यास ब्लड शुगर बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात राहतो.

३. प्रतिकार क्षमता
आनंदी राहिल्याने शरीराची प्रतिकार क्षमता आणि संसर्गासोबत लढणारी प्रणाली सक्षम होते. याच्यामुळे विविध संसर्ग आणि अ‍ॅलर्जीच्या प्रभावात येण्यापासून बचाव होतो. त्याचप्रमाणे अनेक आजारांना दूर ठेवण्याची शक्ती मिळते.

४. मूड बदला
एकटे राहण्यापेक्षा जे लोक मिळून मिसळून राहतात. ते तीस टक्के जास्त हसतात. यासाठी सदैव मित्रांसोबत राहा. नवे मित्र तयार करा. त्यांच्यासोबत चांगला वेळ व्यतीत करा.

५. हृदयासाठी फायदेशीर
एका संशोधनानुसार १० मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी हृदयगती तीव्र होते. तेवढ्या हृदयगतीसाठी एक मिनिट हसणे पुरेसे ठरते.

६. ऊर्जा वाढते
हसत राहिल्याने शरीरातील ऊर्जेच्या स्तरावर चांगला परिणाम होतो. या ऊर्जेमुळे तुम्ही काम किंवा वाचनावर लक्ष केंद्रित करू शकता. तसेच या पद्धतीने कामाची गुणवत्तासुद्धा वाढवता येते.
७. नात्यांसाठी उपयुक्त
हसमुख राहिल्याने व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात आणि त्याचे वागणे सकारात्मक राहते. क्लोज रिलेशनशिप असणाऱ्यांमध्ये हास्य संबंध वृद्धिंगत करणारा घटक ठरतो. हसमुख आणि नेहमी उत्साही राहणाऱ्या व्यक्तीकडे लोक आकर्षित होतात, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

८. तणावापासून मुक्ती
हसल्यामुळे स्टड्ढेस हार्मोन्स कार्टिसोल नियंत्रणात असतो. परिस्थिती कितीही तणावपूर्ण असू द्या. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे डोपामाइन आणि ग्रोथ हार्मोन्सची सक्रियता वाढते.

९. वजन नियंत्रणात
वजन वाढण्यासाठी जास्त खाणे आणि तणाव या गोष्टी जबाबदार असतात. आनंदी आणि हसमुख राहिल्याने तणाव वाढत नाही .त्याप्रमाणे चटपटीत खाण्याची इच्छा होत नाही परिणामी वजन नियंत्रणात राहते.

१०. दुखण्यावर नियंत्रण
हसल्यामुळे शरीरात एंडोर्फिस हा फील गुड करणारा घटक क्रियाशील झाल्याने विविध भागात होत असलेले दुखणे कमी होते. हा रासायनिक घटक पेन किलरप्रमाणे काम करत असतो.
🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...