Friday, September 11, 2020

महाराष्ट्र बॅड कलाकार उत्कर्ष संघटना यांच्या माध्यमातूनपालकमंत्री तसेच अनेक नेत्यांना निवेदन सादर करून चर्चा

सावदा ,महाराष्ट्र बॅड कलाकार उत्कर्ष संघटना यांच्या माध्यमातून मागील आठवड्यात रावेर तालुक्यातील सावदा येथे घेण्यात आलेल्या मिटींगला जो ठराव झाला होता त्या अनुषंगाने आज रावेर,   यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी श्री बबन बडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 11 रोजी शुक्रवारी सकाळी 10 वाजता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांना आज निवेदन सादर केले त्यांनी निवेदन स्वीकारले व आवर्जुन सांगितले की मी तुमचा हा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती उपाययोजना केल्या शिवाय राहणार नाही. त्यावेळी रावेर मुक्ताईनगर व यावल तालुक्यातील उपविभागीय उपाध्यक्ष श्री राजू बोरसे तसेच जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मास्टर शेख रफी , रावेर तालुका अध्यक्ष श्री नीरज सोनवणे , आतिष केदारे व किशोर लोखंडे यांची सुद्धा उपस्थिती होती. 
नंतर पाळधी येथिल भेट घेतल्यानंतर जळगाव ला आले असताना मा. उपजिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली तसेच मा श्री गिरीश महाजन , श्री उमेशदादा पाटील , श्रीमती रक्षाताई खडसे यांनाही निवेदन देऊन त्यांच्या माध्यमातून सुध्दा आपल्या कामाची दखल घेतली जाणार आहे असे सर्वांनी मिळून आश्वासन दिले आहे. व ते आपल्या कार्याचा पाठपुरावा करून दुर्गादेवी उत्सवाच्या वेळे पर्यंत तुम्हाला परवानगी देण्यात येईल अशी आम्ही योजना करणार आहे असे श्री गिरीश महाजन यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...