Tuesday, September 1, 2020

*🙏💐'सामना'चे हिंगोली प्रतिनिधी योगेश पाटील यांचे हृदयविकाराने निधन*

💥💥एक पत्रकार हरवला,✍️
*🙏💐'सामना'चे हिंगोली प्रतिनिधी योगेश पाटील यांचे हृदयविकाराने निधन*

*'दैनिक सामना'चे हिंगोली येथील जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील यांचे रविवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. ते 41वर्षांचे होते. योगेश पाटील यांच्या आकस्मिक निधनाने पाटील परिवार आणि सामना परिवारावर शोककळा पसरली आहे.*

*योगेश पाटील यांना संभाजीनगर येथील नंदलाल धूत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विलास मगरकर यांच्यासह त्यांची टीम योगेश पाटील यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होती. मात्र पाटील यांची गेली 24 तास सुरू असलेली मृत्यूशी झुंज संपली. योगेश पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी संभाजीनगर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले*

*त्यांच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाचा लहान मुलगा, आई, तीन भाऊ, बहीण असा परिवार आहे. आधी धर्माबाद जिल्हा नांदेड येथील तालुका प्रतिनिधी, नंतर सामना च्या नांदेड कार्यालयात शहर प्रतिनिधी, पुढे उत्तर महाराष्ट्रात जळगाव येथे जिल्हा प्रतिनिधी आणि पुन्हा मराठवाड्यात हिंगोली येथे जिल्हा प्रतिनिधी म्हणून योगेश पाटील यांनी काम केले. अत्यंत सचोटीचे, स्पष्टवक्ते आणि धडाकेबाज पत्रकार असलेल्या योगेश पाटील यांचा नांदेड, जळगाव आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांत दांडगा जनसंपर्क होता.*

 त्यांना तरुण तडफदार पत्रकार ग्रुपमार्फत भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...