Wednesday, June 30, 2021

इंजिनियरिंग कॉलेज विद्यार्थी चे शुल्क कमी केल्यामुळे वीस हजार मुलांना लाभ,दिल्याबद्दल सरकार चे अभिनंदनअन्य कॉलेज बाबतीत लवकर निर्णय घ्यावा - प्रशांत बोरकर

इंजिनियरिंग कॉलेज विद्यार्थी चे शुल्क कमी केल्यामुळे वीस हजार मुलांना लाभ,दिल्याबद्दल सरकार चे अभिनंदन
अन्य कॉलेज बाबतीत लवकर निर्णय घ्यावा  - प्रशांत बोरकर
मुंबई=जळगाव=
महाराष्ट्र सरकारने या संदर्भात आज शासकीय  इंजिनिअिंगचे शुल्क सोळा हजार पाचशे रुपये प्रति विद्यार्थी बाबत तसेच जिमखाना शुल्क कमी केले आहे  त्यामुळे विसं हजार विद्यार्थी वरगाला दिलासा मिळणार आहे
श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय यांना गेले वर्ष भरापासून शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा आणि फी माफ करावी अशी मागणी केली आहे तसेच चार जून रोजी उपोषणाचा इशारा दिला होता 
मुख्य मंत्री कार्यालयाने याबाबत दोन मिनिटात उत्तराचा ईमेल श्री प्रशांत बोरकर यांना करून उच्च शिक्षणाच्या मंत्रालयाकडे पाठविले होते  केवळ इंजिनियरनिग अभ्यासक्रम बाबतीत निर्णय घेण्यात आला आहे तो इतर अभ्यासक्रम बाबतीत निर्णय घेण्यात यावेत अशी मागणी श्री बोरकर यांनी केली  आहे,
  तसेच  संस्था आणि खाजगी  संस्था यांना  तसेच अन्य सर्व प्रकारच्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत सर्व प्रकारच्या अनुदान आणि शिश्यवूर्ती चा  आढावा घेवून सर्वांना  मोफत शिक्षण देण्याचा आदेश देवून लोकांना मारामारीत दिलासा द्यावा ही अपेक्षा मानवी हक्क कार्यकर्ता मुक्त पत्रकार श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र आणि उच्च शिक्षण  मंत्री यांना केली आहे

Wednesday, June 2, 2021

*भेंडी :- आरोग्याचे पॉवर हाऊस!* खूप माहितीपूर्ण लेख



*भेंडी :- आरोग्याचे  पॉवर हाऊस!*

माणसाच्या ५० टक्के आजाराला त्याचे पोट कारणीभूत असते.
 *पोट नीट असलं की स्वास्थ्य आलबेल राहू शकते. त्यासाठी एक साधी भाजी महत्त्वपूर्ण कार्य करते ती म्हणजे शेंगेसारखी दिसणारी भेंडी ही भाजी होय. भेंडीच्या आत चविष्ट बिया असतात पण जाडसर, पारदर्शक द्रव असतो. काहींना ती आवडत नाही. पण तुमच्या पोटाचे विकार विशेषतः बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीच्या त्रासांवर भेंडी उत्तम इलाज असल्याचे आढळले आहे. या भाजीचा नियमित खुराक पचनेंद्रियांच्या कार्यासाठी लाभदायक ठरतो.*

*अमेरिकन युनिव्हर्सिटीतील* एक संशोधक  डॉ. सिल्विया  यांच्या नोंदणीनुसार भेंडीची भाजी ही विविध अन्नद्रव्यांचे पॉवर हाऊस आहे. 
त्यातील अर्धा हिस्सा गम आणि पेक्टिनच्या धाग्याच्या रुपात असतो. त्यातील विद्राव्य तंतूमय अन्नामुळे रक्तातला कोलेस्टरॉल कमी होतो, 
तसेच हृदयविकार मंदावतात. जो अतिद्रव्य तंतूमय चोथा असतो तो पचनेंद्रियाचा मार्ग मोकळा ठेवण्यास हातभार लावतो. 
भेंडी सतत खाल्ल्याने आतड्याच्या कर्करोगापासून आपली सुटका होते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठीसुद्धा या भाजीचा हातभार लागतो.

या भाजीत बी-६ हे जीवनसत्त्व तसेच शरीराला उपयुक्त असे फॉलिक आम्लदेखील मुबलक असते. 
शिजविलेल्या अर्धा कप भाजीत खालीलप्रमाणे अन्नसाठा असतो: कॅलरीज – २५ तंतूमय अन्न – २ ग्रॅम प्रथिने – १.५ ग्रॅम कार्बोहायड्रेटस् – ५.८ ग्रॅम जीवनसत्त्व अ – ४६९ युनिट जीवनसत्त्व क – १३ मिलीग्रॅम फॉलिक आम्ल – ३६.५ मिलीग्रॅम लोह – ०.४ मिलीग्रॅम पोटॅशियम – २५६ मिलीग्रॅम मॅग्नेशियम – ४६ मिलीग्रॅम भेंडीतील पातळ, 
*चिकट द्रव्यामुळे आतड्यातील साखरेचे शोषण कमी होते व रक्तात वाढणार्‍या साखरेचे प्रमाण रोखले जाते.*

भेंडीतली जीव रसायने कोलेस्टरॉलच्या नव्हे तर यकृतरसातील विषारी पदार्थाशी परमाणूशी संयोग पावतात व शरीराबाहेर टाकण्यास सहाय्य करतात. भेंडीतील तंतूमय भाग *बद्धकोष्ठता रोखतो.*

हे तंतू मऊ असल्यामुळे अन्य कठीण वनस्पतीज तंतूप्रमाणे ते आतड्याच्या आतल्या मऊ मांसल थरांना ओरखडे पाडीत नाहीत. त्याच्या घसरट गुणधर्मामुळे न पचलेल्या अन्नाचा घन भाग मोठ्या आतड्यातून सहज निसटत गुदद्वारामार्गे शरीराबाहेर पडतो.
शरीराच्या स्वास्थ्याला पोषक ठरणार्‍या जीवाणूच्या वाढीस ही भाजी हातभार लावते. *अशक्तपणा, थकवा व मानसिक तणाव घालविण्यासाठी ही भाजी खुप उपयोगी पडते. फुफ्फुसाला होणारे संसर्ग, गळ्याचे विकार, खाज यासाठी सुद्धा उपाय म्हणून भेंडीची भाजी लागू पडते.*
 या सर्व प्राप्तीसाठी भेंडीची भाजी अर्धवट उकळवून खाल्लेली बरी असा सल्ला दिला जातो.

विशेष चव तसेच चिकट आणि बुळबीळत गुणधर्मामुळे भेंडीची भाजी पाहिली की, अनेकजण नाक मुरडतात. पण, भेंडी या फळभाजीत अनेक पोषण तत्वे असून, नियमित भेंडीचे सेवन केल्यास कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव होतो.
*भेंडी ही फळभाजी आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे.* 

भेंडीमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आणि प्रोटीन्स असतात. शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त बनवण्यासाठी आवश्यक असलेले वसा, रेशा, कार्बोहाइड्रेट, कैल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम यासारखे जीवनसत्वे भेंडीमध्ये आहेत.
भेंडी कॅन्सर सारख्या रोगापासून आपला बचाव करते. 
*आपल्या शरीरातील विषारी सत्वे नष्ट करण्याचे काम भेंडी करते.*

भेंडीत असलेले यूगेनॉलमुळे डायबिटीस या आजारापासून बचाव होतो. तर, यातील फाइबर रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.
ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांनी नियमीत भेंडीचा आहार घ्यावा. 
*भेंडीत असलेल्या फायबरमुळे आपल्या शरीरातील कॅलरी वाढत नाही आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते.*

भेंडी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यात व्हिटामीन सी हे जीवनस्तव असते. हे आपली इम्यूनीटी सिस्टमला ताकद वाढवून खोकला आणि थंडी पासून बचाव करते. तर, 
*यातील व्हिटामीन ए हे जीवनसत्व डोळ्यांना निरोगी ठेवते.*


*भेंडीचे १० फायदे:*

हिरव्या भाज्यांमध्ये आपले एक वेगळे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगरसुध्दा म्हटले जाते. भेंडी ही अनेकांच्या आवडीच्या भाज्यांमधील एक आहे, तर काही लोकांना भेंडी बिलकुल आवडत नाही. परंतु भेंडी खाल्याने कोणते फायदे आणि नुकसान होतात हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत नसतील तर नक्की वाचा हे १० फायदे:

*१. कँसर* -भेंडी आपल्या आहारा नियमित घेतल्याने तुम्ही कँसरला दूर ठेवु शकता. कोलन कँसरला दूर ठेवण्यासाठी भेंडी खास फायदेशीर आहे. ही आतड्यांतील विषारी तत्त्व बाहेर काढण्यासाठी मदत करते, ज्यामुळे आतडे स्वस्थ राहतात आणि चांगल्या प्रकारे काम करता.

*२. हृदय*
भेंडी हृदयाला सुध्दा चांगले ठेवते. यामध्ये असलेले पैक्टिन, कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात, यासोबतच यामध्ये असणारा घुलनशील फायबर, रक्त आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतो. ज्यामुळे हृदय रोगाचा धोका कमी होतो.

*३. डायबिटीस*
यामध्ये असणारे यूगेनॉल, डायबिटीससाठी खुप फायदेशीर ठरते. हे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासुन थांबवते, ज्यामुळे डायबिटीसचा धोका कमी होतो.

*४. अनीमिया*
भेंडी अनिमियासाठी खुप फायदेशीर असते. यामध्ये असलेले आयर्न हीमोग्लोबिन निर्माण करण्यात सहायक असतात. हे रक्त स्त्राव थांबवण्याचे काम करते.

*५. पचनतंत्र*
भेंडी ही भरपुर फायबर असलेली भाजी आहे. यामध्ये असलेले फायबर पचनतंत्रासाठी फायदेशीर आहे. यामुळे गॅस, बध्दकोष्ट आणि पोट दुखी यासारख्या समस्या होत नाही.

*६. हाडांना मजबुत बनवते*
भेंडीमध्ये असणारे सर्व पदार्थ हाडांसाठी उपयोगी असतात. यामध्ये मिळणारे व्हिटॅमिन के हाडांना मजबुत बनवण्याचे कार्य करते.

*७. इम्यून सिस्टम*
भेंडीमध्ये व्हिटॅमिन-सी सोबतच अँटीऑक्सीडेंसही मोठ्या प्रमाणात असते. यामुळे हे इम्यून सिस्टमला मजबुत बनवुन शरीरातील आजारांपासुन लढण्यास मदत करते. भेंडीला रोजच्या जेवनात घेतल्याने अनेक आजार जसे की, खोकला, सर्दी यांसारख्या समस्या होत नाही.

*८. डोळ्यांचा प्रकाश*
भेंडीमध्ये व्हिटॅमिन-ए, बीटा केरोटीन आणि अँटी-ऑक्सीडेंट्स असतात. नेत्रहिनतेसाठी जे कण हानीकारक असतात त्यांना नष्ट करण्याचे काम भेंडी करते. भेंडी मोती बिंदुपासून दुर ठेवते.

*९. गर्भावस्था*
गर्भावस्थेमध्ये भेंडीचे सेवन फायदेशीर असते. भेंडीमध्ये फोटेल नावाचे एक पोषक तत्त्व असते, जे भ्रूणाच्या मेंदुचा विकास करण्यात महत्त्व पुर्ण भुमिका बजावते. या व्यतिरीक्त भेंडीत अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
*१०. वजन कमी करण्यासाठी*
भेंडी आपले वजन कमी करण्यासोबत त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते. भेंडीचा उपयोग केसांना सुंदर, दाट आणि चमकदार करण्यासाठी केला जातो. यामधील पदार्थांना लिंबु सोबत मिसळुन शांपु प्रमाणे वापरता येऊ शकते.
ज्यांनी ही माहिती लीहली आहे त्याला आमचा सलाम

Friday, May 28, 2021

मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे तसेच गुहमंत्री यांना होमगार्ड चे प्रश्नाबाबत पत्रकार प्रशांत बोरकर यांचे पत्र

मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे तसेच गुहमंत्री यांना होमगार्ड चे प्रश्नाबाबत 
पत्रकार प्रशांत बोरकर   यांचे पत्र
गेल्या वर्षापासून होमगार्ड बांधवांना   बंदोबस्त मिळत नसून वयाचे पन्नास चे वरील होमगार्ड बांधवांना वगळण्यात आले आहे अश्या प्रकारे  कर्तव्य निभावणारे होमगार्ड बांधवांना आता कोरोना महामारीत उपासमारीची वेळ आली आहे त्यासाठी सरकारने काही तरतूद करून त्यांना मदत करावी अश्या आशयाचे पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय श्री उद्धव जी बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे तसेच  गृहमंत्री ना दिलीप वळसे पाटील साहेब आमदार कपिल पाटील साहेब जिल्हाधिकारी साहेब तसेच अन्य मंत्री यांना पाठविले आहे

Friday, May 14, 2021

नीतीश कुमार बड़ा ऐलान ,,बिहार में पत्रकारों को भी शामिल किया फ्रंटलाइन वर्कर की श्रेणी में





नीतीश कुमार बड़ा ऐलान पत्रकारों को भी शामिल किया फ्रंटलाइन वर्कर की श्रेणी में।
पटना बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार के निर्देश पर पत्रकारों के हित में राज्य सरकार ने बड़ा निर्णय लिया है। राज्य सरकार द्वारा सूचना एवं जन-संपर्क विभाग द्वारा एक्रिडियेटेड सभी पत्रकारों के साथ-साथ जिला जन-सम्पर्क पदाधिकारी द्वारा सत्यापित नन एक्रिडियेटेड पत्रकारों (प्रिन्ट, इलेक्ट्रॉनिक एवं बेव मीडिया आदि) को प्राथमिकता के आधार पर कोविड-19 टीकाकरण हेतु फ्रंटलाइन वर्कर की श्रेणी में शामिल करने का निर्णय लिया गया है। ऐसे सभी चिह्नित पत्रकारों को प्राथमिकता के आधार पर कोविड-19 का टीकाकरण किया जायेगा। कोरोना संक्रमण के दौर में पत्रकार अपनी भूमिका का बेहतर निवर्हन कर रहे हैं। वे कोरोना संक्रमण के खतरों के प्रति भी लोगों को जागरूक कर रहे हैं।2/5/2021

कोविड 19 मुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लक्ष सानुगृह अनुदान योजनेस मुदतवाढ*

*प्रेस नोट*

*राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या मागणी मान्य .कोविड 19 मुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लक्ष सानुगृह अनुदान योजनेस मुदतवाढ*

दिनांक: १४.५.२०२१

राज्यात कोविड 19 चा प्रभाव कायम असताना राज्य सरकार विविध उपाय योजना करत आहे परंतु त्याची अंमलबजावणी मात्र कर्मचारी वर्गावर अवलंबून आहे त्यामुळे याकामी अनेक कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना या रोगाला बळी पडत आहे प्रसंगी मृत्यू ही पावत आहेत ,सरकारने अशा  कर्मचारी वर्गासाठी 50 लक्ष रुपये सानुगृह अनुदान मंजूर केले आहे तथापि या योजनेची मुदत दिनांक 31/12/2020 रोजी सम्पली होती त्यामुळं या योजनेचा फायदा मृत्यू बाधित कर्मचारी वर्गाला होत नव्हता त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेने मुख्यमंत्री अर्थ मंत्री तथा उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री ग्रामविकास मंत्री यांना अनेकवेळा ही बाब निवेदन देऊन निदर्शनासआणून दिली .प्रथमतः29/05/2020 रोजी च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानवये 30/09/2020 पर्यत व नंतर14/10/2020 च्या शासन निर्णयानुसार 31/12/2020 पर्यत ही योजना लागू केली होती त्यानंतर मात्र 4 महिने  संपले तरी त्यास मुदतवाढ दिली नाही व अनेक कर्मचारी यांचा या कालावधीत मृत्यू देखील झाला परंतु या निर्णयाची मुदत सम्पली असल्याने याचा काहीही फायदा मिळत नव्हता प्रसंगी अनेकांना आर्थिक व मानसिक त्रास झाला .त्यामुळे दिनांक 28 एप्रिल 2021 रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री आरोग्यमंत्री यांना ही बाब लक्षात आणून दिली सतत च्या पाठपुराव्यामुळे आज हा शासन निर्णय निर्गमित झाला आहे त्याबद्दल संघटनेच्या वतीने शासनाचे आभार मानण्यात आले ..मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणेसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर राष्ट्रीय महासचिव  सचिन राजूरकर,समनवयक डॉ अशोक जीवतोडे, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे राज्याध्यक्ष श्री शाम लेडे, राज्य सरचिटणीस अनिल नाचपल्ले , राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर,राज्य समन्वयक विजयकुमार पिनाटे, राज्य सल्लागार गंगाधर गजलवार यांनी विशेष प्रयत्न केले

आपला नम्र
*अनिल नाचपल्ले*
(राज्य सरचिटणीस)
राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ महाराष्ट्र राज्य.
प्रति ,
माननीय संपादक,
दिंनाक: 14/5/2021.
उपरोक्त बातमी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करून आम्हास उपकृत करावे ही विनंती.
धन्यवाद...

Thursday, May 13, 2021

मानसेवी पत्रकार न्यूज पोर्टल प्रतिनिधी यांना korona वॉरियर्स म्हणून सर्व सुविधा विमा योजना लसीकरण मद्ये परिवाराला प्राध्यान्य देण्याबद्दल निर्णय घेण्यात यावेत = श्री प्रशांत बोरकर

निस्वार्थी  प्रयत्नात असणारे  मानसेवी  पत्रकार न्यूज पोर्टल प्रतिनिधी  यांना मेडिकल पॉलिसी व korona वॉरियर्स  म्हणून सर्व सुविधा  विमा योजना  लसीकरण मद्ये परिवाराला प्राध्यान्य देण्याबद्दल निर्णय घेण्यात यावेत = श्री प्रशांत बोरकर  
जळगाव=निस्वार्थी  प्रयत्नात असणारे  मानसेवी  पत्रकार न्यूज पोर्टल प्रतिनिधी   यांचे साठी मेडिकल पॉलिसी व korona वॉरियर्स  म्हणून सर्व सुविधा  विमा योजना  लसीकरण मद्ये परिवाराला प्राध्यान्य देण्याबद्दल निर्णय घेण्यात यावेत अशी मागणी श्री प्रशांत बोरकर  रावेर ,लतिष जैन चोपडा  विजय  पाटील रशीद तडवी  अशोक महाजन संजय दीक्षित  आदी पत्रकार यांनी केली आहे
प्रेस कोन्सील ऑफ इंडिया ने सुध्धा यासंबधी राज्य सरकार ला यासंबधी आवाहन केलं आहे ते पत्र वरिष्ठ पत्रकार श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांना पाठविले आहे त्यासदरभात मुख्यमंत्री महोदय यांचे कार्यालय ने आरोग्य  आपत्ती व्यवस्थापन आणि संभतीत विभागाकडे  कार्यवाही करण्यासाठी काही दिवसापूर्वी  पाठविले आहे त्यांनतर अनेक संघटना पण मंत्री यांनी ही मागणी  मुख्यमंत्री महोदय यांचे कडे केली आहे, त्यावर तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी श्री प्रशांत बोरकर यांच्या सह असंख्य पत्रकार  यांनी केली आहे
रावेर तालु्यातीलआज सकाळी  रावेर चे सामना पत्रकार सतिश नाईक  यांचे  निधन झाले काही दिवसापासून  त्यांचा उपचार जळगाव येथे सुरू होता रावेर तालुक्यातील सावदा येथील सामना पत्रकार केलास परदेशी  यांचे पण त्याचे सह  कुटुंबातील सहा सदस्य यांचे तीन महिन्यात निधन झाले होते  असे शेकडो  पत्रकार कोरोना ने मृत्युमुखी पडले आहेत त्यांना ही  मदत करावी अशी मागणीही  श्री बोरकर आणि असंख्य पत्रकार बांधव केली आहे

पत्रकार श्री.सतीश दादा नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली

*अत्यंत दुःखद घटना...मनमिळावू,अभ्यासू ,रोखठोक व्यक्तिमत्व सामनाचे  रावेरतालुका प्रतिनिधी श्री.सतीश दादा  नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली...त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.. ..😞😞💐💐💐*

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...