Wednesday, February 8, 2023

कचोरी चे प्रेम. आणि शेंगा निवडण्याचे स्वातंत्र्य

रोज काय अनेक वेळा बाहेर ची कचोरी खाल्ली आहे दीड रुपया पासून बारा वीस रुपये पर्यंत.आज ही रावेर मधे पाच रुपये सात आठ दहा आणि बारा रुपये ची कचोरी मिळते पण

घरची ती घरची .असते ते प्रेम .स्वच्छ आणि सुंदर भेसळ रहित मिळते फ्कत त्यासाठी अगोदर बाहेर खावून झाल्यावर त्या खराब घरी पण खावू घ्याल्यावा .वय झाले की मग बायकोला दया येते .त्यात दात पण हळू हळू हलू लागतात
काय मग सकाळ पासून किती वेळा खावू घातल्या.माहीत नाही.चांगल्या झाल्या तरी सकाळीं काय त्रास होतो ते समजेल. देर हे पर अंधेर नाही हे मात्र कचोरी वरून  देवता प्रसन्न झाले..जय कचोरी पुराण आपण संपन्न .नाहीतर पुरण खावून ठार.😆🤩💁🤱👰🎂🙊🎊😳,,,,,,,,
नाव लिहीत नाही.नाहीतर उद्या जेवण मिळायचे नाही.
हा लेख कॉपी करताना सावधान बर😂👰🧑‍🏫✍️

Monday, February 6, 2023

रावेर येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी शिक्षक,शिक्षिका पाहिजेत*.

*
खालील शैक्षणिक पात्रता धारक गरजूंनी त्वरित  संपर्क साधावा.
*1)* एचएससी डी एड/ डीटीएड- 02 जागा 
*2)* बीए, बीएस्सी/ डीएड/ डीटीएड-02 जागा.
  वरील शैक्षणिक पात्रता  असणाऱ्यांना आकर्षक मानधन  दिले जाईल.
 *संपर्क प्राचार्य*
इंग्लिश मीडियम स्कूल  रावेर,तालुका रावेर जिल्हा जळगाव*
mob no 8459673035, 8805441168
धन्यवाद 🙏

रावेर चे त्र्यंबकेश्वर विद्यालय घेणार 151 विद्यार्थ्यांना दत्तक

& &
  त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालय रावेर तालुका रावेर जिल्हा जळगाव या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावी शिक्षण घेत असलेल्या 151विद्यार्थ्यांना शाळा घेणार  दत्तक प्रवेशासाठी गरीब पिवळे  कार्डधारक निराधार तळागळातील विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत प्रवेश दिला जाणार आहे सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश शैक्षणिक वर्ग निहाय पाठ्यपुस्तके वह्या शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे पालकांनी  विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करून घेण्यासाठी शाळेतर्फे आवाहन करण्यात येत आहे
 संपर्कासाठी, मुख्याध्यापक - त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालय रावेर तालुका रावेर जिल्हा जळगाव
Mob no 8805441168,8459673035

Sunday, February 5, 2023

जोधपूरमधील त्या ‘दोन अंगठ्याची’ कमालमान, पाठ, कंबर यावर उपचार करणारे जादूगारमधुकर भावे


आॅगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दोन महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ.पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई-पिंपरी-चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा एक विपरीत परिणाम माझ्या कमरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही. कंबर दुखू लागली, पायापर्यंत चमक मारु लागली. मंगलाच्या आजारपणामुळे माझ दुखण महत्वाच नव्हतं, त्यामुळे ते अंगावर काढल. त्यानंतर चालण असह्य झालं. म्हणून प्रथम डॉ.सुबोध मेहता मग डॉक्टर कपिल अशा नामवंत वैद्यक शास्त्र्यांकडून तपासणी झाली, एम.आर.आय झाला, इंजेक्शन झाली, गोळ्या सुरु झाल्या. चालता येईना, दुखण थांबेना. वेदना असह्य झाल्यावर आणि दुखण बर होत नाही अस जाणवल्यावर निराशा येत गेली त्यातच मंगलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, निराशेत आणखी भर पडली. काय उपचार करावे सुचत नव्हते, डॉक्टरांनी मणक्याचे आॅपरेशन सुचवले, पण ते करणे धोक्याचे आहे, असे त्यांनीच मत दिले. आता काय करायचे?.. काही प्रश्नांची उत्तर नियती देत असते. एक दिवस अचानक माझे दोन मित्र श्री. किशोर अग्रहाळकर (नवी मुंबईचे माजी नगररचनाकार) आणि श्री. अशोक मुन्शी माझ्याकडे आले. माझ दुखण पाहून त्यांनी सुचवलं की, ‘जोधपुरला चला’ असं सांगायलाच आलो आहोत. दोन्ही जिव्हाळ्याचे मित्र. जोधपूरला उपाय काय माहित नाही, त्यांच्यावर विश्वास ठेऊन जोधपूरला जायचं ठरले. त्यांनी सांगितले की, डॉ. गोवर्धनलाल पाराशर हे विख्यात डॉक्टर दोन अंगठयांनी कंबर, मणका, मान, पाय याठिकाणी ज्या मांसपेशीमध्ये शीर दबलेली असते तिला बरोबर मार्गी लावतात आणि अवघी दहा मिनीटाची त्यांची जादू. करुन तर बघा.... चार डॉक्टर झाले होते, चार प्रयोग झाले होते. पाचवा प्रयोग करु या, असं समजून जोधपूरला निघालो, सोबत माझी सुविद्य कन्या डॉ. मृदूला (एम.एस. एफ.आर.सी.एस) हीसुध्दा होती. विमानात बसताना पायंड्या चढता आल्या नाहीत. व्हिलचेअरवरुन आत जावे लागले. उतरताना व्हिलचेअरची गरज लागली.... पुढे काय होणार माहित नव्हते. ४० मिनीटात
डॉ. पराशर यांच्या ‘आॅस्टियोपॅथी’ प्रयोगासाठी त्यांच्यासमोर उभा राहीलो. त्यांनी उपचार सुरु केले. त्यांच्या रुग्णालयात सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ५ पर्यंत रोज ३०० लोकांवर, या सर्व व्याधींवर उपचार केले जातात. त्यांचे बंधू डॉक्टर नंदु, ज्येष्ठ चिरंजीव डॉ. गिरीराज, दुसरे चिरंजीव डॉ.महेश आणि अन्य डॉक्टर सहकारी अशा १२ जणांची टीम ३०० रुग्णांवर पाचवाजेपर्यंत उपचार करते. जे रुग्ण लंगडत आलेले असतात, ज्या रुग्णांना कमरेला विळखा घालून उचलून आणलेले असते... अशा अनेक व्याधी असलेले रुग्ण जवळपास रडत रडतच येतात आणि १० मिनीटाच्या उपचारानंतर टकाटक चालत, हसत आनंदाने परतताना दिसतात, ते सर्व मी बघत होतो. डॉक्टर गोवर्धनजी मला म्हणाले ‘आपका तो कुछ भी नही है। दो दिन मे ठीक होके मुंबई जाओगे।...’ मी ऐकत होतो. पाचवा प्रयोग आहे असच म्हणत होतो. डॉक्टरांच्या सोबत उपचाराच्या खोलीत गेलो. एका रुंद टेबलावर त्यांनी झोपवलं. दोन अंगठयांनी मणक्याची शीर दाबायला सुरुवात करुन कमरेपर्यंत दोन अंगठ्यात दुखरी शीर पकडत ते खालपर्यंत येत होते, पुन्हा वर जात होते... मला फरक जाणवू लागला. पायापर्यंत जाणारी चमक पहिल्या पाच मिनीटात कमी झाल्याच जाणवलं. पुढच्या पाच मिनिटानंतर डॉक्टर म्हणाले, ‘चलो उठो.... आप खुद चल के जा सकते हो।’... मी टेबलवरुन खाली उतरलो. माझी पावलं ताड-ताड पडू लागली. काय झालयं मलाच समजेना आवाजात एकदम फरक पडला, उत्साहात फरक पडला.  नियती काय घडवतं असते. त्याचा अनुभव करत होतो.  डॉक्टरसाहेबांजवळ येऊन बसलो.... कैसा महसूस कर रहे हो।... त्यांच्या प्रश्नावर इतकच म्हणालो की, ‘विश्वास बसत नाही असं काही तरी घडलं आहे. पुराणामध्ये एक कथा आहे की, भगवान श्रीकृष्णांन एका करंगळीवर अख्खा गोवर्धन पर्वत उचलला होता... मोठी रोचक कथा आहे. त्याचे मित्र असलेले पेंदे काठ्या टेकून उभे होते, पर्वत उचलला होता श्रीकृष्णाच्या करंगळीवर , ते बघायला कुणीच गेल नाही. पण माझ्या समोरच्या डॉक्टरांनी हाताच्या दोन अंगठयांवर हजारो रुग्णांची व्यथा आणि पिडा गोवर्धन पर्वतासारखीच उचलली आणि त्यांची पिडा दूर केली. विलक्षण योगायोग म्हणजे त्या वैद्यकशास्त्राच नाव डॉक्टर गोवर्धनच आहे. अंगठयाची कमाल आहे. सेवेची आणि ‘आॅस्टियोपॅथीच्या अभ्यासाची ही साधना आहे.
डॉक्टरांनी एक पुस्तक हातात दिलं. उलटून बघितलं, विश्वास बसला नसता. फोटोसकट सगळी सचित्र माहिती होती. मान, पाठ, मणका, पोटºया एवढेच नव्हेतर हाताची एकमेकांवर चढलेली बोटं अशा अनंत व्याधी घेऊन डॉक्टरसाहेबांकडे कोणकोण आले आणि हे जागतिक किर्तीचे लोक अंगठयाच्या जादूने बरे होऊन गेले. त्यांनी कोणत्या कोणत्या शब्दात डॉक्टरांचं वर्णन कसं केलं... सगळ वाचून थक्क झाले. या उपचारामध्ये आहेत, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अमेरिकेचे माजी राष्टÑपती डॉ. जॉर्ज बुश, बराक ओबामा, भारताचे माजी राष्टÑपती डॉ. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, आजचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सिनेतारकांमध्ये देवानंद, राजेश खन्ना, धर्मेद्र, मिथुन चक्रवर्ती, सलमान खान, सनी देओल आणि शेवटची दोन नाव.... लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या सर्वांचे या ना त्या रुपात डॉक्टरांनी उपचार केलेले आहेत आणि त्या सर्वांच्या व्याधी दूर केलेल्या आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख््यमंत्रीु अर्जुनसिंग चक्क सहा दिवस दाखलच झाले होते. या महारथींच्यापेक्षा सुध्दा सकाळी ८ ते  संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जी सामान्य माणसं येतात त्यांच्या चेहºयावरचा आनंद विलक्षण आहे आणि प्रत्येकाची फी फक्त रुपये १००/-....
आणखी एका किस्सा सांगतो. ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मातोश्री श्रीमती कोकिलाबेन अंबानी यांच्या उपचारासाठी त्यांना जोधपुरात आणलं होतं. तो योग साधून त्यांचा वाढदिवस मुकेशजींनी जोधपूरमध्ये साजरा केला. ४०० मित्रांना वाढदिवसाला बोलावलं, १० चॅटर्ड विमान आणली, सगळी फाईव्हस्टार हॉटेल्स बुक केली, ५ कोटी रुपये खर्च केला म्हणतात आणि नंतर डॉक्टर गोवर्धनलालजींना ते म्हणाले, ‘मी मुंबईमध्ये ५-२५ कोटी रुपये लावून तुमच्या उपचारांसाठी फाईव्हस्टार रुग्णालय उभं करतो, तुम्ही तिथे या. मला डॉक्टर गोवर्धनलाल यांची विशेषता यातच वाटते की, त्यांनी काय सांगितलं?..
‘मुकेशभाई, आपका वह सेंटर तो फाईव्हस्टार हॉटेलसेभी उपर के लेवलका होगा, जाहीर है की ऐसे संस्थानमे मै गरीब तो क्या, मध्यमवर्ग का आदमी भी पहुंच नही सकता, मै विनम्रतापूर्वक इसे स्वीकार नही कर सकता, क्योंकी, जहा, गरीब रुग्ण की मेरे हाथसे सेवा नही हो सकती ऐसे हेल्थकेअर सेंटर मे  मेरी विद्या किस काम की?....’
डॉक्टर गोवर्धनलाल पराशर यांची प्रखर मानसिकता, त्यांची उच्च विचारसरणी, व्यावसायाची निष्ठा आणि सामाजिक धाडस या सर्व गोष्टीचा परिचय त्या एकाच घटनेत होऊ शकतो.
सहा दिवस उपचार घेतले, आज मी टकाटक पूर्वीप्रमाणे झपाटून कामाला लागलो आहे. जगात १६०० कोेटी लोक राहतात, त्यांचे ३२०० कोेटी अंगठे आहेत पण जोधपूरमधले डॉक्टर गोवर्धनलाल पाराशर यांचे दोन अंगठे जगातल्या ३२०० कोटी अंगठयांपेक्षा वेगळे अंगठे आहेत. ‘अंगठा दाखवला’ असा मराठीतला वाकप्रचार फार वाईट अर्थाने वापरला जातो. जोधपूरले हे दोन अंगठे कमाल करणारे अंगठे आहेत. मी मुंबईला परत निघताना डॉक्टरसाहेबांना सांगितलं की,....
‘डॉक्टरसाहब, आपका तहेदिलसे ऋणी हू। आज मुंबई जा रहा हू। जोधपूर के दोन अंगुठे का डंका मुंबई आणि पुरे महाराष्टÑ मे बजानेकी मेरी जिम्मेदारी, आप से मेरा इतनाही वादा....’
मुंबईला आल्यावर अनेक महिने थांबलेला व्यायाम पूर्ववत सुरु केला आहे. मंगलाच्या निधनाने दु:ख पचवून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. डॉक्टर गोवर्धन यांची ही यशस्वी गाथा महाराष्टÑभर सामान्य माणसाला उपयोगी पडेल यासाठी मुंबई, पुणे, नागपूर या दोन-तीन ठिकाणी डॉ. पाराशर यांची आरोग्य शिबीरे आयोजित करण्याचे काम सुरु केले आहे. नियती या कामात यश देते की नाही ते पाहूया..

Address: Shree Sanwar Lal Osteopath charitable sansthan 18 E, Chopasni Housing Board, Jodhpur, Rajasthan 342008

Phone: 0291 297 2777

Sunday, December 25, 2022

ओबीसी नेते श्री प्रशांत बोरकर आणि कुमार कुंभार यांचे कडून सरपंच गडदे यांचे अभिनंदन

नवनिर्वाचित सरपंच दशरथ गडदे  यांचा सत्कार करताना  ओबीसी नेते श्री कुमार कुंभार आणि राजद कार्यकर्ते ग्रामस्थ मंडळी। अभिनंदन। प्रशांत बोरकर प्रवक्ते ओबीसी नेते पत्रकार तरुण तडफदार

Saturday, December 24, 2022

हजारो वीज कामगार लढास राष्ट्रीय जनता दलाचे समर्थन👍राजद नेते श्री प्रशांत बोरकर

हजारो वीज कामगार यांच्या खाजगीकरण विरोधी लढास 
राष्ट्रीय जनता दलाचे समर्थन👍
राजद नेते श्री प्रशांत बोरकर

मुंबई।
वीज कंपन्या चे खाजगी करण हे वीज कर्मचारी बरोबर वीज ग्राहक आणि शेतकरी यांच्या हिताचे  नसून राष्ट्रीय जनता दल वीज कर्मचारी यांचे  बाजूने उभा असल्याचे राष्ट्रिय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांनी पत्रकार यांचेशी बोलताना सांगितले

महाराष्ट्र राज्य सरकारवीज कंपनीचे खाजगीकरण धोरण घेत असून त्यास सर्व वीज कर्मचारी व त्यांच्या संघटना विरोध करत असून त्यासाठी वीज कामगार रस्तावर उतरले असून काल विधिमंडळ अधिवेशनावर मोर्चा काढला वीज कामगार संघटना यांच्या धोरणास मागण्यास राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव श्री प्रशांत बोरकर यांनी पाठिंबा दिला आहे

दोंडाईचा ते मुंबई सेंट्रल खान्देश एक्सप्रेस रावेर हुन सुरू करा प्रवासी नेते राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांची मागणी


भुसावल

दोंडाईचा ते मुंबई सेंट्रल खान्देश एक्सप्रेस रावेर हुन सुरू करा
प्रवासी नेते 
राष्ट्रीय जनता दलाचे  नेते श्री  प्रशांत बोरकर यांची मागणी केली आहे
सध्या भुसावल  रेल्वे स्टेशन वर गर्दी असल्याने भुसावल ऐवजी रावेर परिसरातील  स्टेशन सारखा मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक करणारे लोक यांचा  विचार ना करता   चुकीचे पध्दतीने गाड्या जाहीर करण्यात येत आहेत
त्याचा प्रवासी जनतेला काही फायदा होत नसून रावेर खडवा लोकसभा  मतदार संघातील जनतेवर जाणून बुजून अन्याय होत आहे 
रेलवे चे मिटिंग मध्ये रावेर च्या बाबतील एकही मागणी केली जात नाही एकाही रावेर च्या प्रवासी नेताची वर्णी समितीवर नाही आणि जे काही आहेत ते रावेर चे प्रश्नावर  बोलत नाही रावेर चे बाबतीत रेल्वे प्रशासनाने लक्ष्य ध्यावे  बुऱ्हाणपूर रावेर हुन पुणे मुंबई सुरत साठी रेल्वे गाड्या सुरू करा जुन्या गाड्या रावेर हुन सोडण्यात याव्यातअशी मागणी प्रवासी नेते आणि  राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांनी केली आहे

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...