Tuesday, July 6, 2021

आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागासाठी खेळाडूंनी आर्थिक सहाय्य योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत

आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागासाठी खेळाडूंनी 
आर्थिक सहाय्य योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत
                                                -जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे

सांगली दि. 6 (जि.मा.का.) : राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय पारीत झाला आहे. ही योजना संचालनालय स्तरावर कार्यान्वित आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत किंवा आयुक्त क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन, देश विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे, तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, आधुनिक क्रीडा साहित्य आयात / खरेदी करणे, गणवेश इत्यादी बाबींसाठी अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे. 
या योजनेसाठी पुढील 14 अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता दिली आहे. ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक, ज्यु. विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप, वर्ल्ड कप. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ज्या खेळ / क्रीडा प्रकारांचा समावेश असेल तेच खेळ / क्रीडा प्रकार या नमुद स्पर्धांमध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय होतील. मात्र अपवाद कबड्डी, खो-खो, मल्लखांब या देशी खेळांचा अपवाद शासन निर्णयान्वये करण्यात आलेला असल्याचे श्री. वाघमारे यांनी सांगितले.
00000

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...