Thursday, March 5, 2020

*महात्मा फुले ब्रिगेडच्या मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष पदी डॉ सुनिल देवरे यांची नियुक्ती*


मुक्ताईनगर प्रतिनिधी :-
 सामाजिक कार्यकर्ते डॉ सुनिल देवरे यांची महात्मा फुले ब्रिगेडच्या मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली ही निवड महात्मा फुले ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चांबारगे, जळगाव जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन यांनी केली,डॉ.सुनिल देवरे यांची समाजकार्याची आवड पाहता सर्व समाज कार्यात पारदर्शकता, निर्भीडता व सामाजिक भावनेतून सर्व समाजाला सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक ,राजकीय कार्यामध्ये योगदान   व मोठ्याप्रमाणात जनसंपर्क पाहून ही जबाबदारी महाजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे,डॉ सुनिल देवरे यांची मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे त्यांचावर मित्रपरिवाराकडून मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो*!!!😜🤣या मागची खरी कथा काय आहे वाचा ही वायरल पोस्ट😢😢😢😢🤣

बाॅसने एक स्पर्धा लावली. *"शेकडो मगरी असलेल्या त्या तळ्यात जो कोणी एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत सुरक्षित पोहून जाईल त्याला 50 लाखाचे बक्षीस मिळेल. आणि जर का यात तो मगरींकडून मारला गेला तरी  त्याच्या वारसाला 10 लाख मिळतील"*.
      तिथे आलेल्या स्टाॕफ पैकी एकही माणूस हे आव्हान स्विकारायला तयार नव्हता.

 पण काही वेळेनंतर *अचानक एकाने तळ्यात उडी मारली.* त्याला पकडायला आलेल्या मगरींचा जीवघेणा पाठलाग पाहून जिवाच्या आकांताने पोहून कसेबसे तळ्याचे दुसरे टोक गाठलेच आणि शर्यत जिंकला.

   *भीतीमुळे थरथर कांपत थोडावेळ किना-यावर बसल्यावर तो* एकदम रागाने ओरडला, 
*"कोणी मला मागून तळ्यात ढकललं होतं?*".

बघतो तर काय, *ज्या व्यक्तीने त्याला तळ्यात ढकलले,ती खुद्द त्याचीच बायको होती.* 
जिंकले तर 50 लाख , हरले तर 10 लाख होतेच.

आणि तेव्हापासूनच ही *म्हण अस्तित्वात आली* 👇👇👇


*प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो*
!!!😜🤣😢😢😢😢🤣🤣🤣🤣

वायरल मेसेज,,,===आर्थिक नियोजन करा.**प्रत्येक व्यक्तिने आर्थिक नियोजन खालील प्रमाणे करावे, असे मला वाटते. अनेक नोकरी,धंदा,व्यवसाय नियोजन अभावी अडचणीत किंवा डब घाईला जातात.*

*💰आर्थिक नियोजन करा.*
*प्रत्येक व्यक्तिने आर्थिक नियोजन खालील प्रमाणे करावे, असे मला वाटते. अनेक नोकरी,धंदा,व्यवसाय नियोजन अभावी अडचणीत किंवा डब घाईला जातात.*

*👉 आपल्या महिन्याच्या एकूण इन्कम पैकी जास्तीत जास्त 25% च रक्कम ही घर खर्चासाठी वापरली गेली पाहिजे.बाकीच्या रकमेचे सुनियोजित नियोजन केले पाहिजे*

*👉दरवर्षी 25% रक्कम ही बँक कर्ज, देणी, ईतर देण्यासाठी नियोजन करुन बाजुला गुंतवणूक करुन ठेवावी.*

*👉 दरवर्षी 30% रक्कम ही धंदा,व्यवसाय वाढविण्यासाठी गुंतविली पाहिजे.*

*👉 दरवर्षी 10% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी बचत केली पाहिजे.*

*👉 दरवर्षी 10% रक्कम ही आपल्या मनोरंजनासाठी, वैयक्तिक वापरासाठी किंवा राखीव निधी म्हणून असावी.*

*👉बॅंकेतच एखादी मासिक गुंतवणूक म्हणून रिकरिंग (R.D).ही असावी कारण अडचणीच्या  वेळी कामाला येते.*

*👉कमीतकमी पुढील "6" महिन्यांचा घर-ऑफिस खर्चाची तरतूद अगोदरच असायला हवी, धंदा व्यवसायात मंदि आली तरीही त्यावर "6" महिने पुढील सोय होईस्तोपर्यंत आपले घर व इतर खर्च चालवता येतील.*

*👉 सेकंड होम ही इन्व्हेस्टमेंट नाही.सर्व्हे असे दर्शवतो को सेकंड होम हे एकूण व्याज,खर्च,आणि वाढती महागाई वगळून जास्ती जास्त 5% फायदा करून देऊ शकते.*

*👉 "50" वयानंतर कुठली ही देणी, कर्जे आपल्या अंगावर शक्यतो असू नयेत ,कारण या काळात मुलांची उच्चशिक्षण, लग्न ही या काळात होतात त्याचे प्लॅनिंग आपल्या "25" वर्ष वयापासूनच करायला हवेत.*

*👉 बँकेत पती-पत्नीचे जॉईंट अकौंट असणे अनिर्वाय व आवश्यकच आहे. सदर खात्यावर वर्षातून एकदातरी व्यवहार करा म्हणजे बैंक खाते नियमित चालू राहील*

*👉 आपली प्रॉपर्टी ही पती-पत्नी दोघांच्या नावे असावी, कारण कायदेशीररीत्या पती/पत्नीच्या मृत्यू नंतर पत्नी/पती वारसदार असतात आणि नंतर मुले असतात.*

*👉 प्रत्येकाचा जनरल व मेडिक्लेम इन्शुरन्स असणे गरजेचे आहे.कारण काही अचानक संकटात तेच आर्थिक मदत म्हणून कामाला येते*

*👉 टर्म इन्शुरन्स असणे ही आता काळाची गरजच आहे, हेच पुढे तुमच्या कुटुंबाला संरक्षण देते.*

*👉 कुठलेही इन्व्हेस्टमेंटचे निर्णय हे भावनिक दृष्टिकोनातून घेऊ नये.पूर्ण विचार करुन आर्थिक नियोजन सांभाळून करावी कर्जबाजारी होऊन करू नये*

*👉 आजच्या युगात मेडिक्लेम असणे अत्यंत आवश्यक आहे हॉस्पिटलाचा खर्च खुप वाढलेत त्यासाठी प्रत्येक कुटुंबात मेडिक्लेम पॉलिसी ही अत्यन्त गरजेची आहे.*

*👉 जर बँकेत चोरी, किंवा आग लागल्यास आपल्या बँकेतील लॉकर वर फक्त आता पाच लाख पर्यन्त रक्कम बँक रिटर्न म्हणून देऊ शकते.उरलेले नुकसान आपले असते.*
*👉 तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करणे टाळू नाही शकत,पण योग्य इन्व्हेस्टमेंट करून टॅक्स कमी करू शकतात.तुमचे उत्पन्न जास्त असो वा कमी असो, टॅक्स फाईल केल्यास भविष्यात खूप फायदे होतात.सर्वात मोठा फायदा म्हणजे योग्य लोन, हेच तुम्हाला धंदा व्यवसायात पुढे नेऊ शकते.*

*👉 सर्व संपत्ति,जमीन,जागा,गुंतवणूक,सर्व कर्जे, इतर येणी/देणी फायनेन्शियल कागदपत्रे ही व्यवस्थित ठेवा,याची माहिती आपल्या कुटुंबाला सर्व जबाबदार म्हणजे पती/पत्नी ,मुले, इत्यादिना आवश्य देऊन ठेवाच. जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत किंवा तुमच्या संकटात तुमचे फॅमिली मेंबर्स ते योग्यप्रकारे वापरु शकतील.*

*👉आपला प्रोग्रेस ग्राफ दर तीन महिन्यांनी चेक करा.कारण त्या ग्राफ प्रमाणे आपली इनवेस्टमेंट, व्यवसाय निर्णय बदलता येतात.विचार करा व पुन्हा वाचा व आताच निर्णय घ्या!दिवसा मागुन दिवस,वर्षा मागुन वर्ष निर्णयाशिवाय कसे निघुन जातात हे कळत नाही.म्हणुन..आजच या मुद्द्यांवर आधारीत उज्वल व सुरक्षित भविष्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करा...!*
-----------------------
💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹 अाधिक माहिती साठी संपर्क साधावा 8208361187

Wednesday, March 4, 2020

कर्जमुक्तीच्या तक्रारींसाठी दुरध्वनी व संकेतस्थळ उपलब्ध


 जळगाव, (जिमाका) दि. 4 - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 ची अंमलबजावणी सुरू असून सद्य:स्थितीमध्ये शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण होत नाही अथवा कर्जरक्कम व इतर तपशील चुकीचा आलेला आहे. त्यांचेबाबतीत पोर्टलवर ऑनलाईन तक्रार तयार होवून संबंधित तालुका तहसील कार्यालयात अथवा जिल्हास्तरीय समितीकडे वर्ग होत आहेत.
 असे असूनही ज्या शेतकऱ्यांच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 बाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक-3 पहिला मजला, आकाशवाणीजवळ, जळगाव या कार्यालयाशी प्रत्यक्ष किंवा कार्यालयाच्या 0257-2239729 या दुरध्वनी क्रमांवर तसेच karjmukti.jalgaon@gmail.com या कार्यालयीन संकेत स्थळावर तक्रार करावी. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव श्री. मेघराज राठोड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0000

बहुजन क्रांति मोर्चाद्वारे भारतभर एनआरसी,विरोधात व डिएनए बेस एनआरसी लागु होण्याच्या समर्थनात आज धरना प्रदर्शन

रावेर,बहुजन क्रांति मोर्चाद्वारे रावेर तालुका संयोजक मा.नीतीन गाढे सर यांचे नेतृत्वामध्ये बहुजन क्रांति मोर्चा राष्ट्रीय संयोजक मा.वामन मेश्राम साहेब यांचे आदेशानुसार भारत भराप्रमाणे रावेर शहरात तहसील कार्यालयासमोर document बेस एनआरसी,सीएए,एनपीआर,ईव्हीएम यांचे विरोधात व डिएनए बेस एनआरसी लागु होण्याच्या समर्थनात आज दि.४.३.२०२०,वार ः बुधवार रोजी  धरना प्रदर्शन करण्यात आले,अजुन बर्याच मागण्या धरनेमध्ये करण्यात आल्या,जैसे कि ओबीसींची जातिआधारित गणना करण्यात यावी,पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे,खाजगीकरण थांबविण्यात यावे,सरकार कंपन्यांना विकणे थांबविणे,आदिवास्यांना हिंदू बनवि्याचे षडयंत्र थांबविण्यात यावे,आदिवासी यांच्या धर्माला मान्यता देण्यात यावी,५वी सुची व सहावी सुची लागु करण्यात यावी,नाॅमिनेटेड प्रतिनिधित्व थांबविण्यात यावे,पुणे करार करतेवेली अनूसुचित जाती जनजाती च्या प्रतिनिधित्वासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची सहमती स्वाक्षरी करुन घेतली होती,पण त्यानंतर मागील ७० वर्षापासुन अनुसुचित जाती जनजाती च्या कोणत्याही संघठनेकडुन किंवा नेतृत्वाकडुन सहमती घेतली नाही आणि दर दहा वर्षांनी अशा प्रकारे आरक्षण वाढविण्यात आले,तर अशाप्रकारचे नाॅमिनेटेड प्रतिनिधित्व थांबविण्यात यावे ,घूमंतु जनजातीच्या लोकांना राष्ट्रिय मान्यता देण्यात यावी,लिंगायत व सीख धर्मियांना स्वतंत्र मान्यता देण्यात यावी,एस-एसटि-ओबीसी तथा धार्मिक अल्पसंख्यांकांवर होत असलेले अन्याय अत्याचार थांबविण्यात यावे,महीलांवर होत असलेला शारिरीक व मानसीक छल थांबविण्यात यावा,माईनाॅरिटिज मध्ये खासकरुन सीख ,मुस्लीम व ख्रिश्चन यांचेकरिता कम्युनल राॅयट स् प्रिव्हेन्शन अॅक्ट बनविण्यात यावा,सफाई कर्मियांची होत असलेली ठेकेदारी प्रथा थांबविणे,शेतकर्यांना दिड गुणा जास्त दाम देण्यात यावा,या सर्व मुद्यांना घेऊन रावेर येथील मा.तहसीलदार मॅडम मा.ऊषाराणी देवगुणे मॅडम यांना बहुजन क्रांती मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले,
   प्रसंगी शेकडो कार्यकर्ते ऊपस्थित होते,जसे कि संविधान जागर समितीचे अध्यक्ष मा.साहेबराव वानखेडे,जमाएते ईस्लामि हींदचे मा.शफिऊद्दिन शेख कासम सर,मुस्लीम पंच कमिटीचे शेख गयास शेख रशीद सर,मा.युसुफ खान सर,मा.ईरफान शेख सर चिनावल,मा.नासीर खान चिनावल,मा.नजिर शेख सर,मा.रविंद्र तायडे सर,मा.संघरक्षित तायडे सर(निले निशाण),आत्माराम कोली,भागाबाई जाधव,याकुबखाँ मोहम्मदखाँ,सुरेश तायडे,नितीन पाटील,संतोष ढिवरे,विनायक तायडे,ऊमेश अढागले व खेड्यावरील ईतर सर्व कार्यकर्ते ऊपस्थित होते,धरना प्रदर्शन यशस्वितेकरिता खासकरुन पोलीस प्रशासन रावेर स्टेशन यांनी सहकार्य केले,

Tuesday, March 3, 2020

*इ. 10 वी चा पेपर फुटला नाही**प्रा. वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण यांचे स्पष्टीकरण



मुंबई : दि. 03 मार्च 2020
इ. 10 वी परीक्षा केंद्र क्र. 3351, कुऱ्हा, काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त प्रसिध्द झाले होते. याविषयी अधिकाऱ्यांकडुन माहिती घेतली. याबाबत नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला. विभागीय सचिवांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार वरिल परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे नमूद केले आहे. प्रश्नपत्रिका फुटीचे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे इ. 10 वी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे.

सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षेनिमित्त हार्दिक शुभेच्छा! असेही मंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आवर्जून नमूद केले.

दरम्यान, अशा पध्दतीच्या पेपरफुटीच्या बातम्या पसरविणाऱ्या माध्यमांनीही परीक्षार्थींच्या मानसिकतेवर परिणाम होईल, अशा बातम्या प्रसिध्द करू नये असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री, प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले.

00000

Monday, March 2, 2020

अंबिका व्यायाम शाळेतर्फे रावेर तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धचे आयोजन

 दि 1/3/2020 रविवार रोजी संध्याकाळी 7 वाजता अंबिका व्यायाम शाळेतर्फे  रावेर तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धचे आयोजन करण्यात आले  अध्यक्ष यशोधन ॲग्रो चे युवराज महाजन, उद्घाटक वल्लभ मेडिकल चे मालक चैतन्य  महाजन होते पंच म्हणून राधेश्याम पैलवान , योगेश प्रजापती सखाराम असलकर, अजय महाजन बापू सर, जयेश बिरपन यांनी काम पाहिले,
स्पर्धेत एकूण  12  जोडी पैलवानांनी  भाग घेतले ,कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन , उपाध्यक्ष रवींद्र महाजन, सचिव अशोक पाटील, भगवान चौधरी, ऍड, तुषार माली, यशपाल परदेशी , ललित चौधरी, संजय लोहार, विकास देशमुख गणेश महाजन व इतर कार्यकर्त्यांनी सहकार्य केले🙏💐

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...